वख्तने किया क्या हसीं सितम
वख्तने किया क्या हसीं सितम
भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे. पण असल्या कवितांमध्ये, जिथे कवीला "काय" सांगावयाचे आहे हे तुम्हाला आधीच माहीत असते, तेथे जास्त महत्वाचे होते. आता "कसे" सांगतो आहे ह्यालाच मोल येते. कठोर वर्णांचा त्याग, लयीत म्हटले कीं करुण रसाला पोषक वातवरण निर्मिती, हे आलेच. कवी एक क्लुप्ती नेहमी वापरतात, लक्षात आली आहे ? अशी गीते नेहमी प्रथम पुरुषी असतात. कळत न कळत तुम्ही गीतातील पात्रांशी एकरूप होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक पात्रांची कोठलीच वैयक्तिक माहिती देणे टाळलेले असते. कशाकरितां ? या संदिग्धतेचा फायदा म्हणजे वाचक स्वत:च ती माहिती आपल्याला पाहिजे तशी भरतो. वाचकाची ही गुंतवणुक गीत लोकप्रिय करण्यास मोलाची मदत करते. असो. प्रास्ताविक थांबवून आजच्या गीताकडॆच वळू. गीत आहे कैफ़ी आझमी यांचे.
वख्तने किया क्या हसीं सितम !
तुम रहे न तुम, हम रहे न हम !!
बेकरार दिल इस तरह मिले !
जिस तरह कभी हम जुदा न थे !!
तुमभी खो गये, हमभी खो गये !
एक राहपर चलके दो कदम !!
जायेंगे कहां सुझता नही !
चल पडे मगर रास्ता नही !!
क्या तलाश है कुछ पता नही !
बुन रहे है दिन, ख्वाब दम-ब-दम !!
सितम-- जुलुम, अत्याचार, हसिन --सुंदर, बेकरार--व्याकुळ, आतुर, सुझना -- लक्षात येणे,
तलाश --शोध, , बुनना -- बुझाना, थंड करणे, भावना शांत करणे,, ख्वाब --स्वप्न, दम --श्वास, पळ, क्षण, दम-ब-दम -- क्षणोक्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर.
ती कैफियत सांगते आहे; पण नक्की तीच कां ? तो ही असेल ! दोघे इतके एकजीव आहेत कीं तो ? ती ? काय फरक पडतो ? काळाने घाव घातला दोघांवरच. आणि "अति झालं, हसूं आलं " या न्यायाने ती म्हणते आहे " हा अत्याचार, हा जुलुम, काळजाला इतका भिडला आहे कीं तो जुलुमही आता सुंदर वाटू लागला आहे. त्या वेळचा तूं, आता तसा राहिला नाहीस रे, पण तुला दोष कसा देऊ ? मी तरी थोडीच तशी उरले आहे !
गतकाळात गेल्यावर आता तिला आठवत आहे आपली पहिली भेट. दोन व्याकुळ जीव एकमेकांना भेटल्यावर इतके आत्कृष्ठ झाले की त्यांना वाटले की ही आपली जन्मोजन्मींचीच भेट आहे, कधीही न तुटलेली. व्याकुळ कां ? जर तुम्हाला जीवाला जीव लावणारे कोणी भेटलेच नसेल तर तुम्ही व्याकुळच झालेले असणार ! तर असे हे व्याकुळ दोघे एका वाटेवर भेटले, दोन पावले बरोबर चालले. थोडे इथले सौंदर्य पहा. राहपर---वाटेवर. लोकल आल्यावर स्टेशनच्या बाहेरच्या गर्दीच्या लोंढ्यात, रस्त्यावर कोणाबरोबर तरी चार पावले चालणे आणि माथेरानच्या गर्द सावलीच्या वाटेवर, दोघांनीच, दोन पावले चालणे, किती फरक आहे ! आणि काळाचा आघात इथेच, दोघेही हरवले, दोघांनाही कळत नाही कीं आपण कोठे व आपला साथीदार कोठे ?
आता या वाटेवर तिला पार गोंधळून टाकले आहे. बिचारी एकटी... . कळत नाही की जायचे ..पण कुठे ? चार पावले टाकावयची तर पायाखाली मार्गच नाही. या संभ्रहावस्थेतील पुढचा यक्षप्रश्न म्हणजे पुढे शोध घ्यावयाचा पण कुणाचा ? कसा ? कुठे ? काळ हेच एक औषध आहे, प्रत्येक दिवस भावनांचा कढ कमी करेल पण ते पुढचे; आज क्षणोक्षनी दिसणारी स्वप्ने, पुढच्या क्षणी चुराडा होणारी स्वप्ने. त्यांचे काय ?
व्याकुळ कां ? जर तुम्हाला जीवाला जीव लावणारे कोणी भेटलेच नसेल तर तुम्ही व्याकुळच झालेले असणार ! तर असे हे व्याकुळ दोघे एका वाटेवर भेटले, दोन पावले बरोबर चालले. थोडे इथले सौंदर्य पहा. राहपर---वाटेवर. लोकल आल्यावर स्टेशनच्या बाहेरच्या गर्दीच्या लोंढ्यात, रस्त्यावर कोणाबरोबर तरी चार पावले चालणे आणि माथेरानच्या गर्द सावलीच्या वाटेवर, दोघांनीच, दोन पावले चालणे, किती फरक आहे ! आणि काळाचा आघात इथेच, दोघेही हरवले, दोघांनाही कळत नाही कीं आपण कोठे व आपला साथीदार कोठे ?
आता या वाटेवर तिला पार गोंधळून टाकले आहे. बिचारी एकटी... . कळत नाही की जायचे ..पण कुठे ? चार पावले टाकावयची तर पायाखाली मार्गच नाही. या संभ्रहावस्थेतील पुढचा यक्षप्रश्न म्हणजे पुढे शोध घ्यावयाचा पण कुणाचा ? कसा ? कुठे ? काळ हेच एक औषध आहे, प्रत्येक दिवस भावनांचा कढ कमी करेल पण ते पुढचे; आज क्षणोक्षनी दिसणारी स्वप्ने, पुढच्या क्षणी चुराडा होणारी स्वप्ने. त्यांचे काय ?
आपल्याला आठवणारे एखादे, उदा." भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी " हे गीत घ्या व दोन कवींनी मांडणी कशी केला आहे ते ताडून पहा. एक मिनिट, मी दोन गीतांची तुलना करावयास सांगत नाही. दोन्हीही सुंदर फुले आहेत एक गुलाबाचे तर दुसरे मोगर्याचे. सुरवातीला पाहिले त्या प्रंमाणे त्यांतेल सौंदर्यस्थळे शोधून काढा.
कैफ़ी आझमींचे हे गीत "कागझके फूल" या गुरुदत्ताच्या अवीट सुंदर चित्रपटात गीता दत्तने गायले आहे. संगीत सचिनदांचे. चित्रपट सुरवातीला आपटलाच. गीता गुरूची पत्नी व सिनेमात वहिदा रहमान नायिका. सिनेमातल्या प्रमाणेच प्रत्यक्षातील गुरु-वहिदाच्या प्रेम प्रकरणाने तिघांनाही फक्त मनस्ताप मिळाला. जाउ द्या. गीताने या गाण्याचे सोने केले. पुढे लतादिदींनी Tribute to Geeta Dutt" या नावाखाली हे गाणे म्हटले. जगजीतने ही म्हटले अनेक नवीन गायिकांनी म्हटले. मी तीन दुवे देत आहे. एकच विनंती. जरा वेळ असेल तेव्हा शांतपणे ऐका.
http://in.yhs4.search.yahoo.com/yhs/search?hspart=iry&hsimp=yhs-fullyhosted_003&type=dnldstr1202¶m1=1¶m2=cd%3D2XzuyEtN2Y1L1QzutDtDtAtDyCyBt गीता दत्त
http://in.yhs4.search.yahoo.com/yhs/search;_ylt=A2oKmMqmR_FUaS4AeVLnHgx.?p=Tribute+to+Geeta+Dutt&fr2=sb-top&hspart=iry&hsimp=yhs-fullyhosted_003¶m1=1&par लता
https://www.youtube.com/watch?v=YEBBlRWRwYo जगजित
शरद
याद्या
3761
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
सुंदर
+१
In reply to सुंदर by सर्वसाक्षी
समानधर्मा
In reply to सुंदर by सर्वसाक्षी
लेख आवडला आणि सर्वसाक्षी
गंभीर गाणी आणि सचिनदा ...
गीता दत्त यांची स्वतःची कहाणी
ह्या गाण्यामागची कथा काही
छान आहे रसग्रहण
चुक मान्य
In reply to छान आहे रसग्रहण by भीडस्त
लेख वर आणन्याची गरज आहे.
धन्यवाद!
In reply to लेख वर आणन्याची गरज आहे. by संदीप डांगे
अजरामर गाणे. शब्द, चाल, आवाज,
सुंदर मनोरम गाण्याचे सुरेख रसग्रहण! आवडले.
छान
In reply to सुंदर मनोरम गाण्याचे सुरेख रसग्रहण! आवडले. by नरेंद्र गोळे