Skip to main content

पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अ‍ॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे. तर मंडळी, पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ? पॅरिस मधे Petite Palais अथवा Musée de la Marine सारखे एखादे लहानसे म्युझियम बघता येईल, किंवा Parc de Sceaux अथवा Parc de Saint Cloud सारख्या निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करता येईल. कोण कोण येणार, हात वर करा. . प्रशांत आणि मी: मिपा फोन्तेन्ब्लो कट्टा २०१२ . . . वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस . Petite Palais पॅरिस . Parc de Sceaux पॅरिस -- सर्व चित्रे जालावरून साभार.

वाचने 10578
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

सावधान सावधान !!! नको नको... चित्रगुप्त काका ... इसस्वास ठिऊ णका. सदर माणूस अशीच मस्स्स्स्स्स्स्स्स तानी आश्वासने (मिळवून)घेऊनंही इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै! :-/ तो थिकडे काय येणार? === दू...दू...दू...! पांडू :-/

In reply to by मोहनराव

. टिपः या चित्राचा अन वरील प्रतिसादांच संबंध असेलच असे नाही. पॅरिस / अ‍ॅमस्टरडॅम कट्ट्याला शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

उकाड्यामुळे मुंबई जर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये सूर्याजवळ ७५% अंतरावर असेल तर मग थंडीमुळे मिनिईपोलिस कुठे असेल रे? मला वाटते ते सूर्याच्या विरूध्द दिशेला पृथ्वीपासून बरेच दूर असेल--बहुदा गुरू आणि शनीच्या मध्ये, बरोबर ना? विशेषतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै!
कसा येईल? स्पावड्या आलाय म्हटल्यावर तुमच्या आनंदाला जे काही उधाण येतं त्याचा धसका घेतला असेल त्याने!!

In reply to by स्पा

पान्डूबा तिकडे कोल्हापुरास जातो म्हणालात मग इकडे प्यारीसला कशे जाणार?

..रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्‍या ठिकाणी जेवायला नेणार असाल तर येतो. .डिनर अन रात्री भटकणे याचे किती ड्यामेज व्हावे? ;)

रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्‍या ठिकाणी
चालेल चालेल, रात्री मस्त खायला 'सँ मिशेल' ला भरपूर मिळेल.

बरीच गर्दी झाली आहे. हे ही नसे थोडके! मजा भेटी पेक्षा भेटीसाठी जाण्यासाठीच्या धावपळीत आहे. अहो त्या पंजाबात घडलेल्या मराठी साहित्य संमेलनातही मौजे खातर गेलेल्या शौकिनांना खरी सम्मेलनाची मज्जा रेल्वेच्या प्रदीर्घ प्रवासात आली म्हणतात...

येण्याची मनापासुन इच्छा आहे.. पण इथवर फक्त इच्छेवर पोहचताच येणार नाही .. कधी एकदा युरोप ला फिरायलाला मिळेल काय माहीत ?

अत्रंगी पाऊस लवकरच पॅरिसास येत आहेत, शिवाय एक वाचनमात्र असलेले मिपाकर कालच भेटले आहेत, त्यामुळे पॅरिस कट्ट्याची शक्यता वाढत आहे. आणखी आहेत का कुणी ? २ जून चे आधी ?

उद्या सकाळी मी आणि चित्रगुप्त साहेब पॅरिस मध्ये भेटत आहोत ...आणखीन कुणी येतंय का ?? असल्यास +33 755 989 352 वर मला कॉल करा ...