साहेब... या प्रकल्पाला पूर्ण शुभेच्छा.
या विषयावर आधीच तुमच्याशी आणि विप्रसरांशी बोलणे झाले आहे. माझे विचार मांडले आहेत. त्या प्रमाणे जरूर कळवा.
एक सूचना...
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
स्तुत्य. पण जे विद्यार्थी प्रॉमिसिंग वाटत नाहियेत त्यांच्यावर पण त्या दृष्टीने विशेष मेहनत घेतली जावी का? नाहीतर मुंबईतल्या बर्याच प्रतिथयश शाळा / कॉलेज / क्लासेस सारखे, ऍडमिशन देतानाच क्रीम विद्यार्थी घ्यायचे, त्यातून परत वरचे बाजूला काढायचे त्यांच्यावर विशेष मेहनत घ्यायची आणि मग आमचे एवढे बोर्डात आले असे सांगत सुटायचे पण एकूणात निकाल किती चांगला लागला याबद्दल अवाक्षरही न काढणे, असे न व्हावे.
बाकी मी ५ विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलायला तयार आहे. बाकीचे डीटेल्स कळावेत.
बिपिन कार्यकर्ते
लैच्च भारी .. फारच उपयुक्त लेख ...
बाकी मेडिकल ला जाणे हल्ली आपलं आर्ध आयुक्ष बरबाद करणे आहे असं ऐकून आहे.... कारण एम.बी.बी.एस. नंतर २ वर्षे इंटर्नशीप आणि १ वर्ष एम.ओ.शीप आहे. वाढलेल्या शिक्षण शुल्काबद्दल आम्ही काय बोलावे ? आणि नुसतं एम.बी.बी.एस. असुन भागत नाही ..पी.जी. ला जावंच लागतं .. आणि तिथं पहिल्यावर्षी लंबर लागला तर आपण लैलैलै लक्की .. २-२ वर्ष रगडतात मुले .. आणि म्हणून पी.जी. होइ पर्यंत वयाची बत्तीशी झालेली असते ...
रामदास सर , लोकांना याही गोष्टी विचारात घ्यायला सांगाहो . हल्ली मेडिकलच्या मुलांमधे आत्महत्येचं प्रमाण बाकी शिक्षणक्षेत्रांपेक्षा जास्त आहे.
- (सि.ई.टी.च्या जाळ्यातून एवळ एक वर्षाने हुकलेला)
टारझन
उपक्रम नक्की स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील मुलांना अशी संधी मिळत नाही. एक सूचना करावीशी वाटते.
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
या पर्यायापेक्षा
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग न वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल. असे हवे कारण ९०% गुण मिळविणारा थोड्या मार्गदर्शनाने सहज ९५% - ९८% गुण कमावू शकतात. खरी आवश्यकता असते ती ५०% - ७०% गटातील मुलांना.
मि. पा. सदस्यांना काय वाटते.
नितीन महाजन
आम्ही कुठलेही कोचींग क्लासेस चालविणार नाही. फक्त त्यांना न बघायला मिळालेली सुविधा पोचविणे हा उद्देश. त्यामुळे १० ते १५ मार्कांची वाढ होईल ही अपेक्षा. विशेष मार्गदर्शन एड्मिशन प्रोसेस समजावणे त्रिशंकू मार्क वाल्यांना.१२० च्या विद्यार्थ्यांनी त्याना मिळेल ते स्विकारायचे असते. आणी १८० वाल्याना त्याची गरज नसते. गोंधळ असतो तो फक्त १४० ते १७० वाल्यांचा. त्यांना ही प्रोसेस खूप कठीण जाते.
माझ्याशी मनापासून शुभेच्छा..!
परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. मी माझ्या कुवतीप्रमाणे काही आर्थिक मदत नक्कीच करेन आणि त्याबाबत फोनवर प्रत्यक्ष बोलेन..
रामदासराव आणि प्रभूमास्तरांचं निश्चितच कौतुक वाटतं!
तात्या.
>> परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. <<
विप्र आणि रामदास यांचा उपक्रम चांगला आहे म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष मदत करु शकत नाही तरी प्रामाणिकपणे आणि आपुलकीने देलेले प्रोत्साहन काही किंमतीचे नाही असे आपल्या वरिल वाक्यावरुन वाटले. शुभेच्छा कोरड्या आहेत ही टिप्पणी तुमच्या सहकार्याची किंमत वाढवते का?
मला आपली टिप्पणी वाचून वाईट वाटले.
-- लिखाळ.
प्रत्यक्ष मदत करु शकत नाही तरी प्रामाणिकपणे आणि आपुलकीने देलेले प्रोत्साहन काही किंमतीचे नाही असे आपल्या वरिल वाक्यावरुन वाटले.
पूर्णत: गैरसमज...इन फॅक्ट लिखाळराव, असा आपला गैरसमज झाला याचेच आश्चर्य वाटले..!
प्रत्येकाच्याच शुभेच्छा, सदिच्छा या महत्वाच्या असतात. शुभेच्छा देणारा प्रत्येकजणच काही आर्थिक साहाय्य करू शकेल असे नव्हे, किंवा त्याने केलेच पाहिजे असेही मुळीच नव्हे...!
शुभेच्छा कोरड्या आहेत ही टिप्पणी तुमच्या सहकार्याची किंमत वाढवते का?
प्रश्न कळला नाही..
मला आपली टिप्पणी वाचून वाईट वाटले.
लिखाळराव, आपण गैरसमज करून घेतला आहे. ते विधान मी फक्त माझ्यापुरते केले होते! नुसत्या शुभेच्छा देणे हा केवळ एक उपचार होईल असे मला वाटले म्हणून मी तसे लिहिले! याचा, इतर मंडळी-जी केवळ शुभेच्छाच देतात त्यांच्या शुभेच्छा मोलाच्या नव्हेत असा सरसकट अर्थ आपण कसा काय घेतलात ते खरंच कळले नाही..!
असो, यापेक्षा अधिक कुठलाही खुलासा मी करू शकत नाही...
तात्या.
प्रभुसर मी पण आहे तुमच्या सोबत. पाच विद्यार्थ्यांच्या खर्चाची जबाबदारी माझी.
शिवाय प्रत्यक्षात येउन आणखी काही मदत करायला मिळणार असेल तर आनन्दाने येइन.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
शेरातल्या न आमेरीकेतल्या सूक्षिक्शीत (जल्ला लीवता बी येत नाय )लोकांनो, आमच्या खारपाड्यासारक्या बरेच पाड्यावरच्या विद्यार्थ्याना जागतीक कोंपीटीशन मदी आनन्यासाटी रामदासभौ न परभूसर जे कष्ट करताईत त्याला जरा खुल्या दिलान बॅकिंग करा की.
जल्ला तुमच्या पैशाची गरज त्यांना नाय वो, पन यकदा त्यांच्या पाटीवर हात ठेवून लढ तरी म्हना
रामदासभौ न परभूसर, कई बी काम सांगा आमी हाव तुमच्या संगट
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
विषयाशी (जवळजवळ) असंबद्ध लिहिणे, एखाद्या चांगल्या चर्चाविषयात अवांतर प्रतिसाद टाकणे, संबंध नसताना (आपल्या विरुद्ध बोलणार्या) व्यक्तिंचे दाखले (हिणवण्यासाठी) देणे हे पण ओ.सी.डी.खालीच मोडतं का हो, विप्रकाका?
(बाकी हा प्रतिसाद अवांतरच आहे, संपादकांनी वाटल्यास खुशाल उडवावा, पण अनेक चांगल्या चर्चाविषयात असला एकसुरी कचरा पाहून आता कंटाळा आला आहे.)
विषयाशी (जवळजवळ) असंबद्ध लिहिणे, एखाद्या चांगल्या चर्चाविषयात अवांतर प्रतिसाद टाकणे, संबंध नसताना (आपल्या विरुद्ध बोलणार्या) व्यक्तिंचे दाखले (हिणवण्यासाठी) देणे हे पण ओ.सी.डी.खालीच मोडतं का हो, अदितीशी सहमत आहे.. सर्किटरावांनी ब्रिटिशरावंना उत्तरादाखल दिलेले -चर्चा भरकटवणारे दोन प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने ब्रिटिशरावांचा एक प्रतिसाद अप्रकाशित करण्यात आला आहे..
सदर धाग्याचा विषय महत्वाचा आहे, कृपया विषयाला धरूनच चर्चा व्हावी..
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
सदर धाग्याचा विषय महत्वाचा आहे, कृपया विषयाला धरूनच चर्चा व्हावी..
सहमत आहे. शासनक्र्त्याने असे सर्व "महत्वाचे धागे" मार्क करावेत, म्हणजे सदस्य अवांतर प्रतिसाद देणार नाहीत.
(हल्ली स्वघोषित अवांतर प्रतिसाद कर्त्यांची संख्या खूप वाढलेली आहे, असे दिसून येते.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
शाब्बास बाला....
मला पण हेच म्हणायचे आहे. अश्या प्रकारच्या एखाद्या विधायक कार्याची दखल तरी घेतली असती तरी बरे दिसले असते. पाठिंबा द्या नाही तर नका देऊ, पण कमीत कमी दखल तरी घ्या रे... आणि पटत नसेल तर सुधारणा तरी सुचवा. जवळ जवळ ३५० वाचने आणि प्रतिसाद फक्त १२. धन्य आहे आपलीच. एखादा तथाकथित ज्वलंत विषय मांडलेला नाहिये म्हणून असे झाले का?
सर्किटने मांडलेली सूचना खरोखर विचार करण्याजोगी आहे. पण ही सूचना यायला इतका वेळ का लागला? हाच प्रतिसाद त्यांना आधीपण देता आला असता. किंवा त्यांनी ते व्यनि द्वारे कळवले असेल, तसे असेल तर माझी टिप्पणी रद्द.
असो. इथे व्यक्तिगत काही नाही. मनात आले ते लिहिले.
बिपिन कार्यकर्ते
रामदास साहेब आणि प्रभू सर,
आपल्या सीइटीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रकल्पासाठी माझ्या शुभेच्छा. मार्गदर्शनाच्या अभावामूळे, विद्यार्थी केवळ औपचारिकता म्हणून परिक्षा देतात असेही माझ्या पाहण्यात आहेत. खेड्यापाड्यात शहरात अगदी तालूक्याच्या ठिकाणीही मार्गदर्शनाचा अभाव दिसतो. तेव्हा विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेण्याचा आपण जो विडा उचलला आहे, तो प्रकल्प कौतुकास्पद आहे. त्यासाठी सही दिलसे शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शहरी भागाबाहेरच्या विद्यार्थ्यांना बर्याच गोष्टींशी मानसिकरीत्या जुळवून घेण्यातच बरीचशी शक्ती खर्च होते. बुजलेपणामुळे विचारण्याचे धाडस असतेच असे नाही. नेमका प्रश्न विद्यार्थ्यांना कुठे येतो हे हेरुन आपण काम केलेले दिसते.
तुमच्या ह्या कार्याला मनापासून शुभेच्छा!
(अधिक पत्रव्यवहार व्य. नि. तून करेनच.)
चतुरंग
प्रतिक्रिया
साहेब... या
लैच्च भारी
माझे मत
कार्यक्रम
आपल्याला
स्तुत्य
माझ्याशी
धन्यवाद
परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. ....
>> परंतु
माझ्याही कोरड्या शुभेच्छा!
प्रत्यक्ष
तात्या, खुल
प्रभुसर मी
शेरातल्या
अवांतर
सहमत आहे
शाब्बास
परिक्षा प्रकल्पाला शुभेच्छा !!!
रामदास आणि विप्र खूपच चांगला उपक्रम आहे!
वा! मस्त प्रकल्प.. शुभेच्छा!..
निरोप
उद्याचे आकाश
>>एका