✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

न
निमिष सोनार यांनी
Tue, 03/24/2015 - 11:27  ·  लेख
लेख
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील. क्वचित असा एखादा असतो जो त्या कागदाला हातात घेऊन त्याला उलगडून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कागदात काय लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या हरवलेल्या पुस्तकात ठेवतो. रस्त्यात एखादा स्प्रिंग आणि स्पंज सापडला तर जरूर कुणीतरी त्याला दाबून बघतो. रस्त्यात दगड असला तरी कुणी सहसा त्याच्या वाटेला जात नाही! समजा तुम्ही एकदा जगाला दाखवले की तुम्ही कुणालाही नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करता, मऊ आहात, स्पंज आणि स्प्रिंग आहात तर तुम्हाला सतत दाबून ठेवणारे लोक या जगात पुष्कळ मिळतील. पण जर जगाच्या दृष्टीने तुमची प्रतिमा स्प्रिंग अथवा स्पंज ऐवजी दगड अशी असली तर कुणी तुमच्या वाटेला जाईल का? नाही. कारण दगडाला स्प्रिंग सारखे दाबण्याचा प्रयत्न केला तर दाबणाऱ्याचा हात रक्तबंबाळ होईल तसेच दगडात इतरांचे रंग स्पंजासारखे शोषले जाण्याची शक्यता नसतेच! नेहमी दगड बनावे असे नाही पण तुम्ही जर स्प्रिंग आणि स्पंज असाल तरी तुमची दुसरी बाजू मात्र विसरू नका. म्हणजे कसे ते सांगतो. तुम्हाला माहीत आहेच की निसर्गनियमा नुसार म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच! त्यानुसार स्पंज आणि स्प्रिंग याना "प्रतिक्रियेची" दुसरी बाजू असतेच. त्यानुसार, दाबले जाण्याची दुसरी बाजू (गुणधर्म) त्याच तीव्रतेने उसळणे हीच असते. तुम्ही स्प्रिंग असाल म्हणजे सतत दाबले जात असाल (म्हणजे भावनांचे दमन, सतत फक्त इतरांच्या स्वार्थाचा विचार करणे, स्वत:चा विचार सोडून!) तर स्प्रिंग हा जास्त दाबल्यास उसळतो आणि दगडापेक्षाही जास्त इजा करतो हे मात्र लोकांना दाखवायला विसरू नका. एवढेही अपेक्षांचे ओझे आणि वजन मनाच्या स्प्रिंगवर ठेवू नका की तुम्ही तुमचा उसळणे हा गुणधर्म विसरून जाल किंवा तुमच्यात उसळण्याची ताकदच उरणार नाही. तुम्ही स्पंज असाल तर लक्षात ठेवा की एवढेही स्पंज बनू नका की तुमच्यात शंभर टक्के फक्त इतरांचा रंग शोषला जाईल आणि तुमच्या स्वत:च्या रंगाला जागाच राहणार नाही. स्पंजाची दुसरी बाजू (गुणधर्म) सुद्धा लोकांना दाखवायला विसरू नका. म्हणजे वेळ पडल्यास पिळल्यानंतर एका क्षणात स्पंज हा स्वत:तले शोषलेले सगळे काही बाहेर टाकून रिकामा होवू शकतो हेही जगाला दाखवून द्या. स्पंजाला अशा प्रकारे रिकामा होण्यास मदत करणारा सव्वाशेर, म्हणजेच त्याला पिळून (चांगल्या अर्थाने!) रिकामा करणारा आणि त्यात स्वसामर्थ्याचे रंग भरणारा कुणीतरी असतोच आणि तो कधीतरी भेटतोच. तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग? पण लक्षात घ्या की तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
9452 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

अवघड आहे उत्तर देणे

सांगलीचा भडंग
Tue, 03/24/2015 - 13:29 नवीन
अवघड आहे उत्तर देणे . सध्या तरी मला ओस्ट्रेलिया आणि भारताच्या मेच साठीचा आणि फ़ाइनल चा स्टेडियम मधला केमेरा व्हायला आवडेल . फुल झूम मागे पुढे करत सुखाने मेच बघत येईल. नंतर विमान व्हायला आवडेल . सगळ्या प्रसिद्ध ठिकाणाचा बर्ड'स आय व्हू बघायची इच्छा आहे
  • Log in or register to post comments

निर्वाण

कपिलमुनी
Tue, 03/24/2015 - 13:31 नवीन
लेख वाचून निर्वाण प्राप्त झाले आहे.
  • Log in or register to post comments

फोटो पाठवा तुमच्या

यसवायजी
Tue, 03/24/2015 - 13:39 नवीन
फोटो पाठवा तुमच्या चरनकम्लांचा. _/\_
  • Log in or register to post comments

फोटोबरोबर आम्हाला पादुकाही

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/24/2015 - 14:02 नवीन
फोटोबरोबर आम्हाला पादुकाही द्या पाठौन...रोज सकाळ संध्याकाळ डोकं आपटीन म्हणतो गुरुमाउली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

ऑ!

विशाखा पाटील
Tue, 03/24/2015 - 14:02 नवीन
चुकून आस्था/संस्कार या वाहिन्यांची लिंक उघडली की काय?
  • Log in or register to post comments

ऑ, अच्च जाल्ल ....

स्पा
Tue, 03/24/2015 - 14:16 नवीन
ऑ, अच्च जाल्ल ....
  • Log in or register to post comments

=========

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/24/2015 - 18:11 नवीन
Image removed. ========= Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खर्र-खर्रं सांगा सर, तुम्हाला

अन्या दातार
Tue, 03/24/2015 - 14:28 नवीन
खर्र-खर्रं सांगा सर, तुम्हाला हा लेख अत्रुप्त यांच्या या प्रतिसादावरुन सुचला का?
  • Log in or register to post comments

एवढा जोर लाऊन ताणलेला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/24/2015 - 16:37 नवीन
एवढा जोर लाऊन ताणलेला प्रतिसाद आजवर पाहण्यात आला नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ह्म्म्म

आदिजोशी
Tue, 03/24/2015 - 15:45 नवीन
आई बाबा, भाऊ बहिणी, मित्र मैत्रीणी, शिक्षक, वर्गमित्र, बॉस आणि बायको, ह्यांच्या मते आम्ही दगड आहोत :)
  • Log in or register to post comments

तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग

सस्नेह
Tue, 03/24/2015 - 15:58 नवीन
तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात! लक्षात ठेवा ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मिपाचे साने गुर्जी

कपिलमुनी
Tue, 03/24/2015 - 15:48 नवीन
आज या धागामृताबद्दल धागाकर्त्यस मिपाचे साने गुर्जी पुरस्काराने पुस्पगुच्च देउन सन्मानण्यात येत आहे
  • Log in or register to post comments

ही अशी प्रवचनं केव्हापासून

सूड
Tue, 03/24/2015 - 15:51 नवीन
ही अशी प्रवचनं केव्हापासून होतायेत?
  • Log in or register to post comments

उगवा सूड!!

निमिष सोनार
Tue, 03/24/2015 - 16:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

आपल्या कर्माचे(लेखाचे) आपण स्वत: मूल्यमापन करू नका:- नि नि मा जी

होबासराव
Tue, 03/24/2015 - 16:28 नवीन
जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते :- ईति निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
  • Log in or register to post comments

स्पंज

तिमा
Tue, 03/24/2015 - 16:53 नवीन
आम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारा स्पंज आहोत. त्यामुळे , जो तो आम्हाला लपवण्याचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments

स्पंज ठीक आहे, बराच शांत

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/24/2015 - 18:03 नवीन
स्पंज ठीक आहे, बराच शांत प्रकार आहे तो. :) नशीब, तुम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारी स्प्रिंग नाही ते ! ते प्रकरण फार क्लेशदायक आसतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

भा पो

सस्नेह
Tue, 03/24/2015 - 20:26 नवीन
आण्भवाचे बोल ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आण्भवच पण ते लोकांचे होते आणि

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/25/2015 - 12:42 नवीन
आण्भवच ! पण ते लोकांचे होते आणि आम्ही शिवून दिले होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सोफे का अजुन काही

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/25/2015 - 14:39 नवीन
सोफे का अजुन काही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यांचा व्यवसाय पाहता, ही

सस्नेह
Wed, 03/25/2015 - 15:12 नवीन
त्यांचा व्यवसाय पाहता, ही 'कुशन्स' काही वेगळ्या प्रकारची असावीत असे वाटते +D 'मानवी स्पंज' हम्म...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/25/2015 - 16:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आय्यायाया!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/25/2015 - 17:56 नवीन
आय्यायाया! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आई ग ... मेलो मी हसून हसून

अभिजीत अवलिया
गुरुवार, 03/26/2015 - 03:44 नवीन
आई ग ... मेलो मी हसून हसून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे फारच भारी, हसता हसता

राजाभाउ
Wed, 03/25/2015 - 11:10 नवीन
हे फारच भारी, हसता हसता खुर्चीतुन पडलो असतोना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आजचा विषय:

सतीश कुडतरकर
Tue, 03/24/2015 - 17:49 नवीन
आजचा विषय: ढुंगण टेकवण्याचा सोफा.
  • Log in or register to post comments

माझ्या मना बन दगड..

खटपट्या
Wed, 03/25/2015 - 04:49 नवीन
माझ्या मना बन दगड..
  • Log in or register to post comments

हू आर यु?

मनीषा
Wed, 03/25/2015 - 07:44 नवीन
हू आर यु? हू एम आय? आय इन द यु इन द यु इन विच आय इन द यु ......... *scratch_one-s_head* * *SCRATCH*
  • Log in or register to post comments

.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/25/2015 - 08:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

केम गोर्धनभाई...चोक्कस :- असा मी आसामी

होबासराव
Wed, 03/25/2015 - 12:30 नवीन
इंग्लिस त असा बोल्ते जसा mad in england :- :- असा मी आसामी समर्था नि मुर्खांची ईतकी लक्षणे लिहुन ठेवलि तरी पण ती कमि वाटतात :- पु.ल.
  • Log in or register to post comments

इंग्लिस तं एटला हायक्लास

सूड
Wed, 03/25/2015 - 14:46 नवीन
इंग्लिस तं एटला हायक्लास बोल्ते जसा mad in england
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

गुड वन सर. गुड वन. इट रियली

वेल्लाभट
Wed, 03/25/2015 - 14:48 नवीन
गुड वन सर. गुड वन. इट रियली मेड मी थिंक. :)
  • Log in or register to post comments

तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज

मोहनराव
Wed, 03/25/2015 - 19:33 नवीन
तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग? च्यामारी कायच समजना.. जरा अजुन विस्कटुन सांगा की राव!! (डोक्याचा दगड झालेला) मोहनराव.
  • Log in or register to post comments

मला ओळखणारे ह्या जगातले

अभिजीत अवलिया
गुरुवार, 03/26/2015 - 03:42 नवीन
मला ओळखणारे ह्या जगातले सर्वजन मला स्पंज समजतात. फक्त आमची अर्धंगिनी सोडून. तिच्या मते आम्ही पाषाण आहोत.Smile
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा