✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माय चॉईस

प
पॉइंट ब्लँक यांनी
Tue, 04/07/2015 - 00:37  ·  लेख
लेख
दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती. अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी. चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे. हे सर्व आंतर्जालावरू साभार. सर्वात आधी दिपिकाचा विडियो dipika original हा विडियो आल्या आल्या प्रेशर कुकर मधून वाफ सुटावी तसा सोशियम मेडियावर महिलांच्या भावनांना उत आला. काही पुरूष मंडळींनी फ्रेंड्लिस्टमधल्या मैत्रिनींना इंप्रेस करण्यासाठी तर काहींनी बायकोच्या लाटण्याला घाबरून नाईलाजाने त्याला पाठींबा दिला. पण जगात अजून काही स्वतंत्र मत असलेल्या पुरूषांनी त्याला उत्तर द्यायचे ठरवले आणि हा विडियो आला male one तर काही मजदूर युनियन मंडीळींनी वाहत्या गंगेत असा हात धुवून घेतला maid आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला dog version असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23354 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

I thought Polygamy is state

जूलिया
Wed, 04/08/2015 - 17:06 नवीन
I thought Polygamy is state of having more than one sexual relations at the same time. No one is saying about having a choice of saying 'NO to Sex' which I have stated very clearly. I rest my case; as people want to think about one factor only......... From the next time I will type in Marathi.
  • Log in or register to post comments

अहो ताई जर तिला No to Sex

कहर
Wed, 04/08/2015 - 17:43 नवीन
अहो ताई जर तिला No to Sex म्हणायचे असते तर या तीन शब्दात सरळ म्हणता नसते का आले ? लग्नबाह्य संबंध 'My Choice' असे फिरवून म्हणायची काय गरज? ज्यांच्यासाठी हे म्हणले गेले त्यांना तरी समजेल असे बोलावे. हे म्हणजे असे झाले… आमचा गण्या मुलीला म्हणला "लवशिप घेणार काय ?" तर ती म्हणली "माझ्याकडे option आहे ?" तर गण्या म्हनला "कवातरी मलापण try करकि मग." आता सांगा गण्याच काय चुकले? सरळ "नाही" म्हणली असती तर विषय संपला असता ना ? का तिला दीपिका बाई सारखे सगळे option 'खुले' ठेवायचे होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया

कैच्या कै !!!

नाखु
Wed, 04/08/2015 - 18:02 नवीन
The same thing for marriage; whenever girls don't get married beyond 30; society start discussing about it........It's none of anyone's business...........
चवितचर्वण किंवा बाजारगप्पा करायला असा लिंगभेद्,विवाहीत-अविवाहीत असा आप्परभाव भेदाभेद केला जात नाही कशावरही चार घटका फुक्क्क्क्क्क्क्क्क्क्ट करमणूक म्हणून हे सत्कार्य पार पाडले जाते तेही (स्त्री-पुरूष) दोन्हींकडून सम्-समान. गेला बाजार अश्या विधानानंतर बोलके पोपट्/मैना पहा जरा न्युज चॅनेलवर,आप्सूक ज्ञानसंवर्धन होईल. "वाढदिवस शुभेच्छा" पेज ३ ला नालायक नाखु
  • Log in or register to post comments

दोन गोष्टी

संदीप डांगे
Wed, 04/08/2015 - 19:07 नवीन
१. माय चॉईस ह्या नावाच्या गर्बनिरोद्क गोळ्या हायेत. २. विंग्रजीचा पराबलेम असल्यानं तो हिडो श्याम्पूची याड हाय असं वाटतं. ह्या दोघाईचा काय संबंद लागत नाई म्हनून तं पब्लिक चिल्लावून रायलं काय बे गन्या?
  • Log in or register to post comments

तसा हा विडीओ काही खास नाही,

बाहुली
गुरुवार, 04/09/2015 - 12:26 नवीन
तसा हा विडीओ काही खास नाही, काही नविन सान्गितले नाही. पण लग्नानतर कोणीहि शोधेन .. आणि हा माझा चॉईस या वाक्यांमूळे सगळा वादविवाद .... बाकी मतितार्थ की मी माझे निर्णय घ्यायला समर्थ आहे... पण या विडीओ मधे निर्णया नन्तर त्याची जबाबदारी पण माझी हे सान्गायला विसरले बहुतेक....
  • Log in or register to post comments

एएरए इप

स्पंदना
गुरुवार, 04/09/2015 - 12:44 नवीन
नुसत्या विवाहाचा, नुसत्या प्रेमाचा एव्हढ्याचीच का चर्चा लावलीय? ती त्यात माझ शरीर मला हवं तस वापरेन. मला हवे ते कपडे घालेन असही म्हणते आहे. हवे ते कपदे घालेन जेंव्हा माझा आत्मा उघडा असेल. अर्थात दिपीका ऐवजी हे स्क्रिप्ट लिहीणार्‍याच डोक तपासल पाहिजे अस माझ स्पष्ट मत!
  • Log in or register to post comments

काय चालल आहे ????

जेपी
गुरुवार, 04/09/2015 - 13:15 नवीन
काय चालल आहे ????
  • Log in or register to post comments

काही नाही

नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 14:30 नवीन
लोक चॉइस वर व्हॉइस उठवतायत अग्दी नाईस प्रतिसाद देऊन्,तुम्ही घ्या आईस नुस्ता किंवा सरबत टाकून ! ==== न्युलीया भेळ्पुरीकर You no I can Talk English,I can walk English. Beacasue Englsih is very funny Language.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

दीपिकाला तिच्या मनाप्रमाणे

पूर्वाविवेक
Sat, 04/11/2015 - 15:27 नवीन
दीपिकाला तिच्या मनाप्रमाणे वागायचं असेल तर काही चुकीच नाही. मला पण असच वाटत कि जर लग्न न करता स्वतंत्र राहून sexually active राहायचं असेल, तर ती तिचा choice आहे. नाही तरी हल्ली "लिव्ह ईन रिलेशनशिप" ला कायद्याने परवानगी मिळालीच आहे. पण लग्न झाल्यावर सगळ चांगल असताना केवळ स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणे, मला अजिबात मान्य नाही. स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य अस का वाटत ? पुरुष अस करतात म्हणून आपण पण असेच कराव अस का वाटत. शिक्षण, कपडे, लग्न, जोडीदार, मानवी हक्क याबाबत स्वातंत्र्य हव. माझा नवरा माझ्याशी एकनिष्ठ आहे. माझ्या सगळ्या गरजा अगदी शारीरिक गरज पण तो पूर्ण करतो. आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या घरात सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडतात. तरीपण मग मी स्वातंत्र्य हव म्हणून व्यभिचार करायचा का? आणि सगळे पुरुष तरी कुठ व्यभिचार करतात? जे पुरुष व्यभिचार करत असतील, बायकोला मारझोड करत असतील, तिच्या मानवी हक्काची पायमल्ली करत असतील तर तिने बंड करायला हव. नवरा तिला शारीरिक सुख देत नाही, म्हणून ती स्त्री दुसऱ्याकडून ते सुख मिळवू पाहत असेल पण त्याचे परिणाम, धोके लक्ष्यात घ्यायला हवेत. स्त्रीलाच नाही तर पुरुषानाही व्यभिचाराचे परिणाम भोगावे लागतातच. लग्न झाल कि आपण आपल्या जोडीदाराशी विश्वासाने बांधले जातो. लग्न म्हणजे त्याग, तडजोड आहे. कृपया महिलांनी गळा काढू नये कि आम्हीच तडजोड करतो, पुरुष पण करतात. सगळेच पुरुष वाइट नसतात आणि सगळ्याच बायका शोषित नसतात . पण दीपिका सारखे स्वातंत्र्य हव तर मग लग्नच करू नका. मग कुणालाही फसवण्याचा प्रश्नच नाही. दीपिकाची "choice " १००% सगळ्यांना लागू होऊ शकत नाही. मी तर अस फेसबुकवर कुठेतरी वाचल कि "'माय चॉईस ही शॉर्ट फिल्म मुळात दिपिका पडुकोणची वैयक्तिक फिल्म नाही. जिंदाल स्टील या बड्या उद्योगसमूहातर्फे ही तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचा दिग्दर्शक होमी अडाजनीया आहे. तसंच यातली सगळी अवतरणं केर्सी खंबाटाने लिहिलेली आहेत. शिवाय यात दिपिकासह एकूण नव्व्याण्णव स्त्रियांनी भूमिका वठवलेली आहे. " म्हणजे काय हि दीपिकाने सामजिक प्रबोधनासाठी बनवली नाही. सगळ्या सोशल मिडिया वर आपल्या सारख्या लोकांनी चर्चा-सत्र झोडली. पण तिने त्यातून अफाट लोकप्रियता मिळवली. आणि हीच सवंग लोकप्रियता तिला पुढे उपयोगी पडेल. म्हणजे काय आपण सगळे पोपट झालो. :)
  • Log in or register to post comments

पुरुष अस करतात म्हणून आपण पण

बॅटमॅन
गुरुवार, 04/09/2015 - 16:23 नवीन
पुरुष अस करतात म्हणून आपण पण असेच कराव अस का वाटत.
या फॅशनेबल वाक्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

बॅट्या

नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 16:30 नवीन
माझा गोंधळ करू नकोस !!! तू स्त्री-मुक्तीवादी की मुक्त-स्त्री वादी का आणखी काही मुक्ती-वादी ??? बेंबट्या. गोंधळगल्ली पंताचा गोट्जवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्ही मुद्दावादी.

बॅटमॅन
गुरुवार, 04/09/2015 - 16:51 नवीन
आम्ही मुद्दावादी. बाकी काही नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मग

नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 17:09 नवीन
तुझं हटवादींबरोबर कधीही जमणार नाही !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१००

संदीप डांगे
गुरुवार, 04/09/2015 - 18:15 नवीन
काही त्याहीपुढचे म्हणजे मुद्दा-म हटवादी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तरीच

नाखु
Fri, 04/10/2015 - 08:37 नवीन
तो मुक्त-मुद्दा वादींशी तुफानी चर्चा करतो !!!!! ज्यांच्या चर्चा कुठल्याही ठोस मुद्द्यांपासून कायम मुक्त असतात असे थोर्र् अग्रणी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पंताचा गोट्जवळ

हाडक्या
गुरुवार, 04/09/2015 - 18:20 नवीन
पंताचा गोट्जवळ
ह्या ह्या ह्या ... :)))) शाळकरी विनोद आठवला.. अजूनही तितकाच हसवतोय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

व्यनि करणे... =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/09/2015 - 18:22 नवीन
व्यनि करणे... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

+१००

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 04/09/2015 - 16:33 नवीन
अगदी बरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>> पुरुष अस करतात म्हणून आपण

सूड
गुरुवार, 04/09/2015 - 16:35 नवीन
>> पुरुष अस करतात म्हणून आपण पण असेच कराव अस का वाटत.
असं म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे सांगता का? म्हणजे प्रतिसाद द्यायला बरं पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

असं कसं, असं कसं ?

सस्नेह
गुरुवार, 04/09/2015 - 16:51 नवीन
असं कसं, असं कसं ? बाकी कुणी मागितलाय का तपशील ? देताहेत ना प्रतिसाद ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आत्ता कुठे काडी पेटत होती,

सूड
गुरुवार, 04/09/2015 - 17:12 नवीन
आत्ता कुठे काडी पेटत होती, काय तुम्ही पण !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

म्हणजे पुरुषांनी असं केल,

पूर्वाविवेक
गुरुवार, 04/09/2015 - 17:09 नवीन
म्हणजे पुरुषांनी असं केल, म्हणून मी असच करणार........अस स्त्री-मुक्तीच्या खुळचट कल्पना असलेल्या स्त्रियांना का वाटत ? त्यातून कुठला सूडाचा आनंद मिळतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खरी गम्मत वेगळीच आहे !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/09/2015 - 17:19 नवीन
खरी गम्मत वेगळीच आहे ! "कोणी हे केलं म्ह्णून मीपण तेच करणार." हे वाक्यच मुळात व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध आहे... ते प्रतिक्रियावादी आहे. "मला काय पाहिजे ते मी करणार" यात माय चॉइस असू शकतो, पण... त्याऐवजी "दुसरा काय करतो तेच मी करणार" असे म्हणणे म्हणजे "माझी कृती दुसर्‍याच्या कृतीवर अवलंबून आहे" हे कबूल करणे नाही काय ?! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

एक्दम अचूक

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 04/09/2015 - 22:35 नवीन
१००% सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(प्रतिसाद देण्याचा मोह आवरला

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/09/2015 - 18:32 नवीन
(प्रतिसाद देण्याचा मोह आवरला आहे ... )
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/16/2015 - 12:45 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा