अंजिराचा चिक आणि औषधोपचार
आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी. त्यामुळे ते कितीही हिरवंगार रसरशीत दिसणारं झाड असलं तरी चुकीच्या ठिकाणी उगवल्यामुळे कायम छाटत राहावं लागतं. त्याचा वाढण्याचा वेग आणि दिशा म्हणजे हॉलीवूड चित्रपटात कधी झाडे वेडीपिशी झाल्यावर कशी वेडीवाकडी, सरसर वाढून माणसांना ओढून नेतात तसं काहीसं भीतीदायक पद्धतीने ते झाड वाढतं. अगदी जमीनीला लागून त्याची फांदी समांतर तीन फूट वाढून नंतर भलतीकडूनच कुठेतरी सरळ आकाशाकडे निघते. त्यामुळे इतर फुलझाडांना, वेलींना त्रास होतो.
तर असे हे आमचे अंजिराचे झाड. त्याचा आम्हाला आणि आमचा त्याला विचित्र त्रास. पण एक नवीनच माहिती आम्हाला कळली आणि ह्या आम्ही करत असलेल्या उपद्व्यापाचा कुणालातरी खूपच फायदा झालेला कळून आला.
चार पाच दिवसांपूर्वीची घटना आहे.
एका संध्याकाळी बायको चिमुकल्याला घेऊन आवारात फेरफटका मारत असतांना एक स्त्री त्या झाडाकडे येतांना तीला दिसली. बायकोला अचानक पुढे आल्याचं पाहून ती जरा थबकली. जणू काही ती याच्या आधीसुद्धा नेहमी झाडाजवळ येत असावी असं तिच्या देहबोलीवरून वाटलं. आज घरचं माणूस असं समोर आलेलं पाहून ती चपापली. तरी पुढे येऊन तीने विचारले, 'ताई, या झाडाचा चीक घेऊ का जरासा. माझ्या मुलाला चाई (डोक्यावरच्या त्वचेचा एक रोग ज्यात २-३ इंच पॅच मधे केस पूर्ण झडतात. यापेक्षा अधीक शास्त्रिय माहीती नाही.) झाली आहे. त्यावर हा इलाज सांगितला आहे. मी नेहमी इथून चीक घेऊन त्याच्या चाईवर लावते. त्याला बराच फरक पडला आहे. केस परत उगवायला सुरुवात झाली आहे."
माझ्या बायकोला तो प्रकार काय समजला नाही आणि त्यामुळे ती काय व कशाबद्दल बोलतेय तेही काही कळत नव्हतं. बायकोची प्रश्नार्थक मुद्रा आणि अविश्वास बघून तिने पुढे येऊन ते प्रात्यक्षिक दा़खवले. अंजिराच्या झाडाचं कोवळंसं पान देठापासून तोडून त्यातून निघणारा ताजा ताजा पांढरा चीक तीने सोबत असलेल्या तीच्या दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जिथे चाई पडली होती तीथे लावला. ती म्हणाली की ती दुसर्या गल्लीत चार घरं सोडून राहते. पण त्यांच्याकडे तशी काही झाडे नाहीत. गम्मत म्हणजे आमच्या घरासमोरच दुसरे घर आहे त्यांच्याकडेही असंच अंजिराचं झाड आहे. पण आम्हाला सतावणारे कुठलेच प्रश्न त्यांना सतावत नसल्याने त्यांनी ते झाड कधीच तोडले किंवा छाटले नाही. त्यामुळे त्यांचे झाड जरा राठ झाले आहे, त्यातून असा मुबलक चीक बाहेर येत नाही.
आम्ही आमच्या समस्यांमुळे त्या झाडाची करत असलेली काटछाट नकळत एका कुटूंबाला खूप काही फायदा देऊन गेली हे कळल्यावर आनंदच झाला. मग वाटलं किती साधीशी गोष्ट आहे. तोडा एक पान आणि लावा त्या पॅचवर की आले केस. पण हळूहळू जास्त खोलात जाऊन विचार करता बरेच मुद्दे लक्षात आले. अंजिराचं झाड एवढंही सामान्य नाही की दर चार घर सोडून कुठेही मिळेल. त्यांना नेमका हाच इलाज कुणी सांगीतला आणि ते झाड ताज्या रसरशीत चिकासह शेजारीच मिळावं, त्याचा परिणामही मिळावा हा माझ्यामते तरी भयंकर योगायोग आहे. आमच्याच दारात झाड आहे त्यामुळे आम्हाला त्याचे काही कौतुक नाही पण त्या स्त्रीला तिच्या मुलाच्या उपचारासाठी योग्य सल्ला आणि तो चीक असा मिळणे फारच भाग्याची गोष्ट होती. आमच्या आवारात हीच (पिवळा चाफा, अंजीर, ई.) दोन-तीन औषधी झाडे आहेत पण आम्हाला त्याचे काहीच उपयोग ठाऊक नाहीत. पण असं काही कळलं की बरं वाटतं.
आता मूळ चर्चेचा विषय.
१. असे सल्ले जे इतके साधे आणि सोपे वाटतात ते खरंच तसे असतात का?
२. प्रथमदर्शनी हा सल्ला 'आयुर्वेद' अथवा 'आजीबाईचा बटवा'छाप वाटतो. असे सल्ले फार वाईट पद्धतीने उलटूही शकतात. असे सल्ले उपचारापूर्वीच तपासून बघायची सोय आहे काय किंवा असावी?
३. आधुनिक वैद्यकीय पद्धतीत काही गोष्टींवर अजिबात उपचार नाही असे सांगितले जाते तेव्हा दुसर्या बाजूला त्याच रोगावर खात्रीलायक आणि सिद्ध झालेले उपचार पारंपारिक पद्धतीमधे आढळून येतात. (ऐकीव माहिती. उदा. दम्यावर मासळीतून औषध घेणे, वैगेरे वैगेरे) त्यामुळे सामान्य सुजाण, जबाबदार, विज्ञाननिष्ठ पण रोगाने त्रस्त नागरिकाने नेमकी काय भूमिका घ्यावी?
४. चाई या प्रकारात सर्व वैद्यकीय पद्धतीत खात्रीलायक उपचार आहेत की नाहीत याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पण चाई प्रकार बराच बघितला आहे. त्याने त्रासलेल्या व्यक्तीही बघितल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराची जाणकारांकडून माहीती मिळाल्यास उत्तम. (आजारांच्या बाबतीत मी कधीही गुगलत नाही. मनस्ताप टळतो.)
५. अशी उदाहरणे प्रत्यक्षात समोर घडल्याने अशा उपचार पद्धतींवर सामान्य नागरिकांचा विश्वास बसू शकतो. त्यातला धोका कसा ओळखावा? दुसर्या शब्दात एखाद्या रोगावर कुठल्याही उपचारपद्धतीतली अधिकारी आणि तज्ञ व्यक्ती कशी शोधावी?
६. अशाच काही पारंपरीक, साध्या, बिनखर्चीक, फुकट उपचारांवर संशोधन करून आधुनिक वैद्यकशास्त्र हे अमूल्य ज्ञान प्रमाणित करून सामान्यांस उपलब्ध करून देतं काय, असल्यास त्याचा काही संदर्भ मिळेल काय? नसल्यास का करत नाही?
अंजिराची फळे:
अंजिराचे झाड:
अंजिराचे झाड :
अंजिराचे पाने (आमच्या घरी असलेली जात) :
चाई (Alopecia Areata ):
जाहीर सूचना: सदर घटना सत्य असली तरी कृपया कुणीही या सल्ल्याचा किंवा उल्लेखीत उपचारांचा वापर या लेखात सांगितला आहे म्हणून करू नये. आपल्या कुठल्याही प्रकारच्या आजारावर सांगोवांगीच्या उपचारांना, वाचलेल्या, ऐकलेल्या किंवा प्रत्यक्ष बघितलेल्या अनुभवांना आधार बनवून स्वतःच उपचार करू नये. तज्ञ व अधिकारी व्यक्तीचा सल्ला पूर्ण खात्री करून अमलात आणावा. या लेखात उल्लेखीत उपचार वाचकाने स्वतःवर केल्यास होणार्या बर्या-वाईट परिणामास लेखक जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)
७. अवांतरः घरच्या देवाला वाहायला म्हणून अख्ख्या गावाची फुले हिंस्त्र पद्धतीने ओरबाडून नेणार्या, आमच्या फुलांनी डवरलेल्या लांबच लांब सुंदर गल्लीची सकाळी ७च्या आत वाट लावणार्या, आम्ही राबून जणू त्यांच्यासाठीच फुले उगवतो असे बिंदास समजणार्या, कितीही ओरडले तरी ढिम्म न बधणार्या 'ज्येष्ठ नागरिक' देवभक्तांना गोळ्या घालायचा परवाना कुठे मिळेल?
अंजिराचे झाड:
अंजिराचे झाड :
अंजिराचे पाने (आमच्या घरी असलेली जात) :
चाई (Alopecia Areata ):
जाहीर सूचना: सदर घटना सत्य असली तरी कृपया कुणीही या सल्ल्याचा किंवा उल्लेखीत उपचारांचा वापर या लेखात सांगितला आहे म्हणून करू नये. आपल्या कुठल्याही प्रकारच्या आजारावर सांगोवांगीच्या उपचारांना, वाचलेल्या, ऐकलेल्या किंवा प्रत्यक्ष बघितलेल्या अनुभवांना आधार बनवून स्वतःच उपचार करू नये. तज्ञ व अधिकारी व्यक्तीचा सल्ला पूर्ण खात्री करून अमलात आणावा. या लेखात उल्लेखीत उपचार वाचकाने स्वतःवर केल्यास होणार्या बर्या-वाईट परिणामास लेखक जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)
७. अवांतरः घरच्या देवाला वाहायला म्हणून अख्ख्या गावाची फुले हिंस्त्र पद्धतीने ओरबाडून नेणार्या, आमच्या फुलांनी डवरलेल्या लांबच लांब सुंदर गल्लीची सकाळी ७च्या आत वाट लावणार्या, आम्ही राबून जणू त्यांच्यासाठीच फुले उगवतो असे बिंदास समजणार्या, कितीही ओरडले तरी ढिम्म न बधणार्या 'ज्येष्ठ नागरिक' देवभक्तांना गोळ्या घालायचा परवाना कुठे मिळेल?
याद्या
37471
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
१)अंजिर चित्र १तुमचे वाटतंय
चित्र क्र. १ मधे दाखवलेलं फळ
In reply to १)अंजिर चित्र १तुमचे वाटतंय by कंजूस
तुमच्याकडे अंजिर आहे की उंबर
साधारण चार प्रकारचे अंजीर
In reply to तुमच्याकडे अंजिर आहे की उंबर by अजया
दोघांच्या पानांचा आकार
In reply to साधारण चार प्रकारचे अंजीर by संदीप डांगे
चाई!
तुमचा सविस्तर प्रतिसाद खरंच
In reply to चाई! by साती
डांगे साहेब
In reply to तुमचा सविस्तर प्रतिसाद खरंच by संदीप डांगे
डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
हळद निरुपयोगी आहे
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
हळद निरुपयोगी आहे?
In reply to हळद निरुपयोगी आहे by अत्रन्गि पाउस
कैच्या कै. हळद जंतुनाशक आहे
In reply to हळद निरुपयोगी आहे by अत्रन्गि पाउस
'हे असले' उपाय करण्याबद्दल
In reply to हळद निरुपयोगी आहे by अत्रन्गि पाउस
तुमच्याकडे अंजिर आहे की उंबर?
चिकू
उंबर अथवा अंजिर त्याच्या
घरच्या देवाला वाहायला म्हणून
गोळ्या
In reply to घरच्या देवाला वाहायला म्हणून by बॅटमॅन
ह्या एकाच्च कारणासाठी सकाळी
In reply to घरच्या देवाला वाहायला म्हणून by बॅटमॅन
खाजकुली पसरुन ठेवायची झाडांवर
In reply to घरच्या देवाला वाहायला म्हणून by बॅटमॅन
हे लय भारी... :-)
In reply to खाजकुली पसरुन ठेवायची झाडांवर by स्पंदना
हाण तेजायला. तसे केल्यास
In reply to खाजकुली पसरुन ठेवायची झाडांवर by स्पंदना
अशी चाई झालेली एक स्त्री मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }लहानपणी आमच्या शेतात एक माणुस
चोप्य पस्ते
In reply to लहानपणी आमच्या शेतात एक माणुस by प्रकाश घाटपांडे
अवांतरातील जेना. सर्वत्र
प्रकाश घाटपांडे..
:-(
In reply to प्रकाश घाटपांडे.. by सविता००१
७. अवांतरः घरच्या देवाला
दुसर्या बाजूला त्याच रोगावर
लॉजिक..?
In reply to दुसर्या बाजूला त्याच रोगावर by गवि
खात्रीलायक आणि सिद्ध झालेल्या
In reply to लॉजिक..? by स्वप्नांची राणी
सॉरी सॉरी...कान पकडले बाबा!!
In reply to खात्रीलायक आणि सिद्ध झालेल्या by गवि
@गवि,
In reply to खात्रीलायक आणि सिद्ध झालेल्या by गवि
या पुर्वी आंजावर याची भरपूर
In reply to @गवि, by संदीप डांगे
दुव्यांबद्दल धन्यवाद.
In reply to या पुर्वी आंजावर याची भरपूर by प्रकाश घाटपांडे
मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर
In reply to दुव्यांबद्दल धन्यवाद. by संदीप डांगे
मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद,..........
In reply to दुव्यांबद्दल धन्यवाद. by संदीप डांगे
आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये
In reply to मॉडर्न मेडीसिनवाल्यांना इतर पॅथीज ह्या कायम संशयास्पद,.......... by तुषार काळभोर
सहमत.
In reply to आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद
In reply to दुव्यांबद्दल धन्यवाद. by संदीप डांगे
प्रत्येक पॅथीचे अभिमानी लोक
In reply to उत्तम प्रतिसाद by प्रकाश घाटपांडे
या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने
In reply to खात्रीलायक आणि सिद्ध झालेल्या by गवि
हळदीचा उपयोग:चमचाभर पाण्यात
अरे वा. हळद + तुरटी.
In reply to हळदीचा उपयोग:चमचाभर पाण्यात by कंजूस