Skip to main content

स्रीचे अस्तित्व!

लेखक अश्विनि कोल्हे यांनी सोमवार, 13/04/2015 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो. अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा? लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते. तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं . प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे. म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन. जय महाराष्ट्र! रचना-सौ.अश्विनी कोल्हे.
लेखनविषय:

वाचने 30989
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विकृत, घाणेरडे, अहंकारी, पुरुषी मनोवृतीचे निर्लज्ज प्रदर्शन
I know all these words but not in that order!

In reply to by अश्विनि कोल्हे

@अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.>> नै हो तै!!! असे काहि माज्या मणी! उग्गीच्च कै..? कै तडी बोल्ता! दुत्त दुत्त! :-/ @पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

In reply to by अश्विनि कोल्हे

मि.स्पँरो, माफ करा तुमचे नाव टंक करतांना चुकली आहे.पण इलाज नाही.माझ्या मोबाइलच्या कळफलकावरुन बरेच शब्द टंक करायला जड जातात. मुद्दा हा की बसमध्ये एका वृद्धाला स्त्री ने मारतांना तुम्ही बघितलंय व लहान मुलाला कानफाडात लावतांनाही बघितलंय ,पण कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या पत्नीलाच मारतांना कधीच नाही पाहीलं का तुम्ही? आणि बघितलंच तर यावर तुमची प्रतिक्रीया काय असेल? का प्रत्येक पतीला आपल्या पत्नीला बेदम मारण्याचा अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला? आज स्त्रीयांचा आडदांडपणा बघुन तुम्हाला त्यांच्याबद्दल घृणा वाटतेय पण अनादी कालापासुन स्त्री सुद्धा पुरूषी बाणा सहनच करत आलीय ना.की स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला? मान्य की सगळ्याच सगळेच पुरूष वाईट नाहीत पण खरं सांगा की आज किती टक्के लोक स्वतःच्या घरातच पत्नीला, मुलीला, बहीणीला, आईला सन्मान देतात? काय ही टक्केवारी ५०% च्या वर गेलीय?
जन्रलायझेशन जन्रलायझेशन म्हणतात ते हेच बरं. असो. पुढच्या वेळी दोघांच्या बाजु समतोलपणे मांडायचा प्रयत्न केलात तर जास्तं बरं होईल. तुमच्या कवितेमधे(??????????????????) किंवा तत्सम निबंधामधे तुम्ही फक्तं आम्ही अबला वगैरे लिहित बसलात तर तुमच्या कवितांवर अनाहिता सुद्धा तुटुन पडतील. प्रत्येक वेळी घडलेल्या घतनेमधे पुरुषाचीचं चुक असते काय? पुरुष घराबाहेर कुठल्याच ताणतणावांना तोंड देत नाही काय? पुरुष अबल/ हतबल असु शकत नाहीत काय परिस्थितीसमोर? कजाग बायकोचा त्रास पुरुषांना होत नाही का? ही बाजुही येउ दे की पुढं. तुम्हाला कविता लिहायला कोणीही अडवत नाहीये. फक्त अश्या विषयांवर एवढेवेळा फेमिनिस्ट कविता आर्टिकल्स आली आहेत की साहजिक आहे विरुद्ध पार्टी खवळणार आणि प्रतिसाद देणार.
अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?
त्यांनी कुठेही खालच्या पातळीवर जाउन टिका केलेली नाही. आणि ताशेरे म्हणाल तर त्यांनी एकट्यांनी मारलेले नाहीत तर ऑलमोस्ट सगळ्यांनी मारलेले आहेत, अगदी इथल्या स्त्री-आयडींनी सुद्धा. आणि त्यांना तेवढा अधिकार नक्कीचं आहे. कारण त्यांच्याकडे योग्य-अयोग्याचा विचार करायची क्षमता आहे. तस्मात क्षमता वाढवा.
आणि शेवटी म्हणच आहे ती," कुत्र्यांच्या पेठेतुन हत्ती जायला लागला की कुत्री ही भुंकणारच.म्हणुन हत्तीने चालणं सोडायचं नसतं" Anyway तुमच्या प्रत्येकाच्या टवाळखोरीला उत्तर देत बसली तर नविन काही कधीच सुचणार नाही.
मैंड युअर लँग्वेज. एवढ्या खालच्या पातळीवर जाउन तुम्हाला कोणी काही बोललेलं नाही. जरा बोलताना/ लिहिताना जपुन. मिपा वरती सुरुवातीला हे सगळ्यांबरोबरचं होतं. त्याची मजा घ्या. आणि जुन्या झालात की तुम्हीही तेचं कराल ह्याची खात्री देतो. असो. लिहित रहा. हळु हळु प्रगल्भता येतं जाईलचं. लोकांनाही तुमची लेखन शैली अंगीवळणी पडली की चेष्टा बंद करुन तुम्हाला अगदी भरभरुन प्रतिसाद देतील. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@मिपा वरती सुरुवातीला हे सगळ्यांबरोबरचं होतं. त्याची मजा घ्या. आणि जुन्या झालात की तुम्हीही तेचं कराल ह्याची खात्री देतो.>>> +++१११ मिसळपाव हे संस्थळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासारखंच आहे.. (त्याच्या निर्मितीपासून!) इथे शेरेबाजी/टीका/टींगलटवाळी सुद्धा हो ते च! पण त्याखेरिज तुम्ही तोडिस तोड निर्मिती केलीत्,तर तेव्हढच सकसकौतुक/प्रोत्साहन्/आशिर्वादंही मिळतात. तुमची ही कविता सुमार दर्जाची असल्यामुळे,तुम्हाला हे असले हार/तुरे मिळालेले आहेत. या पुढे काय मिळवायचं ते तुम्ही ठरवा.

In reply to by अश्विनि कोल्हे

आवो ताई, आमच्या सारखे वाचक हायेत ना तुमच्या पाठीशी. लीवा लीवा बिंधास्त... तुमची ही कविता मला खूप म्हंजे खूप आवडली आहे. मी पण कवीता करतो. पण धाडस होत नाही प्रसीद्ध करण्याचं. घरी सर्वांसमोर वाचली ही कविता. सर्वांना आवडली. हे मी सर्व मनापासुन लीहीत आहे.

सर्वप्रथम आपल्या लेखनामागची कळकळ पोचली हे नमूद करतो. हे काव्य नाहीच आहे . हे महाकाव्य आहे. तेव्हा तुमच्या कवितेला निबंध म्हणणार्‍यांकडे उदार अंतःकरणाने दुर्लक्ष करा. हा धागा मी पुन्हा पुन्हा वाचून काढला आणि दर वेळेस अधिकच सद्गदित (विग्रह - सत् + गदित) होत गेलो. माझ्या अंतर्मुख मनावर इतका परिणाम झाला की मी माझ्या बायकोची क्षमा मागितली आणि ती नको म्हणत असतानाही तिचा एक दुखरा पाय चेपून दिला. फक्त तो चुकीचा पाय होता हे नंतर तिने मारलेल्या एका फटक्याने आणि ओरडण्याने मला कळाले. परिणामी आता तिचे दोन्ही पाय दुखताहेत आणि सकाळची न्याहरी मलाच बनवावी लागली. एवढे एक सोडता आमच्या मधुर नात्याचे अस्तित्त्व आपल्या कवितेने अजूनच दृढ झाले ह्याबद्दल आपले अनेक आभार. बायकोने एक टोमणा तिच्या नेहमीच्या सवयीने मारलाच, पण तिच्या मुखातून निघणार्‍या अशा अग्निज्वाळांची आताशा सवय झाल्याने माझी सहनशक्ती तिच्यापेक्षाही कैकपटीने वाढली आहे हे मात्र (माञ असावे बहुतेक. चूभूदेघे) नक्की. स्त्री क्रोधाची जननी असते ह्यावर मात्र तिचा जोरदार आक्षेप आहे हे सांगू इच्छितो (आमच्या कार्टीचे नाव क्रोधा नाही.) त्यामुळे ही दुसरी स्त्री कोण ह्या प्रश्नावरून आमच्या घरी अंमळ संशयकल्लोळ झाला आणि माझ्यावरच क्रोधाचा 'जनक' असल्याचाआरोप करण्यात आला. पण जाऊ द्यात. एवढे चालायचेच, नाही का? असो. तर सांगायचा मुद्दा असा की, मी आपल्या काव्याचा फार मोठा चाहता आहे. ते असेच भरभरून मिपाच्या डेटाबेसमध्ये कोंबले जाणे हे 'स्री' च्या अस्तित्त्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा लिहीत रहा. थांबू नका.

कोल्हेताई तुमच्या कवितेमधील भावभावनांशी सुसंगत अशी एक कविता ... ओझे किती युगांचे साचले या अंतरी वंचना सात जन्मांची साहीली तुजसाठी | पायधूळ ही तुझी घेतली मी मस्तकी जाण तुज नसे जराही माझीया अस्तित्वाची | तोडिली मग बंधने झुगारली सारी नाती पंखात बळ माझ्या होतेच घेण्या भरारी | मनमुक्त मी आकाशी पायतळी ही धरती नजरेत तुझ्या होती तीच आदीम आसक्ती | मज नकोत ते तराणे अन् रीतीचे उखाणे प्रितीची गंधगाणी ते उसासे, ते रडणे | न येणे मी परतुनी तुजसाठी, तुजपाशी राहशील सदा तु रे माझीया चरणांपाशी | ... शेवट बरोबर वाटला का ?

In reply to by मनीषा

मनिषा सुरेख कविता. शेवट कसा असावा;कसा नसावा हे ज्याने त्याने ठरवावे. म्हणजे लिहीणार्‍याने. जर कविता एकाच व्यक्तीला उद्देश्य्न असेल तर त्याला पायतळी घालायला हरकत नाही, पण जर समुदायाला उद्देश्उन असेल तर मात्र हृदयाच्या ठोक्यांना साथ देणारे अनेक असतील, शोधावे आणि ओळखावे लागतील.

आणि १५० ! पदार्पणातच १५० मारणा-या तुमचं प्रचंड प्रचंड अभिनंदन !

In reply to by वेल्लाभट

दिडशतका निमीत्त धागाकर्ती कु/सौ. अश्विनी कोल्हे आणी कु/श्री.वेल्लाभट यांचा सत्कार एक एक पुस्पगुच्च देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

स्त्री ही बला नाही, अबला ही नाही, मात्र पुरूषांच्या हाती सापडलेला तबला आहे.

In reply to by बहीरखेडकर

म्हणून काही दुष्ट पुरुष हातोडीने मारुन त्यांना 'पट्टीत' आणतात.

ठीक ह्यापेक्षा सासू च्या कवितेत जास्त प्रगल्भता दिसून येत आहे

कविता आणि प्रतिसाद वाचुन मंत्रमुग्ध झालेय. तुफान आहे.. चालु द्या. --मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

मंत्रसुन्न व्हायचं असेल तर ह्या कवितेचा आणि प्रतिसादांचा सखोल अभ्यास करा. http://www.misalpav.com/node/30460

त्र व ञ या दोघांतला फरक समजावून घेतलात तर आनंद होईल. आपण मराठी नामक भाषा देवनागरी लिपी वापरून लिहित आहात. त्+र = त्र. ञ हा स्वर आहे. व्यंजन / जोडाक्षर नव्हे.