Skip to main content

निष्पर्ण

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 28/02/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले, जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले… आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल, कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल, पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही, का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही, वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे, साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे, मी ज्यांची साथ केली ते मला सोडून दूर गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
लेखनविषय:

वाचने 1738
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुन्दर!

लिहित राहा. -दिलीप बिरुटे

तुमची कविता वाचून, आमच्या घरासमोरचे दोन निष्पर्ण वृक्ष आठवले. कविता आवडली. बरेच काही सांगून गेली.

एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे, साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे,
माचीवरला बुधा आठवला...