Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख
नमस्कार,
नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट
प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली.
शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.
व्यायाम न जमण्याच्या/करण्याच्या कारणांची उदाहरणं देत पुस्तकाची सुरुवात होते. मग लेखिका स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचं महत्व, ते शरीरावर कशा प्रकारे परिणाम करतं, फॅट लॉस कसा होतो, कसा होत नाही, हे सांगते. व्यायाम का करावा, कसा करावा, किती करावा यासंबंधीची विपुल स्पष्टीकरणं असलेलं हे पुस्तक तुम्हाला व्यायामाला 'नाही' म्हणायला वाव देत नाही. अनेक शास्त्रीय बाबी सोप्या करून सांगत हे पुस्तक तुम्हाला व्यायामाचं महत्व पटवायचा प्रयत्न करतं.
याचबरोबर उदाहरणादाखल वर्कआउट रेजिम्सही या पुस्तकात आहेत. पुढे योग, शास्त्रीय नृत्य अशा अंगांनीही व्यायामाकडे, स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगकडे बघत लेखिका तिच्या क्लाएंट्सची काही मजेशीर उदाहरणं देत पुस्तकाचा शेवट करते.
प्रामाणिकपणे सांगायचं तर डाएट ही गोष्ट विशेष पटत नसल्याने रुजुता दिवेकरांची पहिली दोन पुस्तकं मी वाचलेली नव्हती. पण माझा मित्र व जिम ट्रेनर याने मला आग्रह करून हे पुस्तक वाचायला लावलं तेंव्हा हे मी वाचलं. तेंव्हा पहिले त्याला अनेक धन्यवाद. आणि अर्थातच रुजुता दिवेकर यांना धन्यवाद, की त्यांनी इतकं छान पुस्तक लिहिलं.
व्यायाम केलेल्या, करणा-या, करू इच्छिणा-या प्रत्येकाला मी हे पुस्तक सुचवेन. फिटनेस ला महत्व देणा-या किंवा न देणा-या प्रत्येकाला सुचवेन. आपली आपण फिटनेस ची व्याख्या, परिमाणं ठरवणा-या सर्वांनाही सुचवेन. तेंव्हा नक्की वाचा. फिट रहा. स्ट्राँग रहा.
माझ्यासाठी पुस्तक वाचण्याची फलश्रुती म्हणाल तर पुन्हा नियमित व्यायाम सुरू करण्याचा चंग बांधलेला आहे.


प्रतिक्रिया
माझ्यासाठी पुस्तक वाचण्याची
हश्शू आलं का कुनाला तली....
(No subject)
छान पुस्तक आहे.. फुकट जिम
वेल्लाभट फारच शॉर्ट झालं
मीच पुस्तकाबद्दल भारंभार
छान लिहिले आहे. पुस्तक वाचते
बुद्धिला आकलन होणं वेगळं. आणि
छान छान
२५० रुपये.
धन्स … अमेझॉन वरून मागवलं
हं. 'करिना कपूर' या नावाच्या
@आमची थैली भरणं सोडू नका. >>>
लोल
बरण्या घेऊन निघाले घरी.
रुजुता दिवेकरांची पहिली दोन
'डोन्ट लूज युवर माईंड, लूज