✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्यक्ती स्वतंत्र

न
निनाद जोशी यांनी
Wed, 03/04/2015 - 14:27  ·  लेख
लेख
व्यक्ती स्वतंत्र हा सध्याचा फारच ज्वलंत मुद्दा आहे. प्रत्तेक माणूस आपण जे काही करू त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची जोड लाऊन ते बरोबरच आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय??? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत??? आज मणिशंकर अय्यर सारखा माणूस अफझल गुरुला दिलेली फाशी हि निष्कारण होती आणि तो दोषी आहे हे निश्चित झाले नव्हते असे म्हणू शकतो. एक चित्रकार भारतमातेचे नग्नचित्र भारतात राहून काढू शकतो. एक लेखक दिग्दर्शक भारतात राहून भारतीय फौजेला गुन्हेगार ठरवणारा आणि स्वतंत्र काश्मीरला समर्थन देणारा चित्रपट काढतो. ह्या सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे योग्य ठरेल का????
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3381 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ह्या सगळ्याला व्यक्ती

अनुप ढेरे
Wed, 03/04/2015 - 14:29 नवीन
ह्या सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे योग्य ठरेल का????
हो. पूर्णपणे.
  • Log in or register to post comments

देशद्रोह हा शब्द्द केव्हा वापरावा???

निनाद जोशी
Wed, 03/04/2015 - 14:35 नवीन
असे असेल तर मग देशद्रोह हा शब्द्द केव्हा वापरावा......
  • Log in or register to post comments

त्यावर बक्कळ चर्चा होऊ शकते.

अनुप ढेरे
Wed, 03/04/2015 - 14:44 नवीन
त्यावर बक्कळ चर्चा होऊ शकते. पण वरील एकही गोष्ट देशद्रोह नाही. गुन्हा देखील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी

जबाबदारीची जाणीव असावी

आकाश कंदील
Wed, 03/04/2015 - 14:40 नवीन
स्वातंत्र्य असावे पण जबाबदारीची जाणीव असावी, स्वातंत्र्य म्हनजे स्वैराचार नसवा. अधिकारा बरोबर कर्त्यव्य लक्ष्यात ठेवावे.
  • Log in or register to post comments

कसे आहे, प्रत्येक नाण्याला २

खंडेराव
Wed, 03/04/2015 - 15:15 नवीन
कसे आहे, प्रत्येक नाण्याला २ बाजु असतात. तुमची उदाहरणे selective आहेत. हयदर च्या दुसर्या बाजुवरही सिनेमे आलेत. पिके वर प्रश्न आणि MSG ला विरोध केला कि अक्खा सेन्सॉर बोर्ड गायब. हे लफडे आहे.
  • Log in or register to post comments

भारतातील व्यक्तीस्वातंत्र्य हे मर्यादित आहे

बाप्पू
Wed, 03/04/2015 - 18:03 नवीन
भारतामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य आहे. (विचार,वक्तृत्व,प्रकाशन,संचार ई .) परंतु प्रत्येक व्यक्तिस्वातंत्र्याला घटनेनुसार मर्यादा किंवा बंधने आहेत. हि बंधने भारतातील अखंडता, बंधुता, न्याय समता यांचे रक्षण करण्यासाठी आहेत. कोणीहि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर भारताची अखंडता, बंधुता, न्याय, समता, कायदा इ घटकांना बाधक असे वर्तन करू शकत नहि. अश्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. परंतु बर्याच वेळा राजकीय आणि प्रशासकिय उदासीनतेमुळे हि कारवाई होत नाहि. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादेवरील उदाहरण : - MIM चे नेते ऒवेसि यांना पुण्यात जाहीर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. नंतर काही आटी लावून त्यांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आलि. घटनेच्या १९ ब कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला भारतात सभा घेऊन (शस्त्र -विरहित आणि शांततेत ) आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण तरीही सामाजिक शांततेचा विचार करून प्रशासनाने त्यांना सभा घेण्याची परवानगी नाकारली होती. म्हणजेच भारतातील व्यक्तीस्वातंत्र्य हे मर्यादित आहे. (आणि ते असायलाच हवे असे माझे मत आहे :) )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा