या गावाचं काही खरं नाही!
सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!'
बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?'
अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु.
सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो. आल्यावर खादाडी, चहा आणि लगोलग बंड्याला वॉसप संदेश. हरामखोरा, स्काईप वर ये
पाच मिनिटात बंड्या स्काईप वर.
हं. मग आज काय काय झालं?
कुठे काय?
अरे, ली क्वान ना गेला आज? मग शोकसभा, सर्वत्र बंद, रस्त्यावर क्रिकेट, हातात झेंडे (आणि बरच काही) घेउन 'ए *******, बघतो काय शटर टाक खाली....... कुठे एखादी उघडी टपरी लुटुन फोकटमे थंडा वगैरे
नाही. इथे तस काही नसतं.
ह्यॅ. अस कसं? किमान रस्ते तरी वाहतुकीला बंद केले असतील. एमारटी च्या रुळावर कार्यकर्ते बसले असतील. 'रिक्स' घेउन जनसेवा करणारे टॅक्सीवाले 'चाउ चे काँग ५० डॉलर सीट' बोंबलत असतील. रस्त्यांवर सर्वत्र 'जब तक सूरज चांद रहेगा, ली भाऊका नाम रहेगा' चे बॅनर झळकत असतील. अंत्यसंस्कारासाठी वाहिन्यांनी क्यामेरे आगाउ लावले असतील. सगळ्या शहरभर एल सी डी वर त्यांचे जीवनपट दाखवले जात असतील.
अरे बोल ना गाढवा, मी आपला उत्साहाने विचारतोय आणि तुझ लक्ष त्या स्क्रीनवर. कोण ट्वाळ-ट्वळ्या आल्या आहेत?
हॅ. काय उगाच टीपी लावलाय, इथे अस काहीच नसत. कॅमेर्याकडे ढुंकुनही न पाहता आपल्या उद्योगा पासून अविचल असलेला बंड्या कोरडेपणानं बोलला.
काहीच नाही?
का रे, शेवटी कुठच्या तो हॉस्पिटलात होता? तुमच्याकडे सगळ्या इमारती काचबंद! मस्त राडा झाला असेल, काचांचा खच. पेशंट सलाइन सकट कल्टी, अॅम्ब्युलन्सच्या टाकीतलं डिजेल त्याच गाडीवर. लगाव माचीस.
सोड ना. कशाला पकवतोस? अस काहीच नव्हतं. लोकांनी आपापला शोक व्यक्त केला. म्हातारे कोतारे हळ्हळले. लोकांनी पदपथावर पुष्पगुच्छ ठेवले, ते ही रांगा लावुन. आता आपला पुढचा प्रवास कसा होणार ही चिंता काहींनी व्यक्त केली. बाकी सर्व सुरळीत आहे.
छ्या! आपला तर सगळा ईट्रेष्ट्च संपला. आयला या गावाचं खर नाही. लोकशाही कशाशी खातात हे यांना समजलच नाही.
प्रतिक्रिया
(आपल्या सकल सामाजिक
आमच्याकडे मात्र कोणाच्या
खरं आहे भौ.
ग्रेट माणूस. RIP. _/\_
काय म्हणतात ते...
हा हा खरं आहे.... पण बरं आहे.
मुलाला तिकीट - घराणेशाही
अश्या घराणेशाहीमुळे जे रिझल्ट
मार्मिक!
हम्म
ली क्वान यू हे सर्वार्थाने
वाचनीय मृत्यूलेख
ली कुआन यू ह्यांच्या स्मृतीला अभिवादन
तुलना तर होणारच, पण तरी ही
मार्मिक ! आवडेश !
सहि! आपल्याकडं अस काय व्हायची