लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं:
दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो
असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो
काम असतं खूप! पण खरंच का वेळ नसतो?
आज निघालो कामावर, पॉलीश नव्हतं बुटांना
घेतली डबी, म्हंटलं लावावं पॉलीश त्यांना
एवढ्यात लेक लागली रडू, म्हणे "कडे घ्याना"!
ब्रश, डबी ठेवली, तिचे डोळे केले कोरडे
दोन क्षण गोल फिरवता, थांबले स्वारीचे रडे
निघालो तसाच, राहोत बिन-पॉलीशचे जोडे
आणखी काही वर्षांनी बूट अडगळीत जातील
तेंव्हा थोडीच कोणी 'पॉलीश कुठे' म्हणतील?
आज हसलेले पोरीचे डोळे जन्मभर पुरतील
आज बुटांना पॉलीश नाही, याची नाही खंत
बिन-पॉलीशचे बूट म्हणजे जाणीव आहे जिवंत
माझी माया लेकीसह जाईल पुढे दिगंत


प्रतिक्रिया
मस्त.
वा!
सुरेख. आवडले.!!!!!
मस्त!!
आवडले.
काव्य रुपांतर चांगले आहे.
:)
वा!
खूप छान!
भावानुवाद सुंदर...
छान जमल आहे.
वा.. फारच छान!!
सुंदर. आवडले.
छान........
सुंदर!!
सुरेख
मस्त