Skip to main content

असह्य हा उकाडा...

लेखक बाप्पू यांनी बुधवार, 25/03/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न - १ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? २ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ? ३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल ६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?

वाचने 41219
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्व मिपाकरांचे याचर्चेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.विशेषतः सुबोध खरे यांचे आभार. सिम्फनी चा कूलर घेतला ३ दिवसांपूर्वी. ए सी घेण्याचा निर्णय रद्द करावा लागला . कारण वर्षातील फक्त २-३ महिन्यांचा प्रश असल्याने ३० ते ३५ हजार ची इन्वेस्टमेंट आणि पुन्हा लाईट बिलापोटी महिन्यचे २-३००० अधिकचे रुपये मोजणे आर्थिकदृष्ट्या थोडे अवघड वाटते. तसेच आता घराला एक नवी खिडकी तयार करून घेतली. त्यामुळे आता हवेचा संचार आता बर्यापैकी सुरु झाला आहे. कूलर वापरतान मी त्यामध्ये साधे पाणी घालण्या ऐवजी फ्रीज मधील थंड पाणी घालतो तसेच त्याची मागची बाजू खडकी कडे ठेवून त्याला नवीन हवा मिळत राहील अशी सोय केली. कूलर ची हवा सरळ सरळ अंगावर घेण्याऐवजीत त्याला अश्या रीतीने सेट केले आहे कि तिची हवा पहिल्यांदा छताला टेकेल आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन अंगावर येईल. अगदी नाही पण जवळपास ९० टक्के ए सी ची हवा असल्यासारखे वाटतेय

In reply to by कपिलमुनी

simphony Diet 22 i. २२ लिटर चा आहे. . जवळपास ८ तास चालतो.

शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु आणी श्री.सुबोध खरे यांचा सत्कार एक एक वाळ्याचा पंखा* आणी लिंबु सरबत* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम उष्ण मंडळ कार्यकर्ते. *अटी लागु

In reply to by ब़जरबट्टू

आता चर्चा मी सुरु केली आहे.. त्यामुळे मला इथे माझी उपस्थिती दाखवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हीच म्हणाल " कि नुसता धागा सुरु करून बाप्पू कुठे पळाले ??? बाय द वे - वाळ्याचा पंखा म्हणजे काय :)

डेझर्ट कुलरचं नाव पण नाही निघालं अजून.... इथे काय फक्त पुणेकर आणि मुंबईकरच आहेत का? नागपूरकर जवळजवळ नाहितच ?

In reply to by असंका

धागाकर्ते पुण्यात राहत असल्याने कुणी डेझर्ट कूलरबाबत सुचवलं नसावं. डेझर्ट कूलर चा हा फटू जालावरून साभार. माझ्या काकांच्या घरी होता. मागच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर ठेवला असायचा. घरातली खोल्यांची दारे बंद केली तरी समोरच्या खोलीपर्यंत दारांच्या खालच्या फटीतून थंड हवेचा झोत पायांना जाणवत असे. डेझर्ट कूलर

In reply to by श्रीरंग_जोशी

विदर्भात, त्यातल्या त्यात, गावांमधे उन्हाळ्यात ह्या धुडाला पर्याय नाही. एका कुलरमध्ये, घराबाहेर उघडणारी दारं-खिडक्या बंद केल्यास ३-४ खोल्या गार होतात. दुपारी आमरस/पन्हं कुरड्यांसोबत चापून, हा कुलर लाऊन ताणून द्यायची.. बाहेरुन रणगाडा गेला तरी आवाज ऐकू येणार नाही.. ;-) फ्रिज नसण्याच्या काळात, कुलरच्या वरच्या ट्रेमध्ये बर्‍याच गोष्टी थंड राहण्यासाठी ठेवल्या जायच्या, हा त्याचा अ‍ॅडेड अ‍ॅड्व्हान्टेज..

आमच्या घरात वायूवीजन व्यवस्थीत होत नव्ह्ते, सोसायटीच्या रचनेमुळे घरात मोठे बदल करण्यास मर्यादा होत्या. त्यामुळे आम्ही हॉलच्या स्लायडिंग विंडोला १०" बाय ३' चे तीन झरोके केले (काचेच्या शटर्सची उंची कमी करून) व त्यास उघडझाप करण्यासाठी लूवर्स लावले. लगतच्याभींतीबहेर 'C.' आकाराची मोकळी जागा होती, तेथे सतत सावली असल्यामुळे ती भिंत थंड असे. त्या भिंतीला १ फूट व्यासाचे होल पाडून त्यावर त्याच व्यासाचा टू वे एक्झॉस्ट फॅन (दोन्ही बाजूस फिरण्याची सोय) लावला. बेडरूमला बाथरूमच्या खिडकीच्या मापाची एक खिडकी काढली व लूवर्स लावले. दिवसा घरातील गरम हवा एक्झॉस्ट फॅनने बाहेर फेकल्याने घरात थंडावा येतो. रात्री एक्झॉस्ट फॅन उलटा फिरवल्याने बाहेरची थंड हवा घरात खेळवली जाते. ठाण्यात असूनही आर्द्रतेचा त्रास होत नाही. मच्छरांच्या अटकावासाठी एक्झॉस्ट फॅन व लूवर्सला जाळ्या लावल्या. सूचना- एक्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी (घरातील हवा बाहेर फेकण्यासाठी) बेडरूमचा दरवाज्या अर्धवट बंद असेल तर पुर्ण बंद करावा घरातील हवा खेचली गेल्यामुळे दरवाजा ओढला जावून एखाद्याची बोटे दरवाज्यात सापडली जावू शकतात.

In reply to by मार्मिक गोडसे

क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी (घरातील हवा बाहेर फेकण्यासाठी) बेडरूमचा दरवाज्या अर्धवट बंद असेल तर पुर्ण बंद करावा घरातील हवा खेचली गेल्यामुळे दरवाजा ओढला जावून एखाद्याची बोटे दरवाज्यात सापडली जावू शकतात.
एक्झॉस्ट फॅन आहे का जेट इंजिन?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाहाहा! एक्झॉस्ट फॅनच आहे. हे असे घडण्याची शक्याता फॅनचा आकार( घरातील अंदाजे एक फूट व्यास) व त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे व त्याच वेळेस घराच्या सर्व खिडक्या व बाथरूमचे दरवाजे बंद असल्यास फक्त बेडरूमचे लूवर्स पुर्ण उघडे व दरवाज्या अर्धवट बंद असल्यास हे घडू शकते.

In reply to by मार्मिक गोडसे

टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो? सर्व साधारण विजेच्या दुकानात मिळतो का? आमच्या स्वयंपाक घरातील बिघडला आहे. मुलुंड ठाण्यात दुकानाचे नाव सांगा.

In reply to by सुबोध खरे

टु वे एक्झॉस्ट फॅन एक कनेक्शन उलटं करुन बनवता येतो. :) त्याला क्लॉकवाईज आणि काउंटरक्लॉकवाईजच्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील.

In reply to by सुबोध खरे

टू वे एक्झॉस्ट फॅन ठाण्यात प्रभातच्या गल्लीत मिळेल. मुलुंडची कल्पना नाही. मुंबईत लोहार चाळीत मिळतात. युनिक कंपनिचा थोडा महाग परंतू टिकाऊ व दर्जेदार असतो. जितक्या व्यासाचा फॅन तितक्याच व्यासाचे भिंतीला होल असावे व तेही गोलाकार. चौकोनी होल असल्यास एक्झॉस्ट फॅन त्याच्या पुर्ण क्षमतेने काम करत नाही. किचनचे एक्झॉस्ट फॅन बर्‍याचदा विंडोच्या चौकोनी फ्रेममध्ये बसवलेले असतात अशावेळी प्लायवूडला एक्झॉस्ट फॅनच्या मापाइतके गोल होल पाडून त्यावर एक्झॉस्ट फॅन फीट केला तरी चालते. टू वे एक्झॉस्ट फॅनला इनबिल्ट टू वे स्विच असते एक्स्ट्रा लावावे लागत नाही. फक्त फॅनच्या पात्यांची दिशा बदलताना एक्झॉस्ट फॅन बंद करण्यासाठी ऑन ऑफचे स्विच लावावे लागते.

आपण जर हे स्वतःच्या कल्पनेने केले असेल तर तुमचे अभिनंदन! मलाही आमच्यकडील एका खोलीचे वायूवीजन व्यवस्थित करायचे आहे. आपणांस व्यनी करू का?

In reply to by मार्मिक गोडसे

तिरडीवर आडवे व्हायचे वय झालयं,खिडकीवर आडवे व्हायला काय सांगताय?

In reply to by सस्नेह

ओ तै...तो काय वय विचारणार नौता कै....तो ओळखीची समवयीन मुलगी आहे का ते विचारणार होता. ;) तेवढचं एक पुण्ण्ण्ण्याचं काम =))

'मार्मिक' उपाय सांगितल्या बद्दल.

ज्यांना घराचं वायुविजन करायचं आहे अश्या सर्व मंडळींसाठी एक सल्ला. पुश आणि पुल सेटअप करायचा प्रयत्न करा. पुश अँड पुल सेटअप म्हणजे एका एक्झॉस्ट पंख्याने हवा आत ओढायची तर दुसर्‍या एक्झॉस्ट पंख्याने हवा खोलीबाहेर फेकायची. हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो. शिवाय वर श्रीरंग जोशींनी दिलेल्या डेझर्ट कुलरचा वापर करायलाही हरकत नाही पुण्यामधे. पण त्याचा आवाज मोठा असतो असा अनुभव आहे.

कूलर पेक्षा एसी नक्कीच बरा... विंडो पेक्षा हि स्प्लिट चांगला..

शतक पुर्ण केल्याबद्दल गार पाण्याचा माठ देउन सत्कार करणेत येत आहे. --आखिल भारतिय मिपा चालू होण्याची वाट पहणारे मंडळ

In reply to by कपिलमुनी

पूर्वी माईसाहेब आणि नानासाहेबांच्या काळात महाब़ळेश्वरला अशा रिक्षा असायच्या. आपल्या वयाचे आहेत का ते? :-)

In reply to by श्रीरंग_जोशी

आपल्या वयाचे आहेत का ते?
खरंच की!! माई म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा दीड दिवस लहान आणि नाना माईंपेक्षा अगदी दोन घटका मोठे... असं असतानाही एकेरी उल्लेख करतात म्हणजे हद्द झाली. द्रौपदीच्या लग्नात माईच गेल्या होत्या करवली म्हणून!! ;)

In reply to by सूड

मी तर ऐकलय की ब्रम्हदेवाच्या मुंजीत नाना-माईंचं मेहुण जेवलेलं म्हणुन. खरं खोटं नाना जाणोत.

In reply to by सूड

अन सीताहरणाच्या वेळी सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं...

In reply to by श्रीरंग_जोशी

अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं... यात स्वतःचा असा शब्द टंकायला विसरलात काय ?? बाकी एकेरी उल्लेखाबद्दल तीव्र निशेध?

In reply to by श्रीरंग_जोशी

त्याचं काये, द्रौपदीच्या नातीच्या मोठ्या मुलीच्या नातीच्या मुलीच्या लग्नात पंगतीत जेवताना माई त्यांच्या तत्कालीन मैत्रिणीला सांगत होत्या, "अगो, हरिण पाह्यला आणि आमचे 'हे' गेले हुशारी दाखवायला, म्हटलं नेहमीसारखे माती खातील आता परत; म्हणून मग मीच लक्ष्मणाला पिन मारुन पाठवला. नाहीतर "ह्यांचं" हसं झालं असतं, नेहमीसारखंच!! मनचं का सांगत्ये मी!!"

In reply to by सूड

आता एवढे नाट्य झाल्यावर एक गीत अन संधीसाधू नृत्य पण हवे... हात लावणार मुंगाला, पिन मारली लक्ष्मणाला... टन टन टन...

In reply to by श्रीरंग_जोशी

@सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं... >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif ह्याचाच वचपा काढायला नंतर नानांनी आयोध्येत बाजारपेठेत सुवर्णमृगकांचन छाप चोळी वस्त्रभांडार नावाचं दुकान चालवलं...असं उर्मिला बिभिषण भावजींच्या बायडीला सांगत होती.. असे म्हणतात! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगा, मी सध्या मिपा मिपा खेळण्याऐवजी गावाला जास्त दिवस होते, त्यामुळे सगळे धागे आणि प्रतिक्रिया वाचल्या नव्हत्या! तरी म्हटलं हा धागा कोणाला आठवला नव्हता का!

In reply to by पैसा

गावाकडे राहून पुण्यातल्या उकाड्याची झळ लागली नसणार :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

काजुच्या बागेत उन लागत नै असं ऐकुन आहे ;)... (ओल्या काजु उसळीचा प्रेमी) कॅजॅस्पॅ (रेसिपी टाका राव कोणीतरी)

२००. धाग्याचे २०० झाल्याबद्दलं बाप्पु आणि सर्व प्रतिसादकर्त्यांना डर्मी कुलचे १०० ग्रॅमचे डबे, एक एक पेप्सीकोला आणि ओरिगामीचा पंखा देउन सत्कार करणेत येतं आहे. (अखिल मिपा मापंकाढे समिती तसेचं धागाहितवर्धिनी संघ ह्यांच्या संयुक्त वर्गणीमधुन) *वरचे उपाय ऐकुनही उकाड्याचा त्रास होत असेल तर व्यनि करावा, खात्रीशिर विलाज केला जाईल* (कुलर्हित)

बाप्पूंनी काय केलं म्हैत नै, पण मी परवा दीड टनाचा Lloyd चा एसी घेतला. प्रतिक्रियांसाठी डॉ. खरेंना धन्यवाद!

In reply to by पैसा

पैसा ताई स्प्लिट ए सी घेतला हे उत्तम आता विजेचे बिल वाचवायला एक साधा उपाय करा ए सी बरोबर छताचा पंख १ वर लावा म्हणजे थंड हवेच्या झुळूकीचा अनुभव येतो आणि ए सी चे तापमान २७ " सेल्सियस ठेवले तरी चालते. (विंड चिल इफेक्ट http://en.wikipedia.org/wiki/Wind_chill ) http://www.hko.gov.hk/education/edu01met/wxphe/ele_windchill_e.htm ए सी चे तापमान जितके कमी ठेवाल तितके विजेचे बिल जास्त येते.(पहा न्यूटन चा थंडाव्याचा नियम) दर महिन्याला ए सी चा फिल्टर एकदा साफ करा. सहा महिन्यांनी बाहेरच्या पंख्याच्या जाळीची पाणी मारून सफाई करा. आपला ए सी वर्षानुवर्षे कमी वीज खाऊन आपल्याला थंडावा देत राहील. माझ्या घरी २ एसी दिवसात ८ तास चालवून आजतागायत विजेचे बिल ४००० च्या वर गेलेले नाही.

In reply to by सुबोध खरे

हे पॉइंट्स लक्षात ठेवीन. आणि वापरेन. गेल्या २ दिवसांत मुलंच काय आमचा बोका सुद्धा बेडरूममधून बाहेर यायला तयार नाही. :D

In reply to by पैसा

Lloyd चा AC घ्यायचा विचार सुरु आहे. पैसाताई तुमचा आता पर्यंत चा Lloyd बद्दल अनुभव कसा आहे?

पैसा ताई दीड टनाचा lloyd ए सी घेतल्याबद्दल आपले "दीडवार " अभिनंदन …! पण एक सांगा "बोका" म्हणजे मुलांच्या पपांचे nickname उर्फ कोडवर्ड तर नाही ना ? h

In reply to by रॉजरमूर

खर्‍या बोक्यासाठी एसी लावून ठेवीन. पण मुलांच्या बाबाला तिथून बाहेर काढण्यासाठी निर्दयपणे एसी बंद करण्यात येईल. =)) =))