✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कातरवेळ......

ए — एक एकटा एकटाच, Fri, 03/06/2015 - 23:13
ती येताना कधीच रिकामी येत नाही अगदीच काही नाही तर........... आठवणीचं गाठोडं सोबत घेउन येते काही आठवणी असतात नाजुक अगदी शेवरीच्या कापसासारख्या.. तर काही अगदी नकोश्या कुमारिकेच्या गर्भारपणासारख्या... अश्याच आठवणींच्या कोंडाळ्यात माझ्या अस्तित्वापासून मलाच हिरावणारी...........................कातरवेळ एक ना एक दिवस तो आपला होईल या आशेवर तिने त्याचा पार क्षितिजापलिकडे पाठ्पुरावा केलाय कधी लपुन तर कधी जाणिवपूर्वक मागावर असलेल्या तिच्या चाहत्याला मात्र हुलकावणी देत पुरता हिरमोड केलाय ना तो झाला कधी तिचा........... ना कधी ती कुणाची झाली......... आयुष्याच्या एकाकीपणांत अडकलेली हुबेहुब माझ्या प्रतिबिंबासारखी........................................कातरवेळ आजवर मनाच्या प्रत्येक रंगात समरसून रंगत आली...... अशी ती.. कधी अधीर प्रेयसी....... कधी विरागी जोगीण.... कधी शृंगारीक शहारा....... कधी अनामिक हुरहुर....... कधी स्वप्नांची रांगोळी....... कधी चुकांची उजळणी......... कधी दमलेली पायवाट........ तर कधी....................... दूर हरवलेल्या आपल्या पाखरांना परतीची साद घालत, घरट्यात बोलवणारी..........................कातरवेळ

प्रतिक्रिया द्या
4359 वाचन

💬 प्रतिसाद (4)

छान!

अवतार
Sun, 03/08/2015 - 21:30 नवीन
लिहित राहा.
  • Log in or register to post comments

परत

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/09/2015 - 12:45 नवीन
परत एक सुंदर रचना... आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

एक एकटा एकटाच
Mon, 03/09/2015 - 19:55 नवीन
प्रोत्साहनासाठी अवतार आणि मि. का. तुमचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments

उस्फुर्तपणा

एकप्रवासी
Wed, 02/17/2016 - 00:07 नवीन
उस्फुर्तपणा कवितेतला आवडला…
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा