Skip to main content

शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/11/2008 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना नरमुंड धारी, कालिके,स्यय:म उर्जा स्त्रोत,तु शक्ति असे. आम्हि वामाचारी,शाक्त पंथीय, माते, तुज आमुचे वंदन असे. हे नाग नंदिनि,कालिके,चंद्र सुर्य ,तुझे अलंकार असे जरी वाटे भयभित तुजे रुप,त्यातच आम्हा ममता दिसे योनितत्व प्राशुनि,साधक साधिका अराधनेस माते सज्ज असे हे मातंगी,भुवनेश्वरी,महालक्ष्मी,आम्हि स्वेछ्याचारी तुझे दास असे "म"कार साधक आम्हि,मद्य,मास,मुद्रा,मत्स्य,मैथुन,चे उपासक आहे, तव प्राप्तिसाठी बगलामुखी देवि,घट्कंचुकी विधी अनुष्टीत आहे उघडले उघडले द्वार,ईडा,पिंगलेचे,तव उर्जा आत शिरली आहे माते धन्य धन्य हा साधक, मा कुंडलीनि जागृक झाली आहे. लागली बघ ब्रह्मांनंदी टाळी,सारा देह उर्जेत नहात असे. वितळले ब्रह्मांड लक्ष लक्ष रंगात,प्रत्येक रंग कणांत तव रुप दिसे धन्य झाले जिवन,काहि न उरले ,तव दैदिप्य मान दर्शन घडले आहे कृत कृत्य मी,शीरच्छेद करुनी, मी ,शीर कमल तव चरणी वहात आहे. __________________________________________ अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन
लेखनविषय:

वाचने 2832
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

विद्या आहे का? पण ही साधना अघोरी संप्रदायात केली जाते. कृपया , प्रयोजन सांगाल का?

In reply to by रामदास

पण ही साधना अघोरी संप्रदायात केली जाते. आणि सगळे शाक्त अघोरी उपासना करत नाहीत... "या देवी सर्वभूतेषु, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः |"

कालीमाते संदर्भात आहे. पण इथे कशासाठी?...अशा साधनेचे वर्णन मी रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात वाचले आहे. सदर साधना त्याची गुरु ब्राह्मणी त्याच्या कडुन करुन घेते की सांगते,आठवत नाही. वेताळ

ब्राह्मणीने श्रीराम़कृष्ण परमहंसांना याची दीक्षा दिली, परंतु चरित्रात असे लिहिले आहे की श्री रामकृष्ण दीक्षाविधी पूर्ण होण्याआधीच सामधी अवस्थेत पोचले.

अविनाशजी आपण ही साधना येथे देण्याचे प्रयोजन काय ते मला अद्यापही कळलेले नाही. आपण स्वतः तांत्रिक साधना करता का? की या क्षेत्रातील काही अनुभव आपणाला आम्हा वाचकांसमोर मांडायचे आहेत? तसे असेल तर स्वागत आहे.