Skip to main content

सीट नको पण स्त्री आवर

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/04/2015 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १: स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस 'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी. प्रसंग २: स्थळः प्रचंड गर्दी असलेली एक बस बस खचाखच भरलेली आहे. उभं रहायलाही पुरेशी जागा नाही. लोकं लोंबकळत आहेत. एक स्त्री (मध्यमवयीन) कशीबशी उभी आहे. एक सज्जन व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो व 'मॅडम आप बैठिये' म्हणत तिला बसायला जागा देतो. ती आभार मानत नाहीच. वर 'हं! कसा धाक आहे बघ!' असे भाव चेह-यावर आणत धप्पकन त्या सीटवर बसते. प्रसंग ३: स्थळः कमी गर्दी असलेली एक बस. बसण्याची आसने बहुतेक भरलेली आहेत. बाकी बस रिकामी. स्त्रीयांसाठी असलेल्या आसनांपैकी दोन आसनं रिकामी आहेत. बाकी जनरल आसनांवर तीन स्त्रीया बसलेल्या आहेत. एक पुरुष बसमधे चढतो. जागा शोधत नजर फिरवतो. जनरल आसन रिकामं नाही हे बघून नाईलाजाने उभा रहातो. तीनही प्रसंगात स्त्री आपल्या सवलतीचा गैरवापर करताना दिसते. (या वाक्यावर युद्ध अपेक्षित) पूर्वी काही आसनं राखीव असायची. आता चालकामागची अर्ध्याहून जास्त आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतात. डाव्या बाजूला अपंग, वृद्ध, सैनिक इत्यादी. उरलेली आसनंही 'पुरुषांसाठी' राखीव नसतात. ती जनरल असतात. जिथे प्रसंग २ प्रमाणे पुरुषच अनेकदा जागा देतात. असो. तर. ही सवलत किंवा हे प्रिविलेज जे दिलंय त्यामधे आणि हक्क किंवा राईट मधे फरक आहे. दुर्दैवाने तो अनेकांना कळत नाही. कुठलंही जनरलायझेशन न करता काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो, काही मतं मांडू इच्छितो. १) खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करणा-या स्त्रीया, राखीव आसनांचा उपयोग किंवा समर्थन करतात, हा दुटप्पीपणा नाही का? २) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं. ३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा. ४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको. ५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते? असो. प्रसंग ४: स्थळ: प्रचंड गर्दी असलेली एक बस एक सभ्य पुरुष स्वतःला सांभाळत एका सीटला टेकून उभा आहे. एक स्त्री उतरण्यासाठी पुढे जात असते. तोंडाने काही बोलत नाही बाजूला व्हा सांगत नाही आणि खबदाडीतून पुढे सरकत असते. असं होत असताना त्या पुरुषाला तिचा/तिला पुरुषाचा धक्का लागतो. आणि ही आधीच तडकलेली; अजून तडकते. 'गर्दीत मुद्दाम उभे राहता काय? लावू का एक कानशिलात?' काहीबाही बोलायला लागते. शिव्याही देते दोन. (स्त्रीने शिव्या देऊ नयेत / द्याव्यात किंवा स्त्रीयांसाठी राखीव शिव्या असाव्यात का हा एक विषय होऊ शकतो). तो सुरुवातीची चार वाक्य शांतपणे बोलतो. सॉरीही म्हणतो. पण शिवी दिल्यावर, 'मुद्दाम', 'चान्स' असे शब्द वापरले गेल्यावर तोही आवाज चढवतो. घरचे राग समोर येईल त्यावर काढायचं काम नाही मॅडम. ऐकून घेतोय म्हणून वाट्टेल ते बोलू नका. इत्यादी शाब्दिक चकमक घडते. आसनांचा एक वेगळा मुद्दा झाला. पण सर्वसाधारणपणे पुरुषाकडे खुनशी नजरेनेच बहुतेक स्त्रीया बघताना दिसतात. याला आजूबाजूला घडणा-या गोष्टी जरी काही अंशी कारणीभूत असल्या तरीही हे अती होतं अनेकदा. म्हणजे प्रत्येक पुरुष हा वाईटच आहे आणि तो आपल्याला काहीतरी करणारच आहे असा भाव घेऊन वावरण्याची गरज नाही. ६) सभ्य पुरुष हे बस, ट्रेन इत्यादी सर्वच ठिकाणी सभ्यपणा दाखवतात. परंतु सगळ्यांना एकाच चश्म्यातून बघितलं जात असल्याने, प्रसंग २ प्रमाणे त्यांच्या नशिबी साधं थँक्यू सुधा येत नाही. ७) प्रिव्हिलेज आणि राईट यात गल्लत होते आणि मग माणुसकीलाही त्या राखीव जागेवर जागा मिळत नाही. प्रसंग १ प्रमाणे एखाद्या व्यक्तीला खरोखर उभं राहता येत नसेल तरीही उठवलं जातं, तेही उद्दामपणे. ८) आमचं ते आमचंच पण तुमचं तेही आमचं या तत्वानुसार स्त्रीया कुठल्याही आसनावर बसू शकतात, रेल्वेत कुठल्याही डब्यात चढू शकतात. पण पुरुषांना तो हक्क नाही. कॉमन डब्यात (बघा हं, तो ही जेंट्स डबा नसतो टेक्निकली) प्रेमी युगुलं, किंवा गर्दीत सेफ वाटणा-या महिला प्रवेश करतात आणि ती अदरवाइज कम्फर्टेबल असणारी गर्दी उगीच अनकम्फर्टेबल करून टाकतात. चुकून धक्का लागला तर आपणच मार खाऊ या भीतीने पुरुषच अंग चोरून उभे राहतात. धागा नीट मांडता आला नाही याची कल्पना आहे. पण ठीक आहे काथ्याच कुटायचा आहे मग तो आधीच थोडा कुटल्यासारखा असला म्हणून काय बिघडलं? असं म्हणून धागा टाकत आहे. वरील तीनही प्रसंग अनेकदा बघितलेले आहेत. बाकी पुढे तुम्ही बघितलेले अनुभवलेले प्रसंग सांगायला आमंत्रण देण्याची गरज नाही. जाता जाता; जिकडे तिकडे स्त्रीयांना प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट, रिझर्वेशन असतं. मिपा वरही अनाहिता फक्त स्त्रीयांसाठी आहे. तर मिपावर फक्त पुरुषांसाठी एक्स्क्लूजिव एक सेगमेंट असावं असं मी सुचवू इच्छितो. वाट्टेल ते झालं तरी लेडीज सीट वर न बसणारा. वेल्लाभट नवीन म्हण - सीट नको पण स्त्री आवर.

वाचने 37637
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

असा पावलोपावली पुरुषांचा व्देष आणि अपमान करुन क्षणोक्षणी पुरुषांना मरणयातना देण्या पेक्षा, सर्व पुरुषांना एका रांगेत उभे करावे आणि गोळ्या घालुन ठार करावे. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. हाय काय अन नाय काय... पैजारबुवा,

लेख एकांगी आहे. ज्या असभ्य पुरुषांमुळे राखीव आसने ठेवायची वेळ आली आहे त्या असभ्यतेबद्दल एकही शब्द नाही. लोकल , बस, गर्दी मध्ये 'काही' असभ्य लोक गैरवर्तणूक (बर्‍याच महिलांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना हे अनुभव येतात) करतात त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झालेत . दिलेल्या सवलतींचा गैरफायदा स्त्रिया घेत आहेत हे अंशत: खरे आहे पण ग्रामीण भागात महिला एवढ्या जागरुक दिसत नाहीत.

In reply to by कपिलमुनी

ग्रामीण भागात महिला राखीवचा प्रश्न ही नसतो. (यष्टीत तर २-३च शीटा राखीव असतात)

In reply to by कपिलमुनी

ज्या असभ्य पुरुषांमुळे राखीव आसने ठेवायची वेळ आली आहे त्या असभ्यतेबद्दल एकही शब्द नाही.
अप्रव्रुक्ति सगळ्या समाजात आहेत, पण म्हणून काहि सगळ्याना दोश देता येनार नाहि. पण महिलांना दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेताना सगळिकडे दिसतात. ह्या बद्द्ल स्त्रिमुक्ति वाले बोलत नहित. तेव्हा ह्याची वाचा बसते.

असू द्या हो. आपण पुरुष आहे, हसतखेळत पेलायची सहनशक्ती आणि वेळ आल्यास रक्तपात करायची क्षमता निसर्गाने आपल्यालाच दिली आहे. एक रडगाणं मांडायची क्षमता त्यांना दिली तर कुठं बिघडलं.

In reply to by पॉइंट ब्लँक

आपण पुरुष आहे, हसतखेळत पेलायची सहनशक्ती आणि वेळ आल्यास रक्तपात करायची क्षमता निसर्गाने आपल्यालाच दिली आहे. एक रडगाणं मांडायची क्षमता त्यांना दिली तर कुठं बिघडलं
अहो ह्याच मुळे ह्या केसानी गळा कापायला लागल्या आहेत. रक्तपात हा शारीरीक पेक्शा मानसीक असला तर तो जास्त विधवन्सक असतो, हयात स्त्रियाची क्षमता फारच पूढे आहेत.

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcR3Z9f5GAL35ctKSLKs8jsV9ZNj9sSB2HRa9GvaKKLiE8uTh0Hi

मी अनेकदा बसने प्रवास करते. मी सुद्धा असेच काही प्रसंग तुम्हाला सांगते प्रसंग १ रात्री ८ ची वेळ. पाऊलही ठेवायला जागा नाही अशी खचाखच भरलेली बस. पाठीवर लॅपटॉप बॅग. ३० मिनिटे उभं राहुन प्रवास. स्त्रियांसाठी राखीव जागेवर एक ६०चे गृहस्थ. समोर किमान १० जणी उभ्या. एकीनेही त्यांना उठवले नाही. प्रसंग २ दुपारची वेळ. बर्‍यपैकी गर्दी. एक पुरुष बरोब्बर कॉलेजवयीन मुलीच्या मागे उभा राहुन नको ते चाळे करतोय. मुलगी गर्दीमुळे धक्का लागत असेल असे समजुन.. हिंमत नाही म्हणुन.. किंवा अन्य कोणत्याही कारणाने गप्प. शेवटी मी त्याच्या समोर जाउन उभी राहिले. म्हणलं बघु काय करतोय नक्की. पुन्हा तसाच स्पर्श.. मग आरडाओरडा करुन हाकलला. गर्दीचा धकका आणि सहेतुक स्पर्श बायकांना जनरली कळतोच. त्यातही असा स्पर्श झाल्यावर अनेक जणी बुजुन गप्प रहातात. ते % तुम्हाला कळत नाही. अगदी काही आरडा ओरडा करतात. त्यातही तो अगदी काही केस मध्ये गैरसमज असतो. तुम्ही सुद्धा सरसकटीकरण करु नका. प्रसंग ३ स्त्रियांच्या राख्व जागेवर एक धडधाकट तरुण बसलाय. एक काकु हातात मोठं ओझं घेउन उभ्या. उठ म्हण्लं तर भांडला. मी माझी जागा काकुंना दिली. वर हे ही म्हण्लं की "जौ द्या हो.. त्याला नक्की माहित नसेल की तो स्त्री आहे की पुरुष... म्हनुन तर लेडीज सीट साठी भांडतोय.." प्रसंग ४ मी पाठीवर लॅपटॉप + २ दिवसांचे सामान अशी भली मोठी बॅग आणि कडेवर ३ वर्षाचा मुलगा घेऊन गर्दीमध्ये बसमध्ये चढले. हक्कानी स्त्रियांसाठी बसलेल्या पुरुषाला उठवते. अनेकदा लोक स्वतःहुन उठतातच. त्यांना मी आठवणीने धन्यवाद देते. हेच मी एकटी असते तर १०० पैकी १०० वेळा पुरुषांना उठवत नाही. (अगदी मासिकधर्म चालु असेल.. तरीही..) सौजन्याने बोलुन राखीव सीट घेणार्‍या सुद्धा बायका आहेत. "प्रत्येक" स्त्री सीटवरुन पुरुषाला उठवलं की "कसा धाक आहे" असा लुक देत नाही. म्हणजे अगदीच कै च्या कै विधान आहे हे. लेकुरवाळ्या स्त्रियांना तर १००% राखीव सीट हव्याच. तुम्ही काहीही म्हणा (बोंबला...) पण सर्वांना न्याय्य जागा मिळाव्या म्हणुन माझं मुल घेऊन मी गर्दीत चिरडली जाणार नाही. आणि हो.. लहान मुल हातात असलेला पुरुष असेल तर त्याला अजिबात उठायला न लावणार्‍या असंख्या बायका आहेत. किंवा जर पुरुषाच्या सोबत मुलं असतील तर त्यांना अनेक बायका मांडीवर घेतात. जेणेकरुन बाळाला त्रास होऊ नये. पण खुपदा खुप लहान मुलं जात नाहीत दुसर्‍यांकडे तेव्हा बायका स्वतः वडील-बाळाला जागा करुन देताना पाहिल्या आहेत. स्त्रियांना खांद्याला खांदा लावुन हक्क हवे आहेतच, पण वागणुक सुद्धा तशीच हवी आहे. बस मध्ये चढलेली स्त्री काही पुरुषांना स्वतःची प्रॉपर्टी वाटते. तिला कुठेही हात लावला तर चालतो.. तिला कुठल्याही अवयवाने टच केला तर चालतो असले विकृत पुरुष अनेक आहेत. तुम्ही तसे नसलात म्हणुन बाकी जग सभ्य आणी सुसंस्कृत असेलच असं नाही. ह्या प्रकाराला काय लेव्हलवर आम्ही सामोरे जातो ह्याची तुम्हाला कल्पनाही नसावी. अगदी शाळकरी पोरांपासुन ते म्हातार्या आजोबांपर्यंत सगळीकडे हरामखोर लोक आहेत. अशांपासुन वाचायला राखीव सीट हे वरदानच आहे. तुम्ही जे पुरुष अंग चोरून उभे रहातात वगैरे करुण वर्णन केलय ना ते खरंच बालीश आहे. (नाही टोमणा नाहीये.. मनापासुन लिहीतेय..) सगळेच पुरुष असे नसतात.. जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात तसंच.. जोवर पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार करण्याचं (अगदी सहेतुन स्पर्ष ते बलात्कार..खुन.) प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे तोवर स्त्रियांना झुकतं माप मिळणार की नाही? उगाच खांद्याला खांदा वगैरे म्हणलं की स्त्रिया सेफ होतात की काय? बाकी पुरुषांना मिपावर विभाग पाहिजे की नको.. द्यावा की न द्यावा ह्यावर आमचं काही म्हणणंच नाही.. (तुमचं फोर नो रिझन अनाहिता बद्दल असतं तसं..) काय वाट्टेल ते करा.. आमच्या पप्पांचे काय जाते.. लेडीज सीट वर न बसल्या बद्दल धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

साला आता सहमत कुणाशी होऊ असा प्रश्न पडू राहिलाय खरा. दोन्ही बाजूंत तितकाच दम आहे.

In reply to by बॅटमॅन

सरसकटीकरणास तीव्र विरोध. बहीण्-आई-मुलगी-पत्नी-मैत्रीण अश्या सगळ्यांना अगोदर एक स्त्री+मनुक्श म्हणून आदर दिलाच पाहीजे आणी मग बाकी मुक्तिच्या बाता....

In reply to by नाखु

बाकी आदर द्यायचा त मनुक्श म्हणून, लिंगाधारित नाही.

In reply to by पिलीयन रायडर

+१. याचीच वाट बघत होतो. वेल्लाभट यांच्या मुद्द्यातही तथ्य आहे. पण तुमच्या बाजूला (माझ्याकडून) जास्त पॉईन्ट.

In reply to by पिलीयन रायडर

स्त्रियांच्या राख्व जागेवर धडधाकट तरुण बसलाय
. ..मुद्दे सगळे ठीक आहेत..पण वरीलसारख्या वाक्यांत काही विरोधाभास वाटतो का? पटकन लिहिताना न जाणवणारा..?

In reply to by गवि

हो गवी.. म्हणुनच म्हण्लं ना की मी १०० पैकी १०० वेळा एकटी असताना पुरुषांना उठवत नाही. मी धडधाकट आहे. मला गरज नाही. माझ्यात तासभर प्रवास गर्दीत करायची ताकद आहे. शाररिक आणि मानसिक सुद्धा.. कुणी काही वावगं वागलं तर दोन मुस्काटात हाणायची सुद्धा... पण सगळ्याच मुली हे करु शकत असतील असं नाही. ह्या प्रकारांमुळेच कदाचित राखीव जागांचा निर्णय घेतला असावा. शिवाय गरोदर, मासिकधर्म चालु असणार्‍या, लहान मुल असलेल्या बायकांना खरंच गरज असतेच बसायला जागा मिळण्याची. ज्या पुरुषांना अशी गरज असते जसे की वृद्ध / अपंग / आजारी इ. त्यांना बायका जागा देतातच. मी कित्येकदा दिली आहे. (हो.. राखीव जागा.. जनरलवाली नाही..)

In reply to by पिलीयन रायडर

जोवर पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार करण्याचं (अगदी सहेतुन स्पर्ष ते बलात्कार..खुन.) प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे तोवर स्त्रियांना झुकतं माप मिळणार की नाही? उगाच खांद्याला खांदा वगैरे म्हणलं की स्त्रिया सेफ होतात की काय?
हे तुमचे वयक्तिक मत आहे. ५३% बलात्कारचे आरोप खोटे आहेत. हि लिन्क. ह्या वर कोणतीहि स्त्री बोलताना दिसत नाहि. सगल्या चुका पुरुशच करतात.
जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात
हे मान्य आहे.
ह्या प्रकाराला काय लेव्हलवर आम्ही सामोरे जातो ह्याची तुम्हाला कल्पनाही नसावी.
तुम्हालाहि काहि कल्पना नाहि कि ज्याच्या वर असा मानसीक हल्ला होतो एका स्त्रि कडुन तेव्हा त्याच्या परिवाराचि परिस्थिती काय होते.
तुम्ही जे पुरुष अंग चोरून उभे रहातात वगैरे करुण वर्णन केलय ना ते खरंच बालीश आहे.
हे खरे आहे हे प्रत्यक्श बघितले आहे मी.
अगदी शाळकरी पोरांपासुन ते म्हातार्या आजोबांपर्यंत सगळीकडे हरामखोर लोक आहेत. अशांपासुन वाचायला राखीव सीट हे वरदानच आहे.
तुम्हाला तरी एक वरदान लाभले आहे, अम्हाला तर अश्या हरामखोर स्त्रीयान पासुन कोण वाचवनार???
प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे
कारण एका बाइने मारले म्हणुन पोलिसात गेले तरी पोलिस हसतात आणि हाकलतात.तेव्हा तुम्हि फक्त टिव्हि वर बातम्या बघुन मते बनवु नका.

In reply to by पंतश्री

तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही पण ते ५३ केसेस आहे की ५३% आहे ते जर चेक करता का? माझ्यामते तुमची चुक होतेय. तुमच्या बाकी सर्व प्रतिसादाला उत्तर न देण्याचा निर्णय मी तुमचे एकंदरीत बाकीचे प्रतिसाद पाहुन घेत आहे. मला माझी मनःशांती अत्यंत प्यारी आहे!

In reply to by पंतश्री

प्रतिसाद.. कुठे आहात पंतश्री आपण ? मला, आठवते तेव्हा पासुन असा अनुभव एकही आला नाही जेथे पुरुष टारगेट होतोय. मला वाटायचे मुलींनाही त्रास नसेल, चर्चा जास्त होते. २ मुली, ज्या माझ्या टिममधे होत्या, त्यांनी रोजच्या बस प्रवासातले अनुभव सांगितले तेव्हा हबकलो मी. पिंपरी चिंचवड ते औंध असा रोजचा प्रवास म्हणजे लढाई होती त्यांच्यासाठी. अपवाद आणि राजरोसचे व्यवहार यात गल्लत होतीय आपली.

In reply to by खंडेराव

शब्द अन शब्दाशी सहमत. अपवाद आणि राजरोसचे व्यवहार यात गल्लत होतीय आपली. हा तर ह्या चर्चेतला सर्वांसाठीच कळीचा मुद्दा!

In reply to by पिलीयन रायडर

दुसरी बाजू समर्थपणे मांडून धाग्याचं एकांगीपण संतुलित केल्याबद्दल आभार.
कुठलंही जनरलायझेशन न करता...
असं मी धाग्यात म्हटलं असूनही तुम्हाला सरसकटीकरणाचा भास झाला त्याचं वाईट वाटलं. तुम्ही दिलेल्यापैकी प्रसंग १: #रिस्पेक्ट प्रसंग २: ठाऊक आहे असे, आणि असेच जास्त असतात. त्यांना ठेचलंच पाहिजे जिथे तिथे. ही सामाजिक समस्या आहे. प्रसंग ३: मुजोर पुरुष. कानफडवा. प्रसंग ४: पुन्हा #रिस्पेक्ट जी विधानं तुम्हाला कै च्या कै किंवा बालिश वाटली ती तुम्हाला वाटली असतील तशी. पण तसंही होतं हे खरं आहे. पुढे तुम्हीच तसं म्हणाला आहात.
सगळेच पुरुष असे नसतात.. जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात तसंच..
सो; एनीवेज. तुमच्या प्रतिसादाने धागा किकस्टार्ट झाला. पण दोनही बाजू आहेत आणि दोनही ख-या आहेत हेच खरं आहे. बाकी मिपावर शेपरेट विभाग सुरु करावा की नाही हे पुढील प्रतिसादांत ठरेलच.

In reply to by वेल्लाभट

तुमचे हे काही मुद्दे राहिलेत माझ्याकडुन
२) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं. ३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा
. त्याला आरक्षण म्हणत नाहीत. तसं असेल तर मग उरलेल्या जागा आपोआप "पुरुषांसाठी राखीव" होणार नाहीत का?!
४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको.
मी तर म्हणते बसच द्या वेगळी. कुणाला साला त्या थर्ड क्लास, लोचट पुरुषांचे गचाल स्पर्श सहन करायचेत.. खाली म्हणत आहेत तसा ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!!
५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?
सगळ्याच बायका असं करत नाहीत. हेच ते सरसकटीकरण.. असो. मलाही लेख एकांगी वाटला. स्त्रिया ह्या मुजोर आणि पुरुष मात्र भयंकर सोज्वळ असा सुर वाटला. प्रत्यक्षात दोन्ही बाजुंना आपापले त्रास आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!!
लै बरं होईल, असली पिरपिर (तुमची नव्हे हां, मूळ कवितेसारखी. स्त्रियास्त्रियांतही फरक असतो. एकीला घातलेल्या शिव्या अख्ख्या स्त्रीजातीला आहेत असा समज करून धावून येणार्‍या रेम्याडोक्यांना अगोदरच सजेशन) तरी थांबेल.

In reply to by पिलीयन रायडर

बघा तुम्ही पुन्हा सगळ्यांना एकाच मापकाने मापताय. सरसकटीकरण तुम्ही करताय. असो.

In reply to by सूड

ओ ते कोकरु आमच्या कळपातलं नाहीये.. आणि कोल्हिण्बाई ह्या अ‍ॅक्चुअली एखादा सोंग घेतलेला लांडगा अस्लाच तर!!!

In reply to by सूड

असं काय करतोयस सूड, ती विजुभौंची नि:शब्द नामक कथा आठवतेय का? ती सायकल आणि रणगाड्याच्या टक्करीची गाथा? ते ढाब्यावरचे शिकरण?

In reply to by बॅटमॅन

तु म्हणतोस ते आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठीचे रणगाडे...सूडच्या मनात मात्र "तसले" चित्र उभे राहीले =))

In reply to by टवाळ कार्टा

सूडच्या मनात मात्र "तसले" चित्र उभे राहीले
तसले म्हणजे कसले रे? मी तर उलट कौतुक केलंय तुझं की रणगाड्यांची बरीच माहिती आहे तुला म्हणून. कसलं चित्र उभं राह्यलं माझ्या मनात ते मला कळू देत तरी!!

In reply to by सूड

तु रवाने मरे...आता फडताळातसून ़ कपाटातसून भायेर ये...हयसर तुका कोन काय म्हणायचो नाय...जो म्हणेल त्याच्या आवशीचो घो

In reply to by टवाळ कार्टा

आजतक दांडू से ले के बाकी भी बहुत उपमाएं सुनी हैं, लेकिन ये रणगाडेवाला लफ़्ज़ इस सिलसिले में पहली मर्तबा सुना. ;)

In reply to by सूड

बग...त्या वागळाक पन कळ्ळा मरे...आनं तू ऑ ऑ च करत रवलोस...माशे खात जा मरे जरा...कस्लो मालवणी तू =))

In reply to by टवाळ कार्टा

आता फडताळातसून भायेर ये...हयसर तुका कोन काय म्हणायचो नाय..
ह्या काय तां सांग!! बाकीची उस्तवारी जायना माका..

In reply to by टवाळ कार्टा

मेल्या ट्रान्सलेशन नाय विचारलं मी!! आता मला पण ऐकायचंय, कसलं फडताळ आणि त्यातून मी बाहेर यायचंय!!

In reply to by सूड

मिपावरती उजव्या मताची मंडळी वाढतं चाललेली आहेत असं हे प्रतिसाद झाडाचा आकार बघुन लक्षात येतं आहे.

In reply to by सूड

कितीही उजवीकडे झुकायला लागलं तरी चालेलं. तु टवाळाकडुन काढचं रे उत्तर. वशाड मेलो कैबी बरळतय आज ;)!!!