Skip to main content

एनआरआयची भारतभेट..

लेखक गवि यांनी बुधवार, 18/03/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं.. अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते. वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्‍या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं. माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं. प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील. भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अ‍ॅटिट्यूड असतात. परदेशात राहणार्‍या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का? काही प्रश्न, टु बिगिन विथः -ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का? -मत्सर हेवा दिसतो का? -भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का? -इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का? -तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का? -तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का? -भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात? -नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का? -चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का? -परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का? अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच. परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

वाचने 66346
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

फार धमासान युद्ध व्हावं हा धाग्याचा उद्देश नाही. पण मी माझे मित्र परदेशातून आले की त्यांना इथे खिलवणंपिलवणं आणि फिरवणं या सर्वाची आर्थिक आणि लॉजिस्टिक जबाबदारी आवर्जून उचलतो. कारण ते इथे मला भेटायला आलेत. "मी तिथे परदेशात आलो तर तेव्हा मी त्यांचा पाहुणा..पण आज तुम्ही खर्च नाही करायचा.." असं दोस्तीखातर बजावतो. पण अशी वर्णनं किंवा अनुभव वाचून वाईट वाटतं. हे अपवादच असावेत अशी आशा वाटते. थेट अनुभव घेणार्‍यांकडून ऐकायला आवडेल. नाव घेण्याचा प्रश्नच नाही. जेनेरिक अनुभव अशा रुपात सांगितले तरी बास आहे.

माझ्या एनारआय मित्रांचे अनुभव मिश्र आहेत. बहुतेकजण मित्राम्च्या ओढीने भेटतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात . त्यामध्ये कधी श्रेष्ठत्वाची भावना वाटत नाही. ९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये. त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे. आता उरलेल्या कॅटेगरीमधे काही नग असतात.. ते भेटायला आले की 'तिकडे' कसा चांगला आणि इकडे कसा वाईट एवढाच बोलतात. आपण समोरच्याला भेटायला आलोय. त्याला 'क्ष' देशाचा विकि सांगायला आलो नाही हे त्यांना मुळी कळतच नाही. आणि इकडचे काहीजण कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने तिकडच्या लोकांवर टीका करत असतात. हे साधारण झाला बाकी वैयक्तीक खमंग अनुभव निवांत टंकतो

In reply to by कपिलमुनी

९० च्या दशकात एनारआयची जी क्रेझ होती ती आता राहिली नाहिये. त्यामुळे त्यांच्या बरोबर वावरतानाचा सर्वसामान्यांचा न्यूनगंड कमी झाला आहे. इंपोर्टेड वस्तू , तंत्रज्ञान इथेही उपलब्ध झाले आहे त्या मुळे कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे.
सहमत ! पल्याडचं आयुष्य म्हणजे एकदम आरामदायक हा समज सुद्धा आता बदलला आहे.

एकही जवळचा एनाराय मित्र नसल्याने याबाबत काही प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे. नाही म्हणायला एक अगदी जवळचा मित्र सध्या परदेशात असतो. पण तो एनआरआय आहे असे काही वाटत नाही. म्हणजे तो मधुनच जातो २ वर्षासाठी. मग परत येतो वर्ष दोन वर्ष असतो मग परत जातो. जेव्हा तिकडे असतो तेव्हा इथे धावती भेट देत नाही आणि जेव्हा इथे येतो तेव्हा काय इथलाच असतो मग कसला आलाय डोंबलाच एन आर आय. पण इतरांचे अनुभव वाचण्यासाठी सरसावून बसलो आहे. होउन जाउ द्यात घमासान. काही चर्चा आता अनुषंगाने होणरच आहेत त्यमुळे मजा येइल. उदा.: १. अल्याडचे लोक म्हणतील की चोंबडे एन आर आय परदेशात जाउन गुबगुबीत जगतात आणि भरल्य पोटाने तंगड्या पसरुन भारताच्या करुन स्थितीवर आणि भारतीयांच्या मानसिकतेवर टिप्पणी करतात. २. अल्याडचे लोक म्हणतील की इथल्या सुविधा आणि साधन संपत्तीच्या जीवावर उच्च शिक्षण घेतले आणि थोड्या पैशासाठी इमान गहाण टाकुन गोर्‍यांच्या तुंबड्या भरताहेत झाले. मग इतकेच होते तर सब्सिडाइज्ड दरावर इथले शिक्षण घेताना लाज नाही का वाटली? ३. पल्याडचे लोक म्हणतील आमच्या जीवावर तुमच्या गमजा चालल्या आहेत. आम्ही परकीय गंगाजळी आणतो म्हणुन तुमचा बीओपी तग धरुन आहे नाहितर तुमचे हाला कुत्र्याने खाल्ले नसते. ४. पल्याडचे लोक म्हणतील इथल्या लोकांची सडकी मनोवृत्ती बदलायल तयार नाही. स्वतःला परदेशात जायला मिळाले नाही म्हणुन आमच्यावर जळतात. तुमची लायकी नाही म्हणुन तुम्हाला इकडे यायला जमले नाही. संधी मिळाली तर **णाला पाय लावुन इकडे यायला निघाल. ५. अल्याडचे लोक म्हणतील यांचे नखरे बघा. १० दिवसांसाठी येतात तर इथले प्रदूषण, लोकसंख्या, अस्व्च्छता यावर लेक्चर झोडुन जातात. जन्मतःच महालात उठले होते जणू. अर्रे वयाची २० -३० वर्षे इथेच काढलीत ना? एवढेच असेल तर या ना इथे आणि बदला परिस्थिती. ६. पल्याडचे लोक म्हणतील यांना सुधारण्याची इच्छाच नाही हो. कंस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सहनच करु शकत नाहित हे. ७. अल्याडचे लोक म्हणतील आमची संस्कृती, आमचे देशप्रेम भॉ भॉ भॉ. पल्याडचे लोक म्हणतील आमची प्रगती, आम्चे योगदान भॉ भॉ भॉ. ३ -४ दिवसांची निश्चिंती केली गविंनी.

तेच म्हटल बर्याच दिवसात निवासी - अनिवासी वाद झालेला नाही आता येणार मजा पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच कमीत कमी ३०० कुठे नाही गेले

In reply to by स्पा

पोपकोर्ण घेऊन बसतो, धागा योग्य दिशेला जाईल याची नेहमीचे यशस्वी कलाकार काळजी घेतीलच कमीत कमी ३०० कुठे नाही गेले
>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif ========================== मी पण...मी पण .. बसणार आता..पां डुब्बा च्या शेजारी! पॉपकॉर्णं घेऊण! =)) पण एकंदरीत ते ही कमी पडतील्,असं वाट्ट्य. म्हणून मग ज्येवानच घेऊण बसू... http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-burger.gif ...कसे? ;)

बाकी मोदी सर्व एन आर आय लोकांचा फारच लांगुललाचन करतात बॉ !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@त्यांच्या भाराखाली विझून जाईल ना तो SmileWink>> सहमत आहे मी पण! ;) पन मी काय म्हन्तो? कशाला ते एन.आय.आर.वर एव्हढं कुणी(कुणी ;) ) चिडायचं? :-/ एनाराय भारतात आलेले कित्ती चांगलं! आंम्हाला मस्त चॉकलेट देतात...दक्षिणेबरोबर. =================== एनाराय आवक संघाचा समर् थकः- अतृप्तभट आत्मावाले!

In reply to by कपिलमुनी

आर आय - एन आर आय खिचडी मध्ये मोदींचा तडका बसला तर धाग्याचे काश्मीर काय पार आयसिस, इराक, बोको हराम होइल हो. नका हो नका इतके बाँब एकत्र टाकु.

In reply to by मृत्युन्जय

रच्याकने-- "आर आय - एन आर आय" शिवाय एक अजून क्याटेगरी आहे "आर एन आय"( रेसिडेंट नॉन इंडियन). पैलतीरी नेत्र लावून बसलेले.

टिपीकल भेट येणार येणार म्हणून येण्याआधीच निवडणुका , पाउस यांची चर्चा असते तशीच चर्चा एनआरआयच्या भारत भेटीची असते. विदेशातपण भरपूर दंगल चाललेली असते . एका महिन्यात कोणाला भेटायच , सासरी किती दिवस - माहेरी किती दिवस यावरून तुम्बळ युद्ध झालेले असते . मागच्या ट्रीपमधले हिशोब व्याजासकट ऐकवले जातात ( कोणाला म्हणून विचारू नका ! संसारात ऐकणारा एकच ). बुकिंग झाला की खरेदीची गडबड सुरू होते . इथे लग्नामधले सूड घेतले जातात. "त्या वेळी - या वेळी" ची उजळणी होते . तोवर इकडून काय आणायचा याची यादी मिळालेली असते. फ्लिपकार्ट वर चेक केले तर तिकडेच स्वस्त आहे असं वाटतं पण नेला नाही तर "एवढे डॉलर्स कमावतो पण एक पैसा सुटत नाही " अश्या वाग्बाणांना घाबरून इकडेच खरेदी आटोपली जाते मधे मधे "आता बरी आठवण आली भावाची " यासारखे चिमटे निघत असतात. घरी कळते मूल असेल तर अजून धमाल असते . त्याचा इंडियन कल्चरचा क्रॅश कोर्स घेतला जातो . त्या बिचार्‍यला फक्त वाकून नमस्कार करायचा एवढाच लक्षात रहाते. सरते शेवटी घरादाराची व्यवस्था लावून कुटूंब भारतवारीस निघते. प्रवासात कंफर्टेबल म्हणून घातलेली बर्मुडा आणि मोठ्या बॅगा अशा थाटात उतरले की उकाड्यामुळे आणि झोप न झाल्यामुळे झालेला त्रासिक चेहरा पाहिला की न्यायला आलेल्यांपैकी एकजण म्हणतो , आपल्या देशात पाउल ठेवल की यांचा तोंड वाकड :) आणि सुरू होतो पार्ट : २

आमच्या माहितितले एनाराय हे बिझनेसमन वगैरे नसून आयटीच्या कृपेने ऑनसाइट जाउन आलेले लोक असल्याने.. चॉकलेट्स वगैरे आणतात पण गिफ्ट वगैरे खूप जवळच्यांसाठीच असतात.. घाउक सर्वांना नसतात.. तिकडेही सामान्य जीवन जगत असल्याने (इथल्या तुलनेत जास्त सुखवस्तु असलं तरिही) श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे खास बघितल्याच नाही.. इकडच्या रीअल इस्टेट्च्या वाढत्या भावाने आजकाल ४-५ वर्ष साठवलेले डॉलर्स देखिल कमी पडायला लागलेत ते कुठलं प्रदर्शन करत बसणार!! बाकी आल्या आल्या धूळ,उकाडा,ट्रॅफिक,शिस्त वगैरेच्या नावाने शंख होतो काही दिवस.. पण ते चालायचच..

मी काहि फार मुरलेला एन आर आय नाहिये, पण परदेशि येउन मला आता ३ वर्ष होतिल. ३ वर्षापुर्वि काहि कारणानि नोकरि बदलावि लागणार होति, तेव्हा मुंबईत (मी अर्थक्षेत्रात काम करत असल्यानि भारतात मुंबई हाच पर्याय आहे) मला नोकरि मिळालि नाहि म्हणुन ईकडे आलो. मी दर सहा महिन्यानि भारतात येतो आणी उरलेले दिवस त्या ट्रिप चि वाट पहाण्यात घालवतो. आल्या दिवसापासुन बाहेर मिळेल तिथे हादडत असतो. आणी फक्त मीच नाहि तर आमच्या ५ वर्षाच्या मुलीलाहि पाण्यचा आणि खाण्याचा काहि एक त्रास होत नाहि. भारतात मित्र आणि नातेवाईक भेटि हेच मुख्य आकर्षण असतं मला तरि. मी बहुधा पूर्ण दिवस घरि आई बाबांबरोबर घालवुन संध्याकाळी मित्र असा कार्यक्रम ठेवतो जास्तित जास्त दिवस. दोन तीनदा सिंहगड पण केला मित्र आणी भाऊ बहिणींसोबत. बाकि ईथे काय चांगलं आणि तिथे काय वाईट असले विचार मी कधिच केला नाहि. मी दहा वर्ष मुंबईत आणी आधि खुप वर्ष पुण्यात काढल्यानि ह्या दोन्हि शहरांचि खूप ओढ आहे. तसेच कदाचित ३च वर्ष झाल्यानि काहि फार बदल झालेत वगैरे पण कधि वाटत नाहि (फक्त टोल वाढलेत सोडुन). राहिलि गोष्ट गिफ्ट्स चि - मी घरातिल लहान मुलांना सोडुन काहि गिफ्ट आणत नाहि. कारण आता बहुतेक सगळ्या वस्तु भारतातच चांगल्या आणि स्वस्तहि मिळतात आणी मी हाडाचा कंजुश आहे ;) . मित्रांबरोबर कधि गिफ्ट्चा विषय पण निघत नाहि, बाकि चिडवा चिडवि मधे मला $ वाला म्हणुन एखादेवेळि तीर्थप्रसादाचे बिल भरावे लागते, पण ते त्याच ट्रिप मधे वसुल पण होते. शेवटि मला वाटत मैत्रिचे धागे किति पक्के आहेत ह्यावरच खूप गोष्टी अवलंबुन असतात. तेच नातेवाईकांबद्दल पण आहे.

In reply to by बेकार तरुण

अर्रर्र! पुण्याची पण ओढ आहे म्हणता?? सापडलातच आता तुम्ही पुण्याद्वेष्ट्यांच्या तावडीत.

In reply to by बेकार तरुण

"लक्षपूर्वक र्‍ह्स्वदीर्घ उलटे लिहीणे हा एनारायचा गुणधर्म असावा यावर संशोधनाला जागा आहे काय ?" असा संशय येण्याइतपत सबळ पुरावा मिळाला आहे. धन्यवाद ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ते अर्थशास्त्रात काम करत असल्याने उगाच इकडेतिकडे दीर्घ ईकार-ऊकार टाकून उधळमाधळ करायची त्यांना सवय नसावी!

In reply to by पिवळा डांबिस

शेवटी हसरी स्मायली :) टाकायची आणि ह. घ्या म्हणायचं र्‍हायलं. हो, तिच्यायला आजकाल मिपावर हे पण ल्ह्यायला लागतं!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

हो, तिच्यायला
एकदा पुण्यातल्या रस्त्यावर सरळमार्गी अशा आम्हाला एका व्यक्तीचा जोराचा धक्का लागला आणि आमच्याकडून हा उद्गार अभावितपणे निघाला. त्या माणसाने अश्लील शिवीचा वापर केल्याचा आरोप करून दंगा सुरु केला. तो येऊन धडकला ते बाजूलाच आणि ही शिवी नाही म्हणून कचकून भांडावे लागले ते आठवले. ;)

एन आर आय लोकांना सुरुवातीला विदेशात खुप कष्ट , त्रास सहन करावे लागले असतील याची कल्पना आहे. परदेशातील जीवन / राहणीमान पद्धती , छोटे मोठे जॉब्स करुन उच्चशिक्षण पुर्ण करणे , खर्च , कर्ज , होमसिकनेस , तब्येतीच्या तक्रारी ,कम्युनिकेशन ,नोकरी , व्यवसाय , आर्थिक मंदी , रेसिझम , त्यातुन निर्माण होणारे धोके ही सर्व आव्हाने रोजच्या रोज सांभाळुन कोणी जर तेथे टिकुन सुबत्ता मिळवत असेल तर अशांचा सत्कारच केला पाहिजे .

आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संपादिका रेवती यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. सुगरण सानिकास्वप्निल यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आद्य मिपाकर आणि पुरातन आम्रविकावासी पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
बसा, बसा! प्रतिक्षेत बसा!! पण आम्ही या एनाराय किंवा आरएनआय या दोन्ही कॅटेगरीत नसल्याने आम्हीही पॉपकॉर्न (चिकन) घेऊन बसलेलो आहोत!!! :) -पिवळा डांबिस (येनारनाय)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

येस! आम्ही 'खिलाओ-पिलाओ!' :) म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता. *mosking*

In reply to by विकास

मला वाटले तुम्ही अम्रिकेत असता.
नाय बॉ! उगीच खोटां कशाला बोलियाचां? आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी. तुम्हां बॉस्टन अमेरिकनांसारखे हाय-फाय शिरिमंत नाय!!

In reply to by पिवळा डांबिस

आमी आपले गरीब कॅलिफोर्नियावाले शेतकरी. थंय टेक्सासवाल्यांनी सवतोसुभो मांडलेलो आयकलेलो आमी! आता ह्यां क्यॅलीफोर्नियाचां खूळ केव्हाक झालां?

In reply to by प्रदीप

हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां? तां काय नाय, "पोर्टलंड, वेगास, फिनिक्स सहित संयुक्त कॅलिफोर्निया झालाऽऽऽच पाहिजे!!!!" :)

In reply to by श्रीरंग_जोशी

कॅलिफोर्नियात अशे अनेक चळवळी येकाच वेळी चालू असतंत! त्यातले आमी संयुक्त कॅलिफोर्नियावाले!! तुमकां तां लॉजिक कळूचां नाय. येकतर तुमच्याकडे माणसांच कमी आणि त्यातली निम्मी निरक्षर!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आमच्या हिकडं तसंबी यकाच ठिकानी राहून बी सहा-सहा महिने दोन ठिकानी राहन्याचा अनिभाव घितो. सहा महिने बर्फात लोळतो अन मग उरलेले सहा महिने तलावांच्या पाण्यात डुंबा डुंबा करतो :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

पाण्यात डुंबा डुंबा करतो
हॅपी डुंबा डुंबा टू यू!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हय !! आयना का बायना घेतल्याशिवाय जायना.. आवाज कोनाचा.....वगैरे जय कॅलीफोर्निया. (जय कोकण (?))

In reply to by श्रीरंग_जोशी

या दुरुस्तीवद्द्ल तुमचे १०० अपराध माफ आहेत!! अनुस्वाराला खूप महत्व आहे. उदा. चाचा आनि चांचा! :)

In reply to by पिवळा डांबिस

हे बॉस्टनचे बामण आमकां गाववाल्यांक नेहमी अगदी टोचांन्-टोचांन बोलतंत. मगे आमी काय करूंचां? क्षमस्व, हा दोष माझा नाही तर बॉस्टनचा आहे. इथले पाणी प्यायल्याने तसा स्वभाव झाला असेल. *sorry2* तुमचे बरे आहे, कॅलिफोर्नियाचे पाणी प्यायचे म्हणजे... *mosking* (ह घ्या हो!)

In reply to by पिवळा डांबिस

म्हणून तर दक्षिण कॅलिफोर्नियातले बहुतेक कट्टे आमच्या घरी झालेत!! Wink
'बहुतेक' या शब्दावर आक्षेप. या निष्काळजीपणाबद्दल पिडांकाकांचा कॅडबरी डेरी मिल्क (भारतीय, भारी इ.) देऊन सत्कार करण्यात येईल.

तिथले अनुभव भरपूर ऐकले आहेत. ज्याची कष्ट करायची तयारी आहे आणि कित्येकदा विपरीत हवामानात जगण्याची तयारी आहे, अशा सर्वांना तिथे खूप छान वाटतं. रोजची दिनचर्या अगदी हेक्टिक असली तरी हक्काचे शनिवार-रविवार मिळतात, त्यांतला एक वार घरातल्या कामांसाठी गेला तरी एक दिवस मौजमजा करायला मोकळा असतो. बाकी मुलांचे शिक्षण, संस्कार यावर स्पेशल लक्ष ठेवावे लागते. गिफ्ट मागणारे लोक प्रातिनिधिक वाटत नाहीत. खर्‍या जवळच्या लोकांना 'आपलं माणूस' किती दिवसांनी भेटलं, याचाच आनंद असतो. पण बहुतांशी नॉरेइं ना भारताची भावनिक गुंतवणूक असते आणि त्याच्या ओढीनेच ते येतात. माझ्यासारख्या आळशी आणि कामचुकार माणसांना मात्र, आपलाच देश रहायला चांगला आहे.

In reply to by इरसाल

न माहिती असायला काय झालं? धा दुकानांतून फिरण्यात कसलं आलंय शिक्रेट? :(

उसगावकर भारतात आले की चाकलेटं वाटत का सुटतात ते काही समजत नाही. जो दिसेल त्याला "हे तिकडच चाकलेट आहे बरका" असे म्हणुन दोन तरी चाकलेटं हातावर टेकवतात. आणि भारतातुन जाताना चाकलेटांच्या वजनाच्या एवढ्या चितळ्यांच्या बाकरवड्या घेउन जातात. त्या बाकरवड्या परत गेल्यावर उसगावात जो दिसेल त्याला वाटतात का? ते माहित नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगदी अगदी. आणि चाकलेटं पण ती सोन्या चांदीच्या रंगातल्या कागदात गुंडाळलेली बारक्या मोदकासारखी किंवा हर्शेचे बारके बार असतात. त्यापरास इथलं क्याडबरीचं डेअरी मिल्क कधीपण भारीच लागतं.

In reply to by प्रचेतस

त्या मोदकांना किसेस का काहितरी म्हणतात त्यांना. अगदीच टुकार... एम अँड एम आणणारे महाभागही पाहिलेत. जेम्सच्या गोळ्याच त्या...

In reply to by अनुप ढेरे

आमच्या कंपनीतले काही चतूर महाभाग सर्व फॉरेनची चॉकलेट्स अंधेरीला किंवा पार्ल्याला खरेदी करतात आणि परदेशातून आणली म्हणून सांगतात...यामागे उद्देश हा की त्यांचा तिकडचा खर्च वाचतो व तेवढेच अर्धा/एक किलो वजन पण वाचते + चॉकलेटस प्रवासात खराब होणे किंवा गरम होऊन पाघळून जाणे असा प्रकार होत नाही.

In reply to by योगी९००

हल्ली ती फारिंगची बहुतेक सगळी चॉक्लेटा चौकातल्या कोअपर्‍यावरच्या १० X १० साईजच्या दुकानातपण मिळतात !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मलाही बरीच चाकलेटी मिळालीत देणा-याला प्रचंड आनंद असतो पहिल्यांन्दा ज्यांनी कोणी मला ती दिली तेव्हा उत्साहाने सुरुवातीला लैभारी वैग्रे वाटली पण थोड़ा अपेक्षाभंग आणि हल्ली माझा चेहरा उतरून जातो. आरं द्यायचं तर आपलं विदेशी असं त्याला हे काय म्हणतात ते दिलं पाहिजे. लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ लाल, पिवलं, व्हाईट काचबंद माल पाहिजे आनंद कसा गगनाला टकरा घेऊन खाली आला पाहिजे.>>> :-D

ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्र :)

In reply to by कपिलमुनी

बाकीचे सगळे नुसतेच गोळ्या वाटून बोळवण करणारे :) ड्युटी फ्री बॉटल हेच मैत्रीचे खरे मानक :)

In reply to by कपिलमुनी

ड्युटी फ्री बॉटल आणणाराच खरा मित्र
ते खरं, पण इंडियन गव्हरमिन्टवाले एनाराय लोगला साले लय सतावते! :) माणशी फक्त दोन बाटल्या आणू देतात. गेली कित्येक वर्षे मी चार (माझ्या नांवावर दोन आणि बायकोच्या नांवावर दोन) बाटल्या आणतो आहे. पण घरी जाऊन बॅग उघडली रे उघडली की चारही बाटल्या आमचे भाऊ-मेहुणे-साडू वगैरे मंडळी पसार करतात! मित्रांना द्यायला एक बाटली शिल्लक उरत नाही! :( तेंव्हा तुमचं वजन वापरून जरा तो दोन बाटल्याचा नियम तरी थोडा शिथील करा की!

In reply to by पिवळा डांबिस

हल्ली पब्लीक मुंबई विमानतळावर उतरले की बाहेर येताना मधेच लागणार्‍या ड्युटी फ्री शॉपिंग मधे खरेदी करते.

ओळखीच्यांतली एक जुनी गोष्ट. मुलगी-जावई दोनेक वर्षांनी सुट्टीवर आले. घरात आल्याआल्या स्टुल घेऊन माळ्यावर शोधाशोध सुरू केली. अर्धा पाऊण तासांनी वरून एक पितळी पिचकारी मिळाली तेव्हा एकदा त्यांचा जीव भांड्यात पडला. "अग आई याला तिकडे चांगली किंमत येतेय, नेणारेय."

शिरिष जेव्हा न्यु जर्सीहून येतो तेव्हा ढीगभर स्नीकर्स घेऊन येतो.तिकडे कामाला जाताना हल्ली खाकी चड्डी घालून जातात असे ऐकले आहे.न्यु जर्सीत 'अगदी भारतात असल्यासारखे वाटते' हे मात्र आवर्जून म्हणातो.ग्रीन कार्ड मिळाल्यापासून मात्र त्याला अमेरिकेचा 'कंटाळा' आला आहे.येथे आल्यावर पहिले काही दिवस वडापाव्,कोथिंबीर वडी,दुधी हलवा,मामलेदारची ती जगप्रसिद्ध मिसळ खाण्यात जातो.मग पुढचे काही दिवस अमेरिकेला,तेथील समाज्जीवनाला नावे ठेवणे...जायची वेळ आली की मात्र नूर पालटतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ढीगभर स्नीकर्स
खायचे का घालायचे?


नाही, तिकडे पायात घालायच्या बुटांना देखील स्नीकर्स म्हणतात असं ऐकलं.

अमेरिका जाउंदेत पण पासपोर्ट पण काढलेला नसताना, ८०च्या दशकाच्या भागात जेंव्हा काही एन आर आयज् चा मी लांबूनच (कारण घरातले, नात्यातले कोणीच नव्हते) जो अनुभव घेतला, तो डोक्यात जाणारा होता. तो काळ असा होता की अमेरीकेत जाणारे (म्हणजे मराठी माणसास माहीत असलेले) बहुतांशी आय आय टी आणि काही इतर विद्यालयातले उच्चशिक्षणासाठी गेलेलेच असत. मी देखील (आय आय टी नाही पण) ९०च्या सुरवातीस उच्चशिक्षणासाठी आलो. त्यावेळेस बॉस्टनला जाणार म्हणजे लोकं अरे माझा भाचा ह्युस्टनला जातो, मदत होईल असे म्हणत. किती हजार मैल आहेत ते देखील त्यांना कळायचे नाही! अशातच एका एनआरआयच्या वडीलांनी मला अमेरीकेसंदर्भातला क्रॅशकोर्स (अजून कुठे? पुण्यातच!) देताना, "इंडीया कशी थर्ड वर्ल्ड कंट्री" आहे हे सांगितल्याने एकूणच प्रकरण डोक्यात गेले होते. एका ओळखीच्या मुलाला, तो देखील अमेरीकेत जाणार होता आणि मी देखील म्हणून घरी (मुंबईत) फोन केला. तेंव्हा घरातून. "आमचा मुलगा अमेरीकेला जाणार असल्याने बिझी आहे." असे उत्तर मिळाले. त्याव्र मी म्हणले "मी पण उद्या चाललो आहे". तात्काळ, "हो का? अरे वा! कुठे, कधी?" म्हणलं, "राहूंदेत, तुम्ही बिझी असाल" आणि फोन ठेवला! असो. गवि एन आर आय चा भारतातील अनुभव विचारत आहेत. पण हे अजून एक पुढचे... सुरवातीस युनिव्हर्सिटीत आणि कधी कधी इतरत्र देखील मला काही भारतीय भेटले, जे मला अमेरी़केतच भेटून, "मी (म्हणजे ते) कसे अमेरीकेत राहात आहेत" हे स्टाईल मधे दाखवायचे! तेंव्हा भारतातील भारतीयांनो असे कोणी एनआरआय भेटले तर वाईट वाटून घेऊ नका! ;) सुरवातीची १-२ वर्षे मी घरात नियमितच पण अगदी नातेवाईकांना - मित्रांना देखील पत्रे लिहायचो. इमेल्स नव्हत्या! आणि फोन खूपच महाग होते. तरी देखील १-२ मिनिटांचा करायचो! परवडत नसले तरी घरी दर आठवड्याला फोन करायचोच. (तो देखील शेजारी, कारण घरी फोन नव्हता. म्हणून वेळ ठरवून!) त्यामुळे जेंव्हा पहील्यांदा दिड वर्षांनी भारतात गेलो, तेंव्हा कुठलीच गॅप दोन्ही बाजूंनी वाटली नाही. जेंव्हा डॉट कॉम आणि एचवन चे पेव फुटले तेंव्हा हा प्रकार बराच कमी होऊ लागला. कारणे अनेक आहेत. अमेरीका (चांगले/वाईत दोन्ही अर्थांनी) काय आहे हे घरोघरी कळू लागले आणि त्यातील अप्रूप गेले. आता काही गविंच्या काही प्रश्नांची व्यक्तीगत उत्तरे: -ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अ‍ॅटिट्यूड भासतो का? नाही -मत्सर हेवा दिसतो का? नाही -भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का? वर म्हणल्याप्रमाणे नक्कीच कमी झाले आहे जे चांगले आहे. पण म्हणून (अमेरीका/एन आर आय ना) तुच्छ लेखणे जर होत असेल ते योग्य नाही. -इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का? नसतो. -तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का? हल्ली भारतातील श्रीमंतीचेच जास्त प्रदर्शन होत असेल. ;) (हा व्यक्तिगत अनुभव नाही!) -तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का? भेटवस्तू आणल्या गेल्या तरी त्या प्रेमापोटी होतात. कुठल्याही ताणाने अथवा शो ऑफ ने होत नाहीत. -भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात? अजिबात नाही. किंबहूना भेट देयचीच असेल तर अनेकदा सरळ रुपयात कॅश पण दिली तर सोयीचे जाते. -नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का? कधी कधी होते. त्यात गैर काहीच नसते. योग्य माहिती असल्यास देतो. -चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का? अजिबात नाही. भारतभेट झाली नाही तर चुटपूट लागते. -परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का? सुदैवाने असे कधीच घडत नाही. कधी कधी एकत्र जाता येत नाही. पण जेंव्हा जातो (अगदी एकटे गेलो तरी) तेंव्हा आम्ही दोन्ही घरात आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांबरोबर पण वेळ घालवतो. पण सगळ्यांना जायला आवडते. इथे घरात (आणि घराबाहेर देखील आमच्याशी) लेक (स्वतःच्या चॉईसनेच) शुद्ध मराठीतच बोलते. तसे ती जेंव्हा भारतात बोलायला लागते आणि लोकं म्हणायला लागतात, "अरे वा मराठी येते?", "किती छान बोलते मराठी" वगैरे वगैरे, तेंव्हा तिला जरा annoying होते. बाकी पाहुणा नाही, तर भारत-अमेरीका ही दोन्ही माझीच घरे आहेत असाच चांगल्या अर्थाने अ‍ॅटीट्यूड असतो. तात्पर्यः डोक्यात जाणारे अनुभव हे एन आर आय चे नसतात तर त्यामागील वृत्तीचे असतात. ते कधी कधी परदेशस्थ भारतीयाचे असतील,कधी कधी देशाचा उंबरठा न ओलांडणार्‍या त्याच्या घरच्यांचे असतील, तर या उलट एन आर आय जास्त जाणिवेने यथाशक्ती जास्त करत असतील. अनेकांच्या बायका भारतात राहून देखील सासुसासर्‍या़ंकडे पहात नसतील तर भारतात राहून सगळे पुरूष देखील सासुरवाडीच्या लोकांशी संबंध ठेवून असतील अशातला भाग नसतो... तेच मुलांच्या बाबतीत. आमच्या मुलीस (आणि अशी अनेक मुले आहेत) तिच्या मातृभाषेत बोलायला येत असेल आणि समोर गोर्‍या मैत्रिणी असल्या तरी आईवडीलांशी मराठीत बोलणे साहजीक होत असेल अथवा शाळेत अगदी पालकाची भाजी-भात नेण्यास पण लाज वाटत नसेल. पण भारतात राहूनही मुलांना याच गोष्टींची लाज वाटत असू शकेल... म्हणून म्हणतो एन आर आय म्हणून नाही तर कुठल्यातरी पद्धतीचा न्यूनगंड (भले तो अहंगंड म्हणून वरकरणी दिसला तरी) हा या सगळ्याच्या मागे असतो. अमेरीकेतून आलेल्या एखाद्या भारतीय माणसाकडून दिसला की तो ठळकपणे जाणवतो इतकेच.