गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?
गेल्या वर्षातील दिवस जे सार्यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय
जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय
तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय
आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?
नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोस
नव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय
-ऋषिकेश दाभोळकर
सर्व मिसळप्रेमींना व तुमच्या कुटुंबीयांना हे लीप वर्षामुळे मिळणारे हे मोठ्ठे वर्ष अधिक आनंदाचे, आरोग्यपूर्ण आणि प्रगतीचे जावो हीच सदिच्छा!!

वाचने
5531
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
प्रकटन. शेवटची दोन कडवी विशेष आवडली. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
https://marathisahitya.blogspot.com/)
छान!
नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोस
नव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय
ऋषिकेशा, छान लिहिलं आहेस रे!
तात्या.
नववषाभिनंदन!
चांगले संकल्प!
छान..
या ओळी खास आवडल्या..
जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय
लय भारी
In reply to छान.. by शब्दवेडा
जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय
सही !!!
हुकले न श्रेय सारे !
मित्रा , तुझ्या कवितेच्या प्रयत्नामधे आमच्यापैकी अनेकांच्या भावना सामावलेल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करताना असणारी गतकालाबद्दलची हुरहूर, येत्या वर्षाबद्द्लच्या आशा आकांक्षा, काळज्या आणि मुख्य म्हणजे या सार्याना सामोरे जाण्याची उमेद या सार्याचे सुरेख प्रतिबिंब त्यात पडलेय् !
कवितेचा आस्वाद हा केवळ त्यातील काव्यगुणामुळेच घेता येतो याचा असले काही वाचले की विसर पडतो.
(अर्थात , काही गोष्टी वगळता , उदाहरणार्थ :
तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय )
जिला पहायचे तिला चोरून पाहण्याची आम्हाला गरज नाही... "मुक्या"ने वाहण्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे आमच्याकरता ;-)
ह.घ्या. !
अप्रतिम
शब्द मनाला भिडले!
नुतन वर्षाच्या तुम्हाला आणी तुमच्या आप्तांना हार्दिक शुभेच्छा!