शब्द्नाद - पगार, वेतन, Salay..या शब्दांची जन्मकथा..
लेखनप्रकार
पगार, वेतन, Salay..
सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो.
महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने 'पगार' घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!
मित्रांनो हा कोणत्याही भाषीकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात 'पोर्तुगीज़' आहे हे माहित आहे का आपल्याला..?
'हापूस (अल्फान्सो)' आंब्याप्रमाणेच 'पगार' हा शब्द देखील आपल्याला गोव्यातील पोर्तुगीज़ांकडून वारशात(?) मिळालेला आहे.
('हापुस' व 'पायरी' हे शब्द पोर्तुगीज 'अल्फान्सो' व 'परेरा' या शब्दांचे अपभ्रंश आहे.)
पोर्तुगीज 'पागा' या शब्दापासून 'पगार' हा शब्द सिद्ध झाला आहे व त्याचा मुळ पोर्तुगीज अर्थ 'श्रमाचा मोबदला' असाच आहे. कोळी बांधव मासेमारीला 'मासे पागणे' असे म्हणतात ते याच अर्थाने इतकेच कशाला मुंबईतील लोक खोली घेताना 'पागडी' देत, म्हणजेच मालकाला 'मोबदला' देत तोही याच अर्थाने.
'वेतन' हा शब्द चक्क वेताच्या छडी वरून आला आहे. तर कसा ?
फौऊन्टन पेनाचा शोध लागण्यापुर्वि बोरूने लिहीण्याची पद्धत होती व हा बोरू वेतापासून बनवत असत. वेतापासून तयार केलेल्या बोरूने कारकून लिखानाचे काम करीत व त्याबद्दल त्यांना जो मेहेनताना दिला जाई त्याल 'वेतन' असे नांव प्राप्त झाले.
'वेतन' या शब्दाची आणखी एक गम्मत आहे. वेताची काठी म्हणजे गवताचाचं एक प्रकार. अतिशय 'लवचीक' असणे हा या वेताचा गुणधर्म! आता बघां, नोकरदार माणसानं 'लवचीक' म्हणजे दुल-या अर्थाने 'नम्र' असावच लागतं असेच 'वेतन' शब्द सुचवित नाही का?
'पगार' हा शब्द साधारणतः शारिरीक कष्टाची कामे करणारा कामगार वर्ग उपयोगात आणतो तर 'वेतन' हा शब्द पांढरपेशे बुद्धीजीवी नोकरदार वापरतात. ही विभागणी आजही लक्षात येते.
इंग्रजी 'Salary' हा शब्द मुळ रोमन असून तो 'Salt' म्हणजे 'मीठ' या शब्दापासून तयार झाला आहे. पुर्वीच्या काळात रोमन सैनिकांना दिला जाणारा मोबदला मीठाच्या स्वरूपात दिला जाई तर फ्रान्सच्या सैनिकांना मीठ देण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी 'सोल' या नांवाचे नाणे दिले जाई. है मीठ सैनिकांना त्यांच्या घोड्यासाठी उपयोगास येई. पुढच्या काळात मीठ देणे बंद झाले तरी केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी Salary हा शब्द सुरूच राहीला.
आपणं नेहेमी आपल्या मेहेनतीच्या पैशाला 'घामाचा पैसा' असे म्हणतो. आता बघा, घामाची चव खारट असते म्हणजेच त्यात 'मीठ' असते हे विज्ञान सांगते. म्हणजे 'Salary' हा मोबदल्यासाठी किती योग्य शब्द आहे नाही? आपल्या मराठीतील 'खाल्ल्या मीठाला जागणे' या वाकप्रचाराचा अर्थ आता आपल्या नीट लक्षात येईल.
गणेश साळुंखे
९३२१८११०९१
वाचने
18284
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
या बद्दल अजुन काही माहिती
या सर्व etymologyचा स्रोत काय
In reply to या सर्व etymologyचा स्रोत काय by आदूबाळ
मराठी व्युत्पत्ती कोश..
In reply to मराठी व्युत्पत्ती कोश.. by ग्रेटगणेश
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
In reply to महाराष्ट्र राज्य साहित्य आणि by आदूबाळ
तुम्ही म्हणताय तो विश्वकोश.
In reply to तुम्ही म्हणताय तो विश्वकोश. by ग्रेटगणेश
इथे पहा. "ब) योजनांतर्गत
In reply to इथे पहा. "ब) योजनांतर्गत by आदूबाळ
मराठी व्युत्पत्ती कोशाचे
In reply to मराठी व्युत्पत्ती कोशाचे by बॅटमॅन
हां ये ब्बात! हीच माहिती हवी
In reply to हां ये ब्बात! हीच माहिती हवी by आदूबाळ
आदूबाळ, सोहो स्ट्रीटच्या
In reply to आदूबाळ, सोहो स्ट्रीटच्या by हाडक्या
काय सांगता? खरं का काय??????
In reply to काय सांगता? खरं का काय?????? by बॅटमॅन
हो तंर.. आहांत कुठे ?? :))))
In reply to हो तंर.. आहांत कुठे ?? :)))) by हाडक्या
आयला सहीच की!!!! अत्र्यांची
In reply to आयला सहीच की!!!! अत्र्यांची by बॅटमॅन
(डोले मिचकावणारी स्माईली
In reply to (डोले मिचकावणारी स्माईली by हाडक्या
कोनाचं डोलं मिचकावनारी?
In reply to कोनाचं डोलं मिचकावनारी? by सूड
सूड्ण्यास अधिक सांगणे न लगे..
In reply to तुम्ही म्हणताय तो विश्वकोश. by ग्रेटगणेश
कोश
शब्दांच्या ज्ञन्मकथा मस्त
In reply to शब्दांच्या ज्ञन्मकथा मस्त by गणेशा
सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु
In reply to शब्दांच्या ज्ञन्मकथा मस्त by गणेशा
सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु
ग्रेट गणेशजी तुम्ही खरंच
घामाची चव खारट असते
In reply to घामाची चव खारट असते by सूड
खौचट
In reply to घामाची चव खारट असते by सूड
@ आता घामाची चव घेऊन बघणे आले
In reply to @ आता घामाची चव घेऊन बघणे आले by स्पा
बोल्लास?
छान.
वेतनबद्दल असहमत आहे. हा शब्द
In reply to वेतनबद्दल असहमत आहे. हा शब्द by बॅटमॅन
वेताशी संबंध लावणे कै च्या कै शी सहमत.
In reply to वेताशी संबंध लावणे कै च्या कै शी सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by प्रचेतस
वेतावरुन वेतन अंहं. कब्बी नै.
पगार शब्द पोर्तुगीजच* आहे. पण वेतावरुन वेतन अंहं ही गोष्ट कै पटेना.
पगारला वेतन शब्द सावरकरांनी दिला. (चला मराठी विकीवर)*अभारतीय शब्दकोश. रामदासस्वामी सोनार.
-दिलीप बिरुटे
In reply to वेतावरुन वेतन अंहं. कब्बी नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभारतीय शब्दकोश काय प्रकार
In reply to अभारतीय शब्दकोश काय प्रकार by बॅटमॅन
दोन शब्द.
In reply to दोन शब्द. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोचक!!! पहायला पाहिजे हा कोश,
लिहित रहा भौ! त्यानिमित्ताने
In reply to लिहित रहा भौ! त्यानिमित्ताने by अजया
+१
व्युत्पत्तिकोश आणि इतर सटरफटर
In reply to व्युत्पत्तिकोश आणि इतर सटरफटर by राही
कुलकरणी नव्हे
In reply to कुलकरणी नव्हे by कपिलमुनी
:)
In reply to कुलकरणी नव्हे by कपिलमुनी
मुळ शब्द कुळकरणी असाच आहे.
In reply to मुळ शब्द कुळकरणी असाच आहे. by प्रचेतस
मूळ संस्कृत शब्दात ळ नाही.
In reply to मूळ संस्कृत शब्दात ळ नाही. by बॅटमॅन
ब्रह्मानंद देशपांडे यांचे मत
In reply to ब्रह्मानंद देशपांडे यांचे मत by प्रचेतस
अर्थातच. श्रीकरणाधिपातला करण
In reply to मूळ संस्कृत शब्दात ळ नाही. by बॅटमॅन
कसं काय ?
In reply to कसं काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्रह्मानंद देशपांड्यांनी
In reply to कुलकरणी नव्हे by कपिलमुनी
वेल!
In reply to वेल! by राही
पुण्याजवळचे
In reply to पुण्याजवळचे by चौथा कोनाडा
लोहगांवचं 'लोहेगांव' झालं,
In reply to लोहगांवचं 'लोहेगांव' झालं, by सूड
रंजनगाँव
In reply to लोहगांवचं 'लोहेगांव' झालं, by सूड
यझ बिहार्यांचा परिणाम हा.
In reply to व्युत्पत्तिकोश आणि इतर सटरफटर by राही
मराठी ग्रामनामांचा इतिहास
In reply to मराठी ग्रामनामांचा इतिहास by बॅटमॅन
विश्वनाथ खैरे
In reply to विश्वनाथ खैरे by राही
खैरे सीओईपियन आहेत हे माहिती
In reply to खैरे सीओईपियन आहेत हे माहिती by बॅटमॅन
सीओईपी
In reply to सीओईपी by राही
:) माहितीकरिता बहुत धन्यवाद.
पुन्हा कुलकरणी
In reply to पुन्हा कुलकरणी by राही
कुळकर्णी अन कुलकर्णी
'जुगार' सुद्धा पोर्तुगीजची
In reply to 'जुगार' सुद्धा पोर्तुगीजची by चिमिचांगा
जुआँ
रोचक धागा ! छान शब्द-चर्चा !
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
+१
नमोदन. तसेच त्या शब्दांचे प्रचलीत्+काढीव्+वाढीव अर्थ सांगावेत हि अतिनम्र विनंती. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते अंतर्गत चिमन हटेला गँग पिंचिवडकरआजचा शब्द कोणता?
भत्ता ?
In reply to भत्ता ? by चौथा कोनाडा
किंवा खलबत्ता आणि खलबत ....
पुना ओकांचे नाव आले नाही अजुन
In reply to पुना ओकांचे नाव आले नाही अजुन by hitesh
ते तुम्ही आणाल हे माहीत होतं
छान
सामान्यज्ञानात भर घालणारा