Skip to main content

सोमनाथपुरा

लेखक पॉइंट ब्लँक यांनी रविवार, 22/03/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे. कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला. तेंव्हापासून ह्या मंदिरात पूजा केली जात नाहि. मुख्य द्वारातून प्रवेश करताच दिसणारे मंदिर DSC_0217 मंदिराचा मागून काढलेला फ़ोटो DSC_0248 अजून एक DSC_0668 मंदिराच्या भिंती विविध देवतांच्या मूर्त्यांनी सजल्या आहेत. DSC_0636 DSC_0629 लढाईला चालेले सैनिक DSC_0616 ह्या मंदिरातील सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही महिशासुरमर्दिनिची. आक्रमकता आणि नाजुकतेचा छान संगम Beautiful Slaughter आठ हातांची नृत्यलक्ष्मी. DSC_0465 बहुदा बालाजी असावेत DSC_0460 ही कल्पतेचा उच्चांक गाठणारी नृसिंह लक्ष्मीची मूर्ती . लक्ष्मीने कमळावर पाय ठेवला आहे. आणि त्या दबलेल्या कमळाला हत्ती आधार देतोय. DSC_0442 आता ईतर देवता DSC_0432 DSC_0423 DSC_0402 DSC_0397 ही सरस्वती असावी DSC_0385 ही लक्ष्मी DSC_0347 अजून एक देवी DSC_0334 शेष नागावर बसलेले विष्णू DSC_0300 मंदिरचा द्वारपाल DSC_0283 गर्भगृहातील मूर्ती DSC_0578 DSC_0574 DSC_0570 आत छतावर कोरेलेले कमळ DSC_0561 ह्या मंदिराच्या एका कोपऱ्यात काही मोडक्या मूर्ती आहेत. ह्या बहुदा इतर मोडलेल्या मंदिरातील मुख्य देवता असाव्यात DSC_0266 DSC_0269 DSC_0271 DSC_0272 ह्यात दोन जैन मुर्त्यासुद्धा आहेत DSC_0272 DSC_0279 सोमानाथापुराचे हे मंदिर कलेचा एक खजाना आहे इथे लहान मोठ्या हजारो मूर्त्या कोरल्या आहेत. सोमनाथपुरा आणि तळकडु एक दिवसात पाहता येतात. सोमनाथपुरामध्ये जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाहि. बेंगलोर म्हैसोर हायवेवर नाष्टा करून सोमणाथपुराला भेट द्या आणि जेवण्यासाठी तळकडुला जा. तळकडुचे फोटो लवकरच टाकेन.

वाचने 13225
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

अप्रतिम आहेत फोटोज. पाहतच राहावेसे वाटते.

.....आजही जिवंत वाटणारी ही शिल्पे पाहुन आपल्या पुर्वजांनी ही कला विकसीत करुन तिला इतक्या उंचीवर नेउन ठेवले याचा अभिमान वाटतो पण त्यांना असे विद्रुप करुन समाधान मिळविणारी 'सुलतानी वॄत्ती' किती 'विकॄत व सुंदरतेची मारेकरी' होती व आहे याचाच पुरावा मिळतो. छान प्रकाशचित्रे व माहीती, धन्यवाद श्री.पॉइंट ब्लँक

वाह! वल्ली या मूर्त्यांवर अजून प्रकाश टाकतीलच अशी अपेक्षा. तोपर्यंत तुम्ही जरा विनेटिंगचा परिणाम कमी करा. :-) (फोकसिंग, कॉम्पोजिशन इत्यादी बाबी खूप छान आहेत.)

In reply to by एस

ह्म्म. प्रयत्न करतो. मूर्तीच्या आजू बाजूला असणारे डिस्ट्रॅक्शन झाकायला म्हणून विनेटिंगचा उपयोग सुरु केला होता. पण जरा दुरूपयोग होतोय असं दिसतय. प्रामाणिक मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. :)

सुंदर फोटो ! बेलुर-हळेबिडु च्या मंदिरांची आठवण झाली !

सुंदर छायाचित्रे आणि उपयुक्त माहिती. तळकडुच्या प्रतीक्षेत! तुमच्या कुरुडुमळे आणि नुग्गेहळ्ळी वरच्या लेखांचे दुवे देऊन मालिका बनवा एक यावर.

ठिकाणाची अजून माहिती हवी होती. बाकी पोस्ट प्रोसेसिंग्मधे रामू एफेक्ट जाणवतो आहे

In reply to by पॉइंट ब्लँक

दुव्याबद्दल धन्यवाद ! रामू म्हणजे रामगोपाल वर्मा ! त्याच्या चित्रपटामध्ये गडद शेड्स वापरल्या जातात म्हणून रामू इफेक्ट

ही जागा प्रत्यक्ष पाहिली आहे. सुंदरच आहे. पण तुम्ही काढलेल्या फोटोंना 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असंच म्हणावं वाटतं. :)

फोटो सुंदर फ्रेम्स, कंपोझिंग सुंदर पोस्ट प्रोसेसिंग मुळे मजा जातेय पण , एकदम शार्प का केलेत फोटो , ते विनेतींग टाळता आले तर बघा

In reply to by स्पा

पोस्टप्रोसेसिंग एकदा चालू केले की कुठे थांबायचे हे ठरवणे अवघड आहे. :-) अतिरेक होउ नये ह्याची काळजी घेईन ह्यापुढे. धन्यवाद.

आत्ताच म्हैसुर ट्रिप केली तेव्हा ही जागा पहायचं फार मनात होतं पण शक्य झालं नाही. तुमच्यामुळे आज किमान इतके सुंदर फोटो तरी पहाता आले. धन्यवाद!!

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद. पण जर संधी मिळाली तर सोमनाथपुरा आणि तळकडुला अवश्य भेट द्या. फोटोमध्ये एक टक्काही टिपता आले नाही. प्रत्यक्ष पहाण्यात मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.

मूर्ती आणि मंदिर दोन्हीही सुंदर आहेत!

जबरदस्त. मुर्त्यांच्या आभूषणांचे डिटेल्स कसले आलेत. कमाल शिल्पकला. सुंदर फोटो.

खूप उच्च फोटो. यानिमित्ताने एक माहिती सांगायला हरकत नाही. साधारणपणे असे मानले जाते की भारतीय परंपरेत शिल्पी इ. लोकांची नावे कोरून ठेवायची पद्धत नव्हती. पण चालुक्य आणि होयसळ राजवटींच्या काळात अनेक शिल्पींची कोरलेली नावे शिलालेखांतून मिळालेली आहेत. होयसळांपैकी बोलायचे तर मल्लितम्मा नामक त्यांचा शिल्पकार लै फेमस होता. चाळीसेक मूर्त्यांजवळ तरी त्याचे नाव कोरलेले सापडले आहे. काही दगडांच्या खाणींजवळही कामगारांची नावे कोरलेली सापडली आहेत. आर्किटेक्टचे नाव कोरल्याचे महाराष्ट्रात किमान एक उदाहरण आहे- रायगडावर एका पायरीवर हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले सापडते- "सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर".

In reply to by बॅटमॅन

ही एकदम उपयुक्त माहीती दिलीत. होयसाळा मंदिरांसंदर्भात जकनाचारी हे नावसुद्धा बर्याचवेळा ऐ़कण्यात येते. त्यांच्या नावाने कर्नाटकात एक पुरस्कारही आहे. त्यांचा जन्मगाव कैदाला आहे. तिथे एक केशवाचे मंदिर आहे. इतकी सुंदर केशवाची मूर्ती आजवर पहाण्यात आली नाही. लिहिनच त्या विषयी लवकरच.

In reply to by पॉइंट ब्लँक

कैदाला गावच्या माहितीबद्दल धन्यवाद! बाकी जकणाचार्य यांचे नाव खिद्रापूरसंदर्भातही ऐकलेले आहे. पाहिले पाहिजे.

अतिशय रेखीव आणि नजाकतदार शिल्पे. डोळ्यांना मेजवानी.