Skip to main content

तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक राजीव अनंत भिडे यांनी बुधवार, 02/01/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रिय मित्रवर्य, रसिकग्रणी तात्यासाहेब अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांच्या हातून रौशनी, साधना कोळीण, पाटणकर आजोबा यासारखी उत्तमोत्तम व्यक्तिचित्रं या पुढेही लिहिली जावोत हीच शुभेच्छा! आम्हाला ग्रिटींग कार्ड बनवंण्याची कला माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं चित्र इथे डकवून त्याला या रंगीत शुभेच्छा देत आहोत. ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;)) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29745
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा. (शुभचिंतक) आजानुकर्ण

तात्यासाहेब , तुम जियो हजारो साल .... :-) बाय द वे , >>>ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू! ;)) अहो , जर "समजायचेच" असेल तर फ्लाईंगच कशाला हो ! तात्या, तुमची आवड म्हणजे ......नाही , रसिक हां, रसिक एकदम ! ;-)

मित्रवर्य तात्या, तुला वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. राजीव अनंत भिडे यांना तात्याबद्दल अनेक गोष्टी बरोब्बर माहित असतात हे चांगले आहे. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तात्याश्रेष्ठ अनेकोत्तम शुभेच्छा!! श्री. रा. अ. भि. यांचे आभार हा दिवस लक्षात आणून दिल्याबद्दल

तात्या, तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ... नवीन वर्षात तुम्ही शेअर बाजारावर जास्त नजर ठेवून आमच्यासारख्या नवशिकाऊंना मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती. एखादे नवीन सदर सुरु झाले तर खूपच सुंदर तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना... धन्यवाद सागर

तात्या, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...

तात्या, तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! मनीष पाठक

तात्या, तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं ....म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्...पण आपलं उगीच्...वाटलं म्हणून इचारलं....(बया झकास हाय) तात्या तुमच्या जलमदिवसा निमित आमचा मानाचा मुजरा('त्या' टायपचा नव्हं..:) आणी 'हॅपी नु येर' बाकी ती बया सांच्याला पार्टिला येणार असंल तर आमाला बी बलवा...

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. असेच मोठे व्हा (वजनाने नव्हे किर्तीने :)) तुम्हाला उदंड आयुष्य लाभो (सोबत तुमची आवडती ग्लेन डीच का काय ती पण उदंड लाभो) तुम्ही भरपुर लिहाव अशा बर्‍याचशा शुभेच्छा (ज्या आत्ता या क्षणाला आठवत नाहीत) मग पार्टी कधी???????????????????????????????? एक (कमीत कमी) मिसळ पार्टी होउन जावु दे की :)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तात्या.... वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बाकी.... 'शुभेच्छा' पण छान आहे :). बिपिन.

राजू भिडे आणि सर्व मंडळींचे अनेक आभार... अनिवसे साहेब, म्हणजी...हि बया तात्याची हाय का?आणी जर ती तात्याची असंल तर नक्की कशी त्याचं पष्टीकरण मिळंल का?न्हाय दिलं तरी फरक पडणार न्हाय्... हम्म! ती बया आमचीच हाये, पर सद्या आमी तेचं पष्टीकरण देऊ इच्छित नाय! :) तात्या.

तात्यानु तुमी लय वरुस जगाला ताप देणार हाय.... बाया मान्सांच्या माग जास्त लागु नका....शक्ती वाया घाल वु नका शुभेच्छा नाना

वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तुमी लय वरुस जगाला ताप देणार हाय.... बाया मान्सांच्या माग जास्त लागु नका....शक्ती वाया घाल वु नका तात्यानू,नाना म्हणतोय ते बी बरुबर हाय्,बाया माणसांच्या 'मागं' लागून इनाकारण शक्ती आणी येळ वाया घालवू नगा,त्यापरिस ...नाण्याची 'दुसरी बाजू' ही लक्षात घ्याया पाहिजे....व्हय की नाय? ('मिसळ'लेला) इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

ईनायक भौ, बराब्बर बोल्लासा...... आवं तात्या पैल्यांदा 'हाता'तलं नाणं खणखणीत हाय का नाय ते पाव्हा.......अन् मंग हून जाउंद्या......बाजू कोंचीबी असो..... आनी तुमाला आम्च्यातर्फे 'व्हाढ'दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! (शुभेच्छूक) छोटी टिंगी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हातातलं नाणं!! हा हा हा हा.. द्वर्थी बोलणार नाही म्हणून संकल्प सोडणारे तुमीच काय राव? तुमचं हे मागून पुढून 'लागणं' आम्हाला कळलय बरंका!! :)

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -ऋषिकेश

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... :)

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्यांनु, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! संजय अभ्यंकर

ह्या घ्या वाढदिवसाच्या "भरगच्च" शुभेच्छा! आमच्यापण!! ;) आवडल्या का नाही??

In reply to by झंप्या

आवडल्या का नाही?? नाही आवडल्या! सगळ्याच भरगच्च गोष्टी चांगल्या दिसत नाहीत! तुम्हाला अजून आमची आवड नीटशी कळलेली दिसत नाही! असो, शुभेच्छांबद्दल धन्यवाद! कृपया यापुढे असल्या शुभेच्छांचे इतर नमुने पाठवू नयेत नाहीतर ते उडवले जातील! आपला, जनरल डायर!

In reply to by झंप्या

'ओंगळ' आणि 'सुरेख' या दोन शब्दातील फरक वरील चित्रावरून आणि आम्ही खाली देत असलेल्या चित्रवरून स्पष्ट व्हावा! असो...! आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.

आमच्या पण तुम्हास एक दिवस उशिराने का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि

स.न.वि.वि. मा.जनरल डूक्कर सायबास, डाक लिव्हायचं कारण येवढंच की,आपण हा जो काय 'दारूगोळा' इथं पाटवला हाय तो बघून आम्ही खल्लास झालो हाय्...कार्टी काम-धंद्यात न रमता,फकस्त 'कामात' रमून जो काही धंदा कराया लागलीत त्याच्या मुळे 'मिसळ पंचायतीचं' वातावरण खराब व्हाया लागलंय....ह्या शुभेच्छा बघून माझं डोळं दिपलं ....हि बया माह्या डोळ्यात मावत न्हाय....हि चारचौघात 'उठून' दिसणारी हाय की चारचौघांचा उ......पुढलं बोलवत न्हाय्,तुमचं तुमीच समजून घ्या. तुमच्या पत्राची वाट बघतोय. कळावे, आपला इस्वासू इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा दादा, तुम्ही खल्लास होऊन काय उपयोग? ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना त्या ओंगळ वाटल्या ना!! त्यांना फक्त त्यांच्या राजूने दिलेल्याच शुभेच्छा आवडतात!! आम्हाला तर ती काय सुंदर बिंदर वाटली नाही (आणि 'भरगच्च' तर अजाबतच नाही!) असो ज्याची त्याची आवड काय करणार?

तात्या, वयाने आपोआपच वाढ होते. तुम्ही त्याबरोबर कर्तृत्वानेही उत्तरोत्तर वाढावे ही हार्दिक शुभेच्छा. सस्नेह दिगम्भा

आपणांस सुखसमृद्धी, दिर्घायुरोग्य आणि भर्पूर मिसळपाव व मद्यसमृद्धी चिंतितो.

तात्याना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्या असेच लिहित रहा आनि आमच्या मनन्वर अधिराज्य करा. मी नक्कीच आपल्यापेकक्षा लहान आहे. म्हणुन आपणास उडन्द आउय्ष्य चिन्तितो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला शरुबाबा