सीट नको पण स्त्री आवर

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
14 Apr 2015 - 11:54 am
गाभा: 

प्रसंग १:
स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस
'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी.

प्रसंग २:
स्थळः प्रचंड गर्दी असलेली एक बस
बस खचाखच भरलेली आहे. उभं रहायलाही पुरेशी जागा नाही. लोकं लोंबकळत आहेत. एक स्त्री (मध्यमवयीन) कशीबशी उभी आहे. एक सज्जन व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो व 'मॅडम आप बैठिये' म्हणत तिला बसायला जागा देतो. ती आभार मानत नाहीच. वर 'हं! कसा धाक आहे बघ!' असे भाव चेह-यावर आणत धप्पकन त्या सीटवर बसते.

प्रसंग ३:
स्थळः कमी गर्दी असलेली एक बस.
बसण्याची आसने बहुतेक भरलेली आहेत. बाकी बस रिकामी. स्त्रीयांसाठी असलेल्या आसनांपैकी दोन आसनं रिकामी आहेत. बाकी जनरल आसनांवर तीन स्त्रीया बसलेल्या आहेत. एक पुरुष बसमधे चढतो. जागा शोधत नजर फिरवतो. जनरल आसन रिकामं नाही हे बघून नाईलाजाने उभा रहातो.

तीनही प्रसंगात स्त्री आपल्या सवलतीचा गैरवापर करताना दिसते. (या वाक्यावर युद्ध अपेक्षित) पूर्वी काही आसनं राखीव असायची. आता चालकामागची अर्ध्याहून जास्त आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतात. डाव्या बाजूला अपंग, वृद्ध, सैनिक इत्यादी. उरलेली आसनंही 'पुरुषांसाठी' राखीव नसतात. ती जनरल असतात. जिथे प्रसंग २ प्रमाणे पुरुषच अनेकदा जागा देतात. असो.

तर. ही सवलत किंवा हे प्रिविलेज जे दिलंय त्यामधे आणि हक्क किंवा राईट मधे फरक आहे. दुर्दैवाने तो अनेकांना कळत नाही. कुठलंही जनरलायझेशन न करता काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो, काही मतं मांडू इच्छितो.

१) खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करणा-या स्त्रीया, राखीव आसनांचा उपयोग किंवा समर्थन करतात, हा दुटप्पीपणा नाही का?

२) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं.

३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा.

४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको.

५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?
असो.

प्रसंग ४:
स्थळ: प्रचंड गर्दी असलेली एक बस
एक सभ्य पुरुष स्वतःला सांभाळत एका सीटला टेकून उभा आहे. एक स्त्री उतरण्यासाठी पुढे जात असते. तोंडाने काही बोलत नाही बाजूला व्हा सांगत नाही आणि खबदाडीतून पुढे सरकत असते. असं होत असताना त्या पुरुषाला तिचा/तिला पुरुषाचा धक्का लागतो. आणि ही आधीच तडकलेली; अजून तडकते. 'गर्दीत मुद्दाम उभे राहता काय? लावू का एक कानशिलात?' काहीबाही बोलायला लागते. शिव्याही देते दोन. (स्त्रीने शिव्या देऊ नयेत / द्याव्यात किंवा स्त्रीयांसाठी राखीव शिव्या असाव्यात का हा एक विषय होऊ शकतो). तो सुरुवातीची चार वाक्य शांतपणे बोलतो. सॉरीही म्हणतो. पण शिवी दिल्यावर, 'मुद्दाम', 'चान्स' असे शब्द वापरले गेल्यावर तोही आवाज चढवतो. घरचे राग समोर येईल त्यावर काढायचं काम नाही मॅडम. ऐकून घेतोय म्हणून वाट्टेल ते बोलू नका. इत्यादी शाब्दिक चकमक घडते.

आसनांचा एक वेगळा मुद्दा झाला. पण सर्वसाधारणपणे पुरुषाकडे खुनशी नजरेनेच बहुतेक स्त्रीया बघताना दिसतात. याला आजूबाजूला घडणा-या गोष्टी जरी काही अंशी कारणीभूत असल्या तरीही हे अती होतं अनेकदा. म्हणजे प्रत्येक पुरुष हा वाईटच आहे आणि तो आपल्याला काहीतरी करणारच आहे असा भाव घेऊन वावरण्याची गरज नाही.

६) सभ्य पुरुष हे बस, ट्रेन इत्यादी सर्वच ठिकाणी सभ्यपणा दाखवतात. परंतु सगळ्यांना एकाच चश्म्यातून बघितलं जात असल्याने, प्रसंग २ प्रमाणे त्यांच्या नशिबी साधं थँक्यू सुधा येत नाही.

७) प्रिव्हिलेज आणि राईट यात गल्लत होते आणि मग माणुसकीलाही त्या राखीव जागेवर जागा मिळत नाही. प्रसंग १ प्रमाणे एखाद्या व्यक्तीला खरोखर उभं राहता येत नसेल तरीही उठवलं जातं, तेही उद्दामपणे.

८) आमचं ते आमचंच पण तुमचं तेही आमचं या तत्वानुसार स्त्रीया कुठल्याही आसनावर बसू शकतात, रेल्वेत कुठल्याही डब्यात चढू शकतात. पण पुरुषांना तो हक्क नाही. कॉमन डब्यात (बघा हं, तो ही जेंट्स डबा नसतो टेक्निकली) प्रेमी युगुलं, किंवा गर्दीत सेफ वाटणा-या महिला प्रवेश करतात आणि ती अदरवाइज कम्फर्टेबल असणारी गर्दी उगीच अनकम्फर्टेबल करून टाकतात. चुकून धक्का लागला तर आपणच मार खाऊ या भीतीने पुरुषच अंग चोरून उभे राहतात.

धागा नीट मांडता आला नाही याची कल्पना आहे. पण ठीक आहे काथ्याच कुटायचा आहे मग तो आधीच थोडा कुटल्यासारखा असला म्हणून काय बिघडलं? असं म्हणून धागा टाकत आहे.

वरील तीनही प्रसंग अनेकदा बघितलेले आहेत. बाकी पुढे तुम्ही बघितलेले अनुभवलेले प्रसंग सांगायला आमंत्रण देण्याची गरज नाही.

जाता जाता; जिकडे तिकडे स्त्रीयांना प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट, रिझर्वेशन असतं. मिपा वरही अनाहिता फक्त स्त्रीयांसाठी आहे. तर मिपावर फक्त पुरुषांसाठी एक्स्क्लूजिव एक सेगमेंट असावं असं मी सुचवू इच्छितो.

वाट्टेल ते झालं तरी लेडीज सीट वर न बसणारा.
वेल्लाभट

नवीन म्हण - सीट नको पण स्त्री आवर.

प्रतिक्रिया

हजारो वर्षांच्या अन्यायाचा बदला घेताहेत हो. प्रतिसादही तसेच येणार बघा आता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 12:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Apr 2015 - 12:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

असा पावलोपावली पुरुषांचा व्देष आणि अपमान करुन क्षणोक्षणी पुरुषांना मरणयातना देण्या पेक्षा,

सर्व पुरुषांना एका रांगेत उभे करावे आणि गोळ्या घालुन ठार करावे.

ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.

हाय काय अन नाय काय...

पैजारबुवा,

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 12:09 pm | कपिलमुनी

लेख एकांगी आहे.
ज्या असभ्य पुरुषांमुळे राखीव आसने ठेवायची वेळ आली आहे त्या असभ्यतेबद्दल एकही शब्द नाही.
लोकल , बस, गर्दी मध्ये 'काही' असभ्य लोक गैरवर्तणूक (बर्‍याच महिलांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना हे अनुभव येतात) करतात त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झालेत . दिलेल्या सवलतींचा गैरफायदा स्त्रिया घेत आहेत हे अंशत: खरे आहे पण ग्रामीण भागात महिला एवढ्या जागरुक दिसत नाहीत.

भुमन्यु's picture

14 Apr 2015 - 12:39 pm | भुमन्यु

ग्रामीण भागात महिला राखीवचा प्रश्न ही नसतो. (यष्टीत तर २-३च शीटा राखीव असतात)

पंतश्री's picture

14 Apr 2015 - 1:31 pm | पंतश्री

ज्या असभ्य पुरुषांमुळे राखीव आसने ठेवायची वेळ आली आहे त्या असभ्यतेबद्दल एकही शब्द नाही.

अप्रव्रुक्ति सगळ्या समाजात आहेत, पण म्हणून काहि सगळ्याना दोश देता येनार नाहि.
पण महिलांना दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेताना सगळिकडे दिसतात. ह्या बद्द्ल स्त्रिमुक्ति वाले बोलत नहित. तेव्हा ह्याची वाचा बसते.

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 2:56 pm | कपिलमुनी

सर्वच स्त्रिया गैरफायदा घेत नाहीत.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 2:03 pm | वेल्लाभट

मी सभ्य पुरुषांच्या बाजूने लिहीलं हो....

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 2:57 pm | कपिलमुनी

तुमच्या सभ्यपणाबद्दल खात्री आहे हो ;)

यसवायजी's picture

14 Apr 2015 - 12:10 pm | यसवायजी

वाचतोय!!!

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 12:10 pm | पॉइंट ब्लँक

असू द्या हो. आपण पुरुष आहे, हसतखेळत पेलायची सहनशक्ती आणि वेळ आल्यास रक्तपात करायची क्षमता निसर्गाने आपल्यालाच दिली आहे. एक रडगाणं मांडायची क्षमता त्यांना दिली तर कुठं बिघडलं.

पंतश्री's picture

14 Apr 2015 - 1:37 pm | पंतश्री

आपण पुरुष आहे, हसतखेळत पेलायची सहनशक्ती आणि वेळ आल्यास रक्तपात करायची क्षमता निसर्गाने आपल्यालाच दिली आहे. एक रडगाणं मांडायची क्षमता त्यांना दिली तर कुठं बिघडलं

अहो ह्याच मुळे ह्या केसानी गळा कापायला लागल्या आहेत. रक्तपात हा शारीरीक पेक्शा मानसीक असला तर तो जास्त विधवन्सक असतो, हयात स्त्रियाची क्षमता फारच पूढे आहेत.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

15 Apr 2015 - 9:43 am | जेम्स बॉन्ड ००७

हसतखेळत पेलायची
सहनशक्ती

ROFL

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcR3Z9f5GAL35ctKSLKs8jsV9ZNj9sSB2HRa9GvaKKLiE8uTh0Hi

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 12:44 pm | पिलीयन रायडर

मी अनेकदा बसने प्रवास करते. मी सुद्धा असेच काही प्रसंग तुम्हाला सांगते

प्रसंग १

रात्री ८ ची वेळ. पाऊलही ठेवायला जागा नाही अशी खचाखच भरलेली बस. पाठीवर लॅपटॉप बॅग. ३० मिनिटे उभं राहुन प्रवास. स्त्रियांसाठी राखीव जागेवर एक ६०चे गृहस्थ. समोर किमान १० जणी उभ्या. एकीनेही त्यांना उठवले नाही.

प्रसंग २

दुपारची वेळ. बर्‍यपैकी गर्दी. एक पुरुष बरोब्बर कॉलेजवयीन मुलीच्या मागे उभा राहुन नको ते चाळे करतोय. मुलगी गर्दीमुळे धक्का लागत असेल असे समजुन.. हिंमत नाही म्हणुन.. किंवा अन्य कोणत्याही कारणाने गप्प. शेवटी मी त्याच्या समोर जाउन उभी राहिले. म्हणलं बघु काय करतोय नक्की. पुन्हा तसाच स्पर्श.. मग आरडाओरडा करुन हाकलला.
गर्दीचा धकका आणि सहेतुक स्पर्श बायकांना जनरली कळतोच. त्यातही असा स्पर्श झाल्यावर अनेक जणी बुजुन गप्प रहातात. ते % तुम्हाला कळत नाही. अगदी काही आरडा ओरडा करतात. त्यातही तो अगदी काही केस मध्ये गैरसमज असतो. तुम्ही सुद्धा सरसकटीकरण करु नका.

प्रसंग ३
स्त्रियांच्या राख्व जागेवर एक धडधाकट तरुण बसलाय. एक काकु हातात मोठं ओझं घेउन उभ्या. उठ म्हण्लं तर भांडला. मी माझी जागा काकुंना दिली. वर हे ही म्हण्लं की "जौ द्या हो.. त्याला नक्की माहित नसेल की तो स्त्री आहे की पुरुष... म्हनुन तर लेडीज सीट साठी भांडतोय.."

प्रसंग ४
मी पाठीवर लॅपटॉप + २ दिवसांचे सामान अशी भली मोठी बॅग आणि कडेवर ३ वर्षाचा मुलगा घेऊन गर्दीमध्ये बसमध्ये चढले. हक्कानी स्त्रियांसाठी बसलेल्या पुरुषाला उठवते. अनेकदा लोक स्वतःहुन उठतातच. त्यांना मी आठवणीने धन्यवाद देते. हेच मी एकटी असते तर १०० पैकी १०० वेळा पुरुषांना उठवत नाही. (अगदी मासिकधर्म चालु असेल.. तरीही..)

सौजन्याने बोलुन राखीव सीट घेणार्‍या सुद्धा बायका आहेत. "प्रत्येक" स्त्री सीटवरुन पुरुषाला उठवलं की "कसा धाक आहे" असा लुक देत नाही. म्हणजे अगदीच कै च्या कै विधान आहे हे.

लेकुरवाळ्या स्त्रियांना तर १००% राखीव सीट हव्याच. तुम्ही काहीही म्हणा (बोंबला...) पण सर्वांना न्याय्य जागा मिळाव्या म्हणुन माझं मुल घेऊन मी गर्दीत चिरडली जाणार नाही. आणि हो.. लहान मुल हातात असलेला पुरुष असेल तर त्याला अजिबात उठायला न लावणार्‍या असंख्या बायका आहेत. किंवा जर पुरुषाच्या सोबत मुलं असतील तर त्यांना अनेक बायका मांडीवर घेतात. जेणेकरुन बाळाला त्रास होऊ नये. पण खुपदा खुप लहान मुलं जात नाहीत दुसर्‍यांकडे तेव्हा बायका स्वतः वडील-बाळाला जागा करुन देताना पाहिल्या आहेत.

स्त्रियांना खांद्याला खांदा लावुन हक्क हवे आहेतच, पण वागणुक सुद्धा तशीच हवी आहे. बस मध्ये चढलेली स्त्री काही पुरुषांना स्वतःची प्रॉपर्टी वाटते. तिला कुठेही हात लावला तर चालतो.. तिला कुठल्याही अवयवाने टच केला तर चालतो असले विकृत पुरुष अनेक आहेत. तुम्ही तसे नसलात म्हणुन बाकी जग सभ्य आणी सुसंस्कृत असेलच असं नाही. ह्या प्रकाराला काय लेव्हलवर आम्ही सामोरे जातो ह्याची तुम्हाला कल्पनाही नसावी. अगदी शाळकरी पोरांपासुन ते म्हातार्या आजोबांपर्यंत सगळीकडे हरामखोर लोक आहेत. अशांपासुन वाचायला राखीव सीट हे वरदानच आहे. तुम्ही जे पुरुष अंग चोरून उभे रहातात वगैरे करुण वर्णन केलय ना ते खरंच बालीश आहे. (नाही टोमणा नाहीये.. मनापासुन लिहीतेय..) सगळेच पुरुष असे नसतात.. जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात तसंच..
जोवर पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार करण्याचं (अगदी सहेतुन स्पर्ष ते बलात्कार..खुन.) प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे तोवर स्त्रियांना झुकतं माप मिळणार की नाही? उगाच खांद्याला खांदा वगैरे म्हणलं की स्त्रिया सेफ होतात की काय?

बाकी पुरुषांना मिपावर विभाग पाहिजे की नको.. द्यावा की न द्यावा ह्यावर आमचं काही म्हणणंच नाही.. (तुमचं फोर नो रिझन अनाहिता बद्दल असतं तसं..) काय वाट्टेल ते करा.. आमच्या पप्पांचे काय जाते..

लेडीज सीट वर न बसल्या बद्दल धन्यवाद!

वरील प्रतिसादाशी सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 12:56 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ तसेच.. दूसरी बाजू परिपूर्ण मांडल्या बद्दल धन्यवाद.

साला आता सहमत कुणाशी होऊ असा प्रश्न पडू राहिलाय खरा. दोन्ही बाजूंत तितकाच दम आहे.

नाखु's picture

14 Apr 2015 - 2:33 pm | नाखु

सरसकटीकरणास तीव्र विरोध.
बहीण्-आई-मुलगी-पत्नी-मैत्रीण अश्या सगळ्यांना अगोदर एक स्त्री+मनुक्श म्हणून आदर दिलाच पाहीजे आणी मग बाकी मुक्तिच्या बाता....

बॅटमॅन's picture

14 Apr 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

बाकी आदर द्यायचा त मनुक्श म्हणून, लिंगाधारित नाही.

यसवायजी's picture

14 Apr 2015 - 1:00 pm | यसवायजी

+१. याचीच वाट बघत होतो.
वेल्लाभट यांच्या मुद्द्यातही तथ्य आहे. पण तुमच्या बाजूला (माझ्याकडून) जास्त पॉईन्ट.

स्त्रियांच्या राख्व जागेवर धडधाकट तरुण बसलाय

.
..मुद्दे सगळे ठीक आहेत..पण वरीलसारख्या वाक्यांत काही विरोधाभास वाटतो का? पटकन लिहिताना न जाणवणारा..?

बॅटमॅन's picture

14 Apr 2015 - 1:45 pm | बॅटमॅन

हाहा, अगदी अगदी.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 2:18 pm | पिलीयन रायडर

हो गवी.. म्हणुनच म्हण्लं ना की मी १०० पैकी १०० वेळा एकटी असताना पुरुषांना उठवत नाही. मी धडधाकट आहे. मला गरज नाही. माझ्यात तासभर प्रवास गर्दीत करायची ताकद आहे. शाररिक आणि मानसिक सुद्धा.. कुणी काही वावगं वागलं तर दोन मुस्काटात हाणायची सुद्धा...
पण सगळ्याच मुली हे करु शकत असतील असं नाही. ह्या प्रकारांमुळेच कदाचित राखीव जागांचा निर्णय घेतला असावा. शिवाय गरोदर, मासिकधर्म चालु असणार्‍या, लहान मुल असलेल्या बायकांना खरंच गरज असतेच बसायला जागा मिळण्याची.
ज्या पुरुषांना अशी गरज असते जसे की वृद्ध / अपंग / आजारी इ. त्यांना बायका जागा देतातच. मी कित्येकदा दिली आहे. (हो.. राखीव जागा.. जनरलवाली नाही..)

पदम's picture

14 Apr 2015 - 2:52 pm | पदम

१००% सहमत

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 12:02 pm | खंडेराव

चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उत्कृष्ट प्रतिसाद. आणि सहमतही.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा

अगदी सहमत

जोवर पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार करण्याचं (अगदी सहेतुन स्पर्ष ते बलात्कार..खुन.) प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे तोवर स्त्रियांना झुकतं माप मिळणार की नाही? उगाच खांद्याला खांदा वगैरे म्हणलं की स्त्रिया सेफ होतात की काय?

हे तुमचे वयक्तिक मत आहे. ५३% बलात्कारचे आरोप खोटे आहेत. हि लिन्क. ह्या वर कोणतीहि स्त्री बोलताना दिसत नाहि. सगल्या चुका पुरुशच करतात.

जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात

हे मान्य आहे.

ह्या प्रकाराला काय लेव्हलवर आम्ही सामोरे जातो ह्याची तुम्हाला कल्पनाही नसावी.

तुम्हालाहि काहि कल्पना नाहि कि ज्याच्या वर असा मानसीक हल्ला होतो एका स्त्रि कडुन तेव्हा त्याच्या परिवाराचि परिस्थिती काय होते.

तुम्ही जे पुरुष अंग चोरून उभे रहातात वगैरे करुण वर्णन केलय ना ते खरंच बालीश आहे.

हे खरे आहे हे प्रत्यक्श बघितले आहे मी.

अगदी शाळकरी पोरांपासुन ते म्हातार्या आजोबांपर्यंत सगळीकडे हरामखोर लोक आहेत. अशांपासुन वाचायला राखीव सीट हे वरदानच आहे.

तुम्हाला तरी एक वरदान लाभले आहे, अम्हाला तर अश्या हरामखोर स्त्रीयान पासुन कोण वाचवनार???

प्रमाण जगात एकंदरीत स्त्रियांनी पुरुषांना शाररिक त्रास देण्याच्या प्रमाणापेक्षा (फारच) जास्त आहे

कारण एका बाइने मारले म्हणुन पोलिसात गेले तरी पोलिस हसतात आणि हाकलतात.तेव्हा तुम्हि फक्त टिव्हि वर बातम्या बघुन मते बनवु नका.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 2:14 pm | पिलीयन रायडर

तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही पण ते ५३ केसेस आहे की ५३% आहे ते जर चेक करता का? माझ्यामते तुमची चुक होतेय.

तुमच्या बाकी सर्व प्रतिसादाला उत्तर न देण्याचा निर्णय मी तुमचे एकंदरीत बाकीचे प्रतिसाद पाहुन घेत आहे. मला माझी मनःशांती अत्यंत प्यारी आहे!

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 3:15 pm | कविता१९७८

पिरा ,

सर्वच प्रतिसाद छान आणि योग्य.

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 12:14 pm | खंडेराव

प्रतिसाद.. कुठे आहात पंतश्री आपण ?
मला, आठवते तेव्हा पासुन असा अनुभव एकही आला नाही जेथे पुरुष टारगेट होतोय.
मला वाटायचे मुलींनाही त्रास नसेल, चर्चा जास्त होते. २ मुली, ज्या माझ्या टिममधे होत्या, त्यांनी रोजच्या बस प्रवासातले अनुभव सांगितले तेव्हा हबकलो मी. पिंपरी चिंचवड ते औंध असा रोजचा प्रवास म्हणजे लढाई होती त्यांच्यासाठी.

अपवाद आणि राजरोसचे व्यवहार यात गल्लत होतीय आपली.

शब्द अन शब्दाशी सहमत.
अपवाद आणि राजरोसचे व्यवहार यात गल्लत होतीय आपली.
हा तर ह्या चर्चेतला सर्वांसाठीच कळीचा मुद्दा!

सविता००१'s picture

14 Apr 2015 - 2:36 pm | सविता००१

ज्जे बात. खूप सुरेख प्रतिसाद दिला आहेस. हेच लिहायला आले होते
:)

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 2:45 pm | वेल्लाभट

दुसरी बाजू समर्थपणे मांडून धाग्याचं एकांगीपण संतुलित केल्याबद्दल आभार.

कुठलंही जनरलायझेशन न करता...

असं मी धाग्यात म्हटलं असूनही तुम्हाला सरसकटीकरणाचा भास झाला त्याचं वाईट वाटलं.

तुम्ही दिलेल्यापैकी
प्रसंग १: #रिस्पेक्ट
प्रसंग २: ठाऊक आहे असे, आणि असेच जास्त असतात. त्यांना ठेचलंच पाहिजे जिथे तिथे. ही सामाजिक समस्या आहे.
प्रसंग ३: मुजोर पुरुष. कानफडवा.
प्रसंग ४: पुन्हा #रिस्पेक्ट

जी विधानं तुम्हाला कै च्या कै किंवा बालिश वाटली ती तुम्हाला वाटली असतील तशी. पण तसंही होतं हे खरं आहे. पुढे तुम्हीच तसं म्हणाला आहात.

सगळेच पुरुष असे नसतात.. जशा सगळ्याच बायका कांगावखोर नसतात तसंच..

सो; एनीवेज. तुमच्या प्रतिसादाने धागा किकस्टार्ट झाला. पण दोनही बाजू आहेत आणि दोनही ख-या आहेत हेच खरं आहे.

बाकी मिपावर शेपरेट विभाग सुरु करावा की नाही हे पुढील प्रतिसादांत ठरेलच.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 3:56 pm | पिलीयन रायडर

तुमचे हे काही मुद्दे राहिलेत माझ्याकडुन

२) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं.

३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा

.

त्याला आरक्षण म्हणत नाहीत. तसं असेल तर मग उरलेल्या जागा आपोआप "पुरुषांसाठी राखीव" होणार नाहीत का?!

४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको.

मी तर म्हणते बसच द्या वेगळी. कुणाला साला त्या थर्ड क्लास, लोचट पुरुषांचे गचाल स्पर्श सहन करायचेत.. खाली म्हणत आहेत तसा ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!!

५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?

सगळ्याच बायका असं करत नाहीत. हेच ते सरसकटीकरण..

असो. मलाही लेख एकांगी वाटला. स्त्रिया ह्या मुजोर आणि पुरुष मात्र भयंकर सोज्वळ असा सुर वाटला. प्रत्यक्षात दोन्ही बाजुंना आपापले त्रास आहेत..

ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!!

लै बरं होईल, असली पिरपिर (तुमची नव्हे हां, मूळ कवितेसारखी. स्त्रियास्त्रियांतही फरक असतो. एकीला घातलेल्या शिव्या अख्ख्या स्त्रीजातीला आहेत असा समज करून धावून येणार्‍या रेम्याडोक्यांना अगोदरच सजेशन) तरी थांबेल.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 4:13 pm | पिलीयन रायडर

मुळ कविता?
कोल्हेकुईने भंजाळला काय रे!!!

बॅटमॅन's picture

14 Apr 2015 - 4:17 pm | बॅटमॅन

भावणा पोचल्या का? की पिराबादेत पार्सल करून पाठवून देऊ?

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 4:40 pm | पिलीयन रायडर

धगधगतं पार्सल कोण आणणार रे तुझं!!

असो..

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 4:46 pm | वेल्लाभट

बघा तुम्ही पुन्हा सगळ्यांना एकाच मापकाने मापताय. सरसकटीकरण तुम्ही करताय.
असो.

सूड's picture

14 Apr 2015 - 3:20 pm | सूड

सगळं मान्य हो, जरा ती कोल्हेकुई तेवढी आवरा!!

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 4:15 pm | पिलीयन रायडर

ओ ते कोकरु आमच्या कळपातलं नाहीये..
आणि कोल्हिण्बाई ह्या अ‍ॅक्चुअली एखादा सोंग घेतलेला लांडगा अस्लाच तर!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 5:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दंबुक आहे आपल्याकडं सारकॅझमनी भरलेली. हो जायेगा शिकार.

चिमणरावांनु, ह्या मना लिवलांव काय?

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 7:48 pm | टवाळ कार्टा

तुका नाय रे...तु तर मिपाची तोप आसयं...खयसूनं पन फुटनारी

तोफ नाय, रणगाडो आसंय मी!! समाजलां मां? भेट, मगे फोडतंय तुका!! =))))

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 8:00 pm | टवाळ कार्टा

म्हण्जे फुग्यासारखो गोल आनी तेका बारकी नळीये

रणगाड्याची चांगलीच म्हायती हा मरे तुका...अशे कितके बघितले मरे? =))))

बॅटमॅन's picture

15 Apr 2015 - 2:11 pm | बॅटमॅन

असं काय करतोयस सूड, ती विजुभौंची नि:शब्द नामक कथा आठवतेय का? ती सायकल आणि रणगाड्याच्या टक्करीची गाथा? ते ढाब्यावरचे शिकरण?

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2015 - 3:38 pm | टवाळ कार्टा

तु म्हणतोस ते आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठीचे रणगाडे...सूडच्या मनात मात्र "तसले" चित्र उभे राहीले =))

सूडच्या मनात मात्र "तसले" चित्र उभे राहीले

तसले म्हणजे कसले रे? मी तर उलट कौतुक केलंय तुझं की रणगाड्यांची बरीच माहिती आहे तुला म्हणून.

कसलं चित्र उभं राह्यलं माझ्या मनात ते मला कळू देत तरी!!

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2015 - 8:42 pm | टवाळ कार्टा

तु रवाने मरे...आता फडताळातसून ़ कपाटातसून भायेर ये...हयसर तुका कोन काय म्हणायचो नाय...जो म्हणेल त्याच्या आवशीचो घो

सूड's picture

15 Apr 2015 - 3:47 pm | सूड

ऑ? ह्या काय?

आजतक दांडू से ले के बाकी भी बहुत उपमाएं सुनी हैं, लेकिन ये रणगाडेवाला लफ़्ज़ इस सिलसिले में पहली मर्तबा सुना. ;)

ब्याट्या, विषय चेंज नको करु रे....टक्या, एक्षप्लैन प्लेअसे!!

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2015 - 4:37 pm | टवाळ कार्टा

बग...त्या वागळाक पन कळ्ळा मरे...आनं तू ऑ ऑ च करत रवलोस...माशे खात जा मरे जरा...कस्लो मालवणी तू
=))

आता फडताळातसून भायेर ये...हयसर तुका कोन काय म्हणायचो नाय..

ह्या काय तां सांग!! बाकीची उस्तवारी जायना माका..

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

चोमे ओउत ओफ च्लोसेत...नोबोद्य विल्ल मके योउ फील दिफ्फेरेन्त
=))

मेल्या ट्रान्सलेशन नाय विचारलं मी!!

आता मला पण ऐकायचंय, कसलं फडताळ आणि त्यातून मी बाहेर यायचंय!!

तुमी लोक ते फडताळ आप आपल्या खरडवहीत हलवा...

(खत्रुड)जेपी

असं नाय, नळावर एकदा धुणं आणलं धुवायला की ते धुवून झाल्याशिवाय घरात नाय न्ह्यायचं!!

टवाळ कार्टा's picture

15 Apr 2015 - 8:43 pm | टवाळ कार्टा

आता परत नळावरसून जावान ये बगू

ता काय ता बगतंय मी, माका उत्तर दी!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 9:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिपावरती उजव्या मताची मंडळी वाढतं चाललेली आहेत असं हे प्रतिसाद झाडाचा आकार बघुन लक्षात येतं आहे.

सूड's picture

15 Apr 2015 - 10:48 pm | सूड

चिमणराव, प्लीज ह्या कार्ट्याने उत्तर देईपर्यंत कोणी विषय नका बदलू. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कितीही उजवीकडे झुकायला लागलं तरी चालेलं. तु टवाळाकडुन काढचं रे उत्तर. वशाड मेलो कैबी बरळतय आज ;)!!!

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा

सूडाक नाय काम...हडसरच पसरलेलो अस्ता दिवसभर

खटपट्या's picture

16 Apr 2015 - 10:54 am | खटपट्या

मी वायच अजुन पसारतो..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पसरवायला हातभार लावतो. एक टक्या एक्ष्प्लनेशन दे की लौकर.

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा

तुला पन कल्लावं नाय?...परत सुरवातीपासून वाच

तो काय देणार एक्ष्प्लनेशन!! नेहमीसारखाच स्वतःच्या पार्श्वभागाला पाय लावून पळाला तो! ;) =))))

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 2:16 pm | टवाळ कार्टा

परत वाच रे पैला प्रतिसाद...बाकी मला तुझ्यासारखे खवचट/कुजकट बोल्ता नै येत मग त्यामुळे जावेच लागते...जौदे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2015 - 5:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असो. मिपाचं पान संपेल अजुन बक बक केली तर.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Apr 2015 - 8:09 pm | लॉरी टांगटूंगकर

के

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2015 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

दमलाव इतक्यातच ?!

अगोदर्च्या पब्लिकने प्रतिसाद पानाच्या पार उजवीकडे नेऊन त्यांचा कडेलोट केला होता !

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2015 - 10:18 pm | टवाळ कार्टा

"अभयदान" मिळ्णार असेल तर या धाग्याला पण कडेलोटच कै....पुढला स्वर्ग पण दाखवतो ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Apr 2015 - 11:03 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रत्यक्ष एक्काश्री असल्यावर चिंता कसली?

बॅटमॅन's picture

23 Apr 2015 - 12:13 am | बॅटमॅन

अगदी अगदी!

ब्याट्या, विषय चेंज नको करु रे....टक्या, एक्षप्लैन प्लेअसे!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 10:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुका नाय रे....तु तर मेल्या दोस्तं असाव...ते कोल्ह्याचं कातडं पांघरुक आलेल्या लांडग्याक ठोकायचा असा...जल्ला!!!

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 3:32 pm | पॉइंट ब्लँक

पिलीयन रायडर-
तुमचे सगळ्ळे मुद्दे फक्त बरोबरच नाहीत तर कौतुस्कापद आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या सारखा विचार करणार्या स्त्रिया समजात मायनॉरिटी मध्ये आहे. बाकीच्या बहुतांश स्त्रि-मुक्तीच्या भडीमारानं ब्रेनवॉश झालेल्या असतात आणि म्हणून हे वाद होतात.

स्पंदना's picture

14 Apr 2015 - 5:19 pm | स्पंदना

संयमित, सव्विस्तर आणि सर्वांगिण लिहीलस पिरा.

बसमध्ये राखीव जागांची गरज कशामुळे भासली ते छान सांगितले आहे. समजुतदारपणे या सवलतींचा वापर कसा केला जातो हे सांगून स्त्रियांच्या सहसा न बोलणार्‍या एका गटाचे म्हणणे इथे मांडलेआहे. न बोलणार्‍यांची कहाणी मांडून संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.

अवतार's picture

14 Apr 2015 - 11:47 pm | अवतार

सहमत.

भावना कल्लोळ's picture

15 Apr 2015 - 3:05 pm | भावना कल्लोळ

अगदी सयंत प्रतिसाद पिरा …

अतिशय सुंदर धागा. प्रतिसाद देऊन वर आणतो. माझ्या मते पि.रा. ताईनी मांडलेली बाजू जास्त योग्य आहे. राखीव सीट स्त्रीसाठी सुरक्षा कवच आहे.

शंतनु _०३१'s picture

14 Jul 2015 - 5:44 pm | शंतनु _०३१

काही अंशी सहमत

शंतनु _०३१'s picture

14 Jul 2015 - 5:45 pm | शंतनु _०३१

काही अंशी सहमत

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 1:31 pm | संदीप डांगे

दोन्ही बाजू बघितल्यास समस्या सरसकटीकरणामुळे निर्माण होणार्‍या विषचक्राची आहे. काही लोक (स्त्री-पुरुष दोन्ही) चांगले असतात, काही वाईट. हा स्त्री-पुरुष, काळे-गोरे, गरिब-श्रीमंत असा झगडा प्रत्यक्षात चांगले-वाईट या दोघांतला आहे असे वाटते. पण सरसकटीकरणाने डोक्यावर परिणाम होऊन सगळे जग पिवळे दिसायला लागते.

असो.

अहो चुकि पुरुशानचि नाहि तशी स्त्रिचि पन नाही. पण वाद घालुन अम्हीच भारी कशाला बोलयचे. सर्व बायकानचे अम्हि आपल्या गरिब हे पालुपद सुरुच असते.

कंजूस's picture

14 Apr 2015 - 2:29 pm | कंजूस

प्रश्न सुटला का ?
टिँण टिंण.
बस जाऊ द्या.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 2:31 pm | काळा पहाड

पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे

सोयीस्कर रित्या मी मनसेचा किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता होवू शकतो. माझ्या हिशेबात महाराष्ट्रातले आजोबा यांना नॉर्थ इंडियन किंवा गुजराती स्त्रियांपेक्षा जास्त अधिकार आहेत. हिंदी लोकांनी इथं शिकवायचं नाही. रहायचं तर गप्प रहायचं. मी आजूबाजूला असतो तर सरळ शिव्या दिल्या असत्या.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 2:49 pm | वेल्लाभट

व्हायचंच आणि!

मी बघितलेल्या अनेक प्रसंगात व्यक्ती हिंदीतूनच सुरू करतात. जाम भडका उडतो डोक्याचा.
प्रवासी/वाहक जर हिंदीत बोलला आणि चेह-यावरून मराठी वाटला तर मी सरळ विचारतो, मराठी आहेस ना? मग मराठीत बोल की राव.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 2:54 pm | काळा पहाड

मुंबईतला (किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणीही) वाहक हिंदी कसा असेल? असेल तर मनसे सारख्या संस्था काय करतायत?

सर कुठ्ल्या विश्वात राहता आपण?

आहेत. भरपूर आहेत. उल्लेखित राजकीय पक्षाकडून जाम म्हणजे जाम आशा होत्या सांगतो प्रामाणिकपणे. पण परिस्थितीत किरकोळ बदल आणि बरीच खळबळ होण्यापलिकडे काहीही झालं नाही हे दुर्दैव. आता पदोपदी तुम्हाला अमराठी वर्चस्ववादाला तोंड द्यावं लागतं. वस्तुस्थिती आहे.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 3:14 pm | काळा पहाड

मी पुण्यनगरीत रहातो आणि इथे कार व बाईक दोन्ही असल्याने तीच वापरली जाते. बसचा प्रवास मी जवळ जवळ एक दशक केला नाहीये.

प्रभाकर पेठकर's picture

14 Apr 2015 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

स्त्रियांसाठी स्वतंत्र बसेस (ज्यात पुरुषांना बंदी असेल) आणि स्वतंत्र बसस्टॉप्स असावेत. गुलाबी रंगाच्या 'फक्त स्त्रियांसाठी' (स्त्री चालक असलेल्या) सुरु झाल्या आहेत असे कुठेतरी वाचले. बायका बसही चालवू शकतात. मग वेगळ्या 'फक्त स्त्रियांसाठी' बसेस सुरु कराव्यात असे सुचवितो.

कांही रेल्वे लोकल्सही फक्त स्त्रियांसाठी असाव्यात.

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:16 pm | संदीप डांगे

आहेत, काही लेडीज स्पेशल लोकल्स आहेत.

बाकी, स्त्रियांसाठी स्वतंत्र देशच का नसावा?

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 3:20 pm | काळा पहाड

सगळा ग्रहच करूया नावे.
आता मंगळावर जायचं चाल्लंय.
पाठवून द्या.
पृथ्वी पुरूष ग्रह आणि मंगळ स्त्री ग्रह.
है कै नै कै.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 3:27 pm | वेल्लाभट

नो नो
मेन आर फ्रॉम मार्स ना...
मग मेन शुड गो देअर.
असा युक्तिवाद होईल.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 3:34 pm | काळा पहाड

मग ठिकाय आपण सगळे मंगळावर जाऊ.
जास्तीत जास्त काय तर ऑक्सिजन सिलींडर घेवून फिरावं लागेल.
बट विमेन आर फ्रॉम व्हिनस.
तेव्हा त्यानी तिकडं गेलं पाहीजे.
सध्या तिकडं ४६० डिग्री तपमान आहे म्हणे.

बॅटमॅन's picture

14 Apr 2015 - 3:46 pm | बॅटमॅन

अतिरेकी अन एकांगी स्त्रिमुक्तिबाधित स्त्रियांनी अगोदर शुक्रावर गेले पाहिजे.

त्यांनी पुरूषनामवाचक ग्रहावर का जावे..? ;)

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 3:57 pm | पॉइंट ब्लँक

अ मिलियन डॉलर क्वेश्शन!

त्याचं असंय की शुक्र हे नाव इंड्यन आहे तर व्हीनस हे स्त्रीवाचक नाव विंग्रजी आहे.

तसंच बघायचं झालं तर सूर्य नामक पुरुषी नावाच्या तार्‍याची ऊर्जाही स्त्रियांनी घेतली नाय पायजे, कसें?

तरी अजून धाग्याचे नांव नीट वाचले गेले नसावे.

त्या एका मुद्द्यामध्ये धागालेखकाला काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवण्याचे पोटेन्शिअल आहे. ;)

वेगळी चूल मांडल्यापासून (काय स्त्रीवादी उपमा आहे =)) ) सुस्त झाले असावेत लोक.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 3:24 pm | पॉइंट ब्लँक

बाकी, स्त्रियांसाठी स्वतंत्र देशच का नसावा?

लै बोर होतील सगळेच.

स्वधर्म's picture

14 Apr 2015 - 3:25 pm | स्वधर्म

या निमित्ताने माझ्या अायुष्यात घडलेला एक प्रसंग:
माझ्या मुलीची शाळेला घेऊन जाणारी बस सोसायटीच्या गेटवर साधारण सव्वा अाठ वाजता येत असे. ती वेळ माझा लहान मुलगा झोपेतून उठण्याची असल्याने व बायकोला डबा वगैरे करण्याची गडबड असल्याने मुलीला सकाळच्या वेळी शाळेच्या बसला सोडण्याचे काम बर्याचदा माझ्यावर येत असे. तिथे बर्याच बायकाही अापअापल्या मुलांना सोडायला येत असत. मुलगी बसमध्ये बसली, की ती रोजच हसून बाय करायची. मी पण हात हलवून तीला निरोप देत असे. हे सगळे ती बसमध्ये जागेवर बसल्यावर अाणि मी खाली असताना बर्याचदा व्हायचे. सगळेच अाईवडील हसत हसत निरोप द्यायचे.
एक दिवस दुसर्या सोसायटीतल्या एक बाई अापल्या मुलाला बसमध्ये जागेवर बसवून देण्यासाठी अात चढल्या. सहसा कोणी पालकाने अापल्या मुलाला पार जागेवर बसवून देण्याची गरज नसायची अन बसही तेवढा वेळ थांबायची नाही. त्या दिवशी बस सुरू झाली, मी नेहमीप्रमाणे मुलीला निरोप दिला व माघारी वळून चालू लागणार, एवढ्यात त्या बाईंनी एकदम अारडाअोरडा चालू केला. पहिल्यांदा मला समजलंच नाही, काय झालं ते. नंतर डोक्यात प्रकाश पडला. त्या मलाच अोरडत होत्या. बायकांकडे बघून हसायला लाज वाटत नाही का, वगैरे तोंडाचा पट्टा सुरु केला. मी पहिल्यांदा अवाक झालो, नंतर डोक्यात रागाचा प्रचंड स्फोट झाला व अर्ध्या मिनीटानंतर मनातल्या मनात शरमेने लालीलाल झालो. बाजूला अापअापल्या मुलाला सोडायला अालेल्या सगळ्या बायका माझ्याकडे बघत होत्या. अाता जर ही जमीन पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. एवढा धक्का बसला होता, की काय प्रतिक्रीया द्यावी हेच समजत नव्हतं.
कसाबसा तिथून घरी अालो. मनात काय चालले होते, ते अाज वर्णनही करू शकत नाही. पहिल्यांदा बायकोला सगळं सागितलं. एक क्षणभर तिलाही काय करावं, ते सुचलं नाही. शेवटी अांम्ही तिथे असलेल्या ईतर बायकांबरोबर दोघांनी बोलायचं असं ठरवलं. तो दिवस विचित्र गेला. कशातच मन लागत नव्हतं. अापल्याच घरी जाताना, सोसायटीच्या गेटमधून अात शिरताना चोरासारखं वाटत होतं.
दुसर्या दिवशी मुलीला सोडायला दोघेही गेलो. त्या बाई अाल्याच नव्हत्या. बस गेल्यावर, बायकोने तिथल्या ईतर पालकांजवळ कालच्या घटनेबद्दल चौकशी केली. मला कोणाशीच काही बोलायला सुधरत नव्हतं. कुणाच्या नजरेला नजर दयायची छाती नव्हती. झालं असं होतं की, मी नेहमीप्रमाणेच मुलीला हसत हसत निरोप दिला होता, पण मी त्या त्यांच्याकडे बघून हसलो, असा बाईंचा गैरसमज झाला होता. त्यांनी एवढा मोठा अाकांडतांडव केला होता, की मी संपूर्णपणे दिग्मूढ होऊन गेलो होतो. मी व बायकोने तिथल्या एक दोघींना विनंती केली व अांम्ही ४-५ जण त्या बाईंच्या घरी गेलो. त्यांना व त्यांच्या नवर्याला भेटून बोलल्याशिवाय मला स्वस्थता लाभणे शक्यच नव्हते. त्यांच्या नवर्यानेच दार उघडले. अांम्ही त्यांना अामच्या येण्याचे कारण सांगितले. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले व ते एकच दोनच वाक्ये बोलले. ठीक अाहे, तुंम्ही विसरून जा, अामचा काही गैरसमज झाला असेल. माझा जीव अक्षरश: भांड्यात पडला. पण बायकोने त्या बाईंना अातून बोलवा असा अाग्रह धरला. नवरा म्हणत होता की ठीक अाहे, अाता तुंम्ही विसरून जा, पण माझी बायको त्या बाईंशी बोलायचंच या मताची होती. शेवटी त्यांच्या नवर्याने अांम्हाला सांगितले, की माझा मुळीच गैरसमज झाला नाही, तुंम्ही तिच्याशी बोलण्याचा अाग्रह धरू नका. तिचा मनावर ताबा रहात नाही व त्याबाबत ट्रीटमेंट चालू अाहे. उद्यापासून मीच मुलांना सोडायला येत जाईन. घरी परतताना मनावरचं प्रचंड ओझं उतरल्याची जाणीव झाली होती. अाता कधीतरी तो माणूस परिसरात दिसतो व हसून ओळखही दाखवतो. हा प्रसंग माझ्यावर एका बाईमुळेच अाला होता, अाणि केवळ बायकांनीच त्यातून सोडवले. नशिब की घराजवळ झाला होता, तोंडअोळखीचे तरी लोक अाजूबाजूला होते, समजा बाहेर असे काही झाले असते, तर मी कसे काय तोंड दिले असते असे वाटून कधी कधी थरकाप होतो.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 3:30 pm | वेल्लाभट

खरं तर उलटं व्हायला हवं होतं इथे.
स्त्रीयांनी काही स्त्रीया कशा कधी कधी चुकीच्या वागतात ते अनुभव सांगायला हवे होते
आणि पुरुषांनी पुरुष कसे चुकीचे वागणारे असतात त्याचे.

दॅट वुड हॅव बीन समथिंग. रिअली.

सुबोध खरे's picture

14 Apr 2015 - 3:38 pm | सुबोध खरे

बसने प्रवास करण्याचे प्रसंग सुदैवाने कमीच येतात परंतु बर्याचदा स्त्रियांच्या सीट्स रिकाम्या ठेवून त्या पुरुषांच्या सीटवर बसलेल्या दिसतात. त्यामुळे स्त्रियांच्या सीट वर बसता येत नाही आणी वर त्यांच्या शेजारी बसावे तर अंग चोरून बसावे लागते. निदान सुरुवातीच्या थांब्यावर तरी स्त्रियांनी त्यांच्या राखीव जागेवरच बसावे आणी त्या जागा भरल्यावरच इतर जागांवर बसावे अशी सक्ती का करता येऊ नये?

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 3:46 pm | पॉइंट ब्लँक

कोण सक्ती करणार. कारण
१. सांगायला गेल्यावर "माय चॉईस" अस म्हणतील.
२. किंवा दुसरी शक्यता- त्यांना तुमच्याशी मैत्री करायची असेल :)

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 3:47 pm | वेल्लाभट

हॅ....
या अशा सक्त्या करणं म्हणजे समाज टोट्टल रिव्हर्स मधे नेणं आहे. मूर्खपणा आहे. सिरियसली म्हणतोय. अरे रिझर्व्ड सीट, डबे करून तुम्ही जेंडर बायस ला खतपाणी देणार.... ठीक आहे तुमच्याकडे गुन्हे होतायत पण मग गुन्हे थांबवा ना ! ती धमक नाही. उलट काय, आरक्षण. बसच्या सीट, रेल्वेचे डबे, टॅक्सी च्या सीट, देवळातल्या रांगा... अरे काय चाललंय? द मेजर डिफरन्स बिटवीन अस अँड डेव्हलप्ड कंट्रीज इज धिस. लेट्स फेस इट. वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी प्रोटेक्ट द प्रोबेबल व्हिक्टिम्स. बुलशिट.

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 4:07 pm | संदीप डांगे

वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी प्रोटेक्ट द प्रोबेबल व्हिक्टिम्स. बुलशिट.

हजार टक्के सहमत.

अवतार's picture

14 Apr 2015 - 11:55 pm | अवतार

Because we don't have a National Character

तिमा's picture

15 Apr 2015 - 10:20 am | तिमा

स्त्रियांनी त्यांच्या राखीव जागेवरच बसावे आणी त्या जागा भरल्यावरच इतर जागांवर बसावे अशी सक्ती का करता येऊ नये?
असे कसे करता येईल ? मग ते सर्वच राखीव जागांबद्दल करावे लागेल.

अभिजीत अवलिया's picture

14 Apr 2015 - 4:23 pm | अभिजीत अवलिया

खरे साहेबानशी सहमत. स्त्रीयाणी बस मधे चढल्यावर अगोदर त्यांच्या साठी राखीव असलेल्या जागी बसावे. जर तिथे जागा नसेल तरच दुसरीकडे बसावे. पण काही बायका मुद्दाम तसे करत नाहीत.

वेल्लाभट, हजार टक्के सहमत

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 4:41 pm | विअर्ड विक्स

मी स्वतः स्त्री-पुरुष समानतेचा विरोधक आहे. निसर्गाने जर दोन गोष्टी वेगळ्या बनवल्या असतील तर त्यांना एका पातळीवर आणण्याचा अट्टाहास का ?
समानता हि वेतनाबाबतीत, व्यवसायिक स्तरावर ,शिक्षणा बाबतीत ठीक आहे.प्रत्येक गोष्टीत पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे म्हणजे स्त्री- पुरुष समानता नव्हे. राखीव जागा बद्दल म्हणाल तर हरकत घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर स्त्रिया साधारण डब्यातून आपल्या कुटूम्बियासम्वेत प्रवास करत असतील नि यावेळेस आपण साधारण डब्यातून प्रवास का करता असा आक्षेप घेतलात तर स्त्रीपेक्षा पुरुषांकडून च शाब्दिक व प्रसंगी शारीरिक प्रसाद मिळण्याची शक्यता अधिक…

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 4:48 pm | पिलीयन रायडर

समानता हि वेतनाबाबतीत, व्यवसायिक स्तरावर ,शिक्षणा बाबतीत ठीक आहे.

मग अजुन काय वेगळं आहे समानता म्हणजे? मुळात "जे जे पुरुष करतील ते ते मिळवणे" असली टुकार व्याख्या नाहीचे स्त्री समानतेची..

तुमचा बाकीचा प्रतिसाद समजलाच नाही...

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 4:55 pm | वेल्लाभट

मी स्वतः स्त्री-पुरुष समानतेचा विरोधक आहे. निसर्गाने जर दोन गोष्टी वेगळ्या बनवल्या असतील तर त्यांना एका पातळीवर आणण्याचा अट्टाहास का ?

कुठे कुठे वेगळं वागवायचं याची यादी संपणार नाही बरं का

फायदा होईल तिथे वेगळेपणा, तर फायदा नाही तिथे समानता असे पाठिंब्याचे धोरण ठेवलेले बरे असते म्हणे. दुटप्पीपणाचा आरोप करणार्‍यांना त्यांच्या आईबहिणीबायकोमुलीबद्दल एखादा वैयक्तिक प्रश्न विचारून गप्प केले की झाले.

बाळ सप्रे's picture

14 Apr 2015 - 5:03 pm | बाळ सप्रे

खरंतर सर्वांनी समजून वृद्ध्/अपंग यांना बसायला जागा द्यावी पण सगळे समजुतदार नसल्याने शारिरीक असहाय्यतेसाठी वृद्ध्/अपंगांसाठी बसण्यास जागा समर्थनीय आहे. परंतु खर्‍या स्त्रीवादी व्यक्तिने बस/ट्रेनमधील स्त्रियांसाठी राखीव जागांचा निषेधच करावा. खर्‍या स्त्रीवादी स्त्रीने एखादा धडधाकट पुरुष बसलेला असला तरीही स्वतःला जागा न मिळाल्यास बसलेल्या पुरुषास उठवु नये.
हे मत बसायच्या राखीव जागांबाबत आहे.
इतर क्षेत्रातील राखीव जागा स्त्रियांच्या सहभागाला उत्तेजन देण्यासाठी काही काळ असण्यात मात्र काही गैर नाही.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:06 pm | वेल्लाभट

एक किस्सा सांगतो.
स्वित्झर्लंड ट्रिप मधे माझ्या बाबतीत घडलेला.

मी आणि बायको बसमधून प्रवास करत होतो. समोर एक म्हातारी बाई उभी होती. बसायच्या जागा भरलेल्या होत्या. मी सवयीप्रमाणे उठून तिला बस म्हणून जागा देऊ केली. तर काहीसं रागाने बघत ती म्हणाली 'नो. थेंक्स. आयम फाइन'

हाडक्या's picture

14 Apr 2015 - 6:54 pm | हाडक्या

हा हा हा...

एकदा असंच एका ७५+ वयाच्या म्हातारीला जागा ऑफर केली होती.. आजी मिश्कील होत्या, म्हणतात कशा, "I am not that old, dear!" .. मग काय, सगळेच मस्त हसले.
उरलेला २० मिनिटांचा प्रवास त्या आजी उभे राहून आणि आम्ही तिथेच बसून गप्पा मारत मारत झाला. :)

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 5:11 pm | विअर्ड विक्स

पिरा ताई… ती तुमची व्याख्या असेल सर्वांची नाही. ती असती तर my choice सारखे विडीओ बनलेच नसते. संततीसाठी सुद्धा पुरुषांची काय गरज ? अशी मतेसुद्धा मी ऐकलेली आहेत.

प्रश्न राहिला राखीव जागांबद्दल टिपणीचा …. तो स्त्रियांस राखीव जागा बद्दल आक्षेप घेणार्यांसाठी आहे…. नि त्या जागा असाव्यात या स्पष्ट मताचा मी आहे. राखीव जागा या सुरक्षेच्या मुद्द्यासाठी नव्हे तर सोयीच्या मुद्द्यासाठी दिलेल्या आहेत. नि स्त्रियांच्या डब्यासाठी सुरक्षा पुरवण्याची गरज राहणार नाही तो सुदिन…

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 5:27 pm | पिलीयन रायडर

तुमची व्याख्या काय समानतेची? नाही म्हणजे विरोधात आहात समानतेच्या.. त्यात पुन्हा "पाश्चात्यांचे अंधानुकरण" असाही मुद्दा आणलाय.. म्हणुन विचारलं..

विअर्ड विक्स's picture

14 Apr 2015 - 7:20 pm | विअर्ड विक्स

शिक्षण, वेतन नि व्यावसायिक स्तरावर समानता असावी हे मी मान्य केलेलेच आहे नि कोणत्या गोष्टीत नको हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. अंधानुकारणाचा मुद्दा ज्यांना समजायचा होता ते समजले नि त्यांनी इतर दाखलेही दिले. नि मी विरोधक आहे ते आंधळ्या स्त्रीवादि स्त्रियांचा ज्यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या व्याख्या बदलल्या आहेत.

स्पंदना's picture

14 Apr 2015 - 5:35 pm | स्पंदना

सगळे प्रतिसाद वाचुनही वेल्लाभट अस म्हणावसं वाटत की तुम्ही हा लेख लिहुन तुम्ही आणि कोल्हेबाई यातल अंतर कमी केल आहे.
काही गरज नाही स्त्री स्त्री आणि पुरुष पुरुष म्हणुन एकमेकाचा पानउतारा करण्याची, शेवटी माणुस (ह्युमन) वाईट अथवा चांगला असतो. नाहीतर महाराष्ट्रात घडलेली चोरलेल्या बालकांना विजेच्या खांबावर आपटुन मारणारीहो स्त्री नसती, अन युरोपात स्वतःच्या मुलीला वर्षोनवर्ष घराखालीच डांबुन घालिउन ...राहूदे मला लिहीवत नाही आहे.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:38 pm | वेल्लाभट

बरोबर आहे. पण कोल्हेबाईंच्या काव्याला डांगे साएबांनी न्यूट्रलाईझ केलंय.
हा मुद्दा वेगळा होता. असो. :) ह.घ्या.

आजानुकर्ण's picture

14 Apr 2015 - 6:07 pm | आजानुकर्ण

मी दहा ते बारा वर्षे बसने प्रवास केला आहे. मुलींना आणि बायकांना बसमध्ये राखीव जागांची नितांत गरज आहे. निदान पुण्याततरी पुरुषांपेक्षा मुली-बायका याच बसमध्ये प्रामुख्याने दिसतात. किंबहुना बसमधील धक्काबुक्की टाळण्यासाठी बायकांना पुढील दरवाजाने व पुरुषांना मागील दरवाजाने असे प्रवेश देणेही आवश्यक आहे. बसचा पुढील अर्धा भाग बायकांना राखून ठेवावा व मागील अर्धा भाग पुरुषांना. त्यामुळे धक्काबुक्कीचे प्रसंग बरेच टळतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 6:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे गंमतीत लिहितोय.

ड्रायव्हर ला पण उठवतील ओ सीटवरुन ;)

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2015 - 6:32 pm | धर्मराजमुटके

पिलियन रायडर यांचा प्रतिसाद आवडला. पण माझी खरोखरच एक प्रामाणिक शंका आहे. पि.रा. यांनीच नव्हे तर कोणीही उत्तर दिले तरी चालेल.
'पुरुषांचे तसले स्पर्श बायकांना बरोबर कळतात' हे वाक्य मी इतक्या वेळा ऐकले आहे पण ते नक्की कसे कळतात हे मला आजतागायत कळाले नाही. व्यक्तीशः मला बसने प्रवास करायचा प्रसंग फारच कमी येतो. पण जेव्हा कधी येतो तेव्हा तेव्हा मला बस मधे चढल्यावर स्वतः पुरुष असल्याची भीती वाटते. यात मी काहीही अतिशयोक्ती करत नाही. जर एखाद्या स्त्रीला चुकूनही धक्का लागला तरी मला मनातल्या मनात भिती वाटत राहते की आता काहि विपरीत प्रसंग तर घडणार नाही ना ?
बेस्ट आणि एकंदरीत सगळ्याच जुन्या बसेस ह्या उभे राहणार्‍यांसाठी फारच कंफर्टेबल होत्या असे आजच्या बसेस बघून वाटते. आताशा नवीन मॉडर्न बसेसच्या दोन्ही बाजूच्या सीटसमधील मार्गिका एवढी चिंचोळी झालीय की मनात कितीही ठरवले तरी दुसर्‍याला धक्का लागल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.
बसमधे स्त्रिया नकोसे स्पर्श टाळण्यासाठी आपल्या बॅग्स, बॅकपॅक पुढील बाजूस किंवा गरज असेल तशा घेतात. नेमके हेच तंत्र मी स्त्रियांकडून शिकून आपल्या शरीराचा धक्का दुसर्‍या स्त्रीला लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतो. शेवटी कितीही प्रयत्न केला तरी सर्वथा टाळणे शक्य नसते. असे माझ्यासारखे अनेक पुरुष असतील त्यांच्या मनातील भावना मांडण्यासाठी हा प्रतिसाद.
सांगायचा मुद्दा हा की तसले स्पर्श कसे ओळखता येतात याबद्द्ल काही मार्गदर्शन मिळाले तर आमच्या सारख्यांची लाईफ थोडी इझ्झी होईल एवढेच.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 6:46 pm | पिलीयन रायडर

मी नाही हो सांगु शकणार कसं ते..
पण किमान मी तरी सतत संशय मोड ऑन करुन फिरते हे मी मान्य करते. इतक्या वेळा घाणेरडे स्पर्श अनुभवलेत की आता न्याय-अन्याय, समज- गैरसमज ह्या पलीकडे गेलेय मी. प्रत्येक स्त्री जात असावी. पण कसा कोण जाणे चुकुन लाग्लेला धक्का आणि मुद्दाम मारलेला धक्का कळतो. शिवाय धक्का उगाच असेल (बसचा ब्रेक नाही तरी कुणीतरी आदळणे / बाकी जनता ब्रेकने इंचभरपण हलली नसताना आपल्याच मागचा मनुष्य फुटभर ध्डपडुन आपल्यावर आदळणे) तर तो समजतोच. आणखीन म्हणजे सतत धक्का लागणे. एखाद्या वेळेस जनरली बेनिफीट ऑफ डाउट देतोच. पण सतत तसं झालं की मग आवाज चढवावा लागतो. सभ्य माणुस एकदा जरी धक्का लागला की खुप सावरुन उभा रहातो.
अजुन एक म्हणजे मुद्दाम लेडीज सीट पाशी उभे रहाणे. गर्दी आहे म्हणुन सीटवर झुकणे.
ह्यापेक्षाही जास्त प्रमाण आहे हात लावण्याचं.. ह्यात शाळेतली चिमुरडी पोरं सुद्धा असतात. :(

शेवटी असला घाणेरडा मनुष्य बसमध्ये असेल तर वाईट प्रसंग येतात. तसंच नेमकी हलक्याशा चुकुन लागलेल्या धक्क्यालाही कानाखाली वाजवणारी बाइ असेल तर पुरुषांनाही वाईट वेळ पहावी लागते.

चुकुन धक्का लागला तरी तमाशा केला तर सभ्य पुरुषाला त्याचा किती त्रास होऊ शकतो ह्याची जाणीव आहेच. सभ्य स्त्रीलाही असे आगंतुक स्पर्श झाले की खुप किळस वाटते.. चीड येते.. अशा परिस्थितीची जाणीव पुरुषांनी ठेवावी (अनेकांना असतेच..) आणि म्हणुनच राखीव जागा ठेवाव्या लागतात हे समजुन घ्यावं हेच मांडायचं होतं.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 7:00 pm | वेल्लाभट

सतत संशय मोड ऑन करून फिरण्याची वेळ महिलांवर यावी, हे किती वाईट आणि दुर्दैवी आहे याचा प्रामाणिक विचार प्रत्येक सूज्ञ माणसाने करावा. आपल्या वागण्यात काळजी घ्यावीच पण समोरचा चुकीचं वागत असेल तर त्या स्त्रीने कानाखाली मारण्या आधी आपण त्याला ताडावे; किमान आवाज तरी करावा.

स्त्रीयांनीही कुठेतरी कुठलातरी राग न काढता प्रसंग्/व्यक्ती बघून आपल्याला असलेली सवलत्/हक्क याचा उपभोग घ्यावा. शक्य होईल तिथे 'तसला' आणि 'तसला नाही' यात भेद करून उगीच कुणावर बरसू नये. तुम्हाला न सांगताही रिस्पेक्ट मिळेल तिथे अ‍ॅक्नॉलेज करावं. (करत असतील त्याना हे वाक्य लागू नाही. उगीच नवा वाद नको.)

तेंव्हा कुठल्याच एका वर्गाचं जनरलायझेशन करणं चूकच. किंबहुना धाग्याचा उद्देशही तो नव्हता. 'ऐसा भी होता है' हा संदेश धाग्यातून घेतला तरी पुरे आहे.

असो. माझ्या मते इथे चर्चा थांबावी. तरीही, निर्णय अर्थातच प्रतिसादकांचा आहे.

नाखु's picture

15 Apr 2015 - 9:09 am | नाखु

जिंकलस.
संतुलीत समारोप कसा करावा त्याचे एक दुर्मीळ उदाहरण घालून दिले आहेस.
जगात सगळेच फक्त पांढरे आणि फक्त काळे नसते यामध्ये बरेच रंग आहेत माणसाच्या जीवनात (इ.एक्कांच्या एका प्रतिसादातून उधार) फक्त नजर आणी जाणीव सतर्क असली की "रग" आणि "रंग" नक्की ओळखता येतो.
सर्व समंजस प्रतिसादकांचे विशेष आभार (धाग्याचा -----न केल्याबद्दल)
लेकीचा बाप
नाखु

वेल्लाभट's picture

15 Apr 2015 - 9:57 am | वेल्लाभट

_/\_

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Apr 2015 - 6:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

तुम्ही विचारलंत म्हणुन सांगते.एकदा बस खचाखच भरली होती.एका माणसाने माझ्या पर्सचा पट्टा धरला...तो धरताना त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या स्त्री भागाला झाला..मी तिरीमिरीत वळून त्याला बोलणार तेवढ्यात माझ्या लक्षात आले की तो एका पायाने अधू आहे...बसच्या वरच्या दांड्याला पकडून तो उभा राहूच शकत नव्हता...प्रतिसाद चुकीच्या जागी लिहीला गेला.धर्मराज यांच्या स्पर्श ओळखण्यावरच्या प्रश्नाचे ते उत्तर आहे...

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 7:29 pm | संदीप डांगे

फारच संतुलित चर्चा होऊन धागा संपतोय हे पाहून एक मिपाकर म्हणून...

अभिमान वाटत आहे.

जनरलायझेशन दोन्ही बाजूंना गैरलागूच.
..आणि कलगीतुरा म्हटलं तरी पुरुषप्रकृतीचं भांडण त्यांच्या निर्मितीइतकंच प्राचीन आहे...
तस्मात, चालूद्या...

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 10:15 pm | पॉइंट ब्लँक

लेखकाने वर धागा संपल्याची आणि युद्धबंदिची घोषणा केली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 9:49 am | अत्रुप्त आत्मा

भरले रे भरले ... १०० भरले! ;-)

वेल्लाभट's picture

15 Apr 2015 - 9:58 am | वेल्लाभट

चेरी ऑन द टॉप ! :)

पॉइंट ब्लँक's picture

15 Apr 2015 - 10:24 am | पॉइंट ब्लँक

झालं एकदाचं. नायतर आमाला वाटलं तेंडुलकर होतोय वेल्लाभटांचा. ९०-९२ वर विकेट टाकून बाद ;)

कपिलमुनी's picture

15 Apr 2015 - 3:57 pm | कपिलमुनी

५० % जागा आरक्षित म्हणजे त्या ५० % शिवाय उरलेल्या ५० % फ्री जागांवर सुद्धा क्लेम येतोच ! हे अ‍ॅडमिशनच्या बाबतीत वर्षानुवर्षे होत आहे. मग फक्त याच बाबतीत स्त्रियांनी ५० % आरक्षित जागावरच बसला पाहिजे असा आग्रह कसा काय ?

आयुर्वेदिक वैद्य म्हणुन ज्या प्रकारचे नमुणे समोर येतात ते इथे लिहुही शकत नाही.(आयुर्वेदाकडे आजही ४०% रुग्न सेक्स मेडिसिन साठी येतात.) त्यात स्त्रिया आणी पुरुष दोन्ही आले पण हरामखोरीचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे हे मान्यच करावे लागेल.कॉलेजियन्स परवडले पण हे जे ३५ च्या पुढचे पुरुष जो काही प्रकार करतात तो धक्कादायक आहे.ज्या दिवशी एखाद्या बस मध्ये एखादी लढवय्यी स्त्री एखाद्या विकृताचा जिव घेत नाही तोपर्यंत अश्या नमुण्यांना जरब बसणार नाही.

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2015 - 5:28 pm | पिलीयन रायडर

परवाच बसने प्रवास केला..
७.३० - ८ - वाट पाहुनी जीव शिणला...

८- ८.३० - धक्काबुक्कीत जीव गेला..

८.३० - ९.१५ - बस बंद पडली म्हणून रस्त्यात देह ताटकळला...

९.१५ - ९.३० - भरल्या बसला अजुन ७-८ लोकांचा काय भार म्हणुन देह गर्दीत कोंबला...

ह्यात सांगायची गोष्ट अशी की सगळेच जाम वैतागले होते.. खुप बस बंद पडल्या होत्या.. राखीव जागेवर ४ पुरुष बसले होते.. पण मला जागा द्यायला एक मुलगी उठली. मग एका आजींना धक्काबुक्की होऊ नये म्हणुन मी अबीरला त्यांच्या मांडीवर देऊन उभी राहिले. गाडीत ५-६ जणी उभ्या होत्या. पण पुन्हा एकदा, एकीनेही एकाही पुरुषाला उठवले नाही... तसल्या तुफान गर्दीमध्ये सुद्धा...

तुमच्या धाग्याची २ तास पुष्कळ आठवण काढली!!!

ब़जरबट्टू's picture

14 Jul 2015 - 4:56 pm | ब़जरबट्टू

काही नाही हो, असा पिढ्यांनपिढ्या त्रास सहन करून आता स्त्री चा पण "पुरुष" झालाय.. आता तीच "बिचारी" नाय राहिली तर वरिजनल पुरुषाला त्रास होणारच.. :)

तुडतुडी's picture

14 Jul 2015 - 5:20 pm | तुडतुडी

पिलीयन रायडर >>+1111111111111111111

हजारो वर्षांच्या अन्यायाचा बदला घेताहेत हो>>>
म्हणजे हजारो वर्षे अन्याय झालाय हे मान्य आहे तर .

मुळात स्त्रियांसाठी राखीव जागा कशासाठी दिलेल्या आहेत हेच बर्याच जणांना माहित नाहीयेत . गर्दीचा फायदा घेवून स्त्रिया मुलींना त्रास देणार्यांच्या त्रासातून सुटका होण्यासाठी ह्या जागा दिल्या आहेत . म्हणजे अर्थातच त्याच्यावर तरुण स्त्रिया मुलींनी बसणं अपेक्षित आहे . गडी माणसांना एवढा राग येतो तर त्यांनी राखीव सीट वर बसावच कशाला ?

तुडतुडी's picture

14 Jul 2015 - 5:31 pm | तुडतुडी

म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?>>>
म्हातारेच खरे हरामखोर असतात . कारण त्यांच्या वयाकडे बघून आपल्याला कोणी जाब विचारणार नाही हि त्यांची समजूत अस्ते. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीशी बसमध्ये निर्लज्ज चाळे करताना मी स्वतः बघितलं आहे म्हतार्यांसाठी हि राखीव असन असतात . पण हे म्हातारे तिथं बसत नाहीत . मुद्दाम स्त्रियांच्या रांगेत बसतात . माझ्या बसने रोज येणारे आजोबा सगळी बस रिकामी असली तरी मुद्दाम तिथेच बसायचे . एकदा चांगलं झापलं म्हातार्याला . मग इकडच्या बाजूला बसायला लागला. काही बिनडोक बायका मुली सुधा मुर्दडासारख्या गप्प बसतात . तर पण हिम्मत नसते त्यांच्यात .