Skip to main content

सुभाषबाबू सत्य ..पाळत ...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 11/04/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ? इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ? त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ? सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ? काय खरे काय खोटे ? त्यात आणखीन हि एक क्लिप ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ?? हे अजून एक भयकारी काही जीवघेणे ...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...

वाचने 36892
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

त्यात नेहरूंचे नाव आल्याने कुजबूज आघाडीची पुढच्या २/४ वर्षांची सोय झाली म्हणायची.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ - Sat, 11/04/2015 - 13:38 नवीन ६५ वर्षांची कुजबुज आता चव्हाट्यावर आली म्हणुन काँग्रेसचे धाबे दणाणलेत. नेताजी, लाल बहादुर शास्त्री असे किती लोक गायब केलेत ६५ वर्षांत ?
@ माईसाहेब, वरच्या प्रतिक्रियेवर उत्तर दे अन्यथा असल्या फालतू प्रतिक्रिया देणे बंद कर

In reply to by विनोद१८

माई मोड ऑन.... अरे विनोदा , स्वातंत्र्यासाठी काठ्या कुणी खाल्ल्या अन स्वातंत्र्यानंतर अखंड कुजबुज जप कुठल्या सनातन्यांनी मांडला हे तर सर्वंनाच ठाऊक आहे.. आझाद हिंद सेनेसाठी छातीचा कोट केलेल्या नेहरुंच्या गादीवर , नऊलाखी कोट घालणारे विराजमान झाले अन या राष्ट्रीय कुजबुज संघाचा वाल्युम अजुनच लाऊड झालाय. आमचे हे तर बोलत होते , नव्या राजवटीत या कुजबुजीतुन साक्षात साईबाबा सुटले नाहीत तिथे चाचाजी किस झाड की पत्ती ! माई मोड ऑफ. ..... कोट कोट या कोटीचे क्रेडिट मायबोलीवरील सचिन पगारे यांना जाते.

Shah Nawaz Khan, Gurbakhsh Singh Dhillon and Prem K. Sehgal were, as a test case, put on trial in open court in the Red Fort at Delhi. They were charged with treason and with waging war against the King. This aroused India wide sympathy for them. The trial began on 5 November 1945.Eminent lawyers and public men such as Tej Bahadur Sapru, Bhulabhai Desai and Jawaharlal Nehru defended the accused in court. There were riots in their favour in several places between 21 and 24 November. The court on 31 December 1945 sentenced all the three to transportation for life. The government, however, yielded to the outburst of popular sympathy and the British commander in chief, Sir Claude Auchinleck, quashed the sentence on review. आझाद हिंद सेनेच्या लोकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली सजा दिली तेंव्हा तेजबहाद्दूर सप्रू , भुलाभाई देसाई व चाचा नेहरु यांनी केस लढवली. अखेर ब्रिटिश सरकार नम्ले. ते लंडनवरुन ब्यारिस्टरकी करुन आलेले आणखी एक वकील होते. पण माफीपत्रे लिहुन दिल्याने ते बहुदा शब्दात अडकले होते. म्हणुन केस लढण्यात ' ते' सहभागी नव्हते की काय ! कट्टर जहाल लोकांच्या केसेस लढायला नेहरु गेले ! छ्याछ्या ! चाचा ! 'जहाल'-भक्त मंडळी , वाचताय ना हा इतिहास ? http://www.thesikhencyclopedia.com/historical-events/the-british-and-si…

In reply to by hitesh

ह्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृत्यावर कसली टिका करता येत नाही अस सुचवायचं आहे का तुम्हाला?

In reply to by hitesh

अहो पुढच्या पंतप्रधानकी साठी हे असले आवश्यक होतेच ... बाकी त्यांची बलिष्टरी देशाला किती उपयोगी पडली हे तपासणे रोचक ठरावे ... आणि त्या 'आणखी एका' वकिलांनी पुढचे अनेक वर्षे देशाला वारंवार सल्ले दिले ...बहुतेक सल्ले धूडकावल्यावर ..काळाने चपराक लावल्यावर सुद्धा हे वरचे बलिष्टर सुधारले नव्हते ...

In reply to by अत्रन्गि पाउस

देशाची इतकी चिंता होती तर राष्ट्रपती, पं प्र ... महापौर , ... किमान आर्मीतला सार्जंट वगैरे होऊन आपले सल्ले प्रत्यक्ष्यात आचरणात आणुन दाखवायचे की.

In reply to by विनोद१८

लंडनवरुन बॅरिस्टरकी करुन आलेल्या खर्‍या स्वातंत्र्यवीरांचं नाव ऐकलं की खांग्रेसमनोवृत्तीच्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आपली पापं उघडकीला येतील अशी भिती वाटायला लागते. त्या पक्षाच्या उदो उदो होणार्‍या प्रेषितांचं ढोंग उघड पडेल अशी शंका आली रे आली की हे लोकं "आआप" ला लाजवेल असा थयथयाट करायला लागतात.
आपल्या एकुणच आवाक्याच्या बाहेर असलेल्या बाबतीत आपले घाणेरडे नाक खुपसु नये माणसाने.
+३२८९४७२३९८४७२३९८४७२३

In reply to by hitesh

ते लंडनवरुन ब्यारिस्टरकी करुन आलेले आणखी एक वकील होते.
"स्वातंत्रवीर सावरकर " असं नाव लिहायला घाबरतात की काय आता नेहरू - गांधीच्या घरात चाकरी करणारे ! अच्छा हैं !अच्छा हैं ! ये डर होना चाहिये ... ये डर मुझे अच्छा लगा! -- एक सावरकर भक्त !

म्हणे आझाद हिंद सेनेच्या केसेस लढायला गेले होते. Most of the INA. soldiers were set free after cashiering and forfeiture of pay and allowance.[6] On the recommendation of Lord Mountbatten of Burma, and agreed by Nehru, as a precondition for Independence the INA soldiers were not reinducted into the Indian Army. http://en.wikipedia.org/wiki/Indian_National_Army_trials

काँग्रेस ब्रिगेड नेहरुंना लार्जर दॅन लाईफ बनव वाय चा प्रयन्त चालवलाय, ब्रिटीशां बरोबर देश्याच्या स्वातंत्रासाठी सौदा केला म्हणुनच लाखो लोकांच बलिदान ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी मातीमोल करुन टाकल, २० वर्षे नेताजीवर पाळत ठेउन होते, कारण कदाचीत ब्रिटीश परत येउन स्वातंत्र हिसकाहुन घेतील की काय अशी भीती होती की काय ?

In reply to by डँबिस००७

आणि कुजबुज संघाचा प्रॉब्लेम हा आहे की लार्जर दॅन लाइफ करावीत अशी माणसेच त्यांच्या पार्टीत नाहीत.

In reply to by hitesh

होय एकदम बरोबर, राहुल गांधीसारखे नमुने नसल्याचं फार दु:ख होत असेल नाही संघाला? ;)

In reply to by hitesh

ब्वॉर्र!!! का माहिते का? कारण तिथे हातपक्षीय चाटुगिरी आणि व्यक्तीपुजेला अगदी आत्ता आत्ता पर्यंत महत्त्व दिलं जातं नव्हतं. ह्या निवडणुकीमधे नमो नमो केलं आणि ही व्यक्तीपुजेची पहिली आणि शेवटची वेळ असावी ही आशा.

In reply to by hitesh


In reply to by निनाद जोशी

अतिशय प्रबुद्ध आणि गूढ विचारांनी भरलेला प्रतिसाद. एक महाकाव्य लिहिता येईल याच्यावर. जगाचं सारं तत्वज्ञान या एका प्रतिसादात सामावलं आहे.

In reply to by काळा पहाड


ह्यांनी भगत सींगच्या कुटुंबावरही आय बी कडुन पाळत ठेवली होती अस आता समोर आल आहे ! भगत सींगच्या कुटुंबा कडुन ह्या काँग्रेसला काय धोका होता ?

हितेश,, नेहरूंनी आझाद हिंद्सेनेसाठी वकिली केली हि नवीन माहिती आहे. धन्यवाद . नेहरू बद्दल असलेला आदर अजूनच वाढला

In reply to by प्रतापराव

मलाही ही माहिती नव्यानेच समजली होती. कुणी काही बोलु लिहु देत , पण नेहरु गांधी हे सदासर्वकालस्मरणीय आहेत.

विनोदा, अरे थोडा मोठा हो रे. १९४७ ते १९६८ ह्या काळात किती गृहमंत्री झाले ते येथे बघ.(http://en.wikipedia.org/wiki/Minister_of_Home_Affairs_%28India%29) सी.राजगोपालाचारी,नंदा,यशवंतराव,गोविंद वल्लभ पंत.. तुझे वय ठाउक नाही पण ह्या लोकांचे स्वतःचे राजकीय वजन होते.ही मंडळी नेहरू भक्त नव्हती. कुठल्याही व्यक्तीवर पाळत ठेवायची तर गृहखात्याची मंजूरी लागते,तेव्हा ह्या निर्णयात गृहमंत्री,गृहसचिव महत्वाची भूमिका बजावतात..'नेहरूंनी फर्मान काढले...' हे सनातन प्रभातमध्ये वाचायला ठीक आहे.पण नोकरशाहीत तसे नसते. तेव्हा पाळत ठेवली असेल तर वरील गृहंमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ते अशक्य आहे. कुजबूज आघाडीचे लक्ष्य फक्त नेहरू असल्याने वरील मंडळींवर ते टिका करायला धजावणार नाहीत. त्या फायलींमध्ये खरोखरच पाळत ठेवली होती असे असेल तर नरेंद्र,राजनाथने टी.व्ही.वर येऊन तसे सांगावे की.पण ते तसे करणार नाहीत. वॉट्स अ‍ॅप,ट्वीटर्,इंट्ररनेट्च्या माध्यमातून अशा दुर्गंधीयुक्त फुसक्या सोडायच्या,जनमत आजमावायचे व न आवडणारी व्यक्तीमत्वे मलीन करायची.प्रकरण अगदीच अंगाशी आले की मग 'आम्हाला नेहरूंबद्दल आदर आहेच.." असे म्हणून काढता पाय घ्यायचा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तर डायरेक्ट पंतप्रधानांना रिपोर्ट करायची न? मग त्यांना काही करायचे असल्यास ते इतक्यांच्या परवानग्या घेण्यापेक्षा डायरेक्ट पंडितजींचीच घेतील का?

राष्ट्रीय संरक्षणाच्या अनुषंगाने, त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी अथवा इतर महत्वाच्या कारणासाठी कुठल्याही व्यक्तीवर जर पाळत ठेवली जात असेल तर मला त्यात काहीच चुकीचे वाटत नाही. पाळत ठेवले जाण्यासारखी कुठली गोष्ट बोस कुटुंबानी केली होती ते माहिती नाही कदाचित असे असावे की सुभाषबाबु जिवंत आहेत अशी सरकारची खात्री असावी आणि सुभाषबाबु तेव्हा दुसर्‍या महायुद्धाच्या गुन्हेगारांच्या यादीत असल्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवली जाण्याची भारत सरकारला गरज वाटली असावी. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यक्तींवर सरकार पाळत ठेवत असते. त्यात गैर वाटण्याजोगे काही नाही. हा ते गुजरात सरकारने कुठल्यातरी मुलीवर तिच्या सुरक्षेसाठी पाळत ठेवली होती म्हणुन काही मुर्खांनी मोदी सरकारवर टीका केली होती म्हणून आज भाजपा सरकारने नेहरुंवर टीका केलीच पाहिजे असे काही नाही.

In reply to by खंडेराव

युद्धकैदी असल्यामुळे कदाचित त्यांना गुप्तजागी ठेवले असावे. दुसरे म्हणजे आमचे स्वामी म्हणतात तस त्यांस स्टालिननी फाशी दिली असावी. आज सकाळमध्ये त्यांच्या ड्रायव्हरचे मत आले आहे. तोही हेच म्हणत आहे.

एक धूर्त चाल आहे. मोदीन्चे नेताजीन्च्या वारसाना germany ला भेटणे आणि त्याच वेळी हा रिपोर्ट येणे.

In reply to by टिनटिन

धूर्त नक्कीच आहे. पण प्रत्येक धूर्त चाल स्वार्थी नसते. (आणि प्रत्येक समाजवादी विचार हा समाजाच्या हिताचा नसतो.)

...खरे सत्य काय ते जाणुन घेण्याचा जनतेला अधिकार आहे. ज्याचे अगोदर राजकारण झाले त्याचे नंतरही राजकारण होणारच.

सुभाष बाबूंच्या मृत्यू विषयीचा वाद काही वेळ विसरून जाऊ. पण आता संधी मिळालीच आहे तर कट्टर कॉंग्रेजींना काही प्रश्न विचारतो. १. एकेकाळी कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) चे अध्यक्ष असलेले सुभाष बाबू कॉंग्रेस सोडून का गेले ? अशी कुठली परिस्थिती उदभवली होती ? बंर त्यांना थांबवण्याचे प्रयत्न का करण्यात आले नाही ? २. आज राहुल गांधीसारख्याचे नेतृत्व मान्य असलेल्या कॉंग्रेजींना सुभाष बाबूंचे नेतृत्व का आवडले नाही ? ३. लोकमान्य टिळकांचा जहालमतवादी दृष्टीकोन कॉंग्रेजींना का पटला नाही ? ४. राष्ट्रीय सभेच्या जास्तीत जास्त राज्यस्तरीय नेत्यांचे मत वल्लभभाई पटेलांच्या बाजूने असताना चाचा नेहरू पंतप्रधान का झाले ? या प्रश्नांची उत्तरे द्या . अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत !

In reply to by चिनार

२. आज राहुल गांधीसारख्याचे नेतृत्व मान्य असलेल्या कॉंग्रेजींना सुभाष बाबूंचे नेतृत्व का आवडले नाही ?
जर काँग्रेजींना सुभाष बाबूंचं नेतृत्व आवडलं नसतं तर ते निवडूनच आले नसते. त्या काळी काँग्रेसमध्ये निवडणुका व्हायच्या आणि सुभाष बाबू तर महात्माजींच्या विरोधाला न जुमानता निवडून आले होते. सुभाष बाबूंचे खरे विरोधक (किंवा खरं सांगायचं तर प्रतिस्पर्धी) महात्माजी होते, नेहरू नव्हते. नेहरू तर त्यांच्या पेक्षा खालच्या फळीतील नेते होते.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड तुम्हाला प्रश्नाचा रोख कळला नसावा . अध्यक्ष झाल्यावर सुभाष बाबूंनी कॉंग्रेस सोडली याला अंतर्गत कलह कारणीभूत असावा. याचाच अर्थ सुभाषबाबूंचे विरोधक सुद्धा कॉंग्रेस पक्षात होते. ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ?

In reply to by चिनार

अध्यक्ष झाल्यावर सुभाष बाबूंनी कॉंग्रेस सोडली याला अंतर्गत कलह कारणीभूत असावा.
नाही, याला महात्माजींचा "मीच एकटा नेता" हा हेखेकोर पणा कारणीभूत होता. http://www.quora.com/What-was-the-relationship-like-between-Mahatma-Gan… Gandhi nominated Pattabi Sitaramayya, and suggested to Bose that he withdraw from the election so that Pattabhi can win uncontested. Bose however refused and this almost led to a split in the Congress. ... Bose won the election. Gandhi however took a personal stand and declared that the loss of Pattabhi was his loss and Bose, saddened by this, submitted his resignation and formed the All India Forward Block, with Thevar and some of his supporters joining him.
ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ?
'ही' काँग्रेस 'ती' काँग्रेस नाहीये.

In reply to by काळा पहाड

बोसांची मते ही युद्ध्ह आक्रमण वगैरे कोंग्रेसच्या विचाराविरुद्ध होती. कुणी अध्यक्ष झाला म्हणुन संघटनेFCC ए मूळ विचारच बदलू शकतनाही. म्हणुन बोसांना काँग्रेस सोडावी लागली. काँग्रेसच्या लोकानी जरी बोसाना निवडले होते तरी बोस वेगळे झाल्हावर त्यांच्यामागे कुणीही काँग्र्द्सवाले गेले नाहीत. बोसाना स्वतंत्र संघट्ना बांधावी लागली. सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते. सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले. सनातनवाले संघवाले हे सांगत नाहीत. कारण त्यांच्या अल्पबुद्धीची इतकी कुवत नाही.

In reply to by hitesh

जर "सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते - ." तर भारताची सर्वात मोठी डोके दुखी म्हणजे काश्मीर समस्या. नेहरुना ही समस्या निर्माण करता आली नसती .

In reply to by रमेश आठवले

भारताची सर्वात मोठी डोके दुखी म्हणजे काश्मीर समस्या. नेहरुना ही समस्या निर्माण करता आली नसती .
मी स्वतः भाजप समर्थकच आहे.पण मी भाजप समर्थक आहे म्हणून काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टींना नावे ठेवायलाच पाहिजेत किंवा नेहरूंना प्रत्येक गोष्टीमध्ये शिव्या घालायलाच पाहिजेत असे मला तरी वाटत नाही. अनेकदा श्रेय द्यायची वेळ आली तर ते पटेलांचे आणि दोष द्यायची वेळ आली तर तो नेहरूंचा अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न उभा राहिला नसता हे म्हणणे त्याचेच एक उदाहरण आहे. १ जानेवारी १९४९ रोजी भारताने काश्मीरात अगदी गीलगीट-मुझप्फराबादपर्यंतचा भाग जिंकून न घेता युध्दबंदी केली आणि म्हणून काश्मीरमध्ये नेहरूंनी घाण घातली हा नेहरू विरोधकांचा अगदी आवडता सिध्दांत असतो.पण त्याचवेळी सरदार पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जी हे दोघेही नेहरूंच्याच मंत्रीमंडळात मंत्री होते ही गोष्ट असे म्हणणारे लोक विसरतात.या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर नेहरूंबरोबर मतभेद असतील तर त्यांनी राजीनामा का दिला नाही? तोपर्यंत हैद्राबादचा कटकटा प्रश्न सुटला होता.इतर संस्थानांचेही विलीनीकरण झाले होते.देशातील दंगलीही थांबल्या होत्या. मग सरदार पटेलांसाठी काश्मीरपेक्षा मोठा प्रश्न सोडवायचा राहिला आहे म्हणून ते मंत्रीमंडळात राहणे गरजेचे होते अशी परिस्थिती होती का?तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही.तसेच शामाप्रसाद मुखर्जींनी नंतर एप्रिल १९५० मध्ये नेहरू-लियाकत अली खान कराराविरोधात राजीनामा दिला.म्हणजे ते स्वतंत्र बाण्याचे होते हे नक्कीच पण तरीही काश्मीरात युद्धबंदी करायच्या निर्णयाविरूध्द त्यांना राजीनामा द्यावा वाटला नाही.म्हणजे या निर्णयाला सरदार पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जी या दोघांचीही संमती होती असा अर्थ घेतला तर त्यात काय चुकले? आणि पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामे देण्याचे प्रकार कधी झाले नव्हते असेही नाही. काश्मीरात युध्द ऑक्टोबर १९४७ ते डिसेंबर १९४८ असे १४ महिने चालू होते.सुरवातीला घुसखोर अगदी श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचले होते.विमानतळ जर त्यांच्या ताब्यात गेले असते तर काश्मीर वाचवणे भारताला जवळपास अशक्य झाले असते हे सर्वमान्य आहे. या १४ महिन्यांच्या काळात पाकड्यांना श्रीनगरपासून ७०-८० किलोमीटर्सपेक्षा जास्त मागे रेटता आले नव्हते.याची कारणे २०१५ मध्ये मुंबई-पुण्यात बसून भारतीय सैन्याने काय करायला पाहिजे होते असे बोलणार्‍यांपेक्षा नेहरू-पटेल-शामाप्रसाद यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे माहित होती याविषयी शंका नाही. माझ्या मते याची कारणे होती-- काश्मीर पाकिस्तानच्या बाजूने जास्त अ‍ॅक्सेसिबल होते.त्यामुळे दळणवळण, रसद यासाठी पाकड्यांना जास्त सोयीचे गेले. पण भारताच्या बाजूने या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रतिकूल होत्या. तसेच पाकड्यांना ते अधिक उंचीवर असल्याचाही फायदा होता.१९४७ मधील फाळणी, दंगली आणि मोठ्या प्रमाणावर आलेले निर्वासित यामुळे भारताला काश्मीरमधील युध्द अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणे शक्य नव्हते. काही लोक असे म्हणतात की १९६५ मध्ये शास्त्रीजींनी केले तसे १९४७-४८ मध्ये भारताने करायला हवे होते. म्हणजे काश्मीरात जड जाते म्हणून पंजाबमधून आघाडी उघडून लाहोरला धडक मारायला हवी होती.त्यावेळी महासत्तांचा पाठिंबा पाकिस्तानला होता आणि भारताचे सैन्य प्रचंड प्रबळ असते/होते असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षातल्या मर्यादा राज्यकर्त्यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक होत्या.भारताने पाकिस्तानवर हल्ला केला म्हणून समजा अमेरिका-इंग्लंडचे सैन्य प्रत्यक्ष आपल्याविरूध्द आले असते (तसे व्हायची शक्यता होती की नव्हती हे २०१५ मध्ये मला जितके माहित आहे त्यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरू-पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जींना जास्त माहित होते हे नक्की) तर आपल्याला पार्श्वभागाला पाय लावून पळत यावे लागले असते हे नक्कीच. आणि मग नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य धोक्यात आणले हा उलटा दोषही नेहरूंच्याच कपाळी आला असता. राज्यकर्त्यांना असे धसमुसळ्याप्रमाणे मनात आले म्हणून भावनेच्या भरात जाऊन हवे ते करता येत नाही.तर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि नक्की काय परिणाम होतील हे ध्यानात घेऊनच उचलावे लागते. आता या परिस्थितीत सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न सुटला असता म्हणजे नक्की काय झाले असते असे तुम्हाला म्हणायचे आहे? तुम्ही नेहरूंच्या ३७० कलम, शेख अब्दुल्ला प्रकरण, चीन प्रकरणीचे धोरण इत्यादींवर टिका करत असाल तर मी सहमत आहेच.पण नेहरूंवर टिका करायची म्हणून प्रत्येक गोष्टीवर टिका केलीच पाहिजे हे काही मला पटत नाही.

In reply to by क्लिंटन

सैन्य शक्तीने आक्रमण करुन केवळ काश्मीरच नव्हे तर अक्खा पाकिस्तान जिंकायचा प्लॅन पटेलांकडे तयार होता पण त्याला नेहरुंनी हरकत घेतली. अन्यथा आज अखंड भारत अस्तीत्वात असता :D

In reply to by अर्धवटराव

पटेलांना कुणी लहानपणी कॉम्प्लॅन पाजले नसेल त्यामुळे प्लॅन गुंडाळून ठेवावा लागला. काय पण लोक एकएक अफवा उकळत असतात. क्लिंटनसाहेबांशी शंभर टक्के सहमत. त्या काळातल्या परिस्थितीचा अंदाज त्याकाळात त्या दालनात बसलेल्या लोकांना जास्त असेल. त्यांच्याकडे असलेली-नसलेली माहितीची उपलब्धता त्यांना माहिती. आपले निर्णय चुकले हे काळ 'नंतर' सांगतो. सर्वोच्च नेते झाले म्हणजे ते देव नव्हेत. आज ७० वर्षांनी हजार लोकांनी पुर्ण माहिती नसलेल्या विषयावर आपआपली मते मांडून आवडत्या नावडत्या नेत्यांना पाठीशी घालणे-टार्गेट करणे हे प्रकार म्हणजे करमणूकीशिवाय दुसरे काही नाही. ब्रेनवॉशिंग झालेली लोकं जेव्हा तावातावाने भांडतात तेव्हा हसावे का रडावे कळत नाही.

In reply to by क्लिंटन

"याची कारणे २०१५ मध्ये मुंबई-पुण्यात बसून भारतीय सैन्याने काय करायला पाहिजे होते असे बोलणार्यांपेक्षा नेहरू-पटेल-शामाप्रसाद यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे माहित होती याविषयी शंका नाही” -माझ्या विधानाशी श्यामाप्रसाद यांचा सम्बन्ध नाही. त्यांना तुम्ही येथे का आणता आहात ?- क्लिंटन साहेब , मी मुंबई-पुण्यात रहात नाही आणि भा ज पा चा सदस्य नाही. आपण आपल्या मिसळपाव वर घेतलेल्या टोपण नावावरून अमेरिका वासी आहात असे वाटते .- १. जो पर्यंत महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या कागदावर सही केली नव्हती तोपर्यंत भारत तेथे सैन्य पाठवू शकत नव्ह्ता. त्यांनी २६ ऑक्टोबर १९४७ ला सही केल्यावर तत्काळ पहिली सैन्य तुकडी विमानाने पाठविण्यात आली. पण तोपर्यंत कबायली श्रीनगर च्या जवळ पोचले होते . २. कॉंग्रेस प्रादेशिक समित्यांनी पटेलांची निवड पंत प्रधान पदासाठी केली असताना , बहुमताला डावलून गांधींनी नेहरूंची निवड केली व सरदार पटेलांनी ती निमूट पणे स्वीकारली. तेच पटेल गांधीच्या संमती विना राजीनामा द्यायला तयार झाले असते का ? ३. संस्थानांच्या विलीनीकरणा बाबत अगदी सुरवातीला नेहरूंनी काश्मीरची केस स्वत:कडे राखून ठेवली. बाकी सर्व राज्यांचे विलीनीकरण पटेलांनी साम,दाम, दंड, भेद वापरून किती कुशल पणे केली हे सर्वाना माहित आहे. फक्त काश्मीरची बाब नेहरूंनी बिघडवली हे प्रत्यक्ष उदाहरणांनी पटण्यासारखे आहे. ४. नेहरूंनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी रेडिओवर केलेल्या भाषणात, पटेलांचा तीव्र विरोध असताना, काश्मीरमध्ये Plebiscite ला मान्यता दिली . ५ जवळपास ५०० संस्थानाने विलीन करण्याचे काम पटेल यांनी कौशल्याने आणि अल्पावधीत पूर्ण केले. या वरून काश्मीरचा प्रश्न पटेलांनी नेहरू पेक्षा पटेलांनी जास्त चांगला हाताळला असता आणि निकालात काढला असता असे माझे मत झाले आहे. क्लिंटन साहेबा सरख्या राजकारणाच्या गाढ्या अभ्यासकाला ते पटेल असा विश्वास मी व्यक्त करतो .

In reply to by रमेश आठवले

याविषयी मागे एका चर्चेत या प्रतिसादापासून नंतर लिहिलेल्या २-३ प्रतिसादांमध्ये सगळे मुद्दे मांडले आहेत. याउपर नवीन लिहिण्यासारखे काही नसल्यामुळे जुन्याच प्रतिसादाचा दुवा देत आहे.

In reply to by क्लिंटन

मी भाजप समर्थक आहे म्हणून काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टींना नावे ठेवायलाच पाहिजेत किंवा नेहरूंना प्रत्येक गोष्टीमध्ये शिव्या घालायलाच पाहिजेत असे मला तरी वाटत नाही. अनेकदा श्रेय द्यायची वेळ आली तर ते पटेलांचे आणि दोष द्यायची वेळ आली तर तो नेहरूंचा अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.
क्लिंटन भौ. याच्याशी १००% बाडीस. :) निम्मे जरी भाजपा समर्थक हा दृष्टीकोन स्वीकारायला तयार झाले तर आमच्यासारखे नोटा-मतदार तिकडे वळू शकतील ( आमच्या सातार्‍यात त्याचा शष्प फरक पडत नै तरी पण.. :)) एक मुद्दा निसटतोय तुमच्या ध्यानातून, तो म्हणजे तेव्हाचे भारत आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख हे ब्रिटीश होते आणि त्यांना दोन्ही देशाचे नवे प्रमुख "प्रथम आज्ञा" देऊ शकत नव्हते. ती खूप मोठी अडचण होती म्हणून तर पाकीस्तानने घुसखोर वगैरे वापरले (कारगील प्रमाणेच) आणि त्यांचे नंतरचे अत्याचार पाहून भारतास अधिकृत युद्ध सुरु करणे यासाठी गवर्नरास मान्यता द्यायला भाग पाडता आले (त्यावेळी पटेल व इतर मंत्रीपण हजर होते). काश्मीर प्रश्नी एकंदरीतपणे असे म्हणता येईल की सुरुवातीस अखिल भारतीय नेतृत्व परराष्ट्र धोरणात्मक चातुर्यात कमी पडले तर पाकिस्तानने सुरुवातीस ते चातुर्य देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तमपणे दाखवले. (इंग्रज नेहमीप्रमाणे "whats there for me in this" ह्या त्यांच्या नीतीने चालत राहिले असेच दिसते.)

In reply to by hitesh

बोसांची मते ही युद्ध्ह आक्रमण वगैरे कोंग्रेसच्या विचाराविरुद्ध होती. कुणी अध्यक्ष झाला म्हणुन संघटनेFCC ए मूळ विचारच बदलू शकतनाही. म्हणुन बोसांना काँग्रेस सोडावी लागली.
इतिहास तसं सांगत नाही. तसं असणं कितीही अडचणीचं असलं तरीही. उगीच एका राष्ट्रीय मानकावर माहीत नसताना आघात करू नका. १) आणि काँग्रेस संघटनेचा मूळ विचार तरी स्वराज्याबद्दल होता काय? विकीमधूनः The Congress was founded by Indian and British members of the Theosophical Society movement, most notably Scotsman, A.O. Hume. The Congress was founded in 1885, claiming that it had the objective of obtaining a greater share in government for educated Indians and to create a platform for civic and political dialogue of educated Indians with the British Raj. काँग्रेसचे विचार बदलत गेले होते आणि आहेत. तेव्हा 'मूळ विचार' वगैरे पोपटपंची सध्याच्या काँग्रेसच्या लोटांगणवाल्या कार्यकर्त्यांसमोर ठीक आहे. त्यात तसं ऐतिहासिक सत्य काही नाही. २) १९२३ मध्ये बोस यूथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९३८ मध्ये ते काँग्रेस प्रेसिडेंट झालेत. मधला काळ पण ते वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या कार्यात अ‍ॅक्टीव्ह होते (http://en.wikipedia.org/wiki/Subhas_Chandra_Bose#With_Indian_National_C…). अचानक कट केल्यासारखे ते प्रेसिडेंट झाले नाहीत आणि 'अचानक' त्यांनी राजीनामा पण दिलेला नाही. त्यांच्यासाठी जे घडलंय ते विचार पूर्वक. बोस हे आमचे हीरो आहेत. आणि राहतील. जसे भगतसिंग आहेत तसेच. तेव्हा उगीच त्यांच्याविषयी गरळ ओकू नका.
काँग्रेसच्या लोकानी जरी बोसाना निवडले होते तरी बोस वेगळे झाल्हावर त्यांच्यामागे कुणीही काँग्र्द्सवाले गेले नाहीत. बोसाना स्वतंत्र संघट्ना बांधावी लागली.
काँग्रेस एस काढायला हवी होती का त्यांनी? आणि मग निवडणुकीच्या काळात पुन्हा काँग्रेस बरोबर युती करायची? माफ करा, पण त्या वेळचे काँग्रेस नेते (आणि त्यांचे अनुयायी) वेश्यावृत्तीचे नव्हते.
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
बर मग?
सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले.
तर मग काय?
सनातनवाले संघवाले हे सांगत नाहीत. कारण त्यांच्या अल्पबुद्धीची इतकी कुवत नाही.
हे असलं फालतू गरळ माझ्या प्रतिसादाला ओकू नका. नाही तर प्रतिसाद नाही लिहिला तरी चालेल.

In reply to by काळा पहाड

बोस हे देशाचे हिरो आहेत. त्यांचे व काँग्रेसचे मार्ग भिन्न असल्याची परिणती त्यांच्या बाहेर पडण्यात झाली व इतर समविचारी लोक गोळा करुन त्यांनी स्वतंत्र संघटना बांधली. इतकेच मी लिहिले. सत्तेत सहभाग ते संपुर्ण स्वराज्य असा काँग्र्सचा टार्गेटबदल झाला तरी सशस्त्र युद्ध वगैरे मार्ग मुख्यत्वेकरुन आधीही नव्हता व नंतरही नव्हता. .............. अमुक तमुक यानी अमुक बाबांना देव मानु नये. तमुक धर्माच्या लोकाना मतदानाचा हक्क प्रदान करु नये. अमुकतमुक यानी प्रतिसाद लिहु नये...... भाजपे सरकारात आल्यापासुन कुणी काय करु नये हे सोमेगोमेही सांगू लागलेत नै.. त्यामुळे प्रतिसाद लिहावा का , कसा लिहावा याचे आमचे हक्क आम्ही आमच्याकडेच ठेवलेत . ते तुम्हाला दिलेले नाहीत.

In reply to by hitesh

ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ? हितेश भाऊ ! जर वरील प्रश्नावर पण उत्तर द्या की हो

In reply to by चिनार

का विचारताय चिनार भाऊ? राहुल गांधी सारख्या (स्त्री ) सक्षम नेतृत्वाने कार्यकर्त्यांना बोलायला तोंड ठेवलेच कुठे? Please let me answer your question about Mr Bose. cosider we bring RTI, we should focus on women empowerment, and we should look youth, My ancestors drop blood on the ground for nation bla bla bla...... sorry what is your question ?

In reply to by hitesh

आणि आमची पार्टी तुम्ही ठरवू नका ! जेवढं नरेंद्र मोदींना मानतो तेव्हढंच स्व. नरसिंह रावांना सुद्धा मानतो. प्रश्नाचं उत्तर द्या फक्त

In reply to by चिनार

त्यांना जमणारे का उत्तर द्यायला? नाही म्हणजे ते युवराजांच्या डायनामिक ट्रेनिंग दिलेल्या स्पेशल टास्क फोर्समधले वाटतात इथे मला अर्णब गोस्वामी आणि रा.गां.ची मुलाखत आणि त्यातली उत्तरं आठवली आणि ड्वॉळे पाणावले.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अग्ग बाबो !.. नका हो ते आठवू अर्णब बरेच दिवस त्या धक्क्यातून सावरला नव्हता म्हणे ! :-) :-)

In reply to by चिनार

आहे हो. गावागावात कॉन्ग्रेस्स आहे, नेहरु-गांधी परिवाराच्या पुढेही शिल्लक राहील. राहुल गांधी थोडे शहाणे होऊन परत आले तर बरे होईल. एक विरोधी पक्ष असावाच तगडा.

In reply to by खंडेराव

त्यांचा भारत फक्त फेसबुक , आयटी . मॉल , टोलनाका , मी गोडसेबोलतोय , गोहत्याबंदी , अयोध्या येवढ्यातच आहे.

In reply to by hitesh

हितेश भाऊ ...बरोबर ! फेसबुक , आयटी . मॉल -- ही सगळी प्रगती कोन्ग्रेस च्या राजवटीतचं तर झाली ! लोकसभा निवडणुकीच्या वेळेची जाहिरात आठवली (हर हात शक्ती ...हर हात प्रगती !) :-) :-) बरं ते प्रश्नाच उत्तर पोष्टानी पाठवताय का ? नाही...पत्ता व्यनी करतो तसं असेल तर

In reply to by hitesh

कॉंग्रेस चा आधुनिक भारत काय १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यावर १९४८ ला एका वर्षात आभाळातून पडला काय? आणि चल तुमचे म्हणणे चूक असले तरी खरे माणू २ सेकंदासाठी. याच्या भारतात निदान एवढेतरी आहे जे सोशल आहे सामान्य जनतेचे आहे … तुमच्या भारतात साखर सम्राट, शिक्षण सम्राट, हवाला सम्राट, बोफोर्स सम्राट आणि घोटाळा सम्राट सोडून काय होते ते तरी सांगा. (चारा सम्राट विसरलो ).

In reply to by कहर

एक यादी करा, या सर्व सम्राटांची. बघा एखादा पक्ष सुटतो का. हो, आणि मप्र, कर्नाटक या राज्यात भाजप च्या कारकिर्दीत काय कमी घोळ झालेत का? सम्राट आणि घोटाळे हे काय डिफ्फरनटिएटर नाहीत.

In reply to by खंडेराव

अहो ते घोटाळे कॉंग्रेसच्या राज्यात भाजपाच्या लोकांनी केले म्हणून जास्त उचलले गेले…. खरे खोटे त्यांचे त्यांना माहित… पण मी ज्या घोटाळ्यांचे बोललो ते कॉंग्रेसच्याच राज्यात कॉंग्रेसच्याच लोकांनी केले… म्हणजे दाबून टाकायचा प्रयत्न होऊनही एवढे वर दिसतायत तर हिमनगाचा फक्त १/७ भाग वर दिसतो तसे अजून खाली किती गहन असतील काय माहित

In reply to by कहर

अहो ते घोटाळे कॉंग्रेसच्या राज्यात भाजपाच्या लोकांनी केले म्हणून जास्त उचलले गेले
समजुन सांगा जरा. कॉंग्रेसचे राज्य? बंगारु लक्ष्मण आठवतात का?

In reply to by खंडेराव

कायी झाल की बंगारुच ;) पण त्येंच प्रकरण लैच छोत्तुस होत वाटते. आपली कॉंग्रेसी लोकांची प्रकरणांची लिष्ट काढली त काय पैल्या पाचात तरी येईल का नी माहिती नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

किती वर्स सत्ता होती कॉंग्रेस ची? हिशोब कसला करताय? जेवढे घोळ कॉंग्रेसने ३०-४०-५० वर्षात घातले तेवढे बिजेपी ने ५-७ वर्षात घालायची अपेक्शा होती कि काय तुमची :-) ? मी आधीही लिहिले आहे, भ्रष्टाचार हा डिफरनटिअटर नसावा या दोघांमध्ये

In reply to by खंडेराव

खंडेराव ! खेड्यापाड्यात कोन्ग्रेस म्हणजे इंदिरामायची कंपनी अशीच ओळख आजही आहे. सोनिया गांधीला ते लोकं इंदिरामायची ववळि (ववळि म्हणजे ग्रामीण भाषेत सून!) असंच ओळखतात . आधार कार्ड योजना जेंव्हा सुरु झाली तेंव्हा पहिले आधार कार्ड नंदुरबार जिल्ह्यातील एका खेडेगावातल्या महिलेला सोनिया गांधींच्या हस्ते देण्यात आले. त्याच गावातल्या लोकांना सोनिया गांधींची ही ओळख आहे .

In reply to by चिनार

अहो, गेल्या साठ वर्षात जे काय भले बुरे झाले, त्यात हाताचा हात होताच. खेड्यात लोक वेडे असतात, आणि इंदिरामायच्या नावावर सत्ता येत राहीली, असे समजने पुर्ण चुकीचे आहे. तळागाळापर्यंत सत्ता पोहोचली ६० वर्षात. १९४० च्या दशकात किती देशांना स्वातंत्र मिळाले? आज ते कुठे आहेत? तुलना बघावी. एक येवढा अवाढ्व्य देश, विविधतेने भरलेला, चालवणे, हे काय कमी नाही. काय आहेना, चु़कींबद्दल अवश्य टोकावे,सत्ता काढुन घ्यावी, पण सतत कॉन्ग्रेसला शिव्या देणे बरोबर नाही.