Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 02/26/2015 - 14:28
आज श्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री, यांनी २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्वाच्या तरतूदी इथे टाकत आहे. - प्रवासी भाड्यांमधे कुठलीही वाढ नाही. (अर्थात अंतरिम अर्थसंकल्पात केली होती.) - १७००० शौचालये बायो-शौचालयांत रुपांतरित होणार - १३८ नंबरची रेल्वे चौकशीची दूरध्वनी सेवा १ मार्च पासून पुनरुज्जिवित होणार - प्रवाशांच्या तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप बनविणार - ऑपरेशन ५ मिनिट्स. अनारक्षित तिकीट मोबाईलद्वारे ५ मिनिटात काढता येणार. - टीटीईंकडे हँडहेल्ड उपकरण. इ-तिकीट पेपरलेस होणार. - गाडीच्या वेळेसंदर्भात प्रवाशांना एसएमएस अलर्ट येणार. (ही अतिशय स्वागतार्ह सेवा असेल माझ्यामते) - अपंग, वृद्ध यांसाठी अद्ययावत सेवा. - ठराविक गाड्यांमधे २४ ते २६ डबे. अनारक्षित डब्यांची संख्या वाढवणार. - ४०० स्थानकांवर वाय-फाय - पुढच्या ५ वर्षांत रेल्वेमधे ८.५ लक्ष कोटींची गुंतवणूक - नवीन भागीदारी करारांतून दूरगामी आर्थिक परिस्थितीचं बळकटीकरण तसेच, आधुनिक मूलभूत सेवा - ठराविक मार्गांवर महिला डब्यांत सीसीटीव्ही - ए१ वर्गाच्या स्थानकांना वायफाय - प्रवासी सुविधांना ६७% अधिक निधी - १० प्रमुख शहरात सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल - गेल्या वर्षात रेल्वेच्या विधुतीकरणामधे १३३०% वाढ. - स्वच्छ रेल स्वच्छ भारत - स्वच्छतेला प्राधान्य - मुंबई - दिल्ली व मुंबई - कोलकाता प्रवास एका रात्रीत होणार - इस्रो च्या सहभागातून ३४३८ रेल्वे क्रॉसिंग काढून टाकणार - तांत्रिक क्रांतीसाठी 'कायाकल्प' ची घोषणा - २००० कोटींचा कोस्टल कनेक्टिविटी प्रोग्रॅम - कुठल्याही नवीन गाड्यांची घोषणा नाही. माझ्या मते तरी हे एक अतिशय संतुलित रेल्वे बजेट आहे आणि ठरावं. उगाच एवढ्या नवीन ट्रेन तेवढे नवीन मार्ग पेक्षा यात पायाभूत सुविधांकडे संपूर्ण लक्ष दिलेलं आहे. आपले विचार काय?
  • Log in or register to post comments
  • 14609 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 14:35

Permalink

माझे मत इथे अगोदरच दिले

माझे मत इथे अगोदरच दिले असल्याने या ठिकाणी फक्त दुवा देत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 02/26/2015 - 16:41

In reply to माझे मत इथे अगोदरच दिले by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दुवा चुकलाय काय सर..?

दुवा चुकलाय काय सर..?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 18:49

In reply to दुवा चुकलाय काय सर..? by असंका

Permalink

दुवा चुकला होता. आता सुधारला

दुवा चुकला होता. आता सुधारला आहे. ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर बी. on गुरुवार, 02/26/2015 - 14:37

Permalink

खुप सन्तुलित बजेट!

हो..उगाचच बाता मार्ल्या नाहित..खुप सन्तुलित बजेट!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 02/26/2015 - 15:22

Permalink

चांगला बजेट

कधीही सुरू ना होणार्‍या गाड्यांची केवळ लोकप्रिय घोषणा न करण्याचा निर्णय सर्वोत्तम ! रेल्वेमध्ये एफ डी आय किंवा पीपीपी आला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/26/2015 - 17:07

Permalink

मोदी सरकारच्य ट्रेण्डच्या

मोदी सरकारच्य ट्रेण्डच्या विपरीत बडबड कमी आणि तुलनेने सबस्टन्स जास्त असे बजेट आहे. अर्थात लय भारी वगैरे नसले तरी एकुणात बजेट आवडले. नागरीकांना 'ग्राहक' समजण्याकडे वाटचाल सुरू करणारे समंजस बजेट असे वर्णन करेन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 02/26/2015 - 17:09

Permalink

अत्यंत निराशाजनक

बजेट. नुकत्याच निर्माण झालेल्या 'नव्या नॉर्म्स'च्या संदर्भात ह्यात काय आनंद मानण्यासारखे आहे? ह्यापुढे ज्या बजेटांत रेल्वे प्रवास व मालवाहतूक विनामूल्य असतील, त्यालाच माझा पाठिंबा राहील :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 02/26/2015 - 17:22

In reply to अत्यंत निराशाजनक by प्रदीप

Permalink

हाणु(न)मोदन

हाणु(न)मोदन
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/26/2015 - 17:35

In reply to अत्यंत निराशाजनक by प्रदीप

Permalink

अगदी अगदी....

झालंच तर त्यात एसी, वायफाय, पंचतारांकित सुविधाही पाहिजेतच! शेवटी तो हक्क आहे आपला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 19:25

In reply to अगदी अगदी.... by बॅटमॅन

Permalink

हाय

वायफाय हाय! - ४०० स्थानकांवर असणार आहे. :) बाकी फुकटात काही नसल्याने निषेधच करायला हवा! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 18:53

In reply to अत्यंत निराशाजनक by प्रदीप

Permalink

हो ना ! पण, तुमच्या लीष्टीतून

हो ना ! पण, तुमच्या लीष्टीतून घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी लागणारे टॅक्सीभाडे वगळल्याबद्दल टुम्चा टीव्र म्हंजे यकदम् टीव्र णीषेढ :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 02/27/2015 - 07:30

In reply to हो ना ! पण, तुमच्या लीष्टीतून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

बरोबर

पण त्या फुकट टॅक्सीभाड्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत. शेवटी निवडून दिले आहे कशाला, ऑ? ज्या ज्या सरकारला आम्ही निवडून देतो, त्या त्या सरकारांनी सगळेच मोफत देण्याची हमी द्यायलाच हवी, इतकेच नव्हे, तर निवडून आल्या आल्या त्याची अंमलबजावणी करण्याची तीव्र इच्चा- इच्चा-- इच्छाशक्तीही दाखवली पायजेल आहे, काय समजलात?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 02/27/2015 - 11:46

In reply to बरोबर by प्रदीप

Permalink

सगळंच फुकट ? तुमचा जन्मसुध्दा

सगळंच फुकट ? तुमचा जन्मसुध्दा फुकटच झालाय असं वाटतं. (क्रु.ह.घे.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 02/27/2015 - 14:50

In reply to सगळंच फुकट ? तुमचा जन्मसुध्दा by प्रमोद देर्देकर

Permalink

हा, हा...

नुकत्याच निर्माण झालेल्या 'नव्या नॉर्म्स'च्या संदर्भात ह्यात काय आनंद मानण्यासारखे आहे? ह्यापुढे ज्या बजेटांत रेल्वे प्रवास व मालवाहतूक विनामूल्य असतील, त्यालाच माझा पाठिंबा राहील :)
हे माझ्या प्रथम प्रतिसादातील वाचले नाही, किंवा वाचून त्यातील उपरोध समजला नाही? म्हणजे तुमचे खर्चिक जीवन एकतर लिहीलेले/सांगितलेले न समजण्याच्या कुवतीने अथवा विनोदाचे वावडे असल्याने फुकटच आहे असे वाटते (कॄ. हेही ह. घे).
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 18:42

In reply to हा, हा... by प्रदीप

Permalink

उपरोध सगळ्यांना समजेलचं असं

=)) उपरोध सगळ्यांना समजेलचं असं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 02/27/2015 - 18:59

In reply to उपरोध सगळ्यांना समजेलचं असं by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कहीपे निगाहें कहीपे निशाना...

कहीपे निगाहें कहीपे निशाना...?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 22:42

In reply to कहीपे निगाहें कहीपे निशाना... by असंका

Permalink

नाही. जनरल स्टेटमेंट.

नाही. जनरल स्टेटमेंट.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 11:00

In reply to हो ना ! पण, तुमच्या लीष्टीतून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

नाही मी काय म्हणतो. रेल्वेने

नाही मी काय म्हणतो. रेल्वेने प्रवास केल्याबद्दल तिकिटाच्या किंमतीच्या ५००% रक्कम रेल्वेने दिली पाहिजे की नै रेल्वे मंत्रालयानी? तशी तरतुद नं केल्याबद्दल णव्या बजेटचा तीव्र णिषेध. तसचं घरातुन उचलुन थेट ए.सी. टॅक्सी ने सीटवर नेउन ठेवायची तरतुद नं केल्याबद्दल अण्णा ठणाणा आंदोलन करणारेत म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 02/26/2015 - 17:24

Permalink

एकाही नवीन ट्रेनची घोषणा न

एकाही नवीन ट्रेनची घोषणा न करणे हे मला अत्यंत वास्तववादी वाटले. रेल्वे मंत्रालयाने पुरेसा गृहपाठ केलेला दिसतोय या वेळेस.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 02/26/2015 - 17:27

In reply to एकाही नवीन ट्रेनची घोषणा न by आनन्दा

Permalink

यावेळेस कुणाच्यातरी वाट्याला

यावेळेस कुणाच्यातरी वाट्याला काहीतरी येण्यापेक्षा प्रवाश्यांच्या वाट्याला काय यायचे ते आले.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 02/26/2015 - 17:58

Permalink

नवीन भागीदारी करारांतून

नवीन भागीदारी करारांतून दूरगामी आर्थिक परिस्थितीचं बळकटीकरण तसेच, आधुनिक मूलभूत सेवा म्हणजेच PPP का ??
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 02/26/2015 - 18:28

Permalink

अत्यंत निराशाजनक बजेट

अत्यंत निराशाजनक बजेट कोकणी माणसाला नोकरी देण्याचा उल्लेख नाही विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत मराठवाड्याचा अनुशेष भरला नाही पश्चिम महाराष्ट्रासाठी प्याकेज नाही महाराष्ट्राचा रेल्वे मंत्री असून नागपूर ते चंद्रपूर साठी काहीच नाही मुंबईत वातानुकुलीत लोकल प्रवास फुकट देण्याबद्दल तर अवाक्षर नाही . गेला बाजार भाडे निम्मे तरी करा सुरेश प्रभूंचा निषेध असो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 02/26/2015 - 18:35

In reply to अत्यंत निराशाजनक बजेट by सुबोध खरे

Permalink

आयला ही तळमळ की खौच्ट्प्णा

आयला ही तळमळ की खौच्ट्प्णा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 18:55

In reply to आयला ही तळमळ की खौच्ट्प्णा by टवाळ कार्टा

Permalink

किती दीस झाले म्हनावे मिपावर

किती दीस झाले म्हनावे मिपावर तुमाला ?! +D
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 02/26/2015 - 19:23

In reply to किती दीस झाले म्हनावे मिपावर by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दोन्ही प्रकारे वाटले म्हणून

दोन्ही प्रकारे वाटले म्हणून कंफूज झालो :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 02/27/2015 - 08:34

In reply to दोन्ही प्रकारे वाटले म्हणून by टवाळ कार्टा

Permalink

टका

"नीट"* वाचशील तरच नीट वाचशील ! "नीट" : तीर्थपक्षींचा आवडता शब्द
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/27/2015 - 11:29

In reply to टका by नाखु

Permalink

समजले...

समजले... :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/27/2015 - 19:30

In reply to समजले... by टवाळ कार्टा

Permalink

हांग अश्शी, ज्याच्या त्याच्या

हांग अश्शी, ज्याच्या त्याच्या जबानीत सांगितलं की लगोलग कळ्ते +D
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/27/2015 - 22:00

In reply to हांग अश्शी, ज्याच्या त्याच्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

नै हो...मी फक्त पक्षीवाला पण

नै हो...मी फक्त पक्षीवाला पण तीर्थवाल्यांबरोबर बसणारा :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 02/28/2015 - 15:12

In reply to नै हो...मी फक्त पक्षीवाला पण by टवाळ कार्टा

Permalink

सेम हेअर

टक्याचा साथीदार.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 02/26/2015 - 19:17

Permalink

हम्म

व्यवहारी बजेट दिस्तेय. एकाही नविन गाडीची घोषणा नसल्याने "स्वतःच्या राज्याला झुकते माप" हा आरोप सुरेशवर होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 19:28

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

होना

तसेच नरेंद्रचे पण कौतुक आहे, सुरेशला अर्थसंकल्प तयार करायचे स्वातंत्र्य दिलेले दिसतेय...
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/26/2015 - 20:16

In reply to होना by विकास

Permalink

असं कोण म्हणतय ?

'हे' का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 20:24

In reply to असं कोण म्हणतय ? by अर्धवटराव

Permalink

नाय बा!

नाय बा! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 03/02/2015 - 00:04

In reply to असं कोण म्हणतय ? by अर्धवटराव

Permalink

ओ

'हे' सध्या 'तसल्या' सायटी उघडून बसतात असं माई सांगत होत्या. बाकी माईंचं वय बघता 'हे' एकतर नव्वदीत तरी असावेत किंवा माईंनी खूपच कमी वयाच्या म्हातार्‍याबरोबर सूत जुळवलं असावं. पहिल्या प्रकारात 'हे' ना हे शोभत नाही आणि दुसर्‍या प्रकारात माईंना.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 03/02/2015 - 07:16

In reply to ओ by काळा पहाड

Permalink

तुम्हाला मोड नै येत का हो? ऑन

तुम्हाला मोड नै येत का हो? ऑन ऑफ करावेत. नाहीतर ब्लॅक माउंटन आणि मोडकारांमधला फरक कसा कळायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/26/2015 - 20:36

Permalink

बरा आहे रेल्वेचा अर्थसंकल्प.

वास्तववादी वाटतोय. ज्या कारणाने मोदोंनी प्रभूंना हि जबाबदारी दिली ति सार्थक करण्याकडे पाऊल टाकलय बजेटने. उधोजी नेहमीप्रमाणे आंबट चेहेरा करुन बसलेत बजेटच्या नावे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 20:39

In reply to बरा आहे रेल्वेचा अर्थसंकल्प. by अर्धवटराव

Permalink

संधी

जर आधीच प्रभूंना रेल्वेमंत्रीपदासाठी होकार दिला असता तर ह्या बजेटचे श्रेय किंचीत का होईना शिवसेनेच्या गळ्यात पडू शकले असते...
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/26/2015 - 21:37

In reply to संधी by विकास

Permalink

ते तर नेहेमीचच रडगाणं आहे सेनेचं.

आणि त्यांना पश्चातबुद्धी पण नसते. एका अर्थी बरच झालं प्रभू सेनेतर्फे मंत्री नाहि झाले ते. उधोजींनी उगाच फालतु भूणभूण लावली असती त्यांच्यामागे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 20:53

Permalink

गंगा माता आणि भववान भद्रीविशाल

आत्ताच वाचनात आल्याप्रमाणे, उत्तराखंडला या अर्थसंकल्पात डावलले गेल्याने "गंगा माता आणि भववान भद्रीविशाल" सुरेश प्रभूंवर कोपणार आहेत असे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने जाहीर केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/26/2015 - 20:56

Permalink

जे न देखे इतर माध्यमे ते देखे एन डी टि व्ही

एनडीटिव्हीने रेल्वे अर्थसंकल्पामुळे शेअरबाजार कोसळला असल्यासारखी वक्तव्ये केली आहेत. पण तसे इतर माध्यमे म्हणताना दिसत नाही. (एनडीटिव्ही: Why Suresh Prabhu's Rail Budget Failed the Dalal Street Test).
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 02/27/2015 - 01:43

Permalink

ह्या बजेट मध्ये फ्री वायफाय

ह्या बजेट मध्ये फ्री वायफाय नाही. तिकीट दरात ५०% सवलत नाही. हे बजेट आम आदमीच्या मुळावर आले आहे त्याचा निषेध लवकरच प्रभू चरणी धरणा द्यायचा मनसुबा आहे फ़्री पार्टी अवांतर समाजवादी पक्षांच्या महाबली नेत्याच्या राजकीय सोयारीकीत भांडवलशाही साज शृंगार चढवला म्हणून त्याच्या निषेधार्थ पाटली पुत्र नगरीत सुद्धा धरणा आहे . तेथे आमच्या खान पण ची फ्री सोय पक्षातर्फे होणार आहे .
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 02/27/2015 - 06:13

Permalink

कुठल्याही पोकळ घोषणा नसलेले

कुठल्याही पोकळ घोषणा नसलेले,सुधारणांकडे वाव असणारं संतुलित बजेट.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 02/27/2015 - 08:54

Permalink

मुंबईसाठी ठीक-ठाक बजेट

गेल्या वर्षीच्या अंतरीम रेल्वे बजेटमध्ये सदानंद गौडा यांनी प्रवासी भाडेवाढ केली होती. तेव्हा सुरेश प्रभू यंदा करणार नाहीत हा होरा होताच. तो बरोबर ठरला. मात्र, मालवाहतूक दरात काही भाडेवाढ झाली असल्याचे समजते. नक्की किती आणि त्याचा परिणाम (इतर भाववाढीवर) किती होईल, याचा अंदाज नाही. मुंबईकर म्हणून ३ गोष्टी विशेष वाटल्या - ऐरोळी-कल्याण उन्नत मार्गासाठी, पनवेल-कर्जत मार्गासाठी आणि विरार-डहाणू चौपदरीकरणाठी प्रावधान. बाकी, रेल्वे बजेटनंतर शेयर बाजार का कोसळला याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 02/27/2015 - 14:50

In reply to मुंबईसाठी ठीक-ठाक बजेट by सुनील

Permalink

प्रवासी भाडेवाढ

ही तर काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांमुळे या बजेटमध्ये नहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Fri, 02/27/2015 - 09:17

Permalink

गेल्या २०-२५ वर्षात घोषित

गेल्या २०-२५ वर्षात घोषित केलेल्या किती गाड्या प्रत्यक्षात रुळावरून धावतायेत ? घोषित केलेले किती रेल्वे मार्ग प्रत्यक्षात बांधण्यात आले? नुसत्याच घोषणा करण्यापेक्षा यावेळेच बजेट संतुलित वाटतंय
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 02/27/2015 - 15:08

Permalink

जिथे रेल्वे आहे तिथे अधिक

जिथे रेल्वे आहे तिथे अधिक सुविधा (ए१ वर्गाच्या स्थानकांना वायफाय- प्रवासी सुविधांना ६७% अधिक निधी ,ऑपरेशन ५ मिनिट्स. अनारक्षित तिकीट मोबाईलद्वारे ५ मिनिटात काढता येणार वगैरे वगैरे). मराठवाड्या सारखा उपेक्षीत भाग तसाच उपेक्षीत .
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 02/27/2015 - 18:40

Permalink

हे राहिले......

सध्या अपंग, सैनिक, कॅन्सर पेशंट, ई ना प्रत्यक्ष जाउन आपले कन्सेशनल तिकीट काढावे लागते. माझ्या माहितीप्रमाणे अशाना वेगळी लाईन नाही. अशाना सुद्धा इतरांप्रमाणे घरी बसून आपले कन्सेशनल ई तिकीट काढता आले पाहिजे. ते या बजेटात काही दिसले नाही. त्याना एक कन्सेशनल आय डी देऊन त्यांच्या कन्सेशनचे व्हॅलीडेशन व त्याची मुदत ही सिस्टीम मधून तपासता येणे शक्य आहे. बाकी दुरूपयोग केला किंवा कसे हे प्रत्यक्ष प्रवासात टी सी, इ तिकिट प्रमाणे पाहू शकेलच ना !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/27/2015 - 19:38

In reply to हे राहिले...... by चौकटराजा

Permalink

अतिशय उत्तम सूचना !

अतिशय उत्तम सूचना ! अश्या सूचनांसाठी लोकल सर्कल नावचे संस्थळ फार उपयोगी आहे. येथे दिलेले सल्ले / सूचना खुद्द मध्यवर्ती मंत्रालयापर्यत पोचाव्यात अशी सोय आहे. अर्थात हे तुम्हाला माहीत असेलच. पण तिथे ही सूचना टाकल्यास उपयोगी असेल असे वाटल्याने लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 02/28/2015 - 13:27

In reply to हे राहिले...... by चौकटराजा

Permalink

आहे

वेगळी लाईन असते. मी स्वतः गुड्गांव व दिल्ली ला पाहिली आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com