ढ
ढ
आळस देत मान वर काढता आली असती
जग म्हणजे काय ते बघता आलं असतं
हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं
कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ||
पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या
गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या
धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर
क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या
कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१||
शाळेपुरतीच नसते हुशारपणाची जोखड
नोकरीमध्ये सुद्धा होत रहाते धडपड
डिग्र्या हव्या, पोझिशन हवी, पैसे हवे नाही का!
हुशार असून वाया गेला लागायला नको शिक्का
तेंव्हा वाटत असून बरंच काही करता येत नसतं ||२||
ढ असणं कधी कधी वरदानच मुळी असतं
तुमच्याकडे कुणीच जास्त लक्ष देत नसतं
नाहीच केलंत काही तर विशेष बिघडत नाही
पण केलंतच काही तर त्याचं कौतुक विशेष असतं
आणि हुशार असून केलं तर ते अपेक्षितच असतं ||३||
ढ असून ढ असण्याचा फायदा कळत नाही
हुशार असून हुशारपणाचा तोटा कळत नाही
लहानपणी हे कळण्याचा काळ आलेला नसतो
मोठं होऊन कळतं तेंव्हा उशीर झालेला असतो
जर-तर च्या बाता सोडून काहीच हातात नसतं ||४||
-अपूर्व ओक
टीपः कविता संपूर्णपणे काल्पनिक असून कवितेतील कुठल्याही गोष्टीचा कवीच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही.
क्लियर्र केलेलं बरं :)
कविता आवडली.माझ्या सध्या
झक्कास! शहाणपण उशिरा येते
अगदी बरोबर..
मस्त
कविता आवडली ,
घाण केली ना.... तेच अपेक्षित
कविता आवडली.