काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात, विधानसभा, पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही.
पण गोर्या माकडांच्या देशात ते नसल्याने, त्यांना देशप्रेमी आणि स्वाभिमानी म्हणायला हरकत नसावी !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
पण गोर्या माकडांच्या देशात ते नसल्याने, त्यांना स्वाभिमानी म्हणायला हरकत नसावी !
काय मारले आहे राव! मानलं बॉ... :)
हो, स्वाभिमानी आहेतच आमच्या गावचे पुढारी. देशात राहून मड्याच्या टाळूवरचे लोणी स्वाभिमानाने खात आहेत. आपल्या सारखे थोडेच मर-मर करत शिकून दुसर्या देशात जाऊन कष्ट करत बसलेत.
आपला,
(स्वाभिमानी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
लै भारी फोटू सकट असल्याने अंमळ नेत्रचित्रण (म्हराटीत व्हिजुअलाइज) झालं ...
जबरी.. बाकी इकडच्या ट्राफिकला तुम्ही नावं ठेवता की काय असं वाटता वाटता राहून गेलं ...
-(अभिमानी) टस्कर
स्वाभिमानी भारतीय लोणी खातात, थुंकत नाहीत. पान मात्र पचाक्कन रस्त्यावर थुंकतात. पण ते पान मढ्याच्या टाळूवरचे नसल्याने, ते क्षम्य आहे असे मानतात.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
भास्कर,
तुम्ही पोट तिडीकेने लेहीलेला लेख वाचला . तुमच्या भावना समजल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा बर्याच ठिकाणी रस्ता कमी अन् म्रुत्युचा सापळा जास्त वाटतो. बेजबाबदार वाहनचालकांमुळे अनेकांनी या रस्त्यावर प्राण गमावले आहेत.
माझ्या गावात बर्याच लोकांकडे बायोगॅस होता. त्याचा वापरही बरेच दिवस होताना मी पाहीला आहे. परंतु का कुनास ठाउक लोक आजकाल जास्त वापरत नाही. ईतर ईंधनाचे प्रकार लोकांना जास्त सोयीचे वाटतात.
शेवट्चा फोटो पाहुन जरा वैषम्य वाटले. गरीब शेतकर्याने विजबील भरले नाही म्हणुन तत्परतेने शेतपंपाची वीज कापनारे कर्तव्यद्क्ष अधिकारी अश्या ठिकाणी आपले डोळे बन्द करुन आंधळे असल्यासारखे का वागतात हेच कळत नाही.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
प्रतिक्रिया
सचित्र वर्णन
नक्कीच
भन्नाट
लै भारी
तिडीक
स्वाभिमानी
भास्करशेठ,
+१
शेवटचा
चला इथे
ह्म्म..
लेख छान
मन विषन्न झाले ..
टोचले.