ड्रिल
ड्रिल म्हणजे कवायत
हे शारीरिक शिक्षण( physical Training) नव्हे.
यातील मुळ फरक काय ? तर एक शारीरिक प्रशिक्षण आहे आणि दुसरे मानसिक प्रशिक्षण.
आमच्या एका मित्राच्या भाषेत डोक्याला भोक पडून काही गोष्टी डोक्यात घुसवल्या जातात आणि मग सिमेंटने सील केल्या जातात.
शस्त्र चालवायला शिकवणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्याचा वापर करणे हे तेवढे सोपे नसते. जेंव्हा तुम्ही शत्रूच्या समोर बंदूक हातात घेऊन उभे राहता आणि चहुबाजूनी गोळीबार सुरु होतो तेंव्हा तो आवाज तुम्हाला गर्भगळीत करून टाकतो तेंव्हा तुमची मती गुंग होते आणि हात पाय काम करेनासे होतात. अशा वेळेस काही गोष्टी यांत्रिकपणे करायला शिकवले जाते. म्हणजे जेंव्हा सैनिकांच्या तुकडीचा सुभेदार आज्ञा देतो "लोड युवर गन" तेंव्हा सैनिक डोके न चालविता बंदुकीचे मैग्झीन त्यात लोड करतो. "कॉक युवर गन" म्हटले कि आपोआप बंदूकीची स्प्रिंग ताणली जाते आणि फायर म्हणून आज्ञा दिली कि आपोआप गोळी मारायला सुरुवात करतात. या क्रिया प्रितिक्षिप्त( reflex) तर्हेने घडतात. एकदा सैनिक त्या मानसिक धक्क्यातून सावरला कि पुढचे काम फक्त त्याला स्फुरण देणे एवढेच राहते. असामान्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आठवी पास माणसाला तयार करणे यासाठी याच गोष्टी परत परत त्याच गतीने आणि लयीने करायला शिकवाव्या लागतात.
साधारण लष्कराला जेंव्हा दिसता क्षणीच गोळी घालायची आज्ञा मिळते तेंव्हा पुढच्या फळीतील सर्व सैनिक एकदम बंदुका लोड करतात परंतु त्यातील अगोदर ठरवलेल्या क्रमाप्रमाणे त्यातील एक किंवा दोनच जण गोळ्या झाडतात आणि ती तुकडी मागे सरकते. परत दुसरी तुकडी पुढे येते आणि हीच क्रिया परत केली जाते. यात बघणाऱ्या माणसाला नक्की कोणी गोळी मारली आहे हे कळत नाही त्यामुळे त्या सैनिकावर डूक धरून कारवाई होण्याची शक्यता खूप कमी होते.
बाकी कवायत करण्याचे फायदे इतरही आहेत. मुद्दाम आपण खांद्याच्या वर हात नेउन पाच मिनिटे चालून पहा. खांद्याच्या पुढच्या भागाला रग लागते कि नाही? खांदे पाडून चालणारा माणूस कवायत करून पंधरा दिवसात कसा रुबाबदारपणे चालू लागतो. नाहीतर अवधेस कुमार नाव असलेला भय्या कडक इस्त्रीच्या गणवेशात सैनिक म्हणून कसा देखणा दिसतो ते पहा. आमच्या पुण्याच्या कमांड रुग्णालयात कमांडंट कार्यालयाच्या बाहेर एक ६ फुट उंच आरसा लावलेला आहे त्याच्या खाली लिहिलेले आहे आहे. Am I looking smart? आपण चांगले कपडे घातले आणि व्यवस्थित तयार झालात तर आपला आत्मविश्वास दुणावतो हे प्रत्येकाने अनुभवलेले आहेच. मग रोज तुम्ही व्यवस्थित पणे गणवेश घालून दाढी करून बुटाला पॉलिश करून येता. तेंव्हा आपला आत्मविश्वास नक्कीच सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असतो. ढिसाळपणा किंवा बावळटपणाला लष्करात थारा नाही. लष्करात एक शिकवले जाते." साधेपणा आणि बावळटपणा यात एक सूक्ष्म रेषा असते आणि आपण ती केंव्हा पार करतो ते आपल्याला लक्षात येत नाही. " यामुळे लष्करात तुमचे कपडे तुमची वेशभूषा आणि केशभूषा व्यवस्थित असली पाहिजे हा आग्रह धरला जातो हे यासाठीच.
बाकी ९ mm पिस्तूल हातात घेतल्यावर तुम्हाला जेम्स बॉन्ड झाल्यासारखे वाटते. http://en.wikipedia.org/wiki/Pistol_Auto_9mm_1A
हि अतिशय सुटसुटीत आणि वापरायला सरळ अशी पिस्तुल आहे. शिवाय आत मध्ये आटे पाडलेले असल्याने ( rifling) गोळीला स्वताभोवती फिरण्याची गती मिळते(spin) आणि गोळीचा पल्ला आणि मारक क्षमता वाढते.
आम्हाला प्रथम ०. ३०३ रायफल वर सुरुवात केली होती. यात इतका जोरदार उलटा झटका(recoil) बसतो कि खांदा निखळला कि काय असे वाटू लागते. त्यातून मी तो झटका बसु नये म्हणून तो बंदूक १ सेमी दूर धरली तर तिचा जोरदार खांद्याला झटका बसला आणि पुढे ३ दिवस खांदा दुखत होता. ती खांद्याला प्रत्येक वेळेस एक गोळी लोड करावी लागत असे आणि मग ती मारायची. सुदैवाने हि बंदूक लष्करातून निवृत्त केली आहे. या बंदुकीचा पल्ला २ किमी पर्यंत होता. यानन्तर ७.६२ मिमी रायफल वापरली याला जो उलटा झटका येतो त्याने पुढची गोळी म्यागझीन मध्ये चढवली जाते त्यामुळे झटका कमी बसतो आणि एकामागोमाग एक गोळ्या हि झाडता येतात. भरपूर गोळ्या मारूनही खांदा दुखत नाही हा अजून फायदा. नंतर ९ मिमी कार्बाईन मशीन गन हे वैयक्तिक हत्यार म्हणून लष्करी अधिकार्यांना दिले जाते. ही वापरायला फारच सोपी आहे परंतु काही वेळेस पटकन गोळी सुटू शकते आणि अपघात होतो. http://ofbindia.gov.in/products/data/weapons/wsc/8.htm
या नंतर आता जी शस्त्रे लष्करात वापरतात ती INSAS म्हणजे ५.६५ मिमी ची गोळी असलेली आहे.
http://en.wikipedia.org/wiki/INSAS_rifle.
गोळीस मिळणारी उर्जा १/२ m v वर्ग या सूत्राप्रमाणे आहे तर गोळीचा आकार कमी केला तर तिची मारक क्षमता कमी होते असे असताना हे का होता? याचे कारण आता युद्धाची तंत्रे बदलली आहेत. पूर्वी युद्धात शत्रूच्या सैनिकास ठार करणे हा हेतू असे परंतु आता अभ्यासात असे लक्षात आले आहे कि सैनिकास मारण्यापेक्षा जायबंदी केले तर त्याच्या वर इलाज करण्यासाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार सैनिकांचा व्यय होतो म्हणजे एका सैनिकाला जायबंदी केले तर तीन ते पाच सैनिक काही दिवसांसाठी कामास येतात. आजच्या गतिमान युद्धात हे काही दिवस फार महत्त्वाचे ठरू शकतात. शिवाय ठार मारण्यापेक्षा जायबंदी करणे हे जास्त मानवतावादी आहे.
असो. हि उप पुरवणी बापूसाहेबांच्या उत्तम लेख मालेस पूरक व्हावी. मारक होऊ नये हा हेतू आहे. यास्तव येथेच थांबतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेख
खुपचं मस्तं लेख. बाकी
एकदम मस्त लेख.
एक प्रश्न
'रामपुरी' ने पिस्तुलाबद्दल
छर्याच्या पिस्तुल फक्त
बाबा बिहारात एक जागा आहे ,
माझा एक मित्र आहे,बिहार केडरला
अधिकृतपणे + विनापरवाना
छान
मस्त माहीती !!
खूप छान लेख !!
छान लेख!
माहितीपर लेख. पण विषय
. हि उप पुरवणी
बापूसाहेब,
+१
पुरवणी वाचणेबल!!
छान आहे माहिती
किती जणांना MCC हा प्रकार
एमसीसी
आठवतं अजून...
धन्यवाद
मी नववीत असताना हा एमसीसी
हाहाहा
हे MCC वाले सगळे माझ्यापेक्षा
हे ९ एम एम वगैरे काय असतं?
९ एमएम हा आपण अंदाज व्यक्त
एकच नंबर!!!!
मस्तं प्रतिसाद. एखादी सिरिजही
धन्यवाद. हे .३०३, .२२ म्हणजे
इंच. प्रत्येक . पासुन सुरु
बरोबर
रिव्हॉल्वर आणि पिस्तुल यातला
तीनों बच गयें
फरक
ते दोन्ही हत्यारामधल्या गोळया
नशीब सौदिंडिअन पिच्चर नै बघत
+१००
भारी !
रिव्होल्व्हर मध्ये ज्यात
५० मीटर???
कमी वाटतोय की जास्त ?
खूप जास्त वाटते आहे..
गोळी सुटुन कुठलाही अडथळा न
संरक्षण खात्यात जबरी
एकतर तुम्ही फारच हिंदी सिनेमे
जास्तीत जास्त किती लांब पर्यंतचा पल्ला गाठू शकते
५० मीटर हा परिणामकारक पल्ला
माझ्या प्रतिसादातले चुकीचे