Skip to main content

आज मी आहे

लेखक Rajvardhan यांनी बुधवार, 15/04/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी आहे त्या वळणावर उद्या तू असशील झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे, तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील | जुळतील धागे , मिळतील नातीगोती बांधल्या जातील रेशीमगाठी टाकली जातील बंधने संस्कृतीची लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे आपसूकच टाकले जातील नांगे स्वतंत्र स्वभावाचे कारण आज मी उभा ठाकलो आहे त्या बंधनात _ उद्या तू असशील | विखुरल्या जातील सोंगट्या बुद्धिबळाच्या पटावर तसे आयुष्य बिथरली असशील तू प्रत्येक भेटीआधी अगदीच नवख्या नववधूपरी मोजता मोजता पाऊले थकून जातील वाटांना मात्र अंत नसेल निबरगट्ट क्षीतेजे मात्र साद घालत असतील पाऊले थकतील थांबतील विश्रांतीसाठी एकाच मेळ घाटावरती अगदीच शेवटची निवांत निद्रा घेत असेल देह त्यावेळी मी असेन त्या निद्राश्य्येवरी केव्हांतरी तू असशील |||||| >> मी मात्र @ राजवर्धन
लेखनविषय:

वाचने 684
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया