Skip to main content

गारवा कृपेचा..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानाचीया डोहा जाऊ मी कशास, चरणांची आस मजलागी | माऊलीचे प्रेम, झरा करुणेचा, गारवा कृपेचा, पुरेसाहे | नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | तुम्हा माझी आण, पुरवा तहान, दर्शनास प्राण व्याकूळले | मुमुक्षु
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2264
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | व्वा..सुंदर.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

गारवा कृपेचा, वा वा ... छान कविता.. ज्ञानाचीया डोहा येथे ज्ञानाचिये डोहा असे केले तर कसे वाटेल? 'पुरवा तहान' पेक्षा हट्ट पुरवा/ तहान भागवा असे बरे वाटते. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

"ज्ञानाचीये डोहा" जास्त योग्य वाटतंय! तहान भागवायचीच असते. अगदी योग्य. मला खरे म्हटले तर यात हट्ट दाखवायचा होता. त्यामुळे तसे लिहिलेले आहे. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)

तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार! मुमुक्षु

नेहमीप्रमाणेच सुंदर प्रासादिक काव्य..! आपला, (मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.