यशोदे कसा गं बाई
श्याम तुझा मातला
ओलेती तनु कोमल माझी
अन द्वाडाने रंग टाकला
अंग अंग माझे जाळी
होळीच्या रंगेल ज्वाला
अंगांगाची होय काहिली
कान्ह्याने गं डाव साधला
गोपाळांचा जमवून मेळा
चहाटळ अडवी पांदणीला
लोण्याची त्यां लाच हवी
अन रंगाचा तो हाती बुधला
नंदाचा पोर्या गाली हसला
मैय्या, मी गं अगदीच भोळा
गोपी सार्या एक होवूनी
उगाच करती बघ कागाळ्या
माय यशोदा त्रासुन गेली
बांधुन घातला सावळा
धास्तावल्या गौळणी सार्या
बंधन कृष्णा अन आम्हां कळा !
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2758
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्तच
@धास्तावल्या गौळणी सार्या
(No subject)
In reply to @धास्तावल्या गौळणी सार्या by अत्रुप्त आत्मा
मस्त!
लै भारी
'पांदण' म्हणजे लहानशी वाट,
In reply to लै भारी by चाणक्य
धन्यवाद
In reply to 'पांदण' म्हणजे लहानशी वाट, by विशाल कुलकर्णी
'पांदणीत'भेटलस अंगाक खेटलस
In reply to धन्यवाद by चाणक्य
क्या बाात! जुन्या आठवणी
In reply to 'पांदणीत'भेटलस अंगाक खेटलस by विशाल कुलकर्णी
क्या बात है ! मस्तच.
खूप सुंदर
खासच. विकु टच आहे.
अरे व्वा , तू आहेस काय इथे?
In reply to खासच. विकु टच आहे. by सांजसंध्या