शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.
माझा एक मित्र नेहमीच विना कटकटीच्या,धोका नसलेल्या आणि फायद्याची शक्यता असलेल्या संधींच्या शोधांत असतो.असलेल्या नसलेल्या सर्व धोक्यांची 'काळजी' करण्याच्या त्याच्या सवयामुळे मी त्याला 'काळजीवाहु' हा दर्जा बहाल केला आहे. बजेटच्या संदर्भात मी त्याला 'ह्मखास फायद्याची' एक आयडिया सांगितली.
शुक्रवारी दुपारी मी त्याच्याकडुन 'IDBI Nifty Index Fund' मध्ये गुंतवण्यासाठी २ लाखाचा चेक मागितल्याबरोबर अपेक्षेप्रमाणेच त्याचे "अरे नको रे, मी नाही बाबा अशी रिस्क घेणार....' सुरु झाले.
"हे बघ, खास तुझ्यासाठी ही आयडिया आहे. आजच्या (शुक्रवारच्या)NAV ने युनिटस विकत घ्यायचे, उद्या बजेट, बाजार चालु, बॅंका बंद, हो ना ??.. मार्केटला आवडले आणि उद्या(शनिवारी) व सोमवारी बाजार वर गेला तर मिळालेले युनिट्स सोमवारच्या NAVला विकुन टाकयचे!!!" मी म्हटले. "अरे ते ठीक आहे पण 'गोविंदा' झाला तर?? झोपलो की"- काळजीवाहु "हे बघ बाजाराचा गोविंदा होईल किंवा अण्णु गोगट्या, आपल्याला काय करावचेय??..शेंडी तर आपल्याच हातात आहे. अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे......."मी गौप्यस्फोट केला आणि बजेटची गडबड असल्याने त्याची प्रतिक्रिया पहायलाही न थांबता त्यच्याकडुन चेक घेवुन तेथुन निघालो.
झाले, आम्ही शुक्रवारी १६.६१ रुपयाने घेतलेले युनिटस काल १६.८२ पैशाला विकुन दोनच दिवसाच्या गुंतवणुकीवर १.२८% नफा मिळवला. ."बेस्ट!!याला म्हणतात डोकेलिटी,अशा आयडिया पाहिजेत,नो टेंशन,रिलॅक्स माईंड" -काळजीवाहु सरकारने विश्वासदर्शक मत पास करुन घ्यावे अशा चेहर्याने माझा मित्र म्हणाला.
"संदेश,तुला माहित आहे का रे टेस्ट क्रिकेटमध्ये भारताच्या कोणत्या बॅटसमन ची सरासरी सर्वात जास्त आहे??" मी चहाचा घोट घेत विचारले. "ह्म्म, तशी गावस्कर,द्रविड बाप माणसे आहेत, पण तरीही आपले मत तेंडल्यालाच..." अपरंपार सचिन भक्ती बोलती झाली. "साफ चुक' - मी..... "हा मान दीपक शोधन या फलंदाजाकडे जातो. काही अपरिहार्य कारणाने याची कारकिर्द फक्त ०३ सामन्यांचीच होती आणि सरासरी ६०+ आहे." मी म्हटले. "....आणि फक्त सरासरी बद्दल बोलायचे तर तुझ्या आवडत्या विनोद कांबळीची सरासरी या तिन्ही बापांपेक्षा सरस आहे हो.." मी जखमेवर जणु मीठच चोळले.
मित्रवर्याची यानंतरची काही वाक्ये शिमग्याला साजेल अशा भाषेत झाल्याने ती देण्यापेक्षा हे उदाहरण संदेशला देण्यामागची भुमिका साराशंरुपाने सांगतो.
काय आहे छोट्या कालावधीतील चमकदार कामगिरीपेक्षा मोठ्या कालावधीत केलेली कामगिरी अधिक महत्वाची ठरते हे साधे सोपे तत्व आहे. हेच सुत्र गुंतवणुक विषयासही लागु पडते. म्हणजे वर उल्लेखलेल्या उदाहरणांतील फायद्याचे दोन दिवसांत सव्वा टक्का, किंवा 'डीप आउट ओफ मनी' ऑपश्न्स विकुन शक्य असणारे १०/१२ दिवसांत एक/दीड टक्का ही प्रमाणे वरकरणी दिसावयास उत्तम दिसत असली तरी अशा उल्लेखलेल्या संधी षठीसामासी, क्वचितच असतात, त्या साधण्याने आपण किती जागरुक आहोत यावर नकीच शिक्कामोर्तब होते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असे अजिबातच नाही, परंतु केवळ अशा संधीच्याच शोधावर अवलंबुन राहिल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माणाचे, किंवा परंपरागत पर्यायांपेक्षा अधीक चांगला परतावा मिळ्वण्याचे, उद्दीष्ट साध्य होणे कठीण आहे. काही मर्यादित काळ वगळता उर्वरित काळामध्ये अशा संधी नसलेने पुर्ण वर्ष वा तत्सम कालावधीकरीता मिळणारा परतावा हा तितकासा आकर्षक असणार नाही. 'आर्बिट्राज किंवा हेजिंग' करणे, 'डीप आउट ओफ मनी' ऑपश्न्स विकणे वा वर दिलेल्यासारख्या 'संधीसाधु'पणांतुन वार्षिक १२ टक्क्यांपेक्षा अधीक परतावा क्वचितच मिळालेला दिसतो.
सहाजिकच एखाद्या वर्षासरख्या मध्यम काळांत गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवायचा असेल तर अधिक वारंवारतेने वापरता येणारी गुंतवणुक व्युहरचना,(ज्यात अनिश्चिततेचे प्रमाण कदाचित अधिक ठेवावेही लागेल) आवश्यक आहे ज्याविषयी येत्या काळांत लिहीन म्हणतो.- प्रसाद भागवत.
Book traversal links for शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.....ज्याविषयी येत्या काळांत
वाचतोय पुभाप्र
"हे बघ, खास तुझ्यासाठी ही
नैतिक/अनैतिकतेच्या
कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत
हास्यास्पद जस्टिफिकेशन
सहमत. अगदी टोटल अनैतिक आहे.
कोणास ही गोष्ट अनैतीक वाटत
?
आणि मालकी म्हणजे कमिटमेंट.
ही व्याख्या युनिट विकत
तुमचे वाक्य पुन्हा वाचा
+१
काहीही लॉजिक आहे
आपली माहिती पुन्हा एकदा
पैसे देणार हे मान्य करुन,
आज बर्याच दिवसांनी पुन्हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळेलिखाण पटते
त्यात अशी आपली विकत
लोल
भागवत साहेब,
माझी ब्यांक MF घेतल्यावर
T+3?
अब्बो...
अशावेळी फंडाला दिलेल्या चेकचे 'स्टॉप पेमेंट' करुन मिळालेले युनिट्स 'रद्द' करुन घ्यावयाचे...हे प्रकरण काही समजले नाही राव.अहो म्हणजे पुलंच्या भाषेत, ते
आजानुकर्ण साहेब, (१)मिळालेले
तुम्हाला नक्की अर्थव्यवहाराची कल्पना आहे की नाही
.
खरे तर आता या पोस्टरील हा
हा हा
आजानुकर्णांच्या प्रतिसादांशी
अनैतिक आणि बेकायदेशीर
५. माझ्या मित्राचे वडील वकील
छान
तुमचे लिखाण नेहमीच आवडते.
.
अॅपल्स अॅन्ड ऑरेंजेस
पटलं तर कमवा नाहीतर ...
नैतिकता/अनैतिकता हा वैयक्तिक
काय सांगता?
.
शेअर विकून फक्त नुकसानीची
आजानुकर्ण ह्यांना अनुमोदन.
असे अनेकदा करायचे
डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स
No.. they are treated as
No.. they are treated as
डीप आऊट ऑफ मनी ऑप्शन्स जर मी
ओके
प्रसाद भागवत साहेबाशी सहमत,