Skip to main content

लेह लदाख मोटरसायकल फेरी - फोटो

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 31/03/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या ऑगस्ट मधे मी, बायको, मित्र, त्याची बायको अशा चार लोकांनी स्वतः प्लॅन करुन जम्मु- ष्रीनगर-द्रास-कारगिल-लामायुरु-लेह-नुब्रा-पॅन्गाँग-सर्चु-मनाली-चंदीगड अशी ३०००+ किमीची फेरी केली. आमच्या गाड्या अफाट होत्या. एक ११० सिसी सुझुकी हयाते आणि एक १३ वर्ष जुनी पल्सर १५०. ११० सिसी वर दोन माणसे ( एक १०० किलो - मी ), १५ दिवसाचे सामान घेउन ही फेरी करणारे बहुधा आम्ही भारतातले पहिलेच. वेगळाच अनुभव..स्वत:ला नव्याने ओळखले. काही फोटो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

वाचने 12722
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

कोणी असेल तर बेश्ट, नसेल तर अगदी २-४ जण, किवा एकट्यानेही करा..सॉलिड अनुभव. १५ दिवसात मन भरले नाही, परत जाईल लवकरच.

In reply to by टवाळ कार्टा

प्रथमता मस्त फोटो .. अआणि आनखिन सविस्तर व्रूतांत पाहिजे अशी अपेक्षा. दुसरी गोष्ट .. पुढच्या वर्षी म्हणजे २०१६ ला ? मी तयार आहे . या वर्षीच बेत आखत होतो पण काही जमेल का नाही ते सांगता येत नाही. काल- प्ररवाच रोल ऑफ घेतला आहे, पुणे लोकेशन साठी त्यामुळे. २०१६ पर्यंत बुलेट घ्यावी काय हा विचार करतोय .. अपाची १५० बरीच जुनी झालेली आहे

फोटो जबरदस्त आले आहेत. शेवटच्या फोटोच्या ठिकाणी ३ इडियट मधला शेवटचा प्रसंग चित्रित झाला होता का? रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती तर पाठीवरचे ओझे बरेच कमी झाले असते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हे पॅन्गॉंग सरोवर. इथेच ते चित्रिकरण झाले होते. एनफिल्ड आमची नाही, फक्त फोटो काढला :-) आमच्या हयाते आणि पल्सर होत्या. एकुण, लहान जपानी गाड्या सोप्या वागवायला आणि भरोसेमंद असे मत झाले काही लोकांचे हाल बघुन.

In reply to by कपिलमुनी

पण फारच लांबलचक आहे, लिहायचा कंटाळा आणि अजुन हात साफ होतोय मराठी कळफळीवर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती तर पाठीवरचे ओझे बरेच कमी झाले असते.
संदर्भासहित स्पष्टिकरण द्या :)

In reply to by टवाळ कार्टा

चुभुद्याघ्या, माझा अनुभव लदाखमधे सर्व मोटारसायकलस्वार पास होताना हात देतात, हसुन बघतात. पण बुलेटवाले काय भाव देत नाहीत इतरांना. बाकी १०० मधे ८० हात करतात, बुलेटवाले प्रमाण उलटे. यातुन अभारतीय बुलेटस्वार वगळा, ते मस्तपैकी विक्टोरी साइन देतात.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरे झाले सांगीतलेत. आता बुलेट घेतली की कुजकट वागावे लागणार... :)

In reply to by खटपट्या

कुजकटपणा असल्याशिवाय बुलेटचं बुकिंग घेत नाहीत. =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बहुधा पैजारबुवांना अत्यंत वाईट्ट 'अणुबव' आलेला दिसतोय किंवा ही आंबट द्राक्षे असावीत ;)

खंडेराव ! जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा लेह लडाखची सवारी फोटो आवडेश प्रचंडा पण खूप कमी टाकलेत फोटो. आणि वर्णन??? असं कसं चालेल?

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट :-) फोटो टाकतो अजुन..आणि लिहायचाही प्रयत्न करतो.. लडाख वेड आहे अगदी. एक अगम नावाचे गाव लागते वारी पासला जाताना. काय रस्ता, नदीमधुन जातो. असे वाटते, १० दिवस मस्त बसुन रहावे तंबु ठोकुन...

In reply to by अत्रुप्त आत्मा

इतकी गोड होती, आमचा १० तास गाडी चालवायचा थकवा पळाला :-) आईच्या पाठीवर बसुन आलीहोती..

लयं भारी ! अजुन फोटु हवेत... देवा रवळनाथा माका कधी लेह लडाख चो ट्रिप घडनार ते जरा स्वप्नात येउन सांग रं महाराजा ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

फोटो खुपच अप्रतिम आहेत....... माझी पण खूप ईच्छा अआहे बाईक वरून फिरण्याची पण आपल्याला झेपेल की नाही म्हणून कधी प्रयत्न केला नाही.

यशोधरा, इस्पिकचा एक्का, जुइ, यसवायजी, मदनबाण, मॅक! मॅक : नक्की जमेल..थोडीशी शारिरिक आणि मानसीक तयारी असेल तर बिलकुल अवघड नाही. मदनबाण : या वर्षी करा की प्लॅन ऑगस्ट सप्टे. मधे, उत्तम महीने तिथे फिरायला.

जून्या लडाख वारीची आठवण झाली. सडाफटींग होतो म्हणून शक्य झाले होते. आता लटांबर सोडेल की नाही माहीती नाही. बुलेटपेक्षा पल्सर बरी हेच मत आहे. खासकरून ओढे ओलांडताना बुलेट दगडगोट्यांना अडकते.