सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व
आजपर्यंत बर्याच कविंनी,
आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर
अनन्य साधारण कविता रचल्या आहेत
पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय?
कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय?
अरे,असतील तुम्हाला खर्या भावना
तर रचवा सासुवर कविता
आणि समजू द्या या जगाला
सासुच्याही मनातल्या यातना.
आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी
सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय
पण कधी तिलाही सुनेने छळले असेल
याची कल्पना तरी कोणी केलीय?
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते
तिलादेखील भावना असतात,मन असते
तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला
तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय.
तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं
तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात.
संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती
तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात.
जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु
तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु
ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच
की, मी माञ होइल एक चांगली सासु.
तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो
तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात
तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं
अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात.
तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा
आपण कधीच प्रयत्न करत नाही
तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील
याचा काडीमाञ ही विचार करत नाही.
सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं
असेच तिला नेहमी वाटत असतं
इतकेच नव्हे तर या समाजात फक्त
आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं
असंही प्रत्येक सासुला वाटत असतं.
पुर्वीची सासु "बोलकी" होती
पण स्वभावाने नव्हती मनमोकळी
कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात
होती एक असाधारण पोकळी.
आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय
ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय
वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख
त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय.
आपणही एक पाऊल पुढे जाऊया
आपल्या पुढे आलेला तिचा हात
कायमचा आपल्या हातात घेऊया
करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं
तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.
सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व
मी या कवितेचा शिलालेख बनवुन
शिलालेख ! लोल !
शिलालेख
सून एक निसटतं व्यक्तिमत्व
कशाला ओ कशाला? आधीच दोन गद्य
विहीण?????? ;)
=))
हे सासूच्या दृष्टीने झालं,
दुसर्या दिवशी सासरेबुवा: एक
ते गाणं नै का?
सासू एक अवजड व्यक्तिमत्व
आता येतीलच या डोमेन्स वर
डेब्यू तर कडक झालाच
कोल्हेकाकू - आज काय नवीन?
मेव्हणी-एक हवंहवंसं
_^_ धन्य आहात तुम्ही , आमच्या
ह्म्म्म चांगलंय...
छान
टवाळ मिपाकराङ्कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !
पदार्पणात
यासिर हमीद?
डग वाॅल्टर्स
या कवितेतलं गद्य, वाचकाला
इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल
प्रतिसाद
@ गाञ>>> :-D
वाचनमाञ रहावं आता!
धागा तेवढा 'वाचनमाञ' करु नका
मला कवितेतल काय कलत नाय पन
भयंकर मजेशीर कविता..
आई गं दोन्हि कविता
इंतेहा हो गयी इंतजार कि.....
हैला! हे वाचलच नव्हतं अजून!
अतिशय सहज सुंदर कविता