म्हण (शतशब्द्कथा)
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?''
नाही बेटा .
''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?''
बघू .
ती म्हण आहे, म्हण .
''काय म्हणू?'''
अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात.
लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं .
''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?''
तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो.
***
जयाकाकू आलेल्या.
सारखं बोलतच रहातात .
म्हणाल्या '' पिंकीला सेंट जोसेफला नाई मिळालं - आम्हालाही नकोच होतं इतकं लांब !''
मी विचारलं '' म्हणजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट ना?''
आई रागावली मला .
काकू पण चिडलेल्या बहुतेक .
उगाचच !
वाचने
5224
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
(No subject)
हा हा हा
खि खि खि
हि हि हि
(No subject)
आवडली कथा.
निरागस!
हलकी- फुलकी
निखळ विनोद
बालपणीचा - काळ सुखाचा
ही हॉ हॉ हॉ! जबरीच!
छान कथा. आवडली.
वा !!
मस्त!
(No subject)
हीहीही. निरागसता लहान मुलांची
In reply to हीहीही. निरागसता लहान मुलांची by रेवती
पोट्टी लय डेंजर असतात...
In reply to पोट्टी लय डेंजर असतात... by बाबा पाटील
बहुधा समजलं तुम्हांला काय म्हणायचं आहे ते.
:ड
(No subject)
निर्मळ मन..
आभार.
मस्तच....
गोड आहे