✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

म
मोदक यांनी
Sun, 03/03/2013 - 03:31  ·  लेख
लेख
"मोदक, तू कॉमर्स बॅकग्राऊंडचा असूनही आयटी कंपनी मध्ये कसे काय..?" या प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे हा क्रायसीस बरीच वर्षे मागे लागला आहे. नेमके (म्हणजे समोरच्याला अपेक्षीत!) उत्तर दिले गेले नाही तर, "हल्ली काय, कुणीही आयटीमध्ये भरती होतात!" असे बोचरे टोमणे बसतात ;-) असे टोमणे बर्‍याचदा ऐकून सध्या अवलंबलेला मार्ग म्हणजे "मी एक्सेल वर काम करतो" हे सांगायचे. 'एक्सेल' चे नाव काढले की लोकांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात, एक म्हणजे, "एक्सेलवर काय असते काम करण्यासारखे..?" यातल्या बर्‍याच जणांना 'एक्सेल = डेटा एन्ट्री' असेही का वाटते देव जाणे. दुसरी प्रतिक्रिया म्हणजे, "एक्सेल..???" कित्ती भारी ना..? सगळे फॉर्मुले येतात..?" टाईप्स. या सर्व प्रकारात असे लक्षात येते आहे की लोकांच्या मनामध्ये एक्सेलबद्दल अनेक गैरसमज आहेत, मायक्रोसॉफ्ट ऑफीस ज्या ज्या कॉम्प्यूटरवर असते त्या त्या सर्व कॉम्प्यूटरवर एक्सेल असते त्यामुळे 'अतिपरिचयात अवज्ञा' या न्यायाने एक तर एक्सेल वापरले जात नाही किंवा वापरले तरी साधी कामे पार पाडण्यासाठी साधे सोपे मार्ग उपलब्ध असूनही केवळ माहिती नसल्याने असूनही आपण तेच काम करण्यात प्रचंड वेळेचा अपव्यय करतो. नमनाला घडाभर तेल घालून इथून पुढे मला जे थोडेफार एक्सेल येते ते टप्प्या टप्प्याने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. बर्‍याच एक्सेल संज्ञा या इंग्रजीमध्ये वापरल्या आहेत व त्याअनुषंगाने आजूबाजूचे शब्द आलेले आहेत, त्यामुळे "मराठी सेंटेन्समध्ये इंग्लीश वर्डस यूज केले" या सबबीखाली धाग्याला अवांतराचे ग्रहण लागू नये अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत लिहिलेल्या विविध विषयांवरच्या धाग्यांपेक्षा हा थोडा वेगळा प्रयत्न आहे.. सांभाळून घ्यालच! आणखी एक - सर्व वाचकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी सुरूवातीचे धागे माहितीपर आहेत. दैनंदिन कामात एक्सेल वापरणार्‍यांना हे सर्व 'खूप बेसीक' वाटू शकेल, आपण हळूहळू नवीन फंक्शन्स शिकत जावूया - एकत्र! एक्सेल - अतिसंक्षिप्त ओळख. (मी मुद्दाम एक्सेलच्या जन्मापर्यंत जात नाहीये; एकतर त्याचा या धाग्यामध्ये फारसा उपयोग नसणार आहे आणि ती माहिती अंतर्जालावर सहज उपलब्ध आहे!) एक्सेल म्हणजे एक स्प्रेडशीट आहे, ज्यामध्ये टॅब्यूलर फॉरमॅटमध्ये डेटा मेंटेन केलेला असतो. बाजारात एक्सेलप्रमाणे अनेक अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहेत परंतु मायक्रोसॉफ्टशी संलग्नता, त्यामुळे जवळजवळ सर्वच कॉम्प्यूटरमध्ये असलेली उपलब्धता आणि अत्यंत साधे स्वरूप यांमुळे एक्सेल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मिनिटॅब, IBM SPSS वगैरे अ‍ॅप्लीकेशन बर्‍याच बाबींमध्ये एक्सेलपेक्षा जास्ती उपयोगी असूनही त्यांचा वापर कमी आहे याचे कारण हेच. (तसेच या अ‍ॅप्लीकेशन्स साठी पैसे मोजावे लागतात!) एक्सेल व्हर्जन्स. सध्या एक्सेल २०१० हे अद्ययावत व्हर्जन असून एक्सेल २००७, एक्सेल २००३ आणि एक्सेल २००० ही या आधिची व्हर्जन्स आहेत. (एक्सेल २००० वर कुणी मिपाकराने काम केले असल्यास एक्सेल २००० ते एक्सेल २०१० चा प्रवास लिहून काढावा ही आग्रहाची विनंती - एक रोमहर्षक कहाणी आहे ती!) मी एक्सेल २०१० वरती काम करतो त्यामुळे सर्व स्क्रीनशॉट एक्सेल २०१० चे आहेत. आपण आता एक्सेलशीटकडे वळूया. एक्सेलशीट ओपन करण्यासाठी Start --> All Pragrams --> Microsoft Office --> Microsoft Excel 2010 असा मार्ग वापरावा. (एक्सेल २००३, एक्सेल २००७ साठी हाच मार्ग आहे) आता तुमच्यासमोर बर्‍याच उभ्या आडव्या रेषा आणि त्यांपासून बनलेले अनेक चौकोन दिसत असतील. हीच एक्सेल शीट. . १) Name Box - या ठिकाणी; सद्यस्थितीला कर्सर कोणत्या Cell मध्ये आहे ते समजते. २) Formula Bar - फॉर्म्यूला बारमध्ये Cell मध्ये असलेला नंबर किंवा माहिती किंवा जे असेल ते दिसते. वरील स्क्रीनशॉटमध्ये Cell L9 मध्ये असलेला स्टँडर्ड डेव्हीएशन चा फॉर्म्यूला दिसत आहे. ३) Quick Access Toolbar - या टूलबार मध्ये आपल्याला हवे असणारे महत्वाचे शॉर्टकट्स साठवून ठेवता येतात व हवे त्या वेळी लगेचच वापरता येतात. ४) Column Name - एक्सेल शीटवर दिसणारे A, B, C पासून XFD पर्यंत दिसणारे उभे चौकोन म्हणजे Columns आहेत. ५) Ribbon Menu and Tabs - रिबन मेन्यू २००७ व्हर्जन पासून अस्तित्वात आला. २००७ च्या आधिच्या एक्सेलमध्ये एखाद्या फंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी बराच क्लिकक्लिकाट करायला लागायचा. तो टाळण्यासाठी २००७ पासून या प्रकारचा मेन्यू डिझाईन केला गेला. ६) Workbook Name - सध्या वापरात असलेले वर्कबूक कोणते आहे ते इथून ओळखता येते. ७) Row Number - एक्सेल शीटवर दिसणारे १, २, ३ पासून १०,४८,५७६ पर्यंत दिसणारे आडवे चौकोन म्हणजे Rows आहेत. ८) Cell - सद्यस्थितीला कर्सर कोणत्या चौकोनात आहे तो चौकोन म्हणजे Cell. Column चे नाव आणि Row चा नंबर मिळून Cell Reference तयार होतो. (या उदाहरणार L9) ९) Vertical Scrollbar - एक्सेलशीटमध्ये उभे; वरखाली स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात. १०) Range - ज्यावेळी आपण एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्ती Cells सिलेक्ट करतो त्यावेळी तो Cell समुह म्हनजेच रेंज. ११) Worksheet Name - Excel Workbook मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Excel Sheet चे नाव इथे वाचता येते. १२) Range Stats - आपण माऊसच्या सहाय्याने सर्वच्या सर्व नंबर्स सिलेक्ट केले असतील तर सिलेक्ट केलेल्या आकड्यांच्या संबंधीत पुढील गोष्टी विनासायास या ठिकाणी समजतात. अ‍ॅव्हरेज, आकड्यांची संख्या, लहान आकडा (Minimum within Range), मोठा आकडा (Maximum within Range), आकड्यांची बेरीज. १३) Horizontal Scrollbar - एक्सेलशीटमध्ये आडवे; डावीकडून उजवीकडे स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात. १४) Page View - सध्या एक्सेल शीट कोणत्या फॉरमॅटमध्ये दिसत आहेत ती इथे कळते. तसेच एक्सेल शीट 'पेज लेआऊट' आणि 'पेजब्रेक' फॉरमॅटमधून बघता येते. १५) Zoom - एक्सेल शीट ची झूम लेव्हल किती आहे ते इथे कळते. क्रमशः ********************************************** हा धागा मुद्दाम लहान ठेवला आहे, सुरूवातीचे दोन तीन धागे अशाच माहितीवर आधारित असतील. सूचनांचे स्वागत आहे, पुढील धाग्यांमध्ये त्याप्रमाणे बदल करता येतील. Vlookup, Pivot Table वगैरे गोष्टी आपण शिकणार आहोत परंतु सध्या सर्वांना एका पातळीवर आणूया नंतर एकत्र शिकायला जास्ती मजा येईल असे वाटते. महत्त्वाचे - धाग्यामधल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात काही कळाले नाही तर शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मात्र एखादा भाग आत्ता कळाला नाही तर नंतर त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या इतर बाबी न कळण्याची दाट शक्यता आहे! अतीमहत्वाचे - 'Microsoft Certified Excel Specialist' असूनही मला एक्सेल संपूर्णपणे येते हे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल, तस्मात्; माझ्याकडून एखादी चूक झाल्यास अवश्य नजरेस आणून द्यावी. आनंदाने सुधारणा करून घेण्यात येईल. **********************************************
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells
  • धनु राशीचा शुक्र
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ४) - Filter, Conditional Formatting आणि Text to Columns

Book traversal links for चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
69269 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

वाचन खुणा साठवली आहे..

अनन्न्या
Sun, 03/03/2013 - 19:00 नवीन
प्रश्न विचारण्याएवढे कळत नाही. पण या माहितीचा माझ्या कुवतीनुसार अभ्यास करीन. फक्त शिकवणी अर्धवट सोडू नका.
  • Log in or register to post comments

मस्त !! आता पुभाप्र !!

सूड
Sun, 03/03/2013 - 19:12 नवीन
मस्त !! आता पुभाप्र !!
  • Log in or register to post comments

२००० पासून शिकायचा आळशी पणा केलाय

बहुगुणी
Sun, 03/03/2013 - 19:36 नवीन
तो घालवून तुमची शिकवणी लावणार (आणि थोडीफार ज्ञानप्राप्ती झाल्यावर तुम्हाला मोदकांची गुरूदक्षिणा देणार :-) ) धागा सुरू केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

लई भारी रे..

५० फक्त
Sun, 03/03/2013 - 20:12 नवीन
लई भारी रे.. अवांतर - शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही - हे म्हणजे धाग्याची शंभरी निश्चित.
  • Log in or register to post comments

MSOffice चे सर्वात जास्त

सस्नेह
Sun, 03/03/2013 - 20:51 नवीन
MSOffice चे सर्वात जास्त उपयुक्त अन विस्तृत व्याप्ती असणारे अंग म्हणजे Excel ! पुढच्या भागांची उत्कंठापूर्ण प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 03/03/2013 - 21:13 नवीन
अरे वा! एक्सेलशी संबंध अगदी दररोजचा. बर्‍याच शंकादेखिल आहेत त्या पुढील लेखांतून फिटतील असे वाटते (आणि न फिटल्या तर विचारीनच ;) ) एक्सेल हे तांत्रिकदृष्ट्या मायक्रोसॉफ्टचे असले तरी त्याचा इतिहास पार ८० च्या दशकातील लोकप्रिय लोटस १-२-३ पर्यंत पोचतो. अर्थात प्रस्तुत लेखमालेत त्याचा आढावा घेण्याची गरज नाही! पुढील लेखांच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत

प्रसाद गोडबोले
Sun, 03/03/2013 - 21:32 नवीन
अतिषय सुंदर माहीतीपुर्ण लेखन !! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत (विषेशतः म्यॅक्रो विषयक )!!
  • Log in or register to post comments

मायक्रोसाॅफ्ट एक्सेल म्हणजे

किसन शिंदे
Sun, 03/03/2013 - 23:38 नवीन
मायक्रोसाॅफ्ट एक्सेल म्हणजे आमच्या प्रचंड आवडीचा विषय! जाॅबला सुरूवात केल्यापासून ते आजतागयत प्रत्येक वेळी काही ना काही नविन शिकतोच आहे. काही दिवसांपुर्वी 'VLOOKUP' शिकल्यानंतर कोण आनंद झाला होता. माझा बाॅस एक्सेलमधला बापमाणूस आहे. त्याचे फाॅर्मयुले शिकतानाच दमछाक होतेय, इतके कठीण असतात. या लेखमालेतून खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

छान लेख.

कवितानागेश
Mon, 03/04/2013 - 00:25 नवीन
छान लेख. @ पिन्गू आणि पैसाताई: लिब्रेऑफिस आणि ओपन ऑफिस-कॅल्क दोन्ही 'थकेले' आहेत ! user friendly नाहीत.:P @ पुष्करिणी: पहिल्या बेन्चवर बसून गॄहपाठ वगरै भानगडी करुन पहिला नम्बर काढणार्‍या मुलीचा निशेध!
  • Log in or register to post comments

पहिला धडा वाचला गुरुजी! ही

रेवती
Mon, 03/04/2013 - 01:23 नवीन
पहिला धडा वाचला गुरुजी! ही माहिती होती. आता दुसरा धडा येईल तेंव्हा वाचण्यात वाचू.
  • Log in or register to post comments

वाचनखुण साठवली आहे.

स्पंदना
Mon, 03/04/2013 - 07:54 नवीन
वाचनखुण साठवली आहे. मी नुसती एक्सेल शीट ओपन करुन धा चुका करुन एक बरोअबर युज शिकत गेले. आता मी जे काही करते ती नेमकं कस करायच ते शिकाय्ला मिळेल. धन्यवाद मोदकभाऊ!
  • Log in or register to post comments

मस्त रे मोदकेश

स्पा
Mon, 03/04/2013 - 09:50 नवीन
मस्त रे मोदकेश :)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त लेख!!

अस्मी
Mon, 03/04/2013 - 10:29 नवीन
एकदम मस्त लेख!! मॅक्रो, डेटा वॅलिडेशन, व्हॉट-इफ...पुढील भागांतून खूप काही शिकायला मिळेल!!
  • Log in or register to post comments

मोदक राव .

तर्री
Mon, 03/04/2013 - 10:32 नवीन
मागच्या अनेक चांगल्या उपक्रमासार्खाच उत्तम मालिका .... पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

अरे हे कलर कसं करायचं पासुन

झकासराव
Mon, 03/04/2013 - 11:16 नवीन
अरे हे कलर कसं करायचं पासुन अनहाइड कसं करायचं एवढच शिकलोय मी. ते ही विचारुन विचारुन. डिटेल्स आता शिकवणीत शिकलं जाइल. :) शिकवणी फारच आवडल्यास (ह्याची खात्रीच आहे), मोदकरावाना आकुर्डीतल्या जयश्री हॉटेल म्धील मिसळ खिलवली जाइल. :)
  • Log in or register to post comments

स्तुत्य उपक्रम. एक्सेल हे

वेल्लाभट
Mon, 03/04/2013 - 11:26 नवीन
स्तुत्य उपक्रम. एक्सेल हे खरंच कित्ती भारी आहे, ते एक्सेल वर काम केलेलाच खरं जाणू शकतो. मी त्यातला एक असल्याने मी हे सांगू शकतो. छान सुरुवात आहे, मोदक भाऊ.
  • Log in or register to post comments

प्रगत आलेखीकारण

ई-पूर्वाई
Mon, 03/04/2013 - 11:43 नवीन
प्रगत (Advanced ) आलेखीकारणाची (ग्राफिंग/ चर्टिङ्ग ) पण ओळख करून द्यावी हि विनंती. अगदी अलीकडेच एका इन्व्हेस्ट्मेण्ट बँक ने ४ वेळा मुलाखती घेऊन पाचव्या वेळी एक ग्राफिकॅल प्रेसेण्टेशन करायला सांगितले.तेव्हा साधे ग्राफ्स बघून ऑफर केली नव्हती (आणि "आपण प्रेसेण्टशन मध्ये फारच साधे आलेख वापरलेत आणि बराचसा डेटा प्रगत एक्सेल माहित नसल्यामुळे tabulate केलात" असा feedback दिला होता) त्यामुळे एक्सेल ने इंगा तर दाखवलाच आहे... :-(
  • Log in or register to post comments

प्रगत आलेखीकरण

ई-पूर्वाई
Mon, 03/04/2013 - 11:44 नवीन
*प्रगत आलेखीकरण*
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम

महेश हतोळकर
Mon, 03/04/2013 - 12:01 नवीन
चौ.रा. म्हणल्याप्रमाणे excel शिकणं हि आजची अत्यावश्यक बाब झाली आहे. माझी हालत तर
When I started my carrier I aimed to excel in my work. Now I work in excel.
अशी आहे.
  • Log in or register to post comments

वर्गात नाव घातले गेले आहे !

मोहन
Mon, 03/04/2013 - 12:15 नवीन
धन्यवाद मोदक. अत्यंत स्तुत्य उपक्रम.
  • Log in or register to post comments

मोदक साहेब

विटेकर
Mon, 03/04/2013 - 12:39 नवीन
शुभेच्छा ! एक्सेल भयानक आवडते .. पण पूर्ण येते असे म्हणनार नाही .. विशेषतः मायक्रो..लैच बोम्ब आहे .. तसेच फोरकाश्ट आणि इतर सांखिकी फले वापरताना गंडायला होते .. त्यावर विषेष शिकवणी घेता यील का?
  • Log in or register to post comments

उत्तम!!!!

पिलीयन रायडर
Mon, 03/04/2013 - 12:58 नवीन
हजर आहे सर... आणि शिस्तीत लक्ष पण देत आहे!
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम!

मैत्र
Mon, 03/04/2013 - 13:31 नवीन
एक्सेल आवडते. काही प्रमाणात बरे जमते पण काही लोक इतके सुंदर पद्धतीने रिपोर्ट्स / टेबल्स मांडतात ती कला आहे जी काही फार जमत नाही. खूप पूर्वी सोप्या मांडणीसाठी एक्सेल शिकलो आणि गोडी वाढत गेली. काही काळापूर्वी सिस्टिम मधून तिकीटांचा (प्रॉब्लेम) विदा घेऊन त्यातून विविध टेबल तयार करून त्यावर एकावर एक पिव्होट वापरून तयार ग्राफ / चार्ट बनवण्याचे टेम्प्लेट (मराठी?) केले होते. मजा आली. काही विशेष अनुभवी लोकांनी चक्क पूर्णतः मजकूर असलेली आणि लिंक करून अतिशय उत्तम चालणारी सुंदर टेम्प्लेट्स रिक्वायरमेंट्स साठी बनवलेली पाहिली. गेल्या वर्षी एका मोठ्या अभ्यासक्रमात एक्सेलचे बिल्ट इन आणि बाहेरचे अ‍ॅड इन प्रोग्रॅम्स वापरून विविध प्रकारचा सेन्सिटिव्हिटि अ‍ॅनॅलिसिस / सॉल्व्हर्स पाहून जबरा वाटलं. पण ते तेवढ्या कोर्सपुरतं राहिलं. पुढे शिकण्याची इच्छा आहे. चंदू च्या संस्थळावर पॉवर पिव्होट हा प्रकार पाहिला. हा म्हणजे पिव्होट जे एकपेक्षा जास्त तक्त्यांचा विदा वापरून त्याचा एक छोटा विदागार पिव्होटपुरता बनवून हवा तसा रिपोर्ट देऊ शकते. २०१० / २०१३ पासून ही जबरदस्त सोय आलि आहे. मोदकराव -- पुढच्या भागांची आतूरतेने वाट पाहतो. अतिशय उत्तम विचार आहे ही लेखमाला काढण्याचा. एक्सेल स्पेशालिस्ट यावर गुगललं पण नेमकी कुठली पुस्तकं / माहिती सर्वोत्तम ठरेल आणि ही टेस्ट भारतात देण्याचं सोयीचं ठिकाण मिळालं नाही. बंगळुरात एकही सेंटर नाही पाहून अतिशय आश्चर्य वाटलं. याबद्दल पण अजून माहिती मिळाली तर खूप आवडेल.
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम आहे मोदका. तुला

मृत्युन्जय
Mon, 03/04/2013 - 13:59 नवीन
चांगला उपक्रम आहे मोदका. तुला अनेक शुभेच्छा आणी धन्यवाद. आम्हा अडाण्यांचा एक्सेल चा वापर टेबलांमधुन बेरजा वजाबाक्या करण्यापुढे जात नाही. त्यामुळे हे वाचुन शिकतो आता
  • Log in or register to post comments

छान सुरुवात

स्मिता.
Mon, 03/04/2013 - 14:16 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण उपक्रमाची छान सुरुवात केलीयेस रे मोदका! माझ्या बाबतीत एक्सेल म्हणजे अतिपरिचयात् अवज्ञा असंच आहे. व्हिबी मॅक्रोज् शिकण्याची कधीपासून फार इच्छा आहे. पुढच्या भागांची वाट बघतेय.
  • Log in or register to post comments

वाहवा

नि३सोलपुरकर
Mon, 03/04/2013 - 16:54 नवीन
अत्यंत स्तुत्य उपक्रम. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

मोदकशेट खरच असा चांगला उपक्रम

अधिराज
Mon, 03/04/2013 - 17:17 नवीन
मोदकशेट खरच असा चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 03/04/2013 - 17:24 नवीन
Vlookup शिकण्यास इच्छूक अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments

अतिशय उपयुक्त आणि माहीतीपुर्ण लेख..

अक्षया
Tue, 03/05/2013 - 14:25 नवीन
अतिशय उपयुक्त आणि माहीतीपुर्ण लेख. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

चांगली व उपयोगी लेखमालीका

श्रिया
Tue, 03/05/2013 - 16:47 नवीन
चांगली व उपयोगी लेखमालीका चालू केली आहे, धन्यवाद मोदक!
  • Log in or register to post comments

उत्तम

सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/07/2013 - 11:40 नवीन
उत्तम सुरुवात. वाचतोय
  • Log in or register to post comments

दहा वर्ष एक्सेल वापरते आहे -

आतिवास
Fri, 03/08/2013 - 22:19 नवीन
दहा वर्ष एक्सेल वापरते आहे - पण गरज पडेल तसं शिकत गेल्यामुळे अनेक गोष्टीं अर्धवट माहिती आहेत. तुमच्या लेखमालेतून नीट शिकणं होईल आता.
  • Log in or register to post comments

पुढील भाग...?

आयुष्य
Sat, 04/11/2015 - 23:20 नवीन
याचा भाग एक वाचला याचे पुढील भाग प्रकाशित करण्यात आले आहेत का? प्रकाशित झाले असल्यास त्या भागाचे दुवे मिळाले तर एक्सेल शिकण्यास फार मदत मिळाली असती. धन्यवाद... आपला मित्र आयुष्य
  • Log in or register to post comments

हे घ्या दुवे

श्रीरंग_जोशी
Sun, 04/12/2015 - 08:34 नवीन
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ३) - Entering Data, Clear आणि Paste Special
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ४) - Filter, Conditional Formatting आणि Text to Columns
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुष्य

धन्यवाद!

संदीप डांगे
Sun, 04/12/2015 - 14:45 नवीन
शिरीरंगभाऊ मंजे मिपाचे गुगल हायेत असं मी या ठीकानी झाईर करतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अणुमोदण अणुमोदण अणुमोदण

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/12/2015 - 15:08 नवीन
अणुमोदण
अणुमोदण

अणुमोदण

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाय हो

श्रीरंग_जोशी
Sun, 04/12/2015 - 20:41 नवीन
मी एक सामान्य मिपाकरच हाये. बाकी मी जालावर शोधण्यासाठी बिंगत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यांचं 'बिंग' असं फोडू नका..

आदूबाळ
Sun, 04/12/2015 - 22:32 नवीन
त्यांचं 'बिंग' असं फोडू नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बिंग फुटण्याचा एक जुना नमुना

श्रीरंग_जोशी
Sun, 04/12/2015 - 22:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धन्यवाद...।

आयुष्य
Sun, 04/12/2015 - 23:59 नवीन
श्रीरंग साहेब आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद... हे दुवे मी जतन करून ठेवतो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो...।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पोचपावतीसाठी आभारी आहे

श्रीरंग_जोशी
Mon, 04/13/2015 - 08:55 नवीन
पोचपावतीसाठी आभारी आहे. कृपया साहेब म्हणून नका. बाकी जतन करून ठेवण्यापेक्षा शोधण्याची सवय लावून घ्या. हे दुवे मिळवण्यासाठी खालील शब्द वापरून बिंगले. मायक्रोसॉफ्ट एक्सेल site:misalpav.com आपल्याला जे शोधायचे आहे ते शब्द अन त्याला site:misalpav.com जोडल्यास केवळ मिसळपावरच शोध घेतला जातो. मिपाऐवजी दुसर्‍या संस्थळाचा पत्ता टाकल्यास तिथे शोधले जाईल. ज्या गोष्टी वाचण्यासाठी मिपावर प्रवेश करावा लागत नाही (जसे लेख, प्रतिसाम, मिपावरचा इतर जाहीर मजकूर) हे सर्व शोधले जाऊ शकते. परंतु सदस्यांच्या खरडवह्यांमधला मजकूर मात्र या पद्धतीने शोधता येणार नाही कारण मिपा सदस्यांना प्रवेश केल्यावरच तो दिसू शकतो. या विषयी काही प्रश्न असल्यास हक्काने विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुष्य

शोध घेण्यासाठी काही माहितीपुर्ण धागा आहे का?

नया है वह
Mon, 04/13/2015 - 12:56 नवीन
नसल्यास वर दिल्या प्रमाणे आणखी काही माहीती साठी एखादा धागा येऊ द्या धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद श्रीरंगपंत..!!!!

मोदक
Mon, 04/13/2015 - 13:00 नवीन
धन्यवाद श्रीरंगपंत..!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मोद्क साहेब, चला

श्री
Wed, 06/17/2015 - 17:16 नवीन
मोद्क साहेब, चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. मालिकेचा पुढचा भाग केंव्हा?
  • Log in or register to post comments

काहिही हा श्री

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 18:32 नवीन
काहिही हा श्री रहावले नै हे लिहायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा