मि ही निळा रंग निळा,रंगांच्या बहुत कळा
लेखनविषय:
काव्यरस
मी ही निळा रंग निळा रंगांच्या जातं कुळा
स्वयमेवा-रंग कधी खेळलो न मि ही खुळा
स्वप्नांचा रंग नवा दिसवे तो बहु बरवा
रंगुनीही जाइ त्यात दिसला तो आत्म खुळा
रंगांचे देश नवे काय त्यात दिसत हवे?
तो हिरवा हा पिवळा त्यातचि मी एक निळा
रंगांनी काय दिले ? दालन ते बहुत खुले
शिरूनी मग आत त्यात हो तू ही बहुत-बळा
त्या गावी एकटाच नसतो कुणि सावळाच
असला जरी कुणिही तसा तो असतो बहु विरळा
रंगांची पंचमीच असते ती नित्य नवी
त्यात दिवस-जोडताच असते ती बहुत हवी
परी त्याच्या पाठून तू पाहि काहि दिव्य कळा
धरिती कुणी एकट्यास लडबडती त्यास खास
आवडते काही त्यास ? पुसत कोण नाही खुळा
खरे रंग खर्या कळा स्नेहांच्या जात कुळा
माणंसासी भेटंताच मानव्या रंग-जुळा
हौद तो ही रिकामाच कुठलेही रंग त्यात?
रंगण्यासी सर्वांन्ना असतो तो एक खुला
आलो या जगंदेशी कितीक रंग खेळूनी मी?
जाताना काय दिले? फक्त मला जाळुनि मी?
टाकुनिया वस्त्र जुने रंगण्यासी फिरुन पळा...
होता तो एक निळा...,कृष्ण(?)कोणी म्हणती त्यास!
नव्हताही रंग तसा त्याचाही त्यात खास
राधेच्या परि नावे शाश्वत तो मिसंळलंला
मी ही निळा रंग निळा,रंगांच्या बहुत कळा...
मि ही निळा रंग निळा...मि ही निळा रंग निळा...मि ही निळा रंग निळा...
===================================================
इथे ऐका
http://mfi.re/listen/b0aur9o0aw40b1s/me_hee_nila_ranga_nila_gayan.mp3
=====================≈==============================

=====================≈==============================
वाचने
8074
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
संवेदना, अनुभुती घालुनिया
वा वा ! सुंदर ! प्रदीप
निळ्या नभाचे निळे किनारे
कविता लयीत म्हणता आली असती तर
मस्त.....बुवांच्या या कविते मुळे कधितरी खरडलेले हे आठवले
यमक जुळवत - ही कविता नाद खुळा
In reply to यमक जुळवत - ही कविता नाद खुळा by पॉइंट ब्लँक
बोला
In reply to बोला by नाखु
ऊप्स
छानच आहे कविता. पण अनुस्वार
In reply to छानच आहे कविता. पण अनुस्वार by सस्नेह
मी हेच म्हणणार होतो, पण नेहमी
In reply to मी हेच म्हणणार होतो, पण नेहमी by सूड
ओ सूडराव
In reply to ओ सूडराव by सस्नेह
@मी खुस्पट नाय हां काढलं ! >>
लै भारी कविता
In reply to लै भारी कविता by प्रचेतस
थांकु फॉर धागा अपडेट! :)
कसं काय जमतं एका निळ्या
In reply to कसं काय जमतं एका निळ्या by कंजूस
@"मी न कुणाला सांगायाची कविता
In reply to @"मी न कुणाला सांगायाची कविता by अत्रुप्त आत्मा
ही अशी यमकं काय चचा पण जुळवतो
In reply to ही अशी यमकं काय चचा पण जुळवतो by सूड
ऑ... अच वय! :P बलं...
जय भीम जय अर्जून
कृष्ण खरंच निळा होता का हो?