Skip to main content

(अष्टाक्षरी छंद)

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 11/11/2008 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
सागरात हेलावते नाव माझी वादळात शीड तिचे तुटलेले दिशाहीन अंधारात | लाटांमागे येती लाटा कल्लोळ हा आठवांचा दूर दूर नभांगणी खेळ रंगे सावल्यांचा | शब्द शब्द जपलेला सूर एक भारलेला आयुष्याचा सारीपाट मीच माझा मांडलेला | तुटलेले काही बंध ओढ लावती जीवाला काही नाती, क्षण काही माझे, मागते देवाला | सूर्यबिंब ढळे जळी अस्त जणु वेदनेचा शुभ्र ,शीतल चांदवा देई दिलासा सुखाचा | गंधीत हा गार वारा साद देई तुला, मला वेदनेच्या वाटेवर साथ देऊया सुखाला |
लेखनविषय:

वाचने 2347
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

गंधीत हा गार वारा साद देई तुला, मला वेदनेच्या वाटेवर साथ देऊया सुखाला | एकदम सुंदर कवीता. आवडली.

सुंदर कविता...! क्या बात है तात्या.

सुंदर कविता. :) सागरात हेलावते नाव माझी वादळात शीड तिचे तुटलेले दिशाहीन अंधारात | तुटलेले काही बंध ओढ लावती जीवाला काही नाती, क्षण काही माझे, मागते देवाला | हे विशेष भावलेत. मुमुक्षु

>>आयुष्याचा सारीपाट >>मीच माझा मांडलेला | या ओळी खुपच आवडल्या ! मस्त !!