✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लायब्ररी लव 2

M
mohite jeevan यांनी
Wed, 03/04/2015 - 08:06  ·  लेख
लेख
लायब्ररी लव 2 'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले.  हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले  पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली. ' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले' 'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले. अचानक डस्टी कपाट जवळ दिसते, तीने एक सारखी माझ्या कडे पाहिले. 'डस्टी परत ये माझ्याकडे ,' मी तिच्याकडे हात करत म्हणाले, अचानक तिच्या व माझ्या मधील पुस्तक रॅक मधुन एक उंदराचे पिटुकले बाहेर पडले व ते माझ्या दिशेने येऊ लागले , त्या पाठोपाठ डस्टी त्या उंदराच्या मागे धावू लागली.  मी घाबरले व मी माझ्या जवळच्या रॅक मधुन हाताला  लागलेले जाडजूड पुस्तक त्या उंदराच्या दिशेने फेकले व ते बरोबर त्या उंदरावर पडले. ' खुपच छान , मला वाटते तु त्या उंदराला मारलीस, ' या आवाजाने मी एकदम दचकते व डस्टी ही पळुन जाते. खरचं मी  उंदराला मारले? मी त्या पुस्तका जवळ गेले,  ' हॅलो , तु मला ऐकू शकतोस ,' मी हळुच पुस्तक उचलुन पाहत म्हणाले, ' मला माफ कर,' मी ह्या  उंदराचा खुन केला असे मला वाटू लागले. 'देवा मला माफ कर , मला खरोखरच त्या उंदराला मारायचे नव्हते, '  मी मनातल्या मनात प्रार्थना करु लागले आणि माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागले. अचानक एक हात माझ्या खांद्यावर पडतो व मी भितीने उडी मारली आणि मी पाठीमागे पाहीले. 'तु ठीक आहेस?,' तो मुलगा माझ्या कडे  पाहत म्हणाला,  मला त्याचे डोळे खुपच आकर्षक वाटले. 'हो मी ठीक आहे,' मी डोळे पुसत व स्वतःला सावरत  पुढे म्हणाले, 'मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?,' 'मी आरव , मला मदत हावी आहे पण त्या अगोदर, डस्टी कोठे आहे?,' तो मुलगा म्हणाला, 'माहीत नाही, ' मी म्हणाले, 'तर त्या मांजरा चे नाव डस्टी आहे? ,' 'हो,' मी आजुबाजूला पाहत म्हणाले, 'कारण ती काळ्या रंगाची आहे म्हणून बरोबर,'  काहीतरी जिंकल्याचा भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, 'नाही , कारण तीला धुळीत बसायची सवय आहे आणि धुळीला इंग्रजीत डस्ट म्हणतात,  म्हणुन मी तिचे नाव डस्टी ठेवले,' मी चेहऱ्यावर हास्य करीत म्हणाले, 'ओ..,' आरव आश्चर्याने पाहत म्हणाला, ' तु लायब्ररी वरील मागील बाजूस काय करत आहेस?, '   मी काॅम्पुटर्स डिस्क हातात घेत म्हणाले, खरंतर हा प्रश्न मी करायला नको होते. कारण लायब्ररीत सर्वत्रच पुस्तके होती. 'ओ..,'  काहीतरी आठवण झाल्याने त्याने खिशातून एक कागद काढुन माझ्याकडे दाखवला. चंद्र कोर - कवि स्वप्निल ' तर मी ही कविता शोधत आहे त्यावर मला रिपोर्ट लिहायचा आहे, हे माझ्यासाठी  डोक्याला तापच झालाय, ' आरव  वैतागत म्हणाला, ' मला माहीत आहे ते कोठे आहे, ' मी त्याच्या हातातुन ती चिठ्ठी घेऊन, मी पुस्तकाच्या शेवटच्या रॅक कडे चालले. तो माझ्या मागुन येऊ लागला. ही कविता खुपच जुनी असल्यामुळे ती मागील शेवटीच्या रॅक मध्येच असणार , लायब्ररी तील प्रत्येक पुस्तक कोठे आहे  हे मला चांगलेच माहीती असते. ' नाही. .नाही. ....ना....नाही. .,' मी रॅक मधील एक एक पुस्तक ढकलून पाहु लागले. 'हं ...सापडले, ' मी आनंदाने ते पुस्तक बाहेर काढत म्हणाले, आणि तेवढ्याच आनंदाने ते मी त्याच्या हातात ठेवते. 'थॅक बेबी,' तो म्हणाला, आणि मी कंफ्यूज झाले, मला त्याचा राग आला आणि मी म्हणाले, ' माझे नाव अनया आहे आणि तुला मी सांगितले आहे,' तो माझ्याकडे बघून हसु लागला. 'प्रथम मी पुस्तक तपासुन पाहतो ,' तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत म्हणाला, ते लहान कवितेचे पुस्तक चाळत, शिटी  मारत  तो जिन्यावरून खाली गेला. आणि मी पाहताच राहीले. मी त्या मेलेल्या उंदरा जवळ गेले पण तेथे उंदीर नव्हता , तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती. 'तु त्या उंदराला खाल्ली का?,' मी म्हणाले, आणि डस्टी डोळे फिरवून बघु लागली. क्रमश:
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7978 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मस्त मजा आली..

खटपट्या
Wed, 03/04/2015 - 08:26 नवीन
मस्त मजा आली..
उंदराचे पिटुकले
(पाकॄ पाठवा)
माईऊ ..माईऊ
डस्टी बहुतेक माईंचा अवतार आहेत. "मै माई हू" असे म्हणायचे असेल.
मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?,
तु मुलगा आहेस का मुलगी ते सांग आधी. सद्या एवढेच...
  • Log in or register to post comments

मस्त मजा आली..

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/04/2015 - 08:53 नवीन
मस्त मजा आली.. उंदराचे पिटुकले (पाकॄ पाठवा)
वारलो... _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

अजया
Wed, 03/04/2015 - 08:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो !!

सानिकास्वप्निल
Wed, 03/04/2015 - 15:20 नवीन
ठ्ठो !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

'थॅक यू मोजि'

यसवायजी
Wed, 03/04/2015 - 08:34 नवीन
'थॅक यू मोजि'
  • Log in or register to post comments

छान..

योगी९००
Wed, 03/04/2015 - 08:45 नवीन
मोजीभाऊंचे लेख आणि कथा मला खुप आवडते. मी ते वाचतो. मला खूप छान वाटते. मला हसू येते.
  • Log in or register to post comments

(No subject)

असंका
Wed, 03/04/2015 - 11:48 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

लॅबररी शब्द सुधरल्याचा

अजया
Wed, 03/04/2015 - 09:02 नवीन
लॅबररी शब्द सुधरल्याचा त्रिवार निषेध.मोजी तुमसे ये उम्मिद नहीं थी. निषेधार्थ मी मनातल्या मनात दोन मिनिटं मौन पाळणार आहे.
  • Log in or register to post comments

@ दोन मिनिटं मौन

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/04/2015 - 09:44 नवीन
@ दोन मिनिटं मौन पाळणार आहे.>> संपली दोन मिण्टं . आता बोला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आत्मुदा

नाखु
Wed, 03/04/2015 - 09:48 नवीन
त्या त्यांची दोन मिण्ट म्हणाल्या आहेत तेव्हा त्याच घोषीत करतील संपल्याची तोपर्यंत आपण शांतता राखूया (वादाळापूर्वीची) हा का ना का !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मनातल्या मनात पाळलं मौन.बाबा

अजया
Wed, 03/04/2015 - 09:59 नवीन
मनातल्या मनात पाळलं मौन.बाबा बर्व्यांनी शिकवलंय.नैष्ठिक मौन पाळायला.समजलेंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अनाहिता मनातल्या मनात सुद्धा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/04/2015 - 10:51 नवीन
अनाहिता मनातल्या मनात सुद्धा दोन मिनिटं गप्प राहु शकतात? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सेम सेम.. शेम शेम मोजी!!

पिशी अबोली
Wed, 03/04/2015 - 10:52 नवीन
सेम सेम.. शेम शेम मोजी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मस्त....

ब़जरबट्टू
Wed, 03/04/2015 - 09:49 नवीन
लय म्हणजे लय बेक्कार तुफान लिव्हता राव तुम्ही... :)
  • Log in or register to post comments

कमाल आहे...

थॉर माणूस
Wed, 03/04/2015 - 10:00 नवीन
कमाल आहे... अजूनही कुणाला ही एक साधी सुधी प्रेमकथा नाही ते लक्षात आलेलं नाही की काय?
तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती.
  • Log in or register to post comments

तुम्हाला असे म्हणायचे आहे का? .... :D

झकास
Wed, 03/04/2015 - 10:02 नवीन
...... 'हो मी ठीक आहे,' मी डोळे पुसत व स्वतःला सावरत पुढे म्हणाले, 'मी आरव, येथील सहाय्यक. मी तुमची काय मदत करु शकतो?' तो मुलगा म्हणाला 'मी अनया , मला मदत हवी आहे पण त्या अगोदर, डस्टी कोठे आहे?' ........
  • Log in or register to post comments

मोजिंच्या कथांचे अर्थ इतके

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/04/2015 - 10:51 नवीन
मोजिंच्या कथांचे अर्थ इतके साधे सोपे सरळ नसतात. ते भलतेच गूढगंभीर, विचारप्रवर्तक, बोधप्रद, अनुस्वारयुक्त, लेखकाच्या मनातील आर्त खळबळ दर्शविणारे, वाचकाला गोंधळवून टाकून मोजिंपेक्षा जास्त विनोदी लिहायला उद्युक्त करणारे आणि असेच/इतर प्रकारे बरेच काही आसतात... *unknw* *dance4*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकास

व्याकरण सुधारा, जमेल हळुहळु,

कविता१९७८
Wed, 03/04/2015 - 10:36 नवीन
व्याकरण सुधारा, जमेल हळुहळु, मोठा भाग लिहा, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

व्याकरण सुधारा

सस्नेह
Wed, 03/04/2015 - 11:41 नवीन
व्याकरण सुधारा
मोजींचे व्याकरण सुधारले तर त्यांच्या कथा कोण वाचणार ? +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

+१

असंका
Wed, 03/04/2015 - 11:52 नवीन
+१ (म्हणजे त्यांनी ते सुधारू नये असं काय आम्हाला वाटत नाही पण ते एक फार मोठे अ‍ॅट्रॅक्शन आहे त्यांच्या कथांचे हे तर खरंच आहे..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आणि म्हणुनच मला त्यांच्या कथा

कविता१९७८
Wed, 03/04/2015 - 12:50 नवीन
आणि म्हणुनच मला त्यांच्या कथा आवडतात, पण सर्वांनीच विरुद्ध प्रतिसाद दिले तर पुढचा भाग मोजींनी लिहिला नाही तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मोजीजी, आपण महान आहात आपली

पियुशा
Wed, 03/04/2015 - 10:54 नवीन
मोजीजी, आपण महान आहात आपली लेखन शैली फारच्च प्रभावी आहे तुमची कथा वाचली की ती डोक्यात (जाते ) न मनात कित्येक दिवस घर करुन राहते , ;) कधी कधी मिपाकराचा मुड ओफ झाला असेल जीवनात निराशा आली असेल , आयुष्यात काहीच राहीले नै असे वाटत असेल तर मोजीच्या कथा जरुर वाचा याने तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनन्द परत मिळेल ;) तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती. अरे देवा आमच्या बोक्याला तर देवाने ४ ही पायच दिलेत :p बाकी डस्टी हे नाव वाचुन कथा फारिन मधली आहे अस वाटल होत जौ देत अन अनया डस्टीपेक्षा चपळ आहे उंदराला मारायच्या बाबतीत वा वा वा ..... चालु द्या .....
  • Log in or register to post comments

:))

सविता००१
Wed, 03/04/2015 - 12:07 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

प्रस्तूत लेखातील भाषेवरून सदर

संदीप डांगे
Wed, 03/04/2015 - 12:11 नवीन
प्रस्तूत लेखातील भाषेवरून सदर कथा इंग्रजी कथेचं भाषांतर वाटतंय. 'तु ठीक आहेस?,' are you alright? मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो? how can I help you? माझे नाव अनया आहे आणि तुला मी सांगितले आहे and I have told you that. तु त्या उंदराला खाल्ली का you ate that mouse, no? -द्वारा मोजी कथा अन्वयार्थ संशोधन संस्था. हिवरखेड (रुपराव). तालुका: तेल्हारा. जिल्हा: अकोला. महाराष्ट्र राज्य.
  • Log in or register to post comments

हो...खरच की ...मला आधी वाटले

राशी
Wed, 03/04/2015 - 16:44 नवीन
हो...खरच की ...मला आधी वाटले की मी काही चुकीचे तर वाचत नाही ना? ......हे भाषांतर असल्या सारखे वाटत आहे....बाकी प्रतीक्रिया वाचुन ह.ह.पु.वा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अनया

तिमा
Wed, 03/04/2015 - 14:05 नवीन
अनया है वह! त्या पिटूक ल्याची बाजू ऐकायची असेल तर फक्त व्य.नि.तच सांगता येईल.
  • Log in or register to post comments

व्यनि करा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/04/2015 - 14:24 नवीन
व्यनि करा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/04/2015 - 14:43 नवीन
+१ :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वा काय लवस्टोरी हाय... यावर

मोहनराव
Wed, 03/04/2015 - 15:13 नवीन
वा काय लवस्टोरी हाय... यावर नक्कीच शिनुमा निघनार!!
  • Log in or register to post comments

थांबा पुढचा भाग येउ द्या..

आनन्दा
Wed, 03/04/2015 - 20:46 नवीन
थांबा पुढचा भाग येउ द्या.. म्हंजे कळेल
  • Log in or register to post comments

छान

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/05/2015 - 23:17 नवीन
सर्वप्रथम लॅबररीचं लायब्ररी केल्याबद्दल अनेक धन्यवाद. कथा वाचतो आहे. विशेषतः हा आरव 'आरवतो' की 'आवरतो' हे जाणण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
  • Log in or register to post comments

लॅबररी आणि लायब्ररी

चित्रगुप्त
Fri, 03/06/2015 - 14:43 नवीन
सर्वप्रथम 'लॅबररी' चे 'लायब्ररी' केल्याबद्दल दुखवटा व्यक्त करतो, आणि निषेध नोंदवतो. असे काही करू नका वो सायेब. तुमच्या लेखनाचा आत्माच हरवेल अश्याने. तुम्ही जसे लिहित आला आहात, तसे लिहिण्यातच तुमचे वैशिष्ट्य आहे, ते हरपू देऊ नका, ही कळकळीची विनंती. आहेत बहु, होतील बहु, परि मोजीसम मोजीच, हे तुमचे असामान्यत्व हरवू नका.
  • Log in or register to post comments

" तु लायब्ररी वरील मागील

मेघनाद
Fri, 03/06/2015 - 14:47 नवीन
" तु लायब्ररी वरील मागील बाजूस काय करत आहेस?" " खुपच छान , मला वाटते तु त्या उंदराला मारलीस" "तु त्या उंदराला खाल्ली का?" असा/असे प्रश्न ऐकून डस्टीचे डोळे फिरणं साहजिकच आहे.
  • Log in or register to post comments

आजचा गृहपाठ

नाखु
Fri, 03/06/2015 - 15:08 नवीन
(ग)धड्या खालचे प्रश्नः
  • जांभई कोणी दिली ? व का ? ५गुण
  • धुळीत बसली म्हणून डस्टी तर हीच मांजर जर क्रिकेट खेळपट्टीवर बसली तर काय नाव असेल??? ५गुण
  • आरव सकाळी कोंबड्याबरोबर फिरायला गेला या वाक्यात कोंबड्याला मुख्य कर्ता बनवून वाक्य आणि आरव्+कोंबडा दोन्ही चालवा.१० गुण
  • सराव अभ्यास :घरी उंदराला पुस्तकाने मारण्याचा सराव करा उंदीर व पुस्तके आम्ही पुरवणार नाही.
  • Log in or register to post comments

ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/06/2015 - 15:16 नवीन
ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मोजी

नाखु
Wed, 05/18/2016 - 10:02 नवीन
पुढचा भाग कधी... आक्रस्ताळी धाग्यांवर मोजी आणि अकुंच्या कथा अक्सीर ईलाज आहेत असा आमचा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा