आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो.
मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ? एक शक्यता
अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्त: फणी
तं च् क्रौञ्चपते:शिखौ; स गिरिजासिंहोऽपि नागाननम् !!
गौरी जन्हुसुतामसूयति कलानाथं कपालानलो
निर्विण्ण:स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हालाहलम् !!
शंकराच्या गळ्यातला भुकेला नाग गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला खाऊं इच्छित आहे. पण नागाचेही काय खरे नाही. कार्तीकेयाचे वाहन जो मोर तो नागाला गिळंकृत करावयास टपलेला आहेच. पार्वतीचे वाहन सिंह, त्याचे लक्ष गणपतीचे डोके असलेल्या हत्तीकडेच लागलेले. पार्वती गंगेचा मत्सर करत आहे तर कपाळावरचा अग्नी चंद्राचा ! बोला. असल्या गृहकलहाला वैतागलेला "महादेव" हालाहल पिणार नाही तर काय करणार ?
कवींनी आदीमातेला काशीपुराधिश्वरी का केले ? तिची प्रार्थना करतांना "भिक्षां देही कृपावलंबन करि माताअन्नपूर्णेश्वरी" असे कां म्हटले ? अगदी साधे कारण. त्यांनी शंकराच्या घरांत डोकावून पाहिले, काय दिसले तेथे ?
स्वयं पंञ्चमुख: पुत्रौ गजाननषडाननौ
दिगंबर: कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ? !!
घरांत खाणारी तोंडेच जास्त हो. स्वत: घरधनी पंचमुखी, दोन मुले; त्यातील एकाला तोंड हत्तीचे तर दुसर्याला सहा तोंडे आणि त्यात भर घालावयाला हा गृहस्थ दिगंबर ! आता घरात "अन्नपूर्णा" आहे म्हणूनच संसार चालला आहे नां !!
शंकराचा निवास पृथ्वीवर. तेव्हा कवींनी त्याच्या घरांत जास्त वेळा डोकवावे हे उचितच पण म्हणून क्षीरसागरातील विष्णूची सुटका झाली असे समजू नका. जगन्नाथपुरीच्या देवळातील विष्णूची मूर्ति लाकडाची आहे. का बरे ? उत्तर कवींकडेच मिळणार
एका भार्या प्रकृतिमुखरा चञ्चला च द्वितीया
पुत्रस्त्वेको भुवनविजयी मन्मथो दुर्निवार: !!
शेष: शय्या शयनमुदधौ वाहन: पन्नगारि:
स्मारं स्मारं स्वगृहचरितं दारूभुतो मुरारि: !!
या "वैभवभूषित वैकुंठेश्वर" गृहस्थांचेही हाल काही कमी दिसत नाहीत. एक बायको, सरस्वती, ती बडबडी, दुसरी लक्ष्मी, ती चंचल. एक मुलगा, मदन, तो सर्व जगाला जिंकण्याचा उपद्व्याप करीत बसलेला, झोपायाला शय्या कसली ? ती शेष नागाची, शयनमंदिर म्हणजे समुद्र व वाहन नागांचा शत्रु गरुड ! हे ग्रुहसौख्य आठवून आठवून विष्णूने "काष्टवत" होणेच पत्करले. त्रिखंडात कोठेही जा (बिचार्या) नवर्याचे नशिव साले फुटकेच.
असो या घ्ररच्या कटकटींना जरा बाजूला ठेवून जरा हलकेफुलके बघु या.
मराठीत छेकापन्हुतीवरच्या लेखावरील (http://www.misalpav.com/node/15896 ) प्रतिसादात श्री बॅटमन यांनी संस्कृतमधील उदाहरणाबद्दल विचारले होते. आज एक उदाहरण देतो. बदल म्हणून कै.ल.गो.विंझे यांनी केलेला काव्यानुवाद देत आहे.
या पाणिग्रहलालिता, सुसरला, तन्वी, सुवंशोद्भवा
गौरी, स्पर्शसुखावहा, गुणवती, नित्यं मनोहारिणी !!
सा केनापि हता; तया विरहितो गन्तुं न शक्तोऽस्म्यहं
रे भिक्षो ! तव कामिनी ? न हि न हि ! प्राणप्रिया यष्टिका! !!
"जी हस्ते कुरवाळिली,सरल जी तन्वी सुवंशातली
गौरी, अन् गुणवान्, मनोहर सुखस्पर्शा सदा लाभली
नेली ती कुणिशी ! तिच्याविण न मी जाऊं शके सत्वर !"
"कां भिक्षो ! तव कामिनी ?" " नच तसें, काठी प्रिया सुंदर !"
( या वेळी संस्कृत शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत. गरज आहे कां?)
आज इथेच थांबू.
शरद
वाचने
32432
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशाच अर्थाचं एक सुभाषित होतं
पुढे ओळ अशी:
In reply to अशाच अर्थाचं एक सुभाषित होतं by सूड
मस्त लेख...
मध्यंतरी वाचण्यात आलेलं चित्रकाव्यामधलं एक सुभाषितः
वाहवा !
In reply to मध्यंतरी वाचण्यात आलेलं चित्रकाव्यामधलं एक सुभाषितः by सूड
वा!
In reply to वाहवा ! by डॉ सुहास म्हात्रे
:))
In reply to वा! by साती
:))
In reply to वा! by साती
कोणी यथा काष्ठम चं काष्ठम
यथा काष्ठम च काष्ठम च,
खुप वर्षांनी वाचलं हे. आवडतं
In reply to यथा काष्ठम च काष्ठम च, by स्रुजा
माझा जरा उलटा प्रवास झाला या
In reply to खुप वर्षांनी वाचलं हे. आवडतं by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख आणि प्रतिसाद वाचून
रोचक लेखन व चर्चा
आमचे आवडते सुभाषित
कस्तुरी जायते कस्मात् ? को
सु भाषित ?
सुभाषित? नाही , थोडे मनोरंजन
In reply to सु भाषित ? by रमेश आठवले
आपला लेख आवडला.
In reply to सुभाषित? नाही , थोडे मनोरंजन by शरद