कुक्कुट शर्विलक-विलाप
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.)
मालवणातिल सागरलहरी
मला खिजविती अष्टौप्रहरी
बाण लागता नको तिथे हा
पर झाली 'कनका'ची नगरी
'कुक्कुट गेले साथ सोडुनी
'विकास' दिसता दुज्या अंगणी
चोचीमधला दाणा जपती
नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी
'वाघ' लागला मागावरती
'वांदरे'हि किलकारा करती
वनवासातुन सुटका या हो
कधी व्हायची? घटिका सरती..
'सोनिया'सम ते दिन ना उरले
'घड्याळा'तलेही क्षण सरले
ठेवावे हे मस्तक ऐसी
दिसतिल का चरणांची 'कमले'?
वाह
वाह !!
.
वाह !!
क्या बात है राव ! क्या बात है
ह्हा ह्हा ह्हा ह्हा! जबरी
मस्त!
जबरी
+१
राण्यांचे गणित चुकले
कहर केला राव …
झक्कास
जबरदस्त. समयोचित कविता.
वा!
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiधन्यवाद
कचकुन एकदम
=))