ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने.
एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते. मस्त अख्खी रात्र पण काढली असती.मुंबईत ढिगाने मित्र आहेत, टाईमपास करायला.पण आत्ता उद्याच्या जर्मन पेपरचं टेन्शन आलंय,मला काहीही करून घरी पोचायचेच आहे बास, एक करता येईल, मेन रोड पर्यंत चालत जाऊयात, कोणीतरी लिफ्ट दिली तर किंवा टॅक्सी मिळू शकते.तिकडून बस मिळते का ते पाहू, किंवा काहीही करू, पण इकडून निघू.
आलीया भोगासी ... अगदीच काही नाही मिळाले तर बारा किलोमीटर चालत जाऊ चेंबूर पर्यंत, पण आज घरी जायचेच.
अरे वा एक टॅक्सी थांबली चायला, भैया चेंबूर चलोगे?
हा शेरिंग ठीके, चलो जल्दी
चायला नशीब उघडलं, शेरिंग तर शेरिंग
दरवाजा उघडून आत बसलो, आत अजून एक जण होता. पण तो झोपलेला होता. परेल फ्लाय ओवर क्रॉस झाला. चायला बेक्कार पाणीच पाणी.उद्याच काही खरं नाही. मुंबई थांबली. टॅक्सीत मस्त जुनी गाणी लावलेली होती. वा मझा आ गया.तेवढ्यात बाजूला बसलेल्याकडे माझं लक्ष गेलं. हा ओळखीचा वाटतोय.. अरे हा पशा?? हो ...येस. झोपलाय, उठ्वू का?
दहा वर्षांपूर्वी, २००५ ला फोर्ट ला "ब्लू शार्क" नावाची एक छोटी कंपनी होती, त्यात आम्ही एकत्र काम करत होतो, नंतर अशाच एका हे साहेब अचानक नोकरी सोडून गेले.कोणालाही न सांगता.बर मुंबईत हा एकटाच राहत असल्याने कोणाला संपर्क करायचा तेही समजल नाही. मग मीही काही महिन्यात ती नोकरी सोडली.आणि २ वर्षांसाठी पुण्याला गेलो. ते मागच्या वर्षी परत आलो.तेंव्हा फेसबुक नसल्याने आमचा संपर्क राहिलाच नाही. आणि आज अचानक या गाडीत हा बाजूला. त्याला मी उठवलच, आधी एकदम बावरून तो उठला, पण मी दिसल्यावर एकदम ओरडला अबे तू ? इथे कसा काय ? त्याला सांगितलं अरे मी इथेच असतो परेलला. आता पावसाने बस चे प्रोब्लेम्स झालेलेत म्हणून बाहेर पडलो तर हि गाडी मिळाली.नेमका तू दिसलास. तू कसा काय लेका इकडे? चायला किती वर्षांनी भेटतोय? कुठे गायब झालेल्लास? तो पण एकदम सावरून बसला.
किंग्स सर्कल क्रॉस झालं. गप्पा सुरु झाल्या.माझी सगळी राम कहाणी त्याला सांगत बसलो.तो पण उत्साहाने ऐकत होता.एक दोनदा माझं बाहेर लक्ष गेलं. परत किंग्स सर्कल क्रॉस झाल्यासारखे वाटले. पण पाऊस भरपूर होता. आणि गप्पांच्या नादात माझे लक्ष नसेल म्हणून मी दुर्लक्षित केले. जुन्या ऑफिस मधले किस्से दोघेही रंगवून सांगत होतो, आठवत होतो. परत एकदा किंग्स सर्कल क्रॉस झाले, आता माझी सटकलीच, पशा काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात त्याला थांबवून त्या भैयाची घेतलीच, साले मीटर डाऊन करके मुंबई घुमा रहा हे क्या, कितने बर किंग्स सर्कल दिखायेगा ? सीधा ले गाडी अभी, चुत्या समझके रक्खा हे क्या?
त्यावर तो काहीच न बोलता टॅक्सी दामटत राहिला, किंग्स सर्कल वरून गाडी सरळ सायन फ्लायओवर वर आली, आता उजवीकडे वळले कि चेंबूर,हे कन्फर्म.
पशा तू पण चेंबूर ला राहतोस ना अजूनही.
तेवढ्यात अचानक टॅक्सी बाहेर लक्ष गेले, परत "किंग्स सर्कल"
आता पूर्ण खोपडी सटकली, अरे काय प्रकार सुरु आहे ? अबे तिसरी बार इधरही?
त्या भैयाची गचांडीच धरली,
तेवढ्यात पशा म्हणाला, सोड त्याला,त्याची चूक नाही अरे
गेल्या दहा वर्षात लाखो वेळा आम्ही दोघे किंग्स सर्कल फिरतोय,याला अंत नाही, तुझं मीटर आत्ता डाऊन झालंय........
याद्या
8740
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
सहीये
+१
In reply to सहीये by नेत्रेश
नेत्रेश
In reply to सहीये by नेत्रेश
बापरे
In reply to नेत्रेश by स्पा
नेत्रेश
In reply to सहीये by नेत्रेश
अरे देवा ! काय होणार त्या
In reply to नेत्रेश by स्पा
=))
??????च्यायला फारच डाउन .
आयला! भन्नाट !
" अच्चा अश झाल तल " ;)
आयला असे लूप मधे जाणार असु तर
In reply to " अच्चा अश झाल तल " ;) by पियुशा
अगदी अगदी :)
In reply to आयला असे लूप मधे जाणार असु तर by टवाळ कार्टा
सहिच्च
आयला असं लुप मधे फिरायला लागत
मी मि.पा.वर रजिस्टर झाल्या
In reply to आयला असं लुप मधे फिरायला लागत by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचं सदस्यनाम बघुन ते माहिती
In reply to मी मि.पा.वर रजिस्टर झाल्या by अत्रुप्त आत्मा
काय तरी घोटाळा हाय!!
मस्त!!
मी दात काढताना मरु नये बाई :/
दात काढताना
In reply to मी दात काढताना मरु नये बाई :/ by अजया
तुझं ठिक ग!
In reply to मी दात काढताना मरु नये बाई :/ by अजया
तो पण असाच राहणार.त्याला परत
In reply to तुझं ठिक ग! by स्पंदना
देव करो आणि तुम्ही जायच्या
In reply to तो पण असाच राहणार.त्याला परत by अजया
केबीपीडी ऊर्फ खुले बोळके पे
In reply to देव करो आणि तुम्ही जायच्या by सूड
=))
In reply to केबीपीडी ऊर्फ खुले बोळके पे by बॅटमॅन
(No subject)
In reply to मी दात काढताना मरु नये बाई :/ by अजया
आवडली गोष्ट!
बापरे
जबरी!!!!! एकच नंबर
खाटुक
अगदी अगदी!!!!
In reply to खाटुक by नंदन
मस्त
अच्चा! अश झाल तल स्पावड्या!
भूत-प्रेत, वशीकरण, नोकरी,
स्पाबा बंगाली .. असं हवं ते
In reply to भूत-प्रेत, वशीकरण, नोकरी, by वेल्लाभट
जबरी कथा. अजून मोठी लिहायला
आगो बाब्बो.....
जे पी
In reply to आगो बाब्बो..... by जे.पी.मॉर्गन
चांगली लिहिलीय
तुझं मीटर आत्ता डाऊन झालंय...
मस्त. मजा आली वाचताना. मात्र
हहु हहु हहु हहु! भ्या
In reply to मस्त. मजा आली वाचताना. मात्र by सतिश गावडे
खतरनाक
बापरे!
व्वा !!!
एक नम्बर
स्टोरी लॆच भारी,
खासंच
खासंच
मस्त कथा....
मिटर डाउन
मस्त..
मस्त्च
जबरा रे!!
मस्त रे स्पांडुबा!