Skip to main content

काश्मिरमधील निवडणूक. तुम्हाला काय वाटते?

लेखक सुनील
Published on गुरुवार, 20/11/2008

वाचन संख्या 772
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अरेच्चा, काश्मिरमध्ये निवडणूक आहे काय? मला ठाउकच नाही. याला.

काश्मिरात निवडणुका असेनात का? मला काय त्याचे? माझ्या दैनंदीन जीवनात काहीही फरक न पडणारा हा कौल वांझोटा आहे. - (मतदार) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! अवांतर : वांझोटा हा शब्द योग्य न वाटल्याने संपादन केला (खोडला) आहे! - (स्वयंघोषित संपादक) टिंग्या

मी "इतर" ला मत दिले आहे कारण त्यात वर बाकीच्या मतांतील काही भाग तसेच दृश्यादृश्य इतिहास आणि सद्यस्थितीतील राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय राजकारण गुंतलेले आहे.
  1. काश्मिरची जनता भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छिते. राष्ट्रीय नेते याचा यथायोग्य उपयोग काश्मिर समस्या सोडवताना करतील. हे अशंतः खरे आहे. कारण मते न देणारे किमान ४०-४५% आहेतच! त्यातील ५०% जरी अलगतावादी असले तरी आश्चर्य वाटायला नको.
  2. भरघोस मतदान हे केवळ आपल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी चांगले सरकार यावे म्हणून. स्वातंत्र्याची मागणी त्यांनी सोडलेली नाही. हे खरे अशा साठी वाटत नाही कारण जर भारत आणि भारतीय संघराज्यच मान्य नाही तर त्यातील निवडणूकांत सहभागी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, विशेष करून हुरीयत आणि अतिरेक्यांचा फतवा न जुमानता. आंतर्राष्ट्रीय माध्यमे तसे मत मांडत आहेत. कारणे माहीत आहेतच. आपली "इंग्रजी" माध्यमे काहीतरी शिकून नीट लिहीतील अशी अपेक्षा...बरे ज्यांना कुणाला स्थानिक समस्या आणि चांगले सरकार हवे आहे हे समजते, त्यांना सीमेच्या दुसर्‍या बाजूस काय चालू आहे याची कल्पना नाही असे म्हणायचे आहे का? पाकव्याप्त काश्मिर मधे काश्मिरी गव्हर्नर नसतो अशी अवस्था आहे. बाकी दिवाळखोर देशात आणि अस्थिरतेत जाण्याने या (अतिरेकी दहशतवाद सोडल्यास, देश म्हणून) आग नसून देखील फोफाट्यात जाण्याचे भिकेचे डोहाळे लागले असतील असे वाटत नाही. बरं तसे (असल्या फोफाट्यात) जाणे चांगले म्हणणारे आपले बुद्धीवादी ना धड भारताच्या अधिकृत मताला पाठींबा देतात ना धड त्या गरीब बिचार्‍या काश्मिरींच्या "ह्यूमन राईट्स"ना. उद्या तीच माणसे परत आपल्या देशात रेफ्युजी म्हणून येणार ते पण कमी झालेल्या जागेत. तेंव्हा आता तरी जागे व्हा आणि लक्षावधी काश्मिरी जनतेला पोकळ पाठींबा देत त्यांची फसवणूक नकळत देखील करू नका असे म्हणावेसे वाटते.
  3. अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल.: काश्मिर मधील निवडणूका म्हणताना त्यात जम्मू आणि लडाख हे भाग पण येतात हे विसरले जाते. ह्या भागात भारतविरोधी वातावरण नाही आहे. काश्मीर मधे असले तरी त्याला मुख्य जबाबदार स्वातंत्र्याच्या सुरवातीच्या काळातील नेतृत्व आणि निर्णय हे जसे कारणीभूत आहेत तसेच नंतर केला गेलेला अल्पसंख्यानुनय पण कारणीभूत आहे. आता आजार बराच जूना आहे पण बरे होण्यासाठी इलाज आहे नाइलाज नाही :-) वेळ लागणार इतकेच. शेवटी आज तालीबानमधे पण फाटाफुटी पडायला लागल्या आहेत. तर हुरीयतचे आणि काश्मिरी दहशतवाद्यांचे काय घेऊन बसता? पण त्या सर्व गोष्टी होण्यासाठी आपल्या राजकारण्यांनी आणि तथाकथीत बुद्धीवादी विचारवंतांनी इतिहासाच्या अनुभवातून शिकायला हवे असे म्हणावेसे वाटते.

१५१ वाचने आणि ११ मते! काश्मिरी जनतेने केलेल्या उत्साही मतदानाच्या पार्श्वभूमीवर मिपाकरांचा अनुत्साह उठून दिसतो! असो, विकास यांचा सविस्तर प्रतिसाद पूर्णपणे पटला नाही तरी आवडला. माझे मत अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल याला. याची कारणे दोन. एक म्हणजे, आतापर्यंत निवडणूकीचा फक्त एक टप्पा पार पडला आहे. अद्याप सहा टप्पे बाकी आहेत ज्यात हुरीयतचा बालेकिल्ला असलेल्या श्रीनगरचाही समावेश आहे. आणि दुसरे अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे निवडणूकीत केलेले मतदान हा एकमेव निकष लावून कश्मिरी जनतेची मानसिकता बदलली असे मानणे तर्कसंगत ठरणार नाही. विशेषतः नुकत्याच झालेल्या अमरनाथ देवस्थान जमीन प्रकरणी झालेली निदर्शने पाहता, अवघ्या तीन महिन्यात कश्मिरी जनतेने कोलांटी उडी मारून, भारताप्रती निष्ठा व्यक्त केली असे मानायचे तर त्याला सबळ असे कारण हवे. ते दिसत नाही. थोडक्यात, त्यांनी असे अनेक निकष सातत्याने पार पाडले तरच काही ठाम निष्कर्ष काढता येईल, अन्यथा फसगत होण्याचीच शक्यता. अर्थातच, ही जर त्यांची मानसिकता बदलण्याची पहिली पायरी असेल, तर तीचे स्वागतच आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

१५१ वाचने आणि ११ मते! सुनील , वाईट वाटून घेऊ नकोस !! परवा सरपंच काहीतरी सांगत होते "मिपाच्या अशुभचिंतकांनी मिपावर हल्ला चढवून सेवादात्याची क्षमता कमी करण्याचा चंग बांधला".. तेव्हा ही १५१ वाचने हे मनोगतींचे काम, हे नक्की ! मिसळपावाचे अशुभचिंतन इतर कुणीही करणे शक्य नाही ! खोटे वटत असेल, तर सरपंचांना विचार ! मी १२ वा.. १५२ वा नाही, बरं का ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सुनील

१५१ वाचने आणि ११ मते! काश्मिरी जनतेने केलेल्या उत्साही मतदानाच्या पार्श्वभूमीवर मिपाकरांचा अनुत्साह उठून दिसतो! फार माहिती नसताना मत देणं योग्य ठरलं नसतं, म्हणून मत दिलं नाही. पण या धाग्यावर येऊन वाचन जरुर केलं, माहिती मिळवण्यासाठी शॉर्टकट! (तेरावी) अदिती

In reply to by सुनील

केव्हा कशी कोठे कलाटणी मिळेल काय सांगावं? इतिहास साक्षीला आहे..लाहोरपर्यंत गेलेलं भारतीय सैन्य परत माघारी बोलावलं होतं! निवडणुका पुर्ण जरी झाल्या तरी त्यांचा वापर करुन सत्तेवर कोण येणार ह्यालाही महत्व आहेच की.

In reply to by सुनील

विकास यांचा सविस्तर प्रतिसाद पूर्णपणे पटला नाही तरी आवडला -- मला सुद्धा विकासरावांचा प्रतिसाद आवडला. पण सध्या "अजून काही काळ वाट पहावी" असेच मला सुद्धा वाटते. किमान निवडणुका संपून सरकार स्थापनेपर्यंत. आपला, (सहमत) भास्कर आम्ही येथे वसतो.

माझे मत 'अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल' या पर्यायाला दिले आहे. विकास यांनी वर मांडलेला जम्मू आणि काश्मीर खोर्‍यातील फरकाचा मुद्दा पटला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल. असे मत दिले आहे.

मीही अजून काही काळ वाट पहावी, इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल या पर्यायाला मत दिले आहे. माझा हाही एक प्रश्न आहे की, काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे कायमसाठी निकालात काढणे हे भारतीय राज्यकर्त्यांना कितपत सोयीचे वाटू शकेल? जरी काश्मिरी जनतेला भारतीय मुख्य प्रवाहात सामील होऊन दंग्या धोप्यांपासून सुटका करुन घेऊन शांत, साधे, सरळ आयुष्य जगायचे असले तरीही राज्यकर्ते हे होऊ देतील का? यावर जाणकार मत देतील का?

आम्ही आमचे मत- भरघोस मतदान हे केवळ आपल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी चांगले सरकार यावे म्हणून. स्वातंत्र्याची मागणी त्यांनी सोडलेली नाही. याल टाकले पण.... अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल. असेही वाटते. याही समस्येचे उत्तर राजकारणावर येऊन ठेपते कारण संघटीत मूठभरांनी हिंसक कारवाया व बेकायदेशीर कृत्ये करुन संपूर्ण समाजाला नव्हे देशाला वेठीस धरले आहे. जनजीवन भयग्रस्त झाले आहे, तरीपण राज्यसत्तेने त्यांच्यावर काहीच विलाज करु नये, केवळ तटस्थ आणि लष्कराच्या भरवशावर शांत राहिल्यासारखी आपली राजकीय व्यवस्था दिसते. अतिरिक्यांच्या बंदोबंदास्तासाठी कायदे अनेक मंजूर होतात पण दहशतवादाला आळा घालण्यासाठी राज्यव्यवस्था असमर्थ आहे असा समज रुढ होऊ नये, तरुणांमधे एक आशावाद निर्माण करुन खमक्या निर्णयाने अनेक मार्ग निघतील असेही वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या राजकारण्यांनी पूर्वीपासून काश्मीरच्या बाबतीत डोंगराएवढ्या चुका करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे आता आपण अखंड काश्मीरचे स्वप्न पहाण्याचे सोडून द्यावे. एल्.ओ.सी. वर जरी समझौता झाला तरी नशीब समजा. काश्मीरी पंडितांना हाकलले तेंव्हा आपले नेते डोळ्यावर कातडे ओढून बसले होते. आता तिथे जे उरले आहेत त्यांना भारताविषयी काडीचीही आस्था नाही. बरं, काश्मीर सोडून दिले तर ते सगळा देशच मागतील. या समस्येला आता काहीच उत्तर नाही. कित्येकांना हे सत्य लिहिलेले रुचणार नाही, पण म्हणून वस्तुस्थिती बदलणार नाही.

भरघोस मतदान हे केवळ आपल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी चांगले सरकार यावे म्हणून. स्वातंत्र्याची मागणी त्यांनी सोडलेली नाही.
याला मत दिले आहे. कारण दुसरे ठिक वाटणारे
अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल
हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते प्रत्येक प्रश्नाला लागु आहे. "अजून काही काळ वाट पहावी. इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे ठरेल" असे सतत म्हटले तर मतदान घ्यायलाच नको :) -(मतदार) ऋषिकेश