मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्याही काही रेषा!

शब्दबम्बाळ · · मिपा कलादालन
लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसल्यामुळे जसे जमेल तसे चितारण्याचा प्रयत्न करतो. त्यातही रंगांशी फारसा संबंध नाही, पेन्सिल स्केचिंग थोडेफार जमते. त्यातलीच काही चित्र इथे अपलोड करतोय. ज्यांच्यामुळे चित्र काढायला लागलो त्यात goku साहेबांचा वरचा नंबर आहे! (अजूनही dragonball z पाहत असतो कधीतरी!:)) Goku goku1 dragonball z मुळे Manga आणि chibi या प्रकारांशी ओळख झाली आणि हळूहळू चित्रे जरा जमू लागली. girl boy assassin या शिवाय चार चाकी गाड्यांचे आकर्षण होतेच त्यामुळे त्यांच्यावरही हात साफ करून घेतला! audi porsche काही किडे! ;) tide आणि ३D स्केचिंग… 3D काही दिवसांनी, मित्रांकडून खूप टोमणे खाल्ल्यानंतर वहीच्या पानांवर चित्र काढण्याऐवजी एक चित्रकलेची वही खरेदी केली! :) त्यात चित्र काढायला आता सुरुवात केली आहे. लवकरच तीही अपलोड करेन. इथे चित्रकलेचे जाणकार लोक असल्याने त्यांच्या सल्ल्यांमुळे नक्कीच माझी चित्रकला सुधारण्यास मदत होईल!

वाचने 3030 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by पॉइंट ब्लँक

शब्दबम्बाळ Wed, 04/08/2015 - 18:01
शेडींगमध्ये मार खातो नेहमीच… अनेक व्यक्तिचित्रे त्या शेडींग च्या पायात खराब झाली आहेत! सुधारण्यासाठी काय करता येईल?

मुक्त विहारि Wed, 04/08/2015 - 06:24
झक्कास.... आम्हाला ही कला अजिबात जमत नाही.त्यामुळे ह्या अशा कला अवगत असणार्‍या व्यक्तींविषयी आम्हाला नितांत आदर आहे.

In reply to by मुक्त विहारि

नाखु Wed, 04/08/2015 - 08:53
तीव्र सहमती. आम्ही चितारलेल्या हत्तीलाही बर्याचदा हत्ती सोडून इतर प्राणीनावाने संबोधले जाते त्याची नम्र जाणीव आहे.

चित्रकला येणार्‍या लोकांचा मनापासुन हेवा वाटतो. एक रुक्ष इंजिनिअरिंग ड्रॉईंग आणि निसर्गचित्र सोडलं तर काहीही काढता येत नाही. घोडा काढायला सुरुवात केला की त्याचं अत्यंत कुरुप माकड किंवा डुक्कर होतं असा अनुभव आहे. शाळेमधे वर्षाला एक ह्या रेटनी किमान ५ ते १० वी ही सहा वर्ष, "बाबा तु चित्र नाही काढलस परिक्षेत तरी चालेल पास करतो" असा सल्ला नेमानी दिलेला आहे =))

हर्शरन्ग Wed, 04/08/2015 - 22:07
चित्रे चांगली जमताहेत … सराव चालू राहूदे :) ३d चित्र छान आहे. एक सांगावस वाटत - चित्रांचे फोटो तिरके किवा थोडे बाजूने काढण्यापेक्षासमोरून काढलेत तर आम्हाला सुद्धा ते व्यवस्थित दिसतील.