Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/28/2013 - 15:43
पुत्र व्हावा ऐसा गुंडा... ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो.. तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात. त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही. दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्‍याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे. पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?
  • Log in or register to post comments
  • 99444 views

प्रतिक्रिया

Submitted by कवितानागेश on Sat, 06/21/2014 - 01:14

In reply to तुमच्याकडील प्रगती आवडली. by रेवती

Permalink

चिकणमाती?

पिरा, तुझ्या मुलाला अजून कणीक सापडलेली दिसत नाही. आपली आई रोज कणकेत खेळतेय, हे बघून मुलं पण येतातच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 06/23/2014 - 12:39

In reply to चिकणमाती? by कवितानागेश

Permalink

नाही सापडु दिली मी अजुन..

नाही सापडु दिली मी अजुन.. आधीच राडा कमी आहे का घरातला..!! पण देइन थोडा मोठा झाला की..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/20/2014 - 13:59

Permalink

नवीन वैग्रे राहूदे..

तूर्तास १०० झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 06/20/2014 - 14:01

In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन

Permalink

छान… जमतंय हो… !

छान… जमतंय हो… !
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/20/2014 - 14:04

In reply to छान… जमतंय हो… ! by पिलीयन रायडर

Permalink

धन्यवाद! तुमचा आशीर्वाद

धन्यवाद! तुमचा आशीर्वाद असल्यावर काय अवघडे म्हणा. (साला तो पैल्या पर्तिसादात ह.घ्या. राहून गेला वाट्टे)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 06/20/2014 - 14:35

In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन

Permalink

बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान

बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान मुलांबद्दलचा धागा आहे! "१०० झाले" वगरै काय म्हणतोयस तू? :P
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/20/2014 - 14:49

In reply to बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान by कवितानागेश

Permalink

आज्जी तुम्ही जाग्या व्हा बघू

आज्जी तुम्ही जाग्या व्हा बघू आधी. प्रतिसादसंख्येची सेञ्च्युरी मी केली. बाकी धाग्यात भर घालायला तुम्ही आहातच की.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 09/11/2014 - 12:52

Permalink

वाचता वाचता एक सुंदर ब्लॉग

वाचता वाचता एक सुंदर ब्लॉग सापडलाय... जरुर वाचा... http://mommygolightly.wordpress.com/ त्यातला काही भाग इथे पेस्ट करतेय.. Notes from a teacher to a child The hardest thing about parenting is deciding at what age a child stops being a child. Perhaps children too are always under pressure to “grow up” or “act their age”. Yes, there are reams written about milestones and what a child should know by the time he/she is three, five, ten and twelve. I still get emails on baby milestones from websites years after I stopped reading them. But for lack of a better term, here is a list of what I think every child or student should know: 1. If something doesn’t feel right, it usually isn’t right. Your instincts are more valuable than you think. Grown-ups may look like they have thought things through, but they are mostly relying on instinct. 2. Coloring within the lines is overrated. It is usually the beginning of boundaries. It is usually a trap for other things. Looking like everyone else, talking like everyone else, also thinking like everyone else. Soon they will say, “You can’t do this” or “you can’t do that”. Soon they will say, “you are this” or “you are that”. 3. They may tell you that the sky is the limit, but they may still frown if you paint it purple. The fact is, the sky is whatever color you want it to be. There is enough of blue in our lives anyway. Go paint it orange! 4. Adults can control how you speak or what you wear or what you eat or read, but they cannot control who you are. 5. Books are not fiction, non-fiction, thrillers, fantasies or mysteries. They are things that let you inhabit a world and stay there as long as you want. Don’t label books, let them mark you. 6. There is something about you that is uniquely different from anyone else in this world. Keep it. Cherish it. Learn to love it. And don’t let go of it easily. 7. Happy is not a default state to be. Feeling sad, angry, lonely, jealous is as natural as feeling happy, elated, generous or chirpy. Although people will seldom ask you why you are happy, they will always ask you why you are sad. 8. It’s okay not to have an opinion when everyone else seems to have one. It just means you are still making up your mind on it. Take your time. 9. The teacher is as intrigued by the quiet ones as by the talkative ones. So may be it’s a good idea to conserve your energy sometimes. 10. Adults are people who have been in the universe longer than you. It doesn’t necessarily mean they know more. They are still fumbling around with many things, but they won’t tell you. 11. It is important to laugh, or act silly sometimes. 12. It is totally okay to not love numbers. 13. Or poetry. 14. If you were read to as a child, you probably are luckier than most people in this world. 15. Every time you ask a question an adult laughs at, they probably haven’t had the guts to ask it themselves. Or perhaps they have been caught off guard and never really thought of it and don’t know the answer. Or it perhaps takes them to places they don’t want to go to. 16. The world is a magical, amazing place and there are a lot of secrets you will uncover. Some will make you happy, others will make you sad or angry, but you will always be happier when you find this out on your own. 17. Very often, the things you think you love will not be the things you love when you are 18. That’s what growing up is all about. Finding new things to love. 18. More often, the things your parents think are good for you may not be the things you like. But you don’t have to dislike them just because they came up with the idea. 19. It’s seldom an either/or. Sometimes there is more than one answer to a question. That is how it’s going to be in life. 20. Zero has gravitas. Wear your zeroes proudly. But help them take you someplace you like to belong. 21. You are more powerful than you know. 22. You are going to create more long term memories in people than you possibly imagine. 23. There will always be someone who doesn’t understand your point of view. There will always be someone who does. 24. There will be times when your questions will remain unanswered. That doesn’t mean you stop asking questions. 25. Sometimes, you may touch someone’s life, but they may forget to tell you. But it still happened.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on गुरुवार, 09/11/2014 - 15:46

Permalink

माझा गुंडा ३ वर्षा चा आहे.

माझा गुंडा ३ वर्षा चा आहे. एकदा मी त्याला म्हंटले कि त्रास देणाऱ्या मुलांना शिंगे उगतात बघ आता तुला शिंगे उगायला लागली आहेत. पण तो यावर म्हणतो कसा उगू द्या शिंगे. त्या शिंगांनी मी मला त्रास देणाऱ्या मुलांना त्रास देईल
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on गुरुवार, 09/11/2014 - 15:50

Permalink

त्याच लकडी कि काठी version

त्याच लकडी कि काठी version लकडी कि काठी काठी पे घोडा घोडे के दुम पे जो मारा ततोडा
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 03/27/2015 - 11:45

Permalink

रात्री झोपताना चित्र दाखवुन

रात्री झोपताना चित्र दाखवुन वाचुन दाखवता येतील अशी गोष्टींची पुस्तकं कुणी सांगु शकेल का? वय वर्ष ३ साठी हवी आहेत. आणि शक्यतो मराठी असतील तर उत्तम.. इंग्रजी सुचवुन ठेवल्यास हरकत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on Fri, 03/27/2015 - 13:58

In reply to रात्री झोपताना चित्र दाखवुन by पिलीयन रायडर

Permalink

तुम्ही अ‍ॅमेझॉन सर्च केले

तुम्ही अ‍ॅमेझॉन सर्च केले असेलेच, केले नसल्यास - http://www.amazon.in/s/ref=nb_sb_noss?url=search-alias%3Daps&field-keywords=books%20for%20children%203%20to%205%20years http://www.amazon.in/s/ref=nb_sb_ss_c_0_15?url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=bedtime%20stories&sprefix=bedtime+stories%2Caps%2C499 www.amazon.in/s/ref=sr_nr_n_1?fst=as%3Aoff&rh=n%3A976389031%2Cn%3A1318099031%2Ck%3Abedtime+stories&keywords=bedtime+stories&ie=UTF8&qid=1427444527&rnid=976390031
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Fri, 03/27/2015 - 14:39

Permalink

jyotsnaprakashan.com ह्या

jyotsnaprakashan.com ह्या संकेतस्थळावर माधुरी पुरंदरे ह्यांची बालसाहित्यातली सगळी पुस्तकं खूप छान आहेत. लेखिकेने स्वतः चित्रे काढून अगदी सोप्या भाषेमधे वेगवेगळ्या गोष्टी लिहीलेल्या आहेत. माझ्या भाच्यासाठी मी सर्व पुस्तकं मागवली होती. संकेतस्थळावरून तुम्ही हवी ती पुस्तक ऑनलाईन पेमेंटने घरपोच मागवू शकता. फक्त हवी ती पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत की नाही त्याची चौकशी एकदा त्यांच्या कार्यालयात करून घ्या आणि त्यानुसार ऑर्डर करा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 03/27/2015 - 15:05

In reply to jyotsnaprakashan.com ह्या by क्रेझी

Permalink

फारच छान लिंक..! धन्यवाद!

फारच छान लिंक..! धन्यवाद! लगेच होलसेल मध्ये पुस्तकं मागवत आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 03/27/2015 - 16:47

Permalink

मजेदार गोष्टी

मजेदार गोष्टी - शशिकांत कदम एकदम २०-२५ पुस्तके मागवण्या पेक्षा एखाद दुसरेच पुस्तक मागवावे. वरच्या मजेदार गोष्टी या पुस्तकावर आम्ही बरेच दिवस बॅटींग केली होती. जवळजवळ चार पाच महिने. या वयात मुलांना एकच गोष्ट (जी त्यांना माहीत आहे तीच) सारखी सारखी सांगीतली तर ती प्रत्येकवेळा जास्त आवडीने ऐकतात. त्यांना त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. (हा अर्थात माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव कदाचित वेगळा शकतो.) परवा अप्पाबळवंत चौकातल्या प्रगती बुक स्टोअर मधे गेलो होतो. (जोगेश्वरीच्या समोरचा) त्या दुकानात तर लहान मुलांच्या पुस्तकांचा जवळजवळ एक मजलाच आहे. लहानमुलांसाठी एवढी पुस्तक बघुन मी पण आचंबीत झालो होतो. सध्या वयोगटा प्रमाणे अ‍ॅक्टीव्हीटी बुक्स पण मिळतात. ती पण दोनचार घेउन बघा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 03/27/2015 - 17:04

In reply to मजेदार गोष्टी by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

खरंय.. मी रोज तीच गोष्ट

खरंय.. मी रोज तीच गोष्ट सांगते.. किंवा बनवते.. अत्यंत भक्तिभावानी ऐकतो मुलगा.. पण आता मी कंटाळले! आणि मी सुद्धा ह्या दुकानत जाउन बघेन.. मुलालाच नेते..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 17:43

Permalink

मी माझ्या मुलाला सध्या

मी माझ्या मुलाला सध्या शिवाजीमहाराजांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतीये. त्याला त्यातील लढाईचा भाग सोडता काहीच आवडत नाही. त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 17:57

In reply to मी माझ्या मुलाला सध्या by रेवती

Permalink

त्यातही फायटर विमाने असती तर

त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.
टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही. साधारण १९२०-३० च्या सुमारास लहान असलेल्या एका गृहस्थांच्या आत्मचरित्रातही अशा धर्तीची आठवण आहे. लहान असताना ते आणि त्यांचे एक लंगोटीमित्र विचार करतात की इंग्लंडवर हल्ला कसा करावा? मारुतीच्या पाठीवर बसून तिथे जावे अन मारुतीला ते बेट उलटे करून बुडवण्यास सांगावे इ.इ. फक्त त्यातली संपत्ती परत घ्यावी की न घ्यावी याबद्दल डिबेट होता असे त्यात दिलेले आहे. या वयात दुसरे काही आवडणारही नाही. पण अशा गोष्टींनीच आत्मीयता वाढते हे विसरू नका. अन मुळात आत्मीयताच नसेल तर कोण शिवाजी अन कुठला महाराष्ट्र? तेव्हा शक्य तितक्या लढायांच्या गोष्टी सांगायला विसरू नका. फक्त मोटिव्ह आणि शौर्य यांवर भर दिल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 03/27/2015 - 17:59

In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन

Permalink

टाईम मशीनने मागे जाऊन

टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही.
सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 03/27/2015 - 18:05

In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन

Permalink

माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७)

माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) तर पेशव्यांकडुन मस्तानीला उचलुन आणता येईल असं अत्यंत महत्त्वाचं लॉगिक मांडलेलं. अर्थात त्याच्या डोक्यात मस्तानीचा ग्लास होता ही गोष्ट अलाहिदा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:10

In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

ठ्ठो =))

ठ्ठो =)) =)) =)) नशीब दुसर्‍या बाजिरावाबद्दल काही सांगितलं नाही ते. =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 18:24

In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

असाच प्रश्न मला आला. फक्त

असाच प्रश्न मला आला. फक्त आमच्याकडे वय वर्षे दुप्पट आहे म्हणून बाकी सगळी माहिती आहे. आधी मी महाभारत सुरु केले तर गाडी द्रौपदी वस्त्रहरणाला अडली. मग ते सोडले, शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला. पांडव जर ५ असू शकतात तर दुसर्‍या पार्टीला कुटुंब नियोजन का जमले नाही? शिवाय आमच्यापेक्षा जास्त माहिती मुलांना! मग रामायण सुरु केले. त्यात सीतेला कांचनमृगाचे कातडे, त्याचे कपडे, हे पटवता येईना. मग शिवाजीमहाराजांना शरण गेले शेवटी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:30

In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती

Permalink

शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक

शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला.
मग मूळ कथाच सांगायची. १०० पैकी १४ जणच फक्त धृतराष्ट्र-गांधारी यांचे पुत्र होते, बाकी एकतर धृतराष्ट्र + अन्य स्त्रिया यांचे तरी किंवा अ‍ॅडाप्टेड तरी. कुटुंब नियोजन जमले नाही (रादर त्याची मदत घेतली नाही) कारण भला उसके बेटे मेरे बेटोंसे ज्यादा कैसे इ.इ.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 03/27/2015 - 18:45

In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती

Permalink

धृतराष्ट्रानी प्रश्ण ऐकला

धृतराष्ट्रानी प्रश्ण ऐकला असता तर डोळे पांढरे झाले असते की त्याचे लिटरली =)) बाकी ते तुपाच्या भांड्यात बुडवुन ठेवलेले अंगुलीएवढे १०१ जीव वगैरे ऐकुन टेस्ट ट्युब बेबीज होते की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 18:17

In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन

Permalink

होय, तेही आहेच!

होय, तेही आहेच!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 03/27/2015 - 18:24

In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन

Permalink

करेक्ट..

करेक्ट.. माझ्या मुलाला शिवाजी महाराजांपेक्षा छोटा भीम जास्त शुर वाटतो.. आणि अफझलखानाला सरळ उचलुन गरगर फिरवुन फेकुन दिलं तर जास्त बरं झालं असतं.. कुठं ती वाघनखं वापरायची (त्याला ते कळतच नाही ना..).. सध्या जीवा महाला सय्यद बंडाला फक्त "ढिशुम" करतोय.. पण गोष्ट सांगत रहायची..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 18:31

In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर

Permalink

शिवाजी महाराजांनी आरमार (आधी

शिवाजी महाराजांनी आरमार (आधी आर्मर आणि आरमारात गोंधळ, मग वाद, मग नेव्ही वगैरे) बनवताना जहाजे तयार करण्याचे वर्कशॉप कुठे होते? याचे उत्तर द्यायचे म्हणजे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:32

In reply to शिवाजी महाराजांनी आरमार (आधी by रेवती

Permalink

वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून

वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून सांगा. ते खरेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 18:33

In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन

Permalink

ओक्के. तसेच सांगते.

ओक्के. तसेच सांगते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:34

In reply to ओक्के. तसेच सांगते. by रेवती

Permalink

शिवाय आरमार या शब्दाची

शिवाय आरमार या शब्दाची व्युत्पत्तीही सांगा. पोर्तुगीज़ भाषेतील आर्मेर या शब्दावरून तो आलेला आहे. याच्याशी संबंधित इंग्लिश शब्द म्हणजे armada होय. तेवढेच युरोपियन कनेक्शनही डोक्यात बसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2015 - 18:36

In reply to शिवाय आरमार या शब्दाची by बॅटमॅन

Permalink

ओक्के, समजले. सांगते.

ओक्के, समजले. सांगते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 03/27/2015 - 18:35

In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन

Permalink

आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं

आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं हे माहीत आहे पण नंतर विजयदुर्गच्या वाघोटन खाडीजवळच्या गोदीत सुरु केलं ना?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:36

In reply to आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं by प्रचेतस

Permalink

नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती

नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती होते. नंतरचे ठिकाण माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 03/27/2015 - 18:38

In reply to नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती by बॅटमॅन

Permalink

हो.

हो. विजयदुर्ग खूपच सुरक्षित होता. त्यामानाने कल्याण इंग्रज आणि मुघलांनी घेरलेले होते
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:40

In reply to हो. by प्रचेतस

Permalink

इंडीड.

इंडीड.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:31

In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर

Permalink

आमचे तीर्थरूप तानाजीच्या

आमचे तीर्थरूप तानाजीच्या जेवणाचे भीमाच्या जेवणासारखे वर्णन करायचे ते आठवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/27/2015 - 18:39

Permalink

लहान पोरांना समजेल अन आवडेल

लहान पोरांना समजेल अन आवडेल अशी ऐतिहासिक पुस्तके लिहिण्याचे मार्केट तसे मोठे आहे असे वाटते. तशी चांगली पुस्तके मराठीत कोणती आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 03/27/2015 - 18:44

In reply to लहान पोरांना समजेल अन आवडेल by बॅटमॅन

Permalink

खरंच..

खरंच.. माझ्या लहानपणी कॅसेट्स होत्या.. त्यात खुप मस्त सांगितलं होतं.. हिरकणीची गोष्ट अगदी नीट आठवते मला. शिवाय एक कॅसेट होती त्यात दिलीप प्रभावळवर, निशिगंधा वाड ह्यांच्या आवाजात गोष्टी होत्या.. आहेत का अशा CD / कॅसेट्स? बघते लगेच ऑनलाईन..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 03/27/2015 - 18:48

In reply to खरंच.. by पिलीयन रायडर

Permalink

इथे बरीचशी पुस्तके मिळतील

इथे बरीचशी पुस्तके मिळतील. http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?CID=4612258520099131515
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on Wed, 07/15/2015 - 10:50

Permalink

खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त

खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त प्रतिसाद!!! चिमुकल्यांच्या गोड गोड विश्वात हरवून जायला झालंय. पूर्ण वाचायला आत्ता वेळ मिळणार नाही. संध्याकाळी सावकाश वाचेन.
  • Log in or register to post comments

Submitted by सदस्यनाम on Wed, 07/15/2015 - 10:54

In reply to खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त by जडभरत

Permalink

ओळखले ओळखले. आपणास ओळखले.

ओळखले ओळखले. आपणास ओळखले. इसराइलचा मित्र तो. औषध;-)...
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on Wed, 07/15/2015 - 11:45

In reply to ओळखले ओळखले. आपणास ओळखले. by सदस्यनाम

Permalink

म्हणजे काय भाऊ?

म्हणजे काय भाऊ? इसराईल्चा भाऊ कोण आता?
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Mon, 07/20/2015 - 09:19

Permalink

मस्त धागा ..

उत्तम प्रतिसाद आलेत. वाचू साठवलेली आहे.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on Mon, 01/06/2020 - 18:16

Permalink

साठवलेली सगळ्यात महत्वची वाचन खुण

चार-पाच वर्षंपुर्वी हा लेख जेव्हा हाती आला तेव्हा नुकतेच लग्न झाले होते आणि ही वाचनखुण तेव्हाच साठवुन ठेवली होती. ५ नोव्हेम्बेर २०१८ ला पुत्र रत्न (धनत्रयोदशीला आला म्हणुन रत्न ;)) आले, त्यपेक्षा आता प्रकटले म्हणालो तरी चालेल. तेव्हा पासुन हा धागा वाचायचा हा संकल्प डोक्यात होता, शेवटी आज मुहुर्त सापडला. धागा कर्त्याला आणि प्रतिसाद देणार्‍यांना खुप खुप आभार. टीप. गेल्या चार वर्षांत काहीच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत ह्या निमित्ताने आल्या तर आनंदच आहे. भुमन्यु
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 01/12/2020 - 01:41

Permalink

अतिशय सुंदर आणि उपयुक्त धागा

अतिशय सुंदर आणि उपयुक्त धागा आहे. बादवे, मुलांना सूर्योदय आणि सूर्यास्त आवर्जून दाखवावेत. आमच्याकडून दोन पैसे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com