साहित्य रगड्यासाठी:
१ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे
१/४ टीस्पून हिंग
१/२ टेस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
(आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून काळा मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून चिंचेचा कोळ
पाकृ:
पांढरे वाटाणे हिंग व हळद घालून कुकरला मऊसर शिजवून घ्या.
पातेल्यात तेल गरम करुन त्यात शिजवलेले वाटाणे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळा व थोडेच पाणी घालून उकळी आणा.
रगडा नीट शिजला की गॅस बंद करा.
(आवडत असल्यास फोडणीत चमचाभर आले+लसूण पेस्ट परता)
साहित्य पॅटिससाठी:
४-५ बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या राहणार नाही.
२ टेस्पून आले+ लसूण+ हिरवी मिरची वाटून
(तुम्ही पेस्ट वापरु शकता, मला भरडसर वाटलेले आवडते म्हणून तसे घेतले आहे)
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ:
बटाट्याच्या मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+ हिरवी मिरची, हळद, चाट मसाला, मीठ व मैदा घालून चांगले मिक्स करावे.
मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन चपटे करुन पॅटिस तयार करावे.
नॉन-स्टिक तव्यावर तेल घालून पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.
साहित्य सर्व्हिंगसाठी:
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
चाट मसाला
चिंच-खजुराची चटणी
( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ किंवा सैंधव घालावे.)
पुदिन्याची चटणी
( मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ, जीरे व साखर एकत्र वाटून चटणी बनवणे.)
वरुन घालायला शेव/ फरसाण
(इथे शेव सहज मिळत नसल्यामुळे मी फरसाण वापरले आहे तुम्ही भरपुर शेव घालून सर्व्ह करु शकता :) )
सर्व्हिंगः
एका प्लेटमध्ये रगडा घालून घ्या त्यावर तयार पॅटिस ठेवावे.
आता त्यावर पुदिन्याची चटणी व चिंच-खजुराची चटणी घालावी.
वरुन चिरलेला कांदा व कोथींबीर घालावी.
वरुन शेव/ फरसाणने गार्निश करुन सर्व्ह करावे.

रगडा पॅटिस खाण्यासाठी तयार आहे :)

वाह खासंच
रगड्याची ती डीश काय जिवघेणी
पाकृ देखके कलेजा खलास होता है
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
+९०००००
In reply to +९००००० by कॅप्टन जॅक स्पॅरो
+लै वेळा
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
असे स्मायली कसे टाकतात ?
In reply to असे स्मायली कसे टाकतात ? by प्राची अश्विनी
सांगु नका कोणाला ?
In reply to सांगु नका कोणाला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
मस्तच!
अरारारा !!
वाह!!!
भयंकर
काय बोलणार????????
In reply to काय बोलणार???????? by मुक्त विहारि
@ आता ह्या मिपावर पण,
स का ळी. . . स का ळी. . . हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }वा मस्त
कसं काय जमतं बुवा हे सगळे
मस्तच ग , नक्की करुन पाहीन
वर विशाखा म्हणतेय तसच्च कस ग
.
अरे वा... मस्त दिसतय रगडा
तोंडाला पाणी सुटलं...सकाळी
मस्त ...... वाखु साठ्वतो
हाय हाय !
सानिका दुष्त आहे.
अरे अय.
काळ्या मसाल्या बरोबर धणे जिरा
_/\_ फोटो
वा क्या बात है :)
रगड्याचा मसाला.
काय छळवाद आहे हा. :(
खपलो
मी धागा उघडलाच नाही.
सानिका....
_/|\_ _/|\_ _/|\_
वा
भोजनाच्या देवा हिला माफ कर!!
In reply to भोजनाच्या देवा हिला माफ कर!! by स्पंदना
+१
झक्कास
खल्लास!
अप्रतिम...तोंडाला पाणी सुटले.
ताव मारावा असे वाटतेय
मस्तच. लवकरच करुन बघण्यात
छान आहे पाककॄती ..
सानिका,
In reply to सानिका, by कविता१९७८
ए काही काय चांगलेच बनवशील तू
काय मस्त फोटो ग...
अप्रतिम !
नेहमीप्रमाणेच छान पाकृ व
In reply to नेहमीप्रमाणेच छान पाकृ व by रेवती
आता ती डाळ कशी संपवावी
In reply to आता ती डाळ कशी संपवावी by सूड
अरे ती जरा वाफवली की शिजून
In reply to अरे ती जरा वाफवली की शिजून by रेवती
मे बी
In reply to अरे ती जरा वाफवली की शिजून by रेवती
अगदिच गरगट होतेय का? मग
In reply to नेहमीप्रमाणेच छान पाकृ व by रेवती
(ती डाळ नवर्याने चुकून हरभरा
अरे थांबा, थांबा! यातील
:))
एकदम मस्त