माहेरपण.....
लेखनविषय:
जेव्हा दु:खच परतून येते
मायेने ते कवेत घ्यावे,
मालिश करुनी तळपायाला
हलके त्याला शांत करावे.
येणारच ते पुन्हा पुन्हा घरी
हक्कच त्याचा आपुलकीचा
सासुरवाशीण लेकीसाठी
माहेराने सज्ज रहावे.
कितीही आले ओठावर तरी
प्रश्न विचारू नये तयाला,
नशीब असते एकेकाचे
अपुले आपण मानून घ्यावे.
जाईल निघुनी उद्या सकाळी
नवीन क्षितिजे क्रांत कराया ,
करू नये पण उगीच त्रागा
तळहातावर दही वाढावे.
(लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)
वाचने
2655
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
विषय असा आहे की सुंदर म्हणणे
भाव आवडला
आत्ता एकदम लक्षात आले, इथे दु
In reply to आत्ता एकदम लक्षात आले, इथे दु by चुकलामाकला
अगदी बरोबर......
आवडली.
जरा वेगळी, पण सुंदर!
ठिक.
In reply to ठिक. by अत्रुप्त आत्मा
गुर्जी, लोभ असावा! :)
फारच वेगळा विचार ! आवडली .
छान आहे कविता.
धन्यवाद मंडळी!