✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

न
निमिष सोनार यांनी
Fri, 03/27/2015 - 10:23  ·  लेख
लेख
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले! पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही! पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी. सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात. मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते. एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!! "मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!! आहे ना विरोधाभास? तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
10021 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

तुंम्ही बैल, बकरा असे

सतीश कुडतरकर
Fri, 03/27/2015 - 10:40 नवीन
तुंम्ही बैल, बकरा असे म्हणालात. माझ्याकडून हे घोडा, गाढव, डुक्कर
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Fri, 03/27/2015 - 10:41 नवीन
+१ असेच कण्हतो ! विशेष म्हणजे हे संकलन अजिबात वाटत नाही . आधी वाटलेलं ''रा गा'' वरच लेख आला कि काय? ( बैल ) खेडूत
  • Log in or register to post comments

मला पन रा गा ची आठवण आली

अत्रन्गि पाउस
Fri, 03/27/2015 - 11:53 नवीन
पण मग 'बैल' म्हटल्यावर थोडी तरी अक्कल गृहीत धरलीये हे लक्षात आले :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ह्म्म्म...

योगी९००
Fri, 03/27/2015 - 10:44 नवीन
फारच frustate झालेले दिसतात... यावरून एक जोक आठवला... एक बाई वैतागुन म्हणते "आमचा मुलगा लग्नानंतर एकदम बदलला..बायकोच्या हातचे बाहूले बनला. सगळ्या तिच्या गोष्टी नंदीबैलासारख्या ऐकायला लागलाय. बायकोची आई आता त्याला सख्या आईपेक्षा जवळची झालीय. आम्ही म्हणजे आता त्याला नकोसे झालोयं" मग थोड्यावेळाने तिच्या जावयाचा विषय निघाल्यावर मात्र तिच बाई कौतुकाने असे म्हणते" जावई माझा एकदम गुणी हो..माझ्या मुलीच्या शब्दाबाहेर अजिबात नाही. आणि मला तर आता इतका मान देतो की एकवेळ सख्या आईला विचारणार नाही पण माझा सल्ला घेतल्याशिवाय एक गोष्ट करणार नाही." आता घ्या...
  • Log in or register to post comments

(No subject)

रुस्तम
Fri, 03/27/2015 - 13:17 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

बैलाचा बळी

सुनील
Fri, 03/27/2015 - 10:48 नवीन
गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे काही फरक पडू शकेल काय? ;)
  • Log in or register to post comments

>

टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 11:46 नवीन
<<माई मोड ऑन>> आई म्हणतात आमचे हे म्हणजे शुध्ध नंदीबैल आहेत पण हे खरे तर आईंच्या ताटाखालचे मांजर आहेत <<माई मोड ऑफ>>
  • Log in or register to post comments

चायला माईंचा मोड गायबला

टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 11:47 नवीन
चायला माईंचा मोड गायबला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माई मोड आमचा © आहे म्हणुनच

जेपी
Fri, 03/27/2015 - 12:28 नवीन
माई मोड आमचा © आहे म्हणुनच गायबला *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आजचा गृहपाठ..

नाखु
Mon, 03/30/2015 - 09:13 नवीन
मोडात मोड नानांच्या माईंचा मोड ! मोडात मोड नानांच्या माईंचा मोड !! त्यातच प्रतीसाद द्यायची सगळ्यांना खोड !! ======================= वरील प्रकारे आपणही २ चोरोळ्या टंकाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आयुष्याचे असेच विविध अँगल्स

अन्या दातार
Fri, 03/27/2015 - 11:57 नवीन
आयुष्याचे असेच विविध अँगल्स तुम्ही तुमच्या एकेका लेखातून छान उलगडून दाखवताय सर. :)
  • Log in or register to post comments

आवडत्या लेखकाप्रतिचे तुझे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/27/2015 - 12:53 नवीन
आवडत्या लेखकाप्रतिचे तुझे उच्चार बघुन ड्वॉळे पाणावले. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तुम्ही अगदी ...

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 16:06 नवीन
@= आहात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/27/2015 - 17:00 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

धन्यवाद!!

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 16:10 नवीन
*YES*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

नि सो सर

होबासराव
Fri, 03/27/2015 - 12:12 नवीन
अछा तर हा तुमचा प्रोब्लेम आहे म्हणुन ईतके फ्रस्ट्रेट झालाय्त का ? तुम्हि पुण्यात राहता.. तिथे व्यावसाईक समुपदेशक असतिल बघा, हव तर मि गुगलुन तुम्हाला त्यांचे डिटेल्स देतो. समुपदेशकाचि मदत घ्या, सगळ ठिक होइल.. वाटल्यास घरच्या थोरामोठ्यांचि मदत घ्या, आणि एक लक्षात असु द्या मि पा ला आपल्या सारख्या आधुनिक टॉलस्टॉय चि नितांत आवश्यकता आहे, तेव्हा लवकर बरे व्हा. तुर्तास इतकेच. काळजि घ्या.
  • Log in or register to post comments

हा हा हा

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 16:01 नवीन
8-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

माणसे जोडणे.:- लेखक निमिष सो (अध्यक्ष गहन विचारि सा. संमेलन)

होबासराव
Fri, 03/27/2015 - 13:24 नवीन
" पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही? " http://www.misalpav.com/node/29763 प्रस्तुत लेखकाने २ वेगवेगळ्या लेखात परस्पर विरोधी मते मांडलेली आहेत, तरी आम्हास असे वाटते कि हे जिलबीकार (साहीत्यकार च्या धर्तिवर) डोक्यावर पडले असुन जर त्यानि "डोक्यावर पडण्याचे फायदे (स्वःता करीता) आणि तोटे समाजाकरीता" ह्या विषयावर होणार्‍या आगामि लामणगाव (बु) साहित्य संमेलनात आपले विचार मांडावे.
  • Log in or register to post comments

विरोधाभास नाही..

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 16:05 नवीन
"पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?" तसा प्रयत्न करत नाही म्हणूनच सून, मुलगी, मुलगा अशी जातीव्यवस्था आपण कौटुंबिक जीवनात पाडतो... सगळ्यांना सारखे मानत नाही. सुनेला परके मानतो. वगैरे. सुनेला "माणूस" म्हणून तरी कमीत कमी जोडण्याचा प्रयत्न होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

ऑक्टोपस

'पिंक' पॅंथर्न
Fri, 03/27/2015 - 14:17 नवीन
अहो लग्न झालेला पुरुष ऑक्टोपस असतो. ऑक्टोपस ला तीन ह्रदय असतात. लग्न झालेला पुरुष बायकोवर, आई वर आणि स्वतःवर पण तीतकेच ह्रदयापासुन प्रेम करतो. पण ती तीन ह्रदय वेगवेगळी असल्यामुळे त्याची तारांबळ उडते.
  • Log in or register to post comments

तिसरे हृदय

अन्या दातार
Fri, 03/27/2015 - 16:40 नवीन
मला वाटले तिसरे हृदय मैत्रिणीवर म्हणताय ;) लैच पोपट केलात. आधीच दगड/धोंडा का स्प्रिंग हे कळायच्या आत ही बैलाची पोस्ट वाचतोय. त्यात तुम्ही ऑक्टोपस आणलाय. एकंदरीत जे पिंडी ते ब्रह्मांडीच्या विरुद्ध "जे ब्रह्मांडी ते पिंडी" असा उलटा क्रम लागतोय वाटते. मिपावर ब्रह्मज्ञान होते म्हणतात ते उगीच नाही कै. जळो मेले सरांच्या लेखनाला नावे ठेवणारे. पिंक पँथर्न, उपयुक्त भर घातलीत लेखात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न

अजून एक प्राणी विसरलात ...जो या लेखात सुरुवातीला आहे....

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 19:52 नवीन
ओळखा पाहू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ऑक्टोपस ला हृदय असते? आणि असले तर इतके? तीन तीन?

निमिष सोनार
Fri, 03/27/2015 - 16:08 नवीन
आणि आठ पायांचे काय त्याच्या? *acute*
  • Log in or register to post comments

आणि ते आठ पाय तारेवरची कसरत

'पिंक' पॅंथर्न
Fri, 03/27/2015 - 17:35 नवीन
आणि ते आठ पाय तारेवरची कसरत करण्यासाठी नको का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/27/2015 - 20:48 नवीन
आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं! ह्रदय अगदी पिळ वटून आले.
  • Log in or register to post comments

+१

स्वप्नज
Mon, 03/30/2015 - 07:09 नवीन
हो ना. हृदय वटून गेले अगदी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नारायण ! नारायण !

मदनबाण
Mon, 03/30/2015 - 07:49 नवीन
नारायण ! नारायण ! बिचारे नवरोबा ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
  • Log in or register to post comments

काही अपवाद वगळता सगळे "बैल" प्रतिसाद आले..

निमिष सोनार
Mon, 03/30/2015 - 16:30 नवीन
आला ना राग बैल म्हटल्यावर!! आता कळलं ना ?
  • Log in or register to post comments

बुलशिट? ;)

बॅटमॅन
Mon, 03/30/2015 - 17:28 नवीन
बुलशिट? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

मन घट्ट करा आणि आल आहे त्याला

पॉइंट ब्लँक
Mon, 03/30/2015 - 16:39 नवीन
मन घट्ट करा आणि आल आहे त्याला सामोरे जा ;)
  • Log in or register to post comments

आधीच्या लेखांमुळे लोकांनी

हाडक्या
Mon, 03/30/2015 - 16:41 नवीन
आधीच्या लेखांमुळे लोकांनी बरेच मुद्दे सिरिअसली घेतले नाहीत असं दिसतंय..
सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात. मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते. एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!! "मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!
लेखकाचे स्वतःचे मत जरी इथे बाजूला ठेवले तरी ही खूप प्रकर्षाने जाणवणारी दुटप्पेपणाची बाब आहे. अनुभवी लोकांनी याबाबत मते मांडायला तशी काहीच हरकत नसावी. (लेखक लेखनाबाबत गंभीर आहे असे गृहित धरुन प्रतिसाद आहे) लेखन कोणाचे आहे हे पाहून आलेल्या प्रतिसादांबाबत, "काय" लिहिलेय यापेक्षा "कोणी" लिहिलेय, हे पाहून प्रतिसाद अजूनही दिले जातात तर.. :|
  • Log in or register to post comments

अरे बैल नसलेल्यानो, तुम्हाला कुणीतरी बैल म्हणायची वाट ....

निमिष सोनार
Mon, 03/30/2015 - 16:42 नवीन
....पाहताय का? जरा विचार करून, मूळ विषयाला धरून प्रतिसाद द्या की रे मित्रांनो!!!कौटुंबिक विषयाला धरून प्रतिक्रिया द्या..जरा सिरीयस व्हा जीवनात !!
  • Log in or register to post comments

जरा सिरीयस व्हा जीवनात !!

बॅटमॅन
Mon, 03/30/2015 - 17:28 नवीन
जरा सिरीयस व्हा जीवनात !!
व्हाय सो सीरियस???? -जोकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

ही नीड्स स्माईल ऑन हिज फेस. :

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/30/2015 - 18:14 नवीन
ही नीड्स स्माईल ऑन हिज फेस. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/30/2015 - 18:17 नवीन
सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक हा प्रश्ण असल्यामुळे तुर्तास सिरियस होणं पुढे ढकलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक

हाडक्या
Mon, 03/30/2015 - 18:44 नवीन
सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक हा प्रश्ण
ब्लॅक व्हा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्लॅक झालं की मागे कै.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/30/2015 - 18:47 नवीन
ब्लॅक झालं की मागे कै. लावायला लागतं ओ. बाकी रेशिष्ट कॉमेंट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हा हा हा...

हाडक्या
Mon, 03/30/2015 - 19:26 नवीन
हा हा हा... तुमचीच द्वयार्थी अतिशिष्ट अन रेशिष्ट कमेंट.. ;) बादवे, इतरे अज्ञ जणांसाठी, हे कै. ब्लॅक म्हंजे हे अन ह्यांची आडनाव व्युत्पत्ती इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

"हादाक्या" च्या प्रतिसाद पहिला सिरीयस प्रतिसाद आला...

निमिष सोनार
Mon, 03/30/2015 - 16:44 नवीन
..कौटुंबिक राजकारणाच्या रणरणत्या उन्हात दिलास्याची थंडगार झुळुक आल्यासारखी वाटली...
  • Log in or register to post comments

@ ..कौटुंबिक राजकारणाच्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/30/2015 - 18:32 नवीन
@ ..कौटुंबिक राजकारणाच्या रणरणत्या उन्हात दिलास्याची थंडगार झुळुक आल्यासारखी वाटली...>>> =))))) वारलो ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

तुमच्या लेखनाचा इतरांवर

हाडक्या
Mon, 03/30/2015 - 18:46 नवीन
तुमच्या लेखनाचा इतरांवर "असाही" परिणाम दिसतोय की काय बुवा.. :))) (बादवे, मी पण लग्गेच वारलोय.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:)

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/30/2015 - 19:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा