वार्यावर मंद निनादे
ती श्रीकृष्णाची मुरली
त्या अवखळ स्वरलहरींना
अवखळशी कविता स्फुरली...
ल्याइली आज धरणीने
का गर्भरेशमी शाल
किरणांनी आकाशात
उधळला कशास गुलाल
पसरला रोमरोमी का
अवखळसा एक शहारा
का कसा कुणास्तव आज
हा निसर्ग नटला सारा
पसरली सुखाची चर्या
अन् उडून गेली खंत
अवतरे आज धरणीवर
तो ऋतुराज वसंत
अदिती जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1819
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी शब्दाशब्दातनं आनंद
अगदी शब्दाशब्दातनं आनंद ओसंडून वहातोय...
सुंदर कविता!
धन्यवाद!
क्या बात...! क्या बात...!
क्या बात...! क्या बात...! क्या बात...!
सलाम स्विकारा !
सुरेख. खूप आवडली कविता.
सुरेख. खूप आवडली कविता.
कविता आवडली ... छान .
कविता आवडली ... छान .
सुप्पर
मस्त लयबद्ध काव्य
व्वाह
परत एकदा दर्जेदार रचना!!
दर्जा !
क्लास लिहिली आहे !
मस्त
आवडली