✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुढीपाडवा आणि तरुणाई...

B
bharatm यांनी
Wed, 03/18/2015 - 10:25  ·  लेख
लेख
गुढीपाडवा आणि तरुणाई... हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे लक्षण आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस विजयाचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभी करतो. आपण जसे १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करत असते. आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात दोन वेळा केली जाते, एक इंग्रजी कालगणनेनुसार 'Happy New Year' ने आणि दुसरे हिंदू कालगणनेनुसार 'नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा' ने म्हणजेच गुढीपाढव्याने. १ जानेवारी आळसात उजाडतो कारण त्याला ३१ डिसेंबरचा अंमल असतो. १ जानेवारीच्या स्वागतापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीचीच सगळ्यांना ओढ असते. पण आपला गुढीपाडवा चैतन्य घेऊन उजाडतो. अभ्यंगस्नानांनी सुरु होणारा हा पाडवा प्रत्येक घरातील लहान-थोरांना नटून थटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढया उभारायचा दिवस असतो. अशा या गुढीपाडवा आणि इतरही धार्मिक, सांस्कृतिक सणांपासून आपली तरुणाई दूर असते असं काही वेळा भासवलं जात. परदेशी संस्कृतीचे अनुकरण करते अशीच ओरड असते, परंतु ते खोटे आहे. महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीची वाढत चाललेली जादू पाहता, तरुणांकडून हिंदू आणि मराठी सण मात्र तेवढयाच पारंपारिक पद्धतीने साजरे होताना दिसत आहेत. किंबहुना ते वाढतच आहेत. आत्ताच्या इंग्लिश जमान्यात वावरणारी, सतत सोशल नेटवर्कशी जोडलेली आणि खुली अर्थव्यवस्था, खुली बाजारपेठ यामुळे सतत परदेशी वाऱ्या करणारी किंवा सतत परदेशी घटनांशी निगडीत असलेली ही तरुणाई पश्चात पद्धतीने काही कार्यक्रम नक्कीच करत असतात मात्र आपले सणही आपल्या घरच्यांसोबत तेवढयाच आनंदाने, उत्साहाने आणि पुढाकाराने साजरे करताना दिसतात. त्यातील धार्मिकता काहीशी अंशी कमी झालेली असेलही परंतु आपले सण साजरे करण्याची त्यांची धावपळ मात्र नक्कीच आनंद मिळवून देत असते. १ जानेवारीच्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जी तरुणाई पार्ट्यामध्ये बेधुंद होवून जल्लोष, धांगडधिंगाणा करत असते तीच तरुणाई आपल्या हिंदू नववर्षाचे स्वागत मात्र नम्रतेने, शालीनतेने आणि आत्मियतेने करत असतात. सकाळी-सकाळी नटून-थटून फेटे परिधान करून वडिलधाऱ्यासोबत शोभयात्रांमध्येही तेवढयाच आत्मियतेने भाग घेत असतात. त्यामध्ये ते नेहमीच एक पाऊल पुढे असतात. आणि हाच खरा भारतीय आणि पाश्चात संस्कृतीतील फरक आहे. हा वेगळेपणा, ही संस्कृती अशीच टिकून राहिल्यास आणि तरुणाईचा असाच सहभाग राहिल्यास महाराष्ट्रातील सणांचे महत्व त्याचबरोबर मराठी भाषा आणि मराठीची अस्मिता उत्तोरोत्तर बहरत जाईल आणि ती प्रभावीपणे जोपासलीही जाईल यात दुमत नाही. तर मग चला, शुभसंकेताचे पडघम वाजवत येणारा हा आपला नववर्षाचा पाहीला दिवस आपण सर्वजण अगदी मनापासून आणि उत्साहात साजरा करूया. शुभ गुढीपाडवा….!!! भरत माळकर -मुंबई
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
15346 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

चान चान निबंध

सौंदाळा
Wed, 03/18/2015 - 10:28 नवीन
चान चान निबंध
  • Log in or register to post comments

हो, पण काकांना नक्की काय

आदूबाळ
Wed, 03/18/2015 - 13:09 नवीन
हो, पण काकांना नक्की काय म्हणायचं आहे ते समजलंच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे

सांगलीचा भडंग
Wed, 03/18/2015 - 13:03 नवीन
मेन कारण आहे कि गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे . हल्ली थोडे थोडे ते वाढत आहे हि खरच चांगली गोष्ट आहे . जिथे क्रिसमस ( ख्रिश्चन साधारण ४-५ टक्के असतील ) सारख्या सणाला जेवढ्या ऑफर मोल/दुकानामध्ये मध्ये असतात तेवढ्या गुढी पाडव्याला नसतात . क्रिसमस साजरा करणे थोडे अप मार्केट समजले जाते तसे गुढी पाडवा ला महत्व यायला पाहिजे. शाळे मध्ये पण तेवढेच महत्व दिले तर नक्कीच गुढी पाडवा एक मोठा सण होईल . ( सध्याहि आहेच पण थोडे जास्त मार्केट आणि हवा होईल) अवांतर : गुढी पाडवा तिथीने साजरा न करता मार्च मधला दुसरा शनिवार टाइप साजरा केला तर :-) . म्हणजे लोकांना लक्षात राहील . गोल्ड सेटरडे / मेंगो सेटरडे सारखे नाव दिले कि फुल मार्केट मिळेल सणाला .
  • Log in or register to post comments

@क्रिसमस साजरा करणे थोडे अप

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/19/2015 - 00:52 नवीन
@क्रिसमस साजरा करणे थोडे अप मार्केट समजले जाते तसे गुढी पाडवा ला महत्व यायला पाहिजे. शाळे मध्ये पण तेवढेच महत्व दिले तर नक्कीच गुढी पाडवा एक मोठा सण होईल . ( सध्याहि आहेच पण थोडे जास्त मार्केट आणि हवा होईल) >>>>>>> अगदी ..अगदी. सहमत(च) आहे. आंम्हिही नविन कै तरी काढावे म्हणतो. ताम्रपात्र मध्ये बृहत् काटीक निस्सारण विधी! (मायला, ...जमलं की नावातच! ;) ) भेटा अगर ल्ह्या.. दुकाणः- आत्मंम् भट्ट बांबूतांबेवाले. जुण्या मंडै जवळ. भुरभुरुड आळी. तेल्या मारुतीच्या पाठी,चिक्टोबा नाणे वाड्याजवळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग

गुढी पाडव्याचे "गुडी पाडवा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/20/2015 - 11:58 नवीन
गुढी पाडव्याचे "गुडी पाडवा (Goody Padawa)" असे बारसे केल्यास त्याला चांगले दिवस येतील असे वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग

"गुडी गुडी पाडवा (Goody Goody

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/20/2015 - 12:01 नवीन
"गुडी गुडी पाडवा (Goody Goody Padawa)" हे जास्त अपमार्केट वाटेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

*lol*

सतीश कुडतरकर
Fri, 03/20/2015 - 12:32 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या निमित्ताने

वेल्लाभट
Wed, 03/18/2015 - 14:14 नवीन
या धाग्यावर फोटो टाकले तर लोकांनी? गुढीपाडव्याचे अर्थात.
  • Log in or register to post comments

टाका टाका, हिरवळीचे पण फोटो

सूड
Wed, 03/18/2015 - 15:17 नवीन
टाका टाका, हिरवळीचे पण फोटो टाका... -(रवाळ गारठा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ख्याक्क !

वेल्लाभट
Wed, 03/18/2015 - 15:57 नवीन
ख्याक्क !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हीच का ती शोभा (यात्रा)

यसवायजी
Fri, 03/20/2015 - 21:06 नवीन
Image removed. ह्यापी गुढी पाडवा टू आल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ह्या फोटोमधल्या एकीवर अतिशय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/21/2015 - 11:13 नवीन
ह्या फोटोमधल्या एकीवर अतिशय जीवापाड प्रेम आहे एवढचं बोलतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आणि दुसरीवर माझे

टवाळ कार्टा
Sat, 03/21/2015 - 23:57 नवीन
आणि दुसरीवर माझे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे दोघिंवर...

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/23/2015 - 13:13 नवीन
माझे दोघिंवर... ;) पहिली गोड आणि दुसरी अजोड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै

टवाळ कार्टा
Mon, 03/23/2015 - 13:20 नवीन
ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै कल्लायच्चं आदी १ घ्यायची...झेपली तर दुस्लीचा विचाल कलायचा...नाहीतरी एकीबद्दल लोक बोल्तातच की झेपेल त्यानेच घ्यावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

टकाराव, संन्यासानंतर जास्तच

हाडक्या
Mon, 03/23/2015 - 21:34 नवीन
टकाराव, संन्यासानंतर जास्तच चावट, अश्लील झाला आहेस असे नमूद करतो.. ;) भो, शांत हो.. (पक्षी: थंड घे रे भावा..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आवरा!! दुष्काळातनं आला असलात

सूड
Mon, 03/23/2015 - 22:26 नवीन
आवरा!! दुष्काळातनं आला असलात तरी वागण्यातनं तसं दाखवू नये. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Mon, 03/23/2015 - 23:46 नवीन
खिक्क :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी अगदी

बॅटमॅन
Tue, 03/24/2015 - 12:48 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@आदी १ घ्यायची...झेपली तर

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/24/2015 - 18:05 नवीन
@आदी १ घ्यायची...झेपली तर दुस्लीचा विचाल कलायचा>> दोन्ही झेपवण्यात आहे अर्थ,नाहितर तुझं जीवनच व्यर्थ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्याकडे ३ आहेत

टवाळ कार्टा
Tue, 03/24/2015 - 20:24 नवीन
माझ्याकडे ३ आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

माझ्याकडे ३ आहेत

सूड
Tue, 03/24/2015 - 20:29 नवीन
माझ्याकडे ३ आहेत
ऐकावं ते नवलच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@माझ्याकडे ३ आहेत >> मग तरी

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/24/2015 - 22:11 नवीन
@माझ्याकडे ३ आहेत >> मग तरी तू दु:ख्खि का बाळा? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तीघीतल्या "चालू" कीती आहेत ते

खटपट्या
Wed, 03/25/2015 - 04:43 नवीन
तीघीतल्या "चालू" कीती आहेत ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आगागाग्गाग्गागागा!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/25/2015 - 07:18 नवीन
आगागाग्गाग्गागागा! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

डॉक्टर

कपिलमुनी
Tue, 03/24/2015 - 13:01 नवीन
डॉ. अपर्णा बांदोडकर आणि त्यांची बिजली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सूड

सतीश कुडतरकर
Fri, 03/20/2015 - 12:34 नवीन
स्पेशल भगव्या कपड्यातली हिरवळ म्हणताय का? *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा

सन्दीप
Wed, 03/18/2015 - 15:03 नवीन
नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शोभायात्रा?

सुनील
Wed, 03/18/2015 - 15:16 नवीन
गुढीपाडव्याची शोभायात्रा हा नक्की काय प्रकार आहे? पूर्वी असले काही केल्याचे/पाहिल्याचे आठवत नाही. गेल्या काही वर्षांपासूनच ऐकतोय. घरगुती गुढीपाडवा असा सार्वजनिक करण्यामागचा उद्देश काय? बाकी, शोभायात्रा म्हणजे मिरवणूकच ना?
  • Log in or register to post comments

आपण कुठे राहता?

वेल्लाभट
Wed, 03/18/2015 - 15:56 नवीन
आपण कुठे राहता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आमच पेटंट आहे.

सतीश कुडतरकर
गुरुवार, 03/19/2015 - 15:54 नवीन
ते आम्ही डोंबिवलीकरांनी सुरु केल आहे. आमच पेटंट आहे. नवीन संशोधन करून आम्ही गुढीपाडव्याला पार पाच हजार वर्षांपर्यंत मागे नेल आहे. त्याच्या आधी एखादा राजा सापडला तर तिथपर्यंत पण घेऊन जाऊ. आम्हाला अस तस समजता का राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पण मुळात डोंबोलीकरसुध्धा

टवाळ कार्टा
Sat, 03/21/2015 - 23:59 नवीन
पण मुळात डोंबोलीकरसुध्धा "त्या एका जगप्रसिध्ध" शहरातले आहेत असे जुने डोंबोलीकर म्हणतात असे ऐकून आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

या वर्षी

तुषार काळभोर
Wed, 03/18/2015 - 15:20 नवीन
शनिवारी गुढीपाडवा आल्याने एका सुट्टीला मुकलो. :(
  • Log in or register to post comments

राम, रावण, हिंदू कशाला यांना

सतीश कुडतरकर
गुरुवार, 03/19/2015 - 15:50 नवीन
राम, रावण, हिंदू कशाला यांना मध्येच का घुसडता. काय संबंध गुढीपाडव्याशी? सातवाहन आठवतोय का?
  • Log in or register to post comments

सातवाहनांचा पण तसा फारसा

प्रचेतस
गुरुवार, 03/19/2015 - 16:24 नवीन
सातवाहनांचा पण तसा फारसा संबंध येत नाहीच. येतो तो कुशाण कनिष्काचा आणि क्षत्रपांचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

येतो तो कुशाण कनिष्काचा आणि

हाडक्या
गुरुवार, 03/19/2015 - 19:57 नवीन
येतो तो कुशाण कनिष्काचा आणि क्षत्रपांचाच.
अन् हे तसे भारतीय उपखंडातले नव्हते म्हणे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
गुरुवार, 03/19/2015 - 20:02 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

सातवाहन x क्षत्रप

सतीश कुडतरकर
गुरुवार, 03/19/2015 - 16:45 नवीन
सातवाहन x क्षत्रप
  • Log in or register to post comments

तसे नाही.

प्रचेतस
गुरुवार, 03/19/2015 - 16:49 नवीन
तसे नाही. हा शक सुरु केला कनिष्काने आणि त्याचे पालन केले शकांनी (क्षत्रपांनी) वास्तविक गौतमीपुत्राने केलेल्या नहपान क्षत्रपाचा विच्छेदाचा काल ह्या कालगणनेशी अजिबात जुळत नाही. शालिवाहन शक हे नाव नंतर कधीतरी ९/१०/११ व्या शतकात चिकटले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

इतिहासकारांमध्येच मतभेद आहेत.

सतीश कुडतरकर
गुरुवार, 03/19/2015 - 17:21 नवीन
इतिहासकारांमध्येच मतभेद आहेत. माझा आक्षेप धर्माला मध्येच घुसडण्यात आहे. यामुळे चुकीचा संदेश पोहोचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत आहे.

प्रचेतस
गुरुवार, 03/19/2015 - 20:05 नवीन
सहमत आहे. मात्र शकनिर्मात्याबाबत बहुतांश संशोधकांमधे मतभेद आहेत पण बहुतेकांचे तो गौतमीपुत्राने तो सुरु केला नाही याबाबत एकमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

एकदम चुक. तुम्ही इतीहासाची अशी मोडतोड करु नका.

अर्धवटराव
Fri, 03/20/2015 - 23:12 नवीन
काहि (किंबहुना काहि वगळुन इतर सर्व) विशिष्ट लोकांनी अतिविशिष्ट हेतुने हे इतीहासाचं कुभांड रचलं आहे. सत्य शोधनाचा एकमेव अधिकृत परवाना धारण करणार्‍या अतिएकमेव संस्थेने छ. संभाजीराजांच्या मृत्युशी गुढीपाडव्याचा जो संबंध शोधुन काढला आहे तोच बरोबर आहे. त्याचा अभ्यास करायचा सोडुन हे क्षत्रप, शक, गौतमीपुत्र वगैरे अनाठायी गोष्टीत वेळ दडवु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Fri, 03/20/2015 - 23:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरु

सतीश कुडतरकर
Fri, 03/20/2015 - 10:50 नवीन
डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरु करण्यात आली तेंव्हा माझी उत्सुकता जागी झाली. कारण आतापर्यंत शालिवाहन शक १९०० साल अस काहीसं माहिती होत. पण जेंव्हा शोभायात्रेमध्ये तेच युगाब्ध ५००० वगैरे वाचलं आणि म्हणालो हे काय गौडबंगाल आहे. रामाचा संबंध लहानपणापासून ऐकून आहे. तरीही एक प्रश्न उरतोच. राम उत्तरेचा आणि तिकडे गुढी उभारण वगैरे प्रकार नाही. इतिहासकारांमध्ये कुशाण/सातवाहन याबाबत मतभेद असले तरी गुढीपाडव्याचा संबंध धर्म/राम यांच्याशी नाही याबाबत एकमत नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments

धाग्याच्या शीर्षकाला साजेस्सं

वेल्लाभट
Fri, 03/20/2015 - 11:06 नवीन
धाग्याच्या शीर्षकाला साजेस्सं उदाहरण आज बघितलं. ट्रेनमधे एक मराठी (?) मुलगा एका अमराठी मुलाला सांगत होता, 'अरे कल आजा! मस्त राईड (शोभायात्रा) रहता है.. फुल क्राउड मस्त. और हमारे इधर तो बँड बिंड भी होता है (बहुदा ढोलपथक). झंडा लेके नाचनेका ढाकचिक ढाकचिक.' मस्तच म्हणजे. चालेल! आनंद आहे.
  • Log in or register to post comments

ह्यात जर राजकीय लोक उतरले तर

मराठी_माणूस
Fri, 03/20/2015 - 11:53 नवीन
ह्यात जर राजकीय लोक उतरले तर दहीहंडी सारखा प्रकार व्हायला नको. त्या ढाकचिक ढाकचिक चा फार वैताग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ते ढाकचिक ढाकचिक म्हणजे DJ

सतीश कुडतरकर
Fri, 03/20/2015 - 12:37 नवीन
ते ढाकचिक ढाकचिक म्हणजे DJ नसतो हो. आपले पारंपरीक ढोल ताशा. चांगले वाजवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

ते ढाकचिक ढाकचिक

तुषार काळभोर
Fri, 03/20/2015 - 12:41 नवीन
ते "ढाकचिक ढाकचिक " डोळ्यांना एकदम "ढिन्च्याक ढिच्याक" सारखं दिसलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

तो तेच म्हणाला, मीच आपला

वेल्लाभट
Fri, 03/20/2015 - 14:35 नवीन
तो तेच म्हणाला, मीच आपला बदलला तो शब्द. नाहीतर प्रतिसाद वेगळ्या वळणावर जातात ना.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

म्हणजे?

तुषार काळभोर
Fri, 03/20/2015 - 14:46 नवीन
झंडा लेके नाचनेका "ढिन्च्याक ढिच्याक". !!! असं?? लोल!! मराठी लोकांसाठी "ढिन्च्याक ढिच्याक" चा अर्थच बदललाय मागच्या दोन वर्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा