✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

ख
खटासि खट यांनी
Wed, 02/25/2015 - 13:52  ·  लेख
लेख
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ? ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?) ९. इतर शंका हळू हळू
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
25731 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

तुटक्या विटेची चवथी खोली!

अत्रन्गि पाउस
Wed, 02/25/2015 - 20:23 नवीन
हसून फुटलो आहे *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

परस्पारिक स्वेच्छा सहजीवन

सांजसंध्या
Wed, 03/04/2015 - 07:26 नवीन
परस्पारिक स्वेच्छा सहजीवन विधी >>> :D कुणाचं काय, तर कुणाचं काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो नं!!

सूड
Wed, 03/04/2015 - 14:15 नवीन
हो नं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय

सस्नेह
Wed, 02/25/2015 - 16:41 नवीन
लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>> गांधर्वनाते... तसे, 'गर्दभनाते' हेही चालू शकेल +D
  • Log in or register to post comments

@गर्दभनाते'>>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/25/2015 - 16:46 नवीन
@गर्दभनाते'>>> =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.

खटपट्या
गुरुवार, 02/26/2015 - 02:23 नवीन
आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 17:04 नवीन
सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की घोटाळा आलाचं) ;)
  • Log in or register to post comments

नाव नका काढू त्या सहकाराचं,

खटासि खट
Wed, 02/25/2015 - 23:13 नवीन
नाव नका काढू त्या सहकाराचं, राजू शेट्टीच आठवतात डायरेक्ट ! इथं पण घुस्ले म्हणजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>>

नाखु
Wed, 02/25/2015 - 17:17 नवीन
मराठीत माहेत नाही पण अकाऊंट भाषेत "हायर परचेस" म्हणू शकता. आवश्यक व आवाक्यातील वाटल्यासच शेवटचा हप्ता भरलावर वस्तू मालकी हक्क प्राप्त होतो "हायर" हे फायर व लायर ला फक्त इथेच समानार्थी आहेत.
  • Log in or register to post comments

लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ...

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/25/2015 - 19:10 नवीन
लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... शालिवाहन काळात भटकत भारतात नशीब काढायला आलेल्या एका युरोपियनाने एक पुरातन संस्कृत ग्रंथ चोरून नेला. त्यात दहा प्रकारचे विवाहविधी लिहीलेले होते... वैदीक, राक्षस, गांधर्व, इ इ इ. त्यातला गांधर्वविवाह त्याला फारच आवडला आणि त्याने युरोपमध्ये एक भूमीगत "गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते उघडकीस आल्यावर तो जीव वाचविण्यासाठी कोलंबसच्या जहाजाच्या वाणसामान ठेवण्याच्या खोलीत लपून अमेरिकेला गेला आणि तेथे त्याने सिसिली माफियाच्या सहकार्याने "जागतिक (अमेरिकेत पहिल्यापासून जे काय असतं ते सगळं जागतीकच असतं) अंडरग्राऊंड गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणुन त्याने आपल्या संघटनेचे नांव तिथल्या कॅलिफोर्नियामधिल मूल अमेरिकन (रेड इंडियन) भाषेत भांषांतरीत करून ते सांकेतीक नाव म्हणून वापरायला सुरुवात केली, ते असे होते: जागतिक = लिव, अंडरग्राऊंड = इन, गांधर्वसर्कल = रिलेशन; म्हणुन त्या जीवन पद्धतीला "लिव इन रिलेशन" उर्फ "लिईरि" असे नाव पडले. ही चलाखी सुरुवातीला कोणाच्याच ध्यानात आली नाही आणि जेव्हा ते उघड झाले तेव्हा ते लोकांना इतके आवडले की त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी लिईरि ला कायदेशीर गोष्ट करून टाकली (कॅलिफोर्नियामध्ये असे खूपदा होते). तोच प्राचीन भारतिय गांधर्वविवाह आता पाश्चिमात्य देशांतून परत भारतात (योग चा योगा होऊन आला तंस्सांच्चं अग्दी) आल्यावर ही नविन शिंगे आलेली नविन पिढी त्याला डोक्यावर घेऊन त्याचे आचरण करायला लागली आहे... आणि आचरण न जमणारे आचरट धागे टाकून दुधाची तहान ताकावर भागवताहेत :) ;)
  • Log in or register to post comments

एक्का साहेब धंद्यात भागीदारी

सुबोध खरे
Wed, 02/25/2015 - 19:45 नवीन
एक्का साहेब धंद्यात भागीदारी घेणार काय ? जसे लग्नपूर्वक चाचणी आणि समुपदेशन (premarital counselling) असते तसे सहजीवन पूर्व(pre LIR counselling) समुपदेशनचे दवाखाने काढू या. पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). प्याकेजेस पण देता येतील. गरोदरपण असेल तर वेगळे. आजार झाले तर वेगळे प्याकेज. ब्रेक अप झाल्यास मानसिक समुपदेशनाचे वेगळे. त्यातून गर्भपाताचे पैसे वायले इ इ. वर जमले तर SME चे फायदे घेत येतील का ते हि पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

_/|\_

टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 20:28 नवीन
_/|\_ मला मार्केटिंग साठी घेणार का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ह्या साठी जुनी नोकरी बदलायची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 10:03 नवीन
ह्या साठी जुनी नोकरी बदलायची आवश्यकता नाही. असलेल्या नोकरीमधली २-४ प्रकर्णे हाताळता येतील. माउथ टु माउथ (द्वयार्थ नं काढणे) प्रसिद्धीमुळे धंदा आपोआप वाढेल. त्यामुळे मार्केटींग जॉब पहाण्यापेक्षा एखादी फ्रांचायझी घेउन टाक की. हाकानाका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आमचे एक जुने सहाध्यायी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/25/2015 - 20:33 नवीन
आमचे एक जुने सहाध्यायी म्हणायचे तसे, "प्रयोग करून पाहण्यासारखा आहे" :) पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्‍या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब ! आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्‍यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =)) (गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बूच!!

सूड
Wed, 02/25/2015 - 21:22 नवीन
नो चीटींग, कितलें फावट चेंज करतां!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

म्हंजे काय ?

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/25/2015 - 21:59 नवीन
म्हंजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

किती वेळा बदलताय तो प्रतिसाद?

सूड
Wed, 02/25/2015 - 23:04 नवीन
किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? नवीन म्हणून उघडून पाह्यलं तर, जुन्याच प्रतिसादावर नवीनचा टॅग दिसला. आयदर काहीतरी चेंज झालंय किंवा मिपा गंडलंय. जुन्या मिपावर प्रतिसाद बदलता येऊ नये म्हणून उपप्रतिसाद देऊन ठेवायची पद्धत होती, तेच केलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फक्त स्पेलींग / व्याकरण चुका

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/26/2015 - 00:48 नवीन
फक्त स्पेलींग / व्याकरण चुका दुरुस्त केल्या हो :) ही विनंती करून कोणीही करू शकते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुना ओक विद्यापीठाचे

खटासि खट
Wed, 02/25/2015 - 23:15 नवीन
पुना ओक विद्यापीठाचे विद्यार्थी इकडे पण ? काय खारं नाय ब्वॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उपरोध पुरेसा व्यक्त झालेला

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/26/2015 - 00:49 नवीन
उपरोध पुरेसा व्यक्त झालेला नाही काय ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स

खटासि खट
गुरुवार, 02/26/2015 - 12:20 नवीन
उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स उपरोध आहे, रिव्हर्स स्विंग सारखा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उपरोधावर उपरोध = रिव्हर्स

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/26/2015 - 14:38 नवीन
उपरोधावर उपरोध = रिव्हर्स उपरोध = खरे मत !!! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय

संदीप डांगे
गुरुवार, 02/26/2015 - 03:19 नवीन
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
तुम्ही अजून प्रेषित प्रगो यांच्या पोप संप्रदायाचे सदस्य झालेले दिसत नाही आहात? लौकर दिक्षा घ्या म्हणजे वरिल दोन्ही प्रश्न चटकन सुटतील. मग पुढच्या प्रश्नांची काही आवश्यकता वाटणार नाही कारण पुढची उत्तरे आपोआप निर्माण होतात.
  • Log in or register to post comments

@प्रेषित प्रगो >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/26/2015 - 06:55 नवीन
@प्रेषित प्रगो >>> =))))) योग्य! अगदी योग्य शब्दरचना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/26/2015 - 11:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एकदा सर्व ठरले की लि.री.चा

गवि
गुरुवार, 02/26/2015 - 12:01 नवीन
एकदा सर्व ठरले की लि.री.चा बस्ता मात्र लिरिल सारीज अ‍ॅड कटपीस सेंटर, लाजरा रोड, अंमळनेस या ठिकाणीच. तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.
  • Log in or register to post comments

तीन पिढ्यांपासून विश्वासाचं

पिशी अबोली
गुरुवार, 02/26/2015 - 12:13 नवीन
तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.
१.या तीन पिढ्या लिइरि मधून जन्मलेल्या पुण्यफळांच्या का? २.कधीही तुटू शकतं हा लिइरिचा विश्वास आहे. तो तुमच्याकडे अतूट कसा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तीन पिढ्यांपासून ?

खटासि खट
गुरुवार, 02/26/2015 - 12:22 नवीन
तीन पिढ्यांपासून ? आशिर्वाद द्यावा सर जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक

गवि
गुरुवार, 02/26/2015 - 12:26 नवीन
अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक आहे हो.. आशीर्वाद आहेतच. बिलातही सूट देऊ. लिरीचे ठरले की जोडीने या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

नव्या सिरीयल्स चे नाव "

विजुभाऊ
गुरुवार, 02/26/2015 - 12:24 नवीन
नव्या सिरीयल्स चे नाव " लिव्हीन बन्धन" , गोष्ट एका लिव्हीन ची
  • Log in or register to post comments

नवे गाणी

विजुभाऊ
गुरुवार, 02/26/2015 - 12:26 नवीन
नवे गाणी " निघाले आज.....लिव्हीन च्या घरी " " लेक लाडकी या घरची.होणार लिव्हीन मी त्या घरची "
  • Log in or register to post comments

मग

तिमा
गुरुवार, 02/26/2015 - 19:22 नवीन
मग तिची आई हे गाणं म्हणेल, ओटीत घातली मुलगी लिव्हिण बाई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 19:32 नवीन
हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला पाह्यजे असं काही नाही ना. फक्त, 'लाडकी लेक ही माझी पहिली वहिली, भाग्येच तियेच्या ??? आपली झाली'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

नाय म्हणजे रिकाम्या जागी

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 19:35 नवीन
नाय म्हणजे रिकाम्या जागी लिहीणार काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

आणखी एक.

विजुभाऊ
गुरुवार, 02/26/2015 - 12:27 नवीन
आणखी एक. नेसली....ईईईईईईईईईई लिव्हीन ची साडी.......
  • Log in or register to post comments

बरं अजून एक आठवले

खटासि खट
गुरुवार, 02/26/2015 - 12:39 नवीन
बरं अजून एक आठवले जर लग्न गावाकडे किंवा मुलीच्या घरी झाले तर शहरात पोहोचल्यावर रिसेप्शन द्यावे लागते का ? मंगळागौर, हळदीकुंकू करावे लागते का ? झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?
  • Log in or register to post comments

झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय

सूड
गुरुवार, 02/26/2015 - 14:19 नवीन
झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?
डोहाळजेवण चांदण्यातलं करायचं!! दोघांनीही पांढरे कपडे घालायचे. पदार्थही पांढरे...उकडीचे मोदक, दहीभात, दूधभात. नारळीभात, बासुंदी केली तरी त्यात केशर घालायचं नाही. मुळा, पांढरा कांदा हे भाजीत वापरायचं आणि सगळी चांदण्याशी संबंधित गाणी ऐकत बसायचं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

कै च्या कै. मुलगी काय चि.सौ

काळा पहाड
गुरुवार, 02/26/2015 - 14:22 नवीन
कै च्या कै. मुलगी काय चि.सौ.कां. होती का हे सगळं करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

चि.लि.कां म्हणा की

खटासि खट
गुरुवार, 02/26/2015 - 19:51 नवीन
चि.लि.कां म्हणा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

धागा विषय :

नाखु
गुरुवार, 02/26/2015 - 15:27 नवीन
लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे मार्गदर्शन ला हसवाफसवी मधला शब्द "मागल दर्शन " वापरून लिहा आनि मग बघा.... कशी रांग लागेल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . दर्शन नव्हे सल्ला देणार्यांची..
  • Log in or register to post comments

उत्तरे

ऋषिकेश
गुरुवार, 02/26/2015 - 16:12 नवीन
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
यात सगळ्यात मोठी अडचण आहे जागा. एकदा का 'खोली' गावली का नाय मंग पार्टनर मिळुनच जायेल!
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
कुठेही चालेल. आजकाल मुंबईत यासाठी लोकलचे डब्बे, बसमधील फुडल्या शीटांची पाठ यांची फुल्ल चलती हाय. जरा वेगळ्या प्रकारचे पार्टनर हवे असतील तर सार्वनजिक मुतार्‍यांच्या भितीही ट्राय करू शकता.
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
नाय बा! काय कल्पना नाय!
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
हात साला! जे काय करायचा हाय त्याला खोली पुरते. उंगाच कशाला होल बिल!
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
तुझ्या षौकावर डिपेन् हाय! नैतर हव्वी ती लाँज्री नाय म्हनून पन मानापमान होतात म्हने!
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे
नकोच ते.. ते मदे मदे येत अस्नार! पोशाक टांगायला खिल्ला पण पुरतो, नैरत र्‍हावू दे की जमिनीवर!
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
कोनाकोनाच्या?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
लिव्ह मंजी र्‍हाणे, इन म्हंजी आत नी रिलेशनशिप म्हंजी संबंद आसं मास्तुराने शिकवलेला! म्हणून मी तरी वरची माहिती "आत राहून (ठेवलेल्या) संबंधा"ची दिलेली हाय!! बरुबर अर्थय ना!?
  • Log in or register to post comments

अभ्यास अभ्यास !!

खटासि खट
गुरुवार, 02/26/2015 - 19:53 नवीन
अभ्यास अभ्यास !! नतमस्तक हो ! एक दडवत घ्यावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तुम्हि विवाहित आहत कि अविवहित

यमगर्निकर
Fri, 02/27/2015 - 12:21 नवीन
खटसि खट जर तुमचे लग्न झाले असेल तर सुखाने संसार करा, कशाला नसत्या भानगडित पाय अडकऊन घेत आहात.
  • Log in or register to post comments

त्रैनुभवाचे बोल?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 12:23 नवीन
त्रैनुभवाचे बोल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

अशा प्रतिगामी लोकांच्या

काळा पहाड
Fri, 02/27/2015 - 13:26 नवीन
अशा प्रतिगामी लोकांच्या सल्ल्यामुळेच असे नवीन उपक्रम बंद पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरी हो का.प. दडवत घ्यावा.

खटासि खट
Fri, 02/27/2015 - 14:40 नवीन
जबरी हो का.प. दडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 14:44 नवीन
=)) उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला असता हो. पण काय करणार युज अँड थ्रो वृत्ती नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे??

बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 14:46 नवीन
यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 15:00 नवीन
त्रिदंडी
=)) त्रिदंडानुभव पंथ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी =))

बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 15:08 नवीन
अगदी अगदी =)) =)) त्रिदंडानुभवी त्रिगर्तगामी पंथ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा